Sparsh - 12 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 12)

Featured Books
Categories
Share

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 12)




कुछ गुजरे है वो पल
दिन - रात के घने कोहरे मे
घाव तो बडे बेदर्द दिये तुने
फिर भी किसींसे केहना तुमहें मंजूर नही ...


आजही मृन्मय ऑफीसवरून उशिराच परत आला होता ..नित्याने खायला त्याच्या सर्व आवडीच्याच वस्तू बनविल्या होत्या ..मृन्मय फ्रेश होताच नित्याने जेवण वाढायला घेतलं आणि त्याने आपल्यासोबत एक शब्द बोलावा या आशेने ती त्याला जेवण वाढत होती तर मृन्मय केवळ इशारा करूनच तिला हे नकोय की हे हवं ते सांगत होता ..त्याच्या वागण्यावरून त्यांच्यात काहीतरी वाद झाले आहेत हे सर्वाना कळून चुकलं होत आणि हे बघून सासूबाई मनोमन खुश झाल्या होत्या ..परंतु त्यांच्यात वाद मिटविण्याचा प्रयत्न कुणीच केला नाही ..सर्वांचं जेवण आटोपलं आणि नित्याही जेवायला बसली ..परंतु नित्याच सर्व लक्ष केवळ त्याच्याकडे होत ..तो कितीही निष्ठुर वागला तरीही नित्या त्याच्याबद्दल कधीच चुकीचा विचार करत नसे पण हे त्याला कधीच कळत नव्हतं ..काही वेळात नित्याच जेवण आटोपलं आणि किचनमधल सर्व आवरून ती बेडवर येऊन बसली ..घरातले सर्व टीव्ही पाहत बसले होते ..सासूबाईंनि टीव्हीचा आवाज मोठा केला नि संध्या रडायला लागली त्यामुळे तो सर्वांवर खेकसला ..सासूबाईने लगेच टीव्ही बंद केला ..नित्याला कळून चुकलं होत की हा आपला राग सर्वांवर काढतोय तरीही ती शांत होती ..ती बाजूला असलेल्या संध्याला दूध पाजु लागली ..संध्याने दूध घेतलं आणि काहीच क्षणात झोपी गेली ..टीव्ही बंद होताच घरचेही अंथरुणावर येऊन पडले ..रात्रीचे 1 वाजले होते ..सर्व निद्राधीन झाले होते परंतु नित्या काही झोपी गेली नव्हती ..मृन्मय आपल्याशी बोलत नाहीये याच तिला वाईट वाटत होतं स्वाभाविकच ती चुकीच काही वागली नव्हती पण तो नाराज होता हेही तितकंच खरं होत ..आणखी तिने ताणल तर त्याचे परिणाम भयंकर होतील म्हणून आज त्याला हवं ते देऊन टाकू या विचाराने ती बेडकडे जाऊ लागली ..मृन्मय झोपी गेला होता ..त्याच्या खांद्याला हात लावत ती त्याला उठविण्याचा प्रयत्न करत होती ..तो लगेच उठला पण समोर नित्या आहे हे पाहून पुन्हा झोपू लागला ..तो झोपणार तेवढ्यात तिने त्याचा हात धरला आणि त्याला थांबवत म्हणाली , " चल मृन्मय तुला हवं ते देते पण अस रुसून बसू नकोस ..तुझ्या अशा वागण्याचा आम्हा सर्वांना त्रास होतो .."

त्याला हवं ते मिळणार हे ऐकल्यावर त्याचा राग क्षणात नाहीसा झाला आणि तोही तिच्या मागे मागे किचनमध्ये जाऊ लागला ..आधी नित्या किचनमध्ये गेली तर नंतर मृन्मयने दाराची कळी लावून घेतली ..आज बहुदा साडे तीन महिन्यांनी तो तिला स्पर्श करणार होता ..खर तर तो इतके दिवस थांबण्याच कारण म्हणजे संध्या होती ..ती पोटात असल्याने त्याला काहीच करता आलं नव्हत पण आज ती त्याच्या समोर होती आणि लगबगीने तो तिच्याकडे वळाला ..ती त्याच्याकडे पाहत होती तेवढ्यात त्यानेच तिचे कपडे काढायला सुरुवात केली .. ती केवळ त्याच्याकडे पाहत होती ..काहीच क्षणात त्याने तिला खाली झोपविले आणि सुरू झाला ..तो अस वागत असला की नित्या नेहमीच डोळे बंद करून घेत असे आणि सर्व काही झाल्यावरच डोळे उघडत होती ..आजही तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते हे पाहून मृन्मय म्हणाला , " नित्या तू स्वतःहून मला कधी स्पर्शाची मागणी का करत नाहीस ..प्रत्येक वेळी मीच विचारन गरजेचं आहे का ? आणि हे काय मी जेव्हाही तुला स्पर्श करतो तेव्हा डोळे बंद का करून घेतेस ? कधी तर चांगला रिस्पॉन्स द्यावा तर आपली डोळे बंद करून घेते .."

नित्याला सर्व ऐकू गेलं होतं तरीही तिने डोळे उघडले नव्हते आणि हळुवार आवाजात ती म्हणाली , " मृन्मय ती संधी तू मला कधी दिलीच नाहीस ..अगदी पहिल्या दिवसापासून जनावराप्रमाणे माझ्यावर येऊन भिडतोस ..कुठंही आणी कधीही ..माझंही शरीर आहे यंत्र नाही तेही थकत ..पण तुझा मूड झाला की तू येतोस बाकी वेळ तुला मी आठवतच नाही वरून विचारतोस देखील की रिस्पॉन्स का देत नाहीस ...तू माणसासारख वागलास तर रिस्पॉन्स द देईल ना !! "

तीच उत्तर एकूण त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या पण तिला याक्षणी सोडायच नव्हतं म्हणून तो तिच्याशी आणखीच फोर्सफुल वागत होता . नित्याला त्याचा नेहमीच त्रास होत असे पण त्या त्रासाला ती सहन कारायला आता शिकली होती ..काही क्षण गेले आणि तो बाजूला झाला ..अंगावर कपडे घालत तो बेडवर येऊन पडला तर आता आपली कुणी बायको आहे याचं त्याला भान सुद्धा नव्हतं .. तो गेल्यानंतर नित्याही आली आणि अंथरुणावर पडली ..आज मृन्मय जरी खुश झाला होता तरी नित्या हरली होती ..कारण तिचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला होता ..
असाच एक दिवस संध्याला 5 वा महिना लागला होता..मृन्मय शक्यतो आनंदिच वाटत होता ..तो आनंदी असला की घर बहरून जात होतं आणि आजही तेच झालं..तो आनंदी आहे हे पाहून नित्याही सुखावली होती ..सकाळी - सकाळीच तो आपल्या मुलीला हातात घेऊन तिचे लाड करत होता ..मुलीच्या नादात त्याला ऑफिसला जायला उशीर होतोय हे देखील त्याला कळल नव्हतं ..घड्यालीकडे लक्ष गेलं तेव्हा 9 वाजले होते ..त्याने लगेच संध्याला आईकडे सोपविले आणि अंघोळ करायला बाथरूममध्ये गेला ..जेव्हा तो बाहेर आला तेव्हा सव्वा नऊ वाजले होते ..बाबा ऑफिसला जायला निघाले होते ..तर हा आताही तयारी करतच होता ..नित्याचा स्वयंपाक बनवून झाला होता आणि ती टिफिन बनवू लागली..मृन्मयची तयारी झाली आणि तो टिफिन घेऊन जाऊ लागला ..तेवढ्यात संध्याला पाळण्यात ठेवत आई म्हणाली , " अरे मृन्मय मला मार्केटमध्ये थोडं काम आहे ..तिथे सोडशील का मला ? "

मृन्मयला जायला उशीर होत होता पण तरीही त्याने आईला सोडण्यास सहमती दर्शवली ..तस ऑफिस 11 वाजताच पण लांब जायचं असल्याने मृन्मय लवकरच निघायचा ..10 मिनिटात आई साडी बदलवून मृन्मयकडे आली आणि ते दोघेही बाहेर निघाले ..मार्केट जायला फक्त 10 मिनिट लागत असत त्यामुळे मृन्मयने तिला तिथे ड्रॉप केले ..इकडे नित्या घरचे काम आवरण्याचा प्रयत्न करत होती पण घरी कुणीच नसल्याने तिला मधातच संध्याकडे देखील पहावं लागत असे ..संध्याला पाहण्यात तीच सर्व काम पडून रहायच पण तिला त्याच कधीच वाईट वाटत नव्हतं आपल्या लेकीसाठी ती काहीही करायला तयार असायची..संध्या रडायला लागली आणि तिला आपल संपूर्ण काम तसच ठेवून तिच्याजवळ बसावं लागलं ..तरीही संध्या रडतच होती ..इकडे आईला मार्केटमध्ये सोडून मृन्मय ऑफिसला जाण्याऐवजी सरळ घरी आला ..आई नसल्याची संधि शोधून नित्यकडून हवं ते मिळवून घेता येईल हा विचार मनात आल्याने तो परत घराकडे आला होता . तस हे काही नवीन नव्हतं याआधी देखील तो बऱ्याच वेळी रस्त्यातून फक्त त्यासाठी घरी परत आला होता . त्याच परत येण्याच कारण म्हणजे मागील 4 महिन्यात नित्याने त्याला केवळ दोन वेळाच हात लावू दिला होता ..तो नाराजही झाला होता पण तिने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून त्याला स्वतःच नमत घ्यावं लागलं होतं ..चेहऱ्यावर आनंद घेत तो घरी आला ..तो घरी आला नि नित्याला त्याच्या येण्याच कारण समजलं ..संध्या आताही रडत होती त्यामुळे नित्याने त्याच्याकडे जाणून दुर्लक्ष केलं होतं ..तर तो तिच्या जवळ जात म्हणाला , " चल नित्या लवकर माझा मूड झालाय आणि प्लिज आता तरी नाही म्हणू नकोस .."

नित्या त्याला दूर ढकलत म्हणाली , " तुला केव्हाही मूड येतो का रे ? लेक इथे रडत आहे त्याच काही नाही ..तिच्यासमोर अस करणं बर वाटत का ? ..तू ज ऑफिसला आणि माझं काम करू दे .."

तिच्या अशा बोलण्याने त्याचा इगो दुखावला होता ..त्याने बाजूला असलेलं खेळणी संध्याच्या हातात दिली आणि संध्या त्यांच्याशी शांतपणे खेळू लागली ..नित्याही थोडी रिलॅक्स झाली ..तिला वाटलं की हा ऑफिसला जाईल पण अस काहीच झालं नाही उलट त्याने तिला मागून येऊन धरले ..ती त्याला सोडविण्याचा प्रयत्न करत होती पण तो आज अजिबात ऐकणार नव्हता ..नाही म्हणता म्हणता त्याने शेवटी तिला बेडवर पाडलेच आणि सुरू झाला ..5 महिन्याची नित्या ते सर्व पाहत होती तर मृन्मय फक्त एकच वाक्य म्हणत होता , " इतक्या लहान मुलीला काय समजत .."

आज पहिल्यांदाच नित्याने डोळे बंद केले नव्हते तर ती आपल्या मुलीकडे पाहत होती ..मृन्मय मात्र आताही आपल्या कामात व्यस्त होता .नित्याला आपल्या मुलीसमोर हे सर्व नकोस होत ..ती आनंदाने खेळत होती म्हणून नित्या तिच्याकडे पाहत होती पण मृन्मयच्या अशा वागण्याने तीला किती वेदना झाल्या होत्या हे त्याला माहितीच नव्हतं ..तो काही क्षणात बेडवरून उठला आणि स्वतःचे कपडे नीट करत ऑफिसला जाऊ लागला तेव्हाच मागून नित्या म्हणाली , " मृन्मय मला तुझं हे वागणं अजिबात आवडल नाही ..आज तू सर्व हद्द पार केल्या आहेत ..आज लावला तर लावलास पण पुन्हा मुलीसमोर मला यातलं काहीच नको आहे ..जमलं तर लक्षात ठेव नाही तर पुढच्या वेळी मला हे सहन होणार नाही .."
नित्याचे तिखट बोल एकूण तो कावरा बावरा झाला होता पण ऑफिसला जायला फारच उशीर होत असल्याने तो लगेच निघून गेला ..आज पहिल्यांदाच तो तिच्या बोलण्याचा विचार करत होता ..आणि मनात विचार आला की तिला माझं अस वागणं आवडत की मीच आवडत नाही ..? संपूर्ण प्रवासात तो एकच प्रश्न त्याला सतावत होता ..विचार करत करतच तो ऑफिसला आला ..उशीर झाल्याने बॉस त्याला ओरडला पण त्याने तिकडे फारस लक्ष दिले नव्हते ..आणि तो त्या प्रश्नाचं उत्तर शोधू लागला ..डोक्यात शंकांनी वेग घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्या मेंदूने एक नवीनच कहाणी रचली ..तिला मी आवडत नाही कारण तीच अफेर तर नसेल ना ? ..होऊ शकत ..संध्या होण्या आधी पण मला अस काहीसं जाणवत होतं पण मुलगी झाल्यानंतर मी ते विसरूनच गेलो ..कदाचित खरच तीच अफेर असावं नाही तर लग्नानंतर मुलगीही तेवढीच एक्ससाईटेड असते सेक्स साठी आणि नित्या तर मला हातही लावू देत नाही ..आणि मी लावला तर रिस्पॉन्स पण देत नाही .."

त्याचे विचार खालच्या थराला पोहोचले होते आणि त्याने तिच्यावर पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला ..त्याच्या लक्षात आलं की नित्या अलीकडे कुणाशी तरी फोनवर बोलत असते ..आणि मला पाहुण एक दोनदा लगेच फोन कट तरी केला किंवा मग हसून बोलता - बोलता विषय तरी वळविला .म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे ..

त्या प्रसंगानंतर तो तिच्याकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवायचा ..तिला कॉल आले की तो दुरूनच लक्ष देत असे आणि तिला हसताना बघून त्याचा राग अनावर होऊ लागला ..तरीही तो तिला काहीच बोलला नाही ..नित्या दर दोन दिवसाला मार्केटला भाजीपाला आणायला जात असे तेव्हादेखील तो तिच्यावर लक्ष देत असे अर्थात घरी असेल तेव्हा आणि ती कुण्या पुरुषाशी बोलली की त्याची शंका पक्की होत जाई ..अलीकडे त्याच्या लक्षात आलं की ती घरून निघाली की मार्केट जाईपर्यंत आणि तिथून निघून घरी येईपर्यंत ती सतत फोनवर बोलत होती ..तिच्यावर चारही मृन्मयने बाजूने वेढा घातला होता ...

एक दिवस असाच रविवार असल्याने सर्व घरी होते तर नित्या मार्केट मध्ये काही समान आणायला गेली होती ..बऱयाच वेळ ती आली नाही हे बघून मृन्मय बाहेर पडला आणि त्याला नित्या दिसली ..ती कुण्यातरी पुरुषाशी बोलत होती ..तो पुरुष अगदी तिच्या वयाचा वाटत होता आणि दिसायलाही देखना होता ..नित्या त्याच्याशी फार फ्रॅंकलि बोलत होती तर कधी कधी त्याच्या डोक्यावर देखील मारत होती ..सुमारे 10 - 15 मिनिटे दोघे असच हसून बोलत होते ..तर मृन्मय मनात राग ठेवून घरी परतला होता ...खूप दिवसापासून त्याने बरच काही मनात साठवून ठेवलं होतं ..पण त्याला आता ते साठवून ठेवण परवडणार नव्हतं ..त्याने घडलेल सर्व काही आईला सांगितलं आणि आईही तिची खबर घ्यायला तयार झाली ..तर मृन्मय दारू प्यायला बाहेर पडला होता ..फक्त त्यांने आईला सांगितलं होतं की मी येईपर्यंत तिच्याशी कुणी काहीही बोलू नये ..तो बाहेर पडला आणि नित्या घरात आली। .ती निवांत काम करत होती पण तिच्या मागे काय चालल आहे हे तिला माहीतच नव्हत नि पुढे काय होणार होत याचा देखील तिला अंदाज नव्हता ..मृन्मय आज कोणत्या थराला जाईल याचा तिने स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता ।.


क्रमशः .....