Samarpan - 13 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | समर्पण - १३

Featured Books
Categories
Share

समर्पण - १३

समर्पण-१३

कैसे समझेगा कोई,
तेरे मेरे रिश्ते कि गहराई ।
सिमटा है तू मुझमे ऐसे,
जैसे हो मेरी परछाई ।


माझ्या प्रत्येक अडचणीत विक्रम माझी सावली म्हणून उभा असायचा. आम्हाला एकमेकांची इतकी सवय झाली होती की कोणतीही छोटी गोष्ट आमच्या आयुष्यात घडली तर आम्ही बैचेन असायचो एकमेकांना सांगण्यासाठी. विक्रम ने मला माझं आणि अभय च नातं सावरण्यासाठी तर मदत केलीच पण माझ्या करीअर साठी पण मला तो खुप प्रोत्साहन द्यायचा. तो मला नेहमी बोलायचा,

"सोनू तू इतकी हुशार आहेस, एवढ तुझं शिक्षण झालयं, तुझ्या करीअर वर लक्ष दे...घर, संसार या गोष्टी आयुष्यभर आहेतच पण तुझं स्वतःच अस्तित्व जप...तू कोणावरही अवलंबून राहू नको कोणत्याच गोष्टी साठी...खुप चांगलं करीअर कर, मोठी ऑफिसर हो....मग मलाही अभिमानाने सांगता येईल सगळ्यांना की ही माझी स्पेशल मैत्रीण आहे...किती स्पेशल आहे हे नाही सांगणार 😜😜 पण तू मला नंतर विसरणार तर नाही ना...मी ना एक काम करेल, तुझा ड्राइवर बनून तुझ्या सोबतच राहील😂😂😂"

वेडा होता....काहिपण बोलून मला हसवायचा आणि जाता जाता मात्र तितक्याच पटीने माझ्या डोळ्यात अश्रु देऊन गेला आणि त्यापेक्षा जास्त पटींचे दुःख मनात घेऊन गेला, कायम हसणारा आणि दुसर्यांना हसवणारा माझा विक्रम शांत झाला.....

----------------------------------------------------–------------

महाबळेश्वर ला जायची माझी अन अभय ची तयारी पूर्ण झाली. अभयला ड्राइविंग खूप आवडतं त्यामुळे आम्ही कार ने जायचं ठरवलं, त्याच्या उद्देश एकच होता की मला आणि अभयला जास्तीत जास्त वेळ सोबत घालवता यावा....जायच्या आधी एकदा तरी विक्रम शी बोलावं म्हणून त्याला मी फोन केला,

"बोल सोनू, झाली तयारी जायची?"

"हो😑😑"

"आता काय झालं? का मूड ऑफ आहे?....आणि खर खर सांगायचं, तुला माहीत आहे तू काहिच लपवू शकत नाही माझ्यापासून... कॅमेरे लावलेत ना मी😜😜"

"तू खूप खराब आहेस विक्रम 😫😫, कधीतरी मला तुझ्यावर चिडायचा चान्स दे...आधीच कस सगळं ओळखून घेतो"

"जस तू सगळं माझ्या बाबतीत ओळखून घेते तसंच... आपण फक्त शरीराने वेगळे आहोत सोनू, आपली मन मात्र एकच आहेत...कैसा लगा मेरा डायलॉग😝😝"

"कधीतरी सिरिअस हो गधड्या..."

"मी गधडा तर तू गधडी... बघ, बोलायचं एक असतं अन बोलतो वेगळंच आपण मुद्दा सोडून"

"आपण नाही तू, तूच काहीपण बोलतो"

"मी बोलतो तर तू पण त्यात शामिल होतेच ना, खर तर काय आहे ना आपण कोणत्याही विषयावर गप्पा मारू शकतो😜"

"हो ते तर आहेच, तुझ्याशी बोलताना विचार नाही करावा लागत मला"

"चल मग सांग पटकन का अपसेट आहेस?"

"काही नाही, मला ना खूप अस्वस्थ वाटत आहे, खूप दडपण आल्यासारख वाटत आहे रे, अस अभय सोबत पहिल्यांदाच जात आहे ना बाहेर, न त्यात तुझ्याशी पण बोलता नाही येणार काही अडचण असेल तर...."

"अग, त्यात काय एवढ, अभय कोणी दुसरा थोडीच आहे...तू जर आता अस वागशील ना तर त्याची मेहनत वाया जाईल सगळी आणि मी कुठेच गेलो नाहीये, फक्त एवढंच आहे हा वेळ फक्त तुझा आणि अभयचा आहे सोनू, हाच चान्स आहे तुला सगळं काही व्यवस्थित करायला त्यामुळे आता तु माझा नाही अभय चा विचार कर, आणि बघ जेंव्हा तो तूझ्या सोबत असेल ना तुला या गरिबाची आठवण पण येणार नाही 😂😂"

"काय विक्रम काही पण बोलतो तू, मी तुला कधीच विसरू शकत नाही...आणि मी नसणार तर तुला तर नाहीच येणार ना माझी आठवण, तू तर चार दिवस एकदम शांतीत जगशील ना😜😜"

"सोनू प्लिज...तुला वाटत का मी तुला विसरेन कधी? तू जरी मला रोज भेटत नसली ना तरी एक समाधान असत की आपण एकाच शहरात आहोत, तू माझ्या आसपास आहेस आणि तू मुंबई च्या बाहेर जात आहेस..आता तर मला भीती वाटत आहे की कदाचित मी तुला कायमची गमावणार आहे😔😔"

"सॉरी विक्रम, मी मजाक करत होती, नको इतका नाराज होऊस प्लिज..."

"बघ, संगत का असर झालाच ना शेवटी माझ्यावर, तू मला तुझ्यासारखच रडक बनवत आहेस...लवकरचं तुझ्यापासून सुटका करायला पाहिजे🤣🤣"

"नालायका, आता तर तुझी सुटका नाहीच समज, मी दूर गेली ना तरी तुझ्या स्वप्नात येऊन त्रास देईन तुला"

"बघू कोण कोणाच्या स्वप्नात येतं... पण सध्या तू अभय चे स्वप्न बघ...पण मनाच्या छोट्याश्या कोपऱ्यात माझी जागा ठेवशील ना ग"

"हे तर मी तुला पण सांगायला पाहिजे ना विक्रम...भले ही दिशा सोबत रहा पण कधीतरी चुकून माझी आठवण काढशील ना"

आपला आत्मा जाणत असतो काय योग्य आहे आणि काय अयोग्य, पण प्रश्न तर मनाचा आहे ना ! मनालाच समजावणं खुप कठीण असतं. मला आणि विक्रम ला महित होत आम्ही एकमेकांचे कधीच होऊ शकत नाही पण तरीही, कधीतरी त्याला अभय चा हेवा वाटायचा, अभय माझ्या सोबत असल्यावर त्याच्या बदल थोडीशी ईर्षा विक्रमला ही जाणवायची...मलाही माहीत होत की दिशा विक्रम ची जीवनसंगिनी आहे पण तरीही मला कधी कधी वाईट वाटायच जेंव्हा विक्रम फक्त दिशाबद्दल बोलायचा...पण या भावना आमच्या क्षणिक असायच्या...त्यापेक्षा ही जास्त आमचं प्रेम होतं जे या सगळ्या मत्सर भावनांवर हावी व्हायचं..आणि हाच आमच्या प्रेमाचा विजय होता...आम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही सोबत राहावं, आमची अपेक्षा ही होती की आम्ही आमच्या जोडीदाराला साथ देताना एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं, एकमेकांना मानसिक आधार द्यावा...पण हे कितपत शक्य होणार होत हे माहीत नव्हतं.........

------------------------------------------––---------------------

भल्या पहाटे मी आणि अभय महाबळेश्वर साठी निघालो. थोडा वेळ गाडीत खूप शांतता होती, कारण ही पहिलीच वेळ होती जेंव्हा मी अन अभय असा एकत्र होतो..माझं लक्ष मात्र फोन कडे होत की कदाचित विक्रम मेसेज करेल, मला माहित होतं की विक्रम मला कॉन्टॅक्ट करणार नाही पण तरीही माझं मन मात्र मानायला तयार नव्हतं... आमची शांतता भंग करत अभय बोलला,

"मॅडम...मी ड्राइवर नाही आपला 😉...नवरा आहे ..बोल काहीतरी, सारखं सारखं फोन मध्ये काय आहे"

आता मात्र माझी तंद्री भंगली आणि मला विक्रम च बोलणं आठवलं, "सोनू, तुझा सगळा वेळ अभय ला दे, माझ्या फोन ची वाट नको पाहू, मी फोन नाही केला तरी तू मात्र माझ्या जवळच आहे हे विसरू नको....अभय ची काळजी घे"

आणि मी फोन बंद करून बॅग मध्ये ठेवला आणि आता फक्त आणि फक्त अभय कडे लक्ष द्यायचं हे ठरवून त्याला बोलली,

"😊😊 घे केला फोन बंद, आता दे बायको कडे लक्ष..."

"लक्ष द्यायचं आहे त्यामुळे च एवढ्या सुट्या घेऊन आलो आहे ना आपण..."

अस बोलून त्याने एक हॅट स्टेरिंग वर ठेवत, दुसऱ्या हाताने माझा हात घट्ट पकडला, मी सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने मानेनेच नकार दिला हात सोडायला, आणि माझ्याकडे बघून मिश्कीलपणे हसला,

"अभय, सोड ना प्लिज...बघ घाटाचा रस्ता आहे ड्राइविंग वर लक्ष दे, आता आपण सोबतच आहोत ना..."

"हम्म..घे सोडला..अजून थोडा वेळ...मग मी पण बघतो मला सोडून कुठे पळतेस तर😜"

अभय च्या या बोलण्यावर मात्र मला घामच फुटला..पण अभय मात्र त्याच्या बाजूने जेवढ शक्य आहे तेवढ वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत होता...अभय चे हे रंग मी पहिल्यांदाच पाहत होती...नेहमीच धीर गंभीर असणारा अभय असा पण असू शकतो याचा विचार मी केला नव्हता...
------------------------------------------------------------------

सहा सात तासांचा प्रवास करून आम्ही पाचगणी ला पोचलो. तसं तर गाडीत बसल्या बसल्या मला झोप यायला लागते पण आज अभय सोबत एवढा प्रवास करूनही मला झोप नाही लागली आज...एक प्रकारचं टेन्शन होतं, हुरहुर होती, माहीत नाही काय होत होतं, पण सगळं काही अजबच घडत होतं, त्यात विक्रम ला काही बोलता ही येत नव्हतं... अभय मात्र मला कम्फर्टेबल वाटावं म्हणून प्रयत्न करत होता...

पाचगणी च वातावरण मात्र खूप प्रसन्न वाटत होतं...थंड थंड वारा, सगळीकडे हिरवळ...आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं ते हॉटेल..सगळं काही अप्रतिम... आम्ही हॉटेल मध्ये चेक इन केलं आणि रूम मध्ये गेल्यावर जेंव्हा मी खिडकी उघडली... आणि थंड हवेची एक झुळूक मला स्पर्शून गेली आणि माझ्या तोंडातून नकळतपणे निघालं.."विक्रम"....

"काय झालं नैना..काही बोललीस?"

मागे वळून बघितलं तर अभय होता...आणि जस काही मी झोपेतून जागी झाल्यासारखी स्वतःलाच बोलली..."विक्रम नाही नैना.. अभय..अभय आहे तुझ्याबरोबर"...आणि अभय ला उत्तरली,

"ना..नाही...काही नाही...छान आहे ना रूम आणि बाहेर पण किती छान वाटतं आहे, हेच सांगायचं होतं..."

अभय माझ्या जवळ आला अन माझ्या गालावर हात ठेवत बोलला,

"हे बघ नैना, मी तुला इथे यासाठी घेऊन आलो की इतके दिवस आपल्या मध्ये जे औपचारिक नात होतं त्याची जागा आता प्रेमाने घ्यावी...तू का एवढा विचार करून बोलतेस माझ्यासोबत....मोकळेपणाने बोल...मला तुझ्या कोणत्याही गोष्टीच वाईट वाटणार नाही....चल फ्रेश हो आपण कॉफी घेऊ..."

मी आणि अभय सायंकाळी कॉफी संपवून बाहेर फेरफटका मारायला निघालो...थोडंस फिरल्यावर आणि थोडीफार शॉपिंग केल्यावर आम्ही बागेत जाऊन बसलो... मावळतीला आलेला सूर्य आणि त्याच्या बाजूला पसरलेल्या केशरी रंगांच्या छटा पाहून मला विक्रम ची आठवण आली, तो सायंकाळी सूर्याचा केशरी रंग पाहून मला बोलायचा, " सोनू, एक तर माणसाचा रंग गोरा असतो, काळा असतो किंवा सावळा असतो, पण तुझा रंग नागपूर च्या संत्रासारखा नारंगी आहे 😜😜"
तो असा बोलला की मी रागवायची मग तो बोलायचा,

"नको रागवू ग, नारंगी फक्त संत्राच नसतो, सूर्य मावळताना कधी बघितलायेस...किती छान रंग सोडून जातो.. तुझा रंग पण अगदी तसाच आहे...आपल्याला वाटतं सूर्य मावळला आहे पण सुर्य कधीच मावळत नाही, फक्त थोड्यावेळासाठी लपतो...आणि त्या गोष्टीचा पुरावा आहे सूर्याचा तो केशरी रंग...तोच रंग सूर्य उगवताना ही दिसतो...सूर्य कोणत्याही परिस्थितीत आपला रंग बदलत नाही...तशीच तू आहेस माझ्यासाठी.. तू माझ्या साठी कधीच बदलणार नाहीस...तुझं तेज मला माझ्या प्रत्येक काळात प्रोत्साहन देत राहील..."

विक्रम चे शब्द आठवून माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं, अभय मात्र माझ्याकडे बघून खुश होता, त्याला वाटत होतं की त्याचा मला इथे आणण्याचा निर्णय अगदी योग्य होता...खूप वेळ तिथे बसल्यावर आम्ही हॉटेल ला परत आलो...अभय दिवसभर गाडी चालवून थकला होता आणि मी पण दमली होती त्यामुळे आम्ही रात्रीच जेवण रूममध्येच ऑर्डर केलं...जेवण झाल्यावर आम्ही झोपायच्या तयारीत होतो तेवढ्यात अभयचा फोन वाजला, फोन ला नेटवर्क मिळत नसल्यामुळे अभय बाहेर गेला बोलण्यासाठी... मला खूप प्रकर्षाने वाटत होतं की विक्रम ला एखादा मेसेज तरी करावा पण पुन्हा विचार केला इतक्या रात्री मेसेज करणं योग्य नाही... माझ्यामुळे विक्रम आणि दिशामध्ये काही प्रॉब्लेम नको व्हायला पण तरीही माझं मन शांत होत नव्हतं आणि न राहवून मी विक्रम ला मेसेज केलाच...
📱"मिसिंग यु, विक्रम.."

आणि शुन्य मिनिटात विक्रम चा रिप्लाय आला,

📱"सोनू...खूप खूप आठवण येत आहे तुझी..पण इतक्या रात्री का मेसेज केला, सगळं ठीक आहे ना...अभय ठीक आहे का..काही प्रॉब्लेम झाला का तुमच्यात?"

📱"काही काळजी नको करू, सगळं ठीक आहे...खूप छान आहे इथे सगळंच... फक्त तूच नाहीस😔😔"

📱"वेडी आहेस का सोनू...मी तुझ्यासोबतच आहे नेहमी, एक क्षणा साठीही तू लांब नाहीस माझ्यापासून...पण अभय चा विचार कर, तू असा चेहरा उतरवल्यावर त्याला कस वाटेल...माझी सोनू समजदार आहे ना...मी आहे तुझ्या सोबतच नको काळजी करू..."

विक्रम शी बोलल्यावर खूप हलकं वाटत होतं...माझा एक मेसेज गेला आणि त्याचे किती प्रश्न मला...किती काळजी करतो तो माझी...असाच...असाच हवा तो मला माझ्या आयुष्यात..माझ्या मनातल ओळखणारा... माझं मन हलकं करणारा...हाच विचार मी मनाशी करत खिडकीतून थंड वारा अनुभवत होती..मी माझ्याच विचारात मग्न असताना अभय ने मागुन येऊन मला कधी मिठी मारली मला कळलच नाही,

"माझाच विचार करत होतीस ना नैना? तुलाही नाही राहवत ना आता लांब माझ्यापासून..."

"अभय...ऐक ना...मला ना..."

"हो...माहीत आहे तू दमलीस, एवढस सांगण्यासाठी किती विचार करशील..."
अभयने मिठी सैल केली आणि माझ्या समोर येऊन माझ्या डोळ्यात बघत बोलला,

"माझ्याकडे बघ, तुला वाटतं तुझ्या मनाविरुद्ध मी काही करेल...पण मी तुला आधीही बोललो आहे, मी सगळं सहन करू शकतो, तू म्हणशील तर आयुष्यभर तुला हातही लावणार नाही..पण काहीही लपवू नको माझ्यापासून...खर सांगायचं तर खोटं आणि धोका या गोष्टी माझ्यातला राक्षस जागृत करतात ...पण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे...त्यामुळे रिलॅक्स होऊन झोप"

आणि अभय ने माझ्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले..रात्री झोपतानाही अभयने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता...मी दिवसेंदिवस अभय ची जिद्द बनत जात होती...अभय च्या मनात काय चालू होतं याचा काहीच अंदाज मला येत नव्हता..पण मला प्रामाणिक पणे वाटत होतं की जर अभय इतकं सगळं करतो आहे माझ्यासाठी तर मी पण त्याला विक्रम बदल सांगून द्यावं....मी तर मनाने ठरवलच होत की मी अभय सोबत नवीन आयुष्य सुरू करणार आणि त्याला कोणत्याच गोष्टि साठी दुखावणार नाही पण येणारा काळ माझ्यासाठी काय वादळ घेऊन येणार होता हे मला माहीत नव्हतं.....

--------------------------------------------------------------------

क्रमशः