#@मैत्री📱प्रेम@#
सौ. वनिता स. भोगील
काव्या......
आग ए काव्या.......
काय ग आई?
सुट्टीच्या दिवशीपण झोपू देत नाहीस....
संचिता..
काव्या आणि निशांत अशी संचिताच्या संसाराच्या वेलीवरची दोन फुल..
नवरा सुजित बिजनेस वाला ..
त्याला ना वेळ न काळ घरी येण्याजण्याचा....
.
पण संचिता आणि सुजित आपापल्या विश्वात दंग असायचे,
त्यांचं विश्व म्हणजे आपापली कामे....
सुजित घरात कधीच लक्ष देत नसे,
पण संचिता घरच सगळं करून मुलांचं सगळं करून सुजितच्या कामात हातभार लावत असे.
.
तसा सुजित तुसड्या स्वभावाचा पण संचिता सगळं ऍडजस्ट करून घ्यायची,
संचिता नावाप्रमाणेच सगळ्या कलागुणांचा संचयच जणू, रंगानं गोरी, मध्यम बांधा, घारे डोळे लांबसडक केस...
आणि साधी राहणी
मूल लहान होती तेव्हापासून सुजितने घरची जबाबदारी झटकून टाकली,
पण संचिता स्वाभिमानी आणि स्वावलंबी,
तिने कधी नवऱ्यात दोष काढलेच नाहीत..
तो कधी ड्रिंक करून यायचा मग वाद घालायचा,
आतून पूर्ण खचून जायची पण कधी कुणाकडे बोलत नसायची.
प्रत्येक दिवस तिच्यासाठी नवीन आव्हान घेऊन यायचा आणि त्याच ती रोज जोमाने स्वागत करायची.
.
घरासाठी संसारासाठी खूप कष्ट घेतले,
सुजित सेटल नव्हता तरीही आहे त्यात सगळं कसं आनंदात निभावून न्यायची, कमी पडल तर कधी कुणापुढे हात पसरून नवऱ्याची इज्जत नाही घालवली...
नंतर मूल शाळेत जायला लागली,
त्यांचा अभ्यास निगा सगळं करून थोडंफार घरबसल्या संसाराला मदत म्हणून काही न काही करायची,
शिवणकाम,
छोट्या मुलांचे क्लास,
जमेल तसं जमेल तेवढ करून सुजित ला हात भार लावायची.
सुजित कामानिमित्त जास्त बाहेरच असायचा,
कधी फोन वर लेडीज सोबत बोलायचा,
संचिताने विचारले की उडवा उडवी ची उत्तर द्यायचा.
.. मग मूल चौथी ,पाचवीत असताना नवऱ्याचं प्रकरण तिला माहीत झालं,
, सुजितला तीन सरळ विचारलं तुझं कुठे काही चालू आहे का?
त्याने सांगितले हो आहे...
आणि राहील..
तुला काही प्रॉब्लेम असेल तर तुला वाटेल तिकडे तू जाऊ शकतेस...... ...
.... संचितावर आभाळ कोसळल....
काय करावं काहीच सुचेना....
.
रात्रभर जागून विचार केला,
मी घर सोडून गेले तर मुलांचं काय?
बर मुलांना घेऊन गेले तर त्यांचं पालन पोषण मी समर्थ पणे करेल पण मला समाजात स्थान काय?
.....
मी बाहेर काय म्हनून राहू?
नवऱ्याला सोडून दिलेली की नवऱ्याने टाकलेली?
काहीही झालं तरी दोषी मीच राहणार.....
.. मुलांच्या भविष्याचा काय?
.... खूप विचार केला ,
रडून डोळे सुजले.
..
रात्रभर बसून काढली,,
सकाळचा पाचच अलार्म वाजला,,,
संचिता शुद्धीवर आल्यासारखी झाली,
काहिही झालं तरी घर सोडायच नाही.
.
आणि तस पण सुजितचा काय दोष, मीच कुठे कमी पडले असेल त्याच्या आवडी निवडीला.....
..
असा विचार करत सकाळ चे सहा वाजले,
मुलांचं करायचं डबे ,नास्ता आठवुन कमरेला पदर खोचून कामाला लागली.......
मग सुजित सगळं साळसूद पणे करू लागला,
रात्र रात्र बाहेर राहणे ड्रिंक करणे,
संचिता खूप समजवायची....
पण तो काही ऐकायचं नाव घेत नसे,
पुढे सुजितचा बिजनेस वाढू लागला,
मूल मोठी करण्यात संचिता कुठेच कमी पडली नाही,
नंतर सुजित तिच्याकडे लक्ष देत नसे....
...
माफक पैसे आणि मुलांचा थोडाफार खर्च एवढंच करायचा,,.
संचिताला काळजी वाटायची
तिने तिची काम सोडली नाहीत,
,,, सगळ्या कलागुणांना ती अवगत होती,
सुशिक्षित पण संस्कारी.....
.. सगळ्यांच्या विचारात अडकून राहिलेली,
किती वेळा मानसिक ताण होई, आर्थिक अडचणी येईत....
सुजित या सगळ्यांपासून दहा हात लांब असायचा
संचिता कधी काही सांगायला गेलीच तर त्याच एकच उत्तर असे
तू घर संभाळतेस तर अडचणी पण तूच बघ....
... काहीही झालं तरी कधी कुणाजवळ मन मोकळं केलं नाही .....
मूल मात्र खूप समजदार, दोघेही कॉलेज ला जाऊ लागली...
आता संसाराची सुख दुःख पेलून संचिता खूप थकून जाई,,
....
वयाने नाही पण मनाने ....
पण मूल , नवरा बघून रोज नव्याने तिच्यातील स्त्री जन्म घ्यायची....
.. आजही ती रोजच्यासारखी कामाला लागली,
रविवार होता तरी देखील रोज पाच वाजता उठणारी संचिता कधीच उशिरा उठत नसे....
हातात चहा चा कप घेऊन लेकीला हाक मारत होती...
पण लाडकी ती आईने चार हाका दिल्या तरी कसली उठते,
त्या दोघी नावाला मायलेकी होत्या सख्या जिवलग मैत्रिणी होत्या.......
..... काव्या ला आणि निशांतला आईचा अभिमान वाटे...
आमची आई super mom...
मूल सगळ्यांना सांगत,
संचिताने सुजितचा भूतकाळ कधीच मुलांसमोर उचारला नाही.....
... वडिलांचं काही माहीत पडलं तर मूल वडिलांची किंमत करणार नाही असं तीच मत असायचं,
...
आदर्श पिता म्हणून मुलांसमोर तिने सुजित ला ठेवलं होतं...
आता सुजितचा ही स्वभाव बदलू लागला होता......
... वयाची चाळीशी पार झाली....
पण..........
...
या सगळ्यात संचिता स्वतःसाठी जगायचं विसरून गेली...
.. घरी कुणी नसताना मनात विचार येई...
आपल्याला ही कुणी हक्काचं असावं......
फक्त एक घट्ट मैत्री जिथं मी खांद्यावर डोकं ठेऊन हक्काने आयुष्यातले सुखदुःख सांगेल....
कधी काही अडचण आलीच तर त्यानं अगदी हक्कानं ( विश्वासानं) म्हणावं " तू नको काळजी करू मी आहे न"
,,
नंतर स्वतःवरच हसू येई मला आता चाळीशीत कोण मित्र भेटायचा?
.... मूल मोठी झाली , जिम्मेदारी वाढली पण शारीरिक ताण कमी झाला होता...
..
लेकीने मोकळा वेळ असतो म्हणून आईला व्हाट्सअप्प ,फेसबुक ओपन करून दिल होत,
संचिता तशी सगळ्याच गोष्टीत हुशार,
सोशल मीडियावर ग्रुप वर ऍक्टिव्ह असायची,
वाचन लिखाणाची आवड...
त्यामुळे फेसबुक वापर थोडा जास्तीचा होता....
तिनेही छोटा बिजनेस चालू केलेला घरातूनच, सगळे महिला, पुरुष जोडीला असायचे......
..
सुजितला हे आवडत नसे.
मग जोडीच्या लोकांना घेऊन संचिता होईल तेवढं फोन वरच काम करून घेई...
.. मन मिळवू, आनंदी,
त्यामुळे कुणाशीही पटकन मैत्री व्हायची, त्यात पुरुष ही होते ज्यांना तिच्याशी मैत्री करणे आवडत असे....
पण संचिताच्या कामात किंवा मैत्रीत संस्काराची लक्ष्मण रेषा असायची....
......
असच एक दिवस सोशल मीडियावर काही वाचत असताना एक ओळखीचे नाव दिसले...
..
अरे ओळखीचे आहे म्हणून प्रोफाइल ओपन केलं तर चेहरा थोडा ओळखीचा वाटला.....
.. अबाऊट मध्ये जाऊन चेक केलं तर ओळखीचाच निघाला......
त्यात त्याचा मोबाईल नंबर पण भेटला...
.. सगळ्यात मिसळण्याची सवय,
काय करणार?
न राहवून तिने त्याला व्हाट्सएप वर hi पाठवलं......
....पाठवलं तर खर पण तो मला ओळखेल का?
आणि ओळ्खलच तर काय समजेल,
अस करत दोन तास गेले, मग समोरून hi आलं
Kon म्हणून विचारलं त्याने...
आडनाव वेगळं असल्यामुळे त्यानेही ओळखले नसावे,
मग संचितांने नाव सांगितले, तो confuse होता,
मग तिने आडनाव सांगितले माहेरचे.....
.... आणि त्याने ओळखलं म्हणून लगेच रिप्लाय दिला,
,,
कशी आहेस अस एकेरी नावाने त्याने विचारले,
हिला कधी एकेरी नावाने बाहेरचे कुनि बोलत नसत,
आणि ती ही कुणाला अस एकेरीने बोली नव्हती.
तिला जवळच कुणी बोलत असल्यासारखं वाटलं,
...
मग बराच वेळ एकमेकांचं करियर , लग्न ,मूल आणि संसार याबद्दल बोलणं चालू होतं....
...
तीही थोडी ओळख असल्यामुळे मन मोकळे पणाने बोलत होती.
...
मग तो रोज आठवणीने gm, gn मेसेज पाठवू लागला,
,,,, बऱ्याच गप्पा होऊ लागल्या,
तिने स्वतःबद्दल सगळं मनमोकळे पणाने त्याला विश्वासाने सांगितलं...
तस तो ही काही गोष्टी सांगायचं,
पण.....
संचिता छोटा का होईना बिजनेस करत होती ,तिला माणसाची पारख होतीच....
.. ती त्याला नेहमी म्हणे तू बोलतोस तसा नाहीस रे, तुझं काही कळतच नाही ,तू मनात काहीतरी ठेऊन बोलतोस.......
आणि त्याच एकच वाक्य ठरलेलं असे,
तू मला अजून नीट ओळखलं नाहीस म्हणून अस बोलतेस.......
....
संचिता तीच घर, नवरा ,मूल आणि बिजनेस बघून वेळ भेटेल तस त्याला बोलायची, आवर्जून वेळ काढायची.....
.. तिला कधी नव्हे ते आधार वाटत होता तिचा,
तिला वाटे कधीही मला मानसिक, आर्थिक अडचण आली तर हा माझ्या मागे नाही माझ्या सोबत उभा असेल.....
काही दिवस बोलल्यानंतर......
.... त्यानं तिला प्रपोज केलं......
.... संचिताच मन काही मानायला तयार नव्हता, म्हणजे आता कुठे प्रेम असत का?
.....
अर्ध आयुष्य जगल्यावर कुणी कुणावर कस प्रेम करू शकत,
,,,
पण तिला ही काहीतरी जाणवत होतं जे आयुष्यात हातून सुटून गेलं आहे,
पण आपण का असल्या भानगडीत पडायचं,
नको त्या अपेक्षा वाढतात ,नको त्या तक्रारी, आधीच आयुष्य कस गेलं हे समजलं नाही आणि आता हे नवीनच का म्हणून?
अपेक्षा,,,
संचिता तशी खूप स्वाभिमानी , स्वावलंबी...
शेजाऱ्यांनी काही मदत केली तर कधीही त्यांच्या मदतीला हजर राहणे आणि हे आपलं कर्तव्य आहे असं तीच मत असे,
...
राहिला अपेक्षेचा प्रश्न,
पण तो बोलायला लागल्यापासून आधाराची अपेक्षा मात्र वाढली होती.
.. पण तिला त्याच्याकडून कधी "मी आहे न " चा प्रतिसाद मिळाला नव्हता,
....
मग एक दिवस तो म्हणाला ..
आपण समोर भेटायचं का?
कुठेही भेटू..
तू म्हणशील तिथे,
नाही हो म्हणत ती तयार झाली,
तो म्हणाला आपण बागेत भेटू,
...
तिला अस परपुरुषासोबत बागेत वगैरे ठीक वाटत नव्हते,
पण चला त्याच्या इच्छेखातर ती होय म्हणाली.
.
मग दिवस ठरला..
तो अर्ध्या रस्त्यात आला ही अर्ध्यापर्यंत गेली,
समोर जाताच तिला कसतरी झालं ,
आपण चूक तर नाही न करता.
पण पुन्हा मनात विचार आला कामानिमित्त आपण भेटतोच की किती पुरुषांना ...
,मनाची तयारी करून दोघे जवळच्या बागेत गेले,
खूप गप्पा झाल्या,
पण त्याच्या बोलण्यातून काहीच तिच्याबद्दल निघत नव्हते...
... ती गप्प होती,
काय बोलाव काही सुचत नव्हतं..,
...
तो जेवढा फोन ,मेसेज वर बोले तसा समोर तिला किंचितही वाटला नाही,
तिला वाटलं आपण काही वेगळं करतोय का?
मग माझ्याशी अगदी दोन दोन तास बोलणारा माझ्याविषयी एक शब्द पण बोलत नाही,
तिचा तिलाच संकोच वाटू लागला...
... मनातून स्वतःला खूप दोष देत होती,
आयुष्यभर नवऱ्याला समजू शकले नाही तर तात्पुरत्या ओळखीत याला काय समजू मी...
बराच वेळ निघून गेला ,
मग संचिता म्हणाली, निघुया का आपण?
तस तो लगेच हो म्हणाला,
तिला अस जाणवलं की त्याला फक्त ती येते का हे बघायचं होत, अस तो वागत होता,
....
दोघे बागेतून निघाले,
तो त्याच्या मार्गाने गेला सुद्धा,
ही वेड्यासारखी अर्धा तास तिथंच उभी राहून विचार करत होती....
.. माझ्यात अस काय कमी असेल म्हणून जी जिवलग वाटावी ती मानस माझ्याशी अशी वागतात.
तिची गाडी आली,
विचारातच घरापर्यंत पोहचली,
न राहवून परत तिनेच त्याला मेसेज केला , पोहचलास का रे?
त्याने हो म्हणून रिप्लाय दिला,
त्या दिवशी तिला रात्रभर झोप येईना,
मी संचिता अख्ख् आयुष्य कुणाच्या भरवशावर न बसणारी कुणाकडून कसलीही अपेक्षा न ठेवणारी , स्वाभिमानी सगळ्या संकटांना संधी म्हणून स्वकरणारी मग आज हतबल का झाली?
....
..सगळंच समजण्या पलीकडे होत,
मैत्रिणीला सांगावं वाटलं पण मन आवरत घेतलं,
।
हसेल माझ्यावर ती...
म्हणेल वेड लागलं संचिता तुला ?
आता पण कुठे मैत्री प्रेम असत का?
कसाबसा दिवस उजाडला,
नित्याच्या कामाला सुरुवात झाली,पण......
मन काही केल्या कामात रमेना,
स्वतःचा खूप राग येत होता,
स्वतःशीच प्रश्न विचारत होती काय कमी होत अस वागायला,
दोन मुलं, नवरा संसार आणि असही सगळं मॅनेज करायची सवय आहेच की,
,,
या अगोदर कोणी नव्हतेच न मैत्रीचा हक्क गाजवायला, आणि प्रेमाची साथ दयायला,
मग आता का गरज पडावी?
....
सगळी काम आवरून झाली,
तेवढ्यात मोबाईल ची रिंग वाजली,
त्याचाच फोन होता,
, संचिता शांत ,समंजस स्वभावाची,
फोन नाही उचला तर त्याला काय वाटेल, आणि उचला तर मला काल जे वाटले ते तोंडून निघेल, आणि मला काय वाटले हे त्याला का सांगू?
...
तो का काळजी करेल माझी ?
रिंग वाजत होती,
शेवटी त्याला काय वाटेल याच विचारात फोन उचलला,
हॅलो बोल,
काय करतेस,
काही नाही रे,
बिझी आहेस का?
कामात आशील तर नंतर बोलू...
नाही बोल ...
तस त्यानं काढू नये ते कालचाच विषय काढला,
खूप मनाला आवरून घेतलं पण कुठेतरी तेही दुखावलं होतच,
...
स्वाभिमान आडवा येतोच कधीतरी,
मग संचिताचा बोलण्याचा तोल सुटला, एकीकडे रडत होती बोलत होती,
घडलं ही तसच होत न......
... मन दुखावलं गेलं होतं कधी नव्हे ते....
तो समजावत होता,
खूप समजावत होता,
तिला त्याच समजावणं फक्त वर वरच वाटत होतं,
.....
त्यानंतर तीन तो दिवस आयुष्यातून वजा केला, असही तिला वाईट दिवस, प्रसंग, वजा करायची कला येत होती.....
. त्याच्या समजवण्यातून त्याची चूक त्याला जाणवत होती,
,
मग सगळं विसरून ती परत त्याच्याशी बोलू लागली,
आयुष्यातील एक एक क्षण तिने त्याला सांगितला,
फक्त आधार म्हणून,
,, पण त्याने कधीच तिच्या भूतकाळाबद्दल साधी सहानभूती ही दाखवली नाही,
तिला ते स्पष्ट जाणवायचं,
पण कधी नव्हे ते नात गुंफल होत, ते ही समंजस वयात मग विशीच्या मुलांसारखं कस संपवायचं न?
.....
त्याला रोज फक्त त्याच्या विषयी बोलायला आवडायचं,
त्याने कधी ना तिच्या अडचणी विचारल्या ना सुख दुःख,
,,,
तिला त्याच्या बोलण्यात परकेपणा जाणवायचा,
ती खूप वेळ म्हणाली पण,
तू बोलतोस ते खरं नसत न,
कारण ही तसच असे,
तो बोललेलं कधीच परत मी अस काही बोलो अस होत नसे,
.....
बऱ्याच दिवसानंतर तिला आर्थिक अडचण आली,
आता संसार म्हटलं की अडचण आलीच,
तिला वाटलं त्याला सांगावं,
पण तिने पूर्ण ओळखलं होत त्याचा तिच्यावर विश्वास नाही मग तो का मदत करेल न,
तिचे तिलाच कळून चुकले,
मग तिच्या टेन्शन मुले रोज रोज मेसेज करायचे राहून जायचे, त्याला राग यायचा,
,,
एक दिवस ती खूप टेन्शन मध्ये होती त्याला तिने सांगितले मी खूप टेन्शन मध्ये आहे तू माझ्या मेसेज ची वाट बघू नकोस, मला जमेल तस मी बोललेच,,
....
त्याला संगण्यामागचा संचिताचा हेतू ही तसाच होता , मी माझ्या टेन्शन मध्ये असेल तो मेसेज कॉल ची अपेक्षा करेल, मीही बोलत राहील कधी माझी अडचण सांगून त्याला द्विधा मानस्तीतीत टाकेल,
आणि जर यातून अपेक्षाभंग झालाच तर नात आहे ते ही राहणार नाही,,,,,,
,,,, आणि काय तीन त्याला तस सांगितलं,
आणि त्यानेही त्याच्यावर रिप्लाय म्हणून ok पाठवलं,,,,,,,,,,,,,,,,,
...
आणि हो तो म्हणजे तिच्या *शाळेतील बालमित्र....* चक्क पंचवीस वर्षांने कॉन्टॅक्ट झालेला, त्यामुळे ती जास्तच हळवी झाली होती, खूप आपलेपणा वाटायचा तिला त्याच्याशी प्रत्येक गोष्ट सांगताना,,
संचिताने जस सांगितलं त्यावर त्याने काही प्रॉब्लेम आहे का तुला एवढं विचारायचं सुद्धा कष्ट घेतले नाहीत,,,
मग याला शाळेतील पोरखेळ म्हणावा? , की रिलॅक्स आयुष्यातील एन्जॉय?, की चाळिशीतील प्रेम म्हणावं?
आणि हो आता संचिता अजूनही अडचणीत आहे पण तिचा स्वतःवरच विश्वास बसत नाही,की खंबीरपणे आयुष्याचा गाडा ओढणारी कशासाठी हतबल झाली,
ती आता फक्त मोबाईल घेऊन बघते विचारले च कधी त्याने तर लगेच उत्तर द्यायला,
पण तिला खात्री आहे तिच्यात काही कमी आहे म्हणून अस होत असेल.........
पण ती आता दहा वेळा विचार करते अपेक्षाही नको आणि ............
📱 *मोबाईल वरच प्रेम मोबाईल वरच थांबलं📱*