Sant eknath maharaj - 2 in Marathi Spiritual Stories by Archana Rahul Mate Patil books and stories PDF | संत एकनाथ महाराज - 2

Featured Books
Categories
Share

संत एकनाथ महाराज - 2

🌹संत एकनाथ महाराज,🌹

उत्तरार्ध.....✍️✍️💞Archu 💞

एकनाथ महाराज विद्वान, ज्ञानी, पंडित होवून पैठणला परतले होते.. सर्व वेद पुराण, शास्त्र अंगिकारून करुणेचा व शांतीचे सागर नव्हे महासागर झाले होते..आजी आजोबांच्या सांगण्यावरून त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकार्याल होते.. त्यांनी सुसंस्कृत अश्या गिरिजा बाई सोबत विवाह करून ते चतुर्भुज झाले होते..आता नाथाच्या वाड्यात दररोज हरिकिर्तन,कथा पारायण होवू लागली... एकनाथ महाराज यांचे अफाट लिखाण काम होते.. जनसामान्य माणसापर्यंत पोहचण्यासाठी त्यांचे मनोरंनाबरोबरच त्यांना शिकवण ते भरुदामाडून देवू लागले. त्यांनी अनेक गवळणी, पद ,भारुड, गोंधळ ,अभंग. .. यांची सुरेख रचना केली.. वेदातले गुह्य अत्यंत समजेल अश्या पद्धतीने सजरित्या ते सर्वासमोर मांडू लागले....त्यांनी अनेक ग्रंथ हि लीहीले..त्यांची काही गवळणी,भारुडे खूप प्रसिद्ध आहेत.. मी काही कडवे टाकते...मला जास्त आवडलेली.. कारण मी सगळच जर लिहीत बसले तर मला आयुष ही पुरणार नाही..म्हणू...
असो ..
त्यांनी विंचू, पिंगळा,असे कितीतरी विषय म्हणून मांडले आहेत..
अब्बब अबब विंचू चावला..
देवा रे देवा विंचू चावला..
काय मी करू विंचू चावला..
एडका मदन तो केवळ पंचानन..
धडक मारीली शंकरा.
केला ब्रहम्याचा मातेरा.
इंद्र चंद्रासी चलीला..
लावियेला हो तेणे...
केवळ पंचानन..🌹

जबर मोठे ग बाई..
भूत जबर मोठे ग बाई..
झाली धडगत करू मी काही..
भानुदास,एकनाथ..🌹

असे खूपच प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले आहे..
मला दादल्या नको ग बाई..
मला नवरा नको ग बाई .
मोडकेसे घर, तुटकेसे छप्पर..
देवाला देवघर नाही..🌹

जोंधल्याची भाकर,
आंबड्याची भाजी
वरी वरी तेल नाही...🌹

मोडकासा पलंग,
टुटकेसे नवार..
नरम बिछाना नाही..🌹

अतिसुंदर असे काव्य आहे..

झगा सिवला नवा..
मी लहान होते तवा..🌹

माझ्या झग्याच्या गुंड्या..
पंढरीला निघाल्या डींड्या..🌹

लिंबू,नारळ, कोंबडा उतारा
ज्या भुताने धरिला थारा..🌹

ही नाथांची भारुडे आहेत, एकावे तितके ऐकत राहण्यासारखे. ..
पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा..
डौल फिर्वितो कैसा दुगडुग एैका..🌹

वरल्या आडीला तुम्ही सावध राहावे.
पाहतील बुवा मग लावील सावे..
चिठ्ठी येईल मग वाधका बसावे..🌹

पिंगळा, भुत्या,जोगत्या,जोशी,विंचू,एडका असे अनेक भरुंडाचे प्रकार त्यांनी सजरीत्या मांडले आहे..

त्यांनी जनसामान्य पर्यंत पोहचण्यासाठी ते ब्राह्मण असताना देखील आपल्यापेकषाही कनिष्ठ जाती धर्मातील लोकासती ते खाली आले.. त्यांनी ऊच नीच हा भेद नष्ट करून सर्वांना आपल्या शब्द सुमननी ,करुणेने आपलेसे केले..पण काही कर्मठ ब्रह्मनानी हे सहन होईना..हा एकनाथ आता आम्हां सारख्यांना वेदाचे महत्त्व पटवून देणार, स्वतः ल धर्मशाशरज्ञ समजतो की काय!!!असे म्हणून त्यांनी त्यांची हेटाळणी चालू केली..त्यांना मोडता कसा घालता येईल, त्यांचे नसणारे गर्वहरण कसे केले जाईल याची ते संधी शो धू लागले..
अश्यातच एकनाथ महाराज यांनी आपले चातुष्लोकी भागवत लिहिण्याचे काम चालूच होते..त्यांनी सगळ्यांना बोध संपन्न करण्यासाठी लिखाण पूर्ण केले. या चार शलोकमध्ये चार तत्व सांगितले आहे.. आत्मतत्त्व, जगात्तत्व, परमत्तत्व,आणि मयातत्व हे सगळं तत्ववणी गच्च भरलेली आहेत.. एकनाथ महाराज यांनी ही तत्वे ओवी बद्ध करून जगासमोर मांडले आहेत..
पुढे गोकुाष्टमीच्या निमित्ताने कथा पारायण चालू होते. भगवान श्री कृष्णाच्या जन्मनुमित्त संपूर्ण पैठणात , नाथाच्या वाडा सजवलेला होता..मोठ्या आनंदाने जन्माष्टमी साजरी करण्यात आली.. नाथ म्हणतात...
💞गुढीया तोरणे,करीती कथा, गाती गाणे..
बालकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी..💞
हा सोहळा पाहण्यासाठी गावोगविचे लोक नाथांना भेटण्यासाठी येवू लागले.. एकनाथ महाराज ची कीर्ती सर्वदूर पसरली होती..
दूर दूर हून लोक नाथाना आपल्या शंका विचारण्यासाठी येवू लागले..आपल्याला ही चर्चासत्र मधून काही तत्ववे अनुभवता यावित्त,या उद्देशाने एकनाथांच्या वाड्यात माणसाचा राबता सतत वाढत होता.. एकनाथांना फुरसत मिळत नवती.. आणि एकड गिरिजमाईचे देखील घरातील काम वाढले होते.. सगळ्यांची सेवा, विचारपूस करून त्या कामाचा व्याप सांभाळून भक्ती भावाने आपली एकनिष्ठ पतीसेवा करत होत्या.. त्यांना कामाला सोबत म्हणून उद्धव नावाचा त्यांचा आप्त होता..तो त्यांना घरकामात मदत करू लागला..
पण परमात्म्याला काही चैन पडेना..माझा एका जनसामान्यांसाठी अहोरात्र जागला आहे.. आपली त्याला काही मदत व्हावी म्हणून त्यांनी उद्धव सोबत त्यांची सेवा करण्याचे संधी शोधत होते.. आणि ते एक सेवक म्हणून एकनाथांच्या समोर आले.. भगवंताने एक रूप धारण केले त्याचे नाव श्रीखंड्या.. नाथांना वाटले रोज दुरून दुरून माणसे चर्चासत्रे साठी येतात तसा हा ही आला असेल...विचारलं नाथांनी,, कोण रे बाबा तू??कुठून आलास..
भगवंत म्हणाले..., माझ नाव श्रीखंद्या,, मला तुमची सेवा करण्याची इच्छा आहे..नाथ म्हणाले की ठीक आहे,मग थांबा आजच्या दिवस...तुम्ही आजची सेवा करून उद्या जावू शकत..
देव म्हणाले..की अशी आजच्या पुरती सेवा नको मला, अविरत, अखंडपणे सेवा करायची.. सेवा करवून घावी अशी पाहिजे..
मला कुणीच नाही.. तुम्हीच माझे मायबाप आहात.. तुमच्यासाठीच मी आहे..
नाथ म्हणाले.. ठीक आहे मग, सेवाच करायची ना जा आतमध्ये..
स्वयंपाक घरात काही असेल तर बघ..
उद्धव सोबत भगवंत गिरिजमाईकडे गेले.. म्हणाले मला नाथ महाराजांनी आपली सेवा करण्यासाठी पाठविले आहे, काही काम असेल तर सांगा.. तेव्वा गिरिजमाई गोडवरीतून पाणी आणण्यासाठी चालल्या होत्या.. त्या म्हणे बसा जरा,,मी पाणी आणते,मग तुम्हाला काही काम असेल तर सांगते..
तुम्ही कशाला पाणी भरता ,आता मी आलोय न आता दररोज मीच पाणी आणत जाईन.. श्रीखंड्या म्हणाला...
असं का!!! ठीक आहे ती कावड घेऊन गंगेवर जा...असेहणून गीरिजमाई ने कावड खांद्यावर वूचलून दिली..
अनंतकोटी ब्रम्हांडनायक असलेला माझा पांडुरंग एकनाथांच्या घरी कावडीने पाणी भरतो आहे, कशी ही अगम्य लीला..
💞कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे..
अनन्य भक्तिभावे निळा वंदी त्याचे पाय...💞

श्रीखंद्या कामात रुजू झाला.. स्वयंपाघरातील सर्व कामे आवडीने करू लागले.. एकनाथ महाराज पूजा करण्यासाठी बसले तर चंदन उगाळून द्यावं..
🌹 एकनाथ सदनी माधव जी सर्व कार्य करतो..
स्वकरे चंदन घासितो, कावडीने पाणी ही भरितो..🌹
पुजेकरिता फूल ही आणि लागला. पडेल ती कामे करू लागला..आता गिरिजा माईचे काम ही कमी होवू लागले,आता कितीही लोक येवू देत, त्यांची सेवा करण्याचे काम श्री खंड्या आवडीने करू लागले... अश्यातच अनेक वर्षे निघून गेले.. एकनाथ महाराज यांना हरिपंदित नावाचा पुत्ररत्न प्राप्त झाले होते.. श्री खंड्या असताना तिथे आता अनेक चमत्कार होवू लागले..
एकनाथ महाराज यांनी तळागाळात जावून, दलितांना आत्मबोध करावा, हे काही कर्मठ ब्रहामनाना सहन होईना. त्यांचे भावबंधयांना वाटत होत की नाथ हा अधर्म करतोय, अनाचार करतोय,याला आवरल पाहिजे..ते भयंकर शब्दात ताडणा करायचे, डारात जावून वाद निर्माण करायचे,पण नाथ महाराज हसून निरोप घ्यायचे..लोक शिव्या देऊ लागली तरी पण राग येत नवत.. आपण एवढ बोलतो,याचा याला रागच येत नाही,तो ते मनावर पण घेत नाही. नाथांन राग आणण्याकरिता ते विचार करू लागले..

एकदा काय झालं,एका ब्रहाम्हणाच्या मुलीचं लग्न होत, पण त्याच्याकडे मुबलक धन नव्हते म्हणूनच तो या कर्मठ ब्राह्मण कडे आला.. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी त्यांच्याकडे 200र मागितले..
ब्राह्मण म्हणाले" तुला आम्ही पैसे देतो,पण आमचं एक काम करावं लागेल.."
तो म्हणाला,कोणतेही काम असू द्या मी करतोच..
ब्राह्मण म्हणाले" तो नाथ माहिती आहे क तुला.. त्याला जर तू राग आणला स तर तुला हे दोनशे रुपये बक्षीस.. परत पण घेणार नाही."..
तो म्हणाला ठीक आहे,",त्यात काय एवढं,ज्या माणसाला राग आणायचा त्याच्या मनाविरुद्ध वागाव म्हणजे त्याला आपोआपच राग येईल.."
तो ब्राह्मण सकाळी सकाळी च नाथाच्या घरात घुसला. गिरिजा माई सडा सर्वण करून तुळसी वृंदावन जवळ रांगोळी काढत होत्या.. ब्राह्मनाने विचारलें नाथ आहेत का घरात?? म्हणे हो.. देवपूजा करताय..बसा न..
असं ऐकता क्षणीं ब्राह्मण तडक देवघरात पाईच्या चप्पल सह नाथ महाराज कडे गेले.. नाथ महाराज विठालाच्या मूर्तीचे पूजन करत होते..ही मूर्ती पंढरपूर च्या मुर्तीपेक्षा जरा वेगळी आहे . यामध्ये पांडुरंगाचे एक हाथ कमरेवर तर दुसरा हाथ नाथासमोर पसरलेला आहे, जणू तो हाथ नाथान कडे खायला मागतो आहे !!!विलक्षण अशी मूर्ती आजही पैठणमध्ये एकनाथांच्या वाड्यातील देवघरात आहे ..परंपरेने पूजनीय असेही मूर्ती चे दर्शन आजही आपल्याला होते..
हा ब्राम्हण जोड्या सहित देवघरात घुसला आणि सोहळ्यामध्ये पूजा करीत असलेली नाथांच्या मांडीवर जाऊन बसला पहातच राहिले आणि म्हणाले अहो मम भाग्य.. केवढ प्रेम तुमचं माझ्या विषयीच!!! रागवायचं तर लांबच राहिले नाथ महाराज हसून म्हणाली.. माझा बालकृष्ण देखील असाच पळत येत असेल नाही का!!.आहे त्या अवश्टेत..मला तुमच्यामध्ये देखील तोच दिसतो आहे..
ब्राह्मण म्हणाले काय विचित्र माणूस आहे हा ...
मी त्याच्या मांडीवर जोड्यासहित जावून बसलो, तरीही राग नाही आला..त्याचा नाईलाज झाला.. घाईघाईने नाथ महाराज उठले,नी म्हणाले, थोड थांबा ह.. जेवून च जा आता ...
गिरिजा माई ने स्वयंपाक तयार केला होता.. दोघेही जेवायला बसले होते गिरीजा माई आग्रहाने जेवण वाढत होत्या जेवता जेवता ब्राह्मणांनी एक शेवटची संधी म्हणून गिरिजाबाई वाढत असताना त्यांच्या पाठीमागून जाऊन गळ्यात हात टाकला ते पाहून नाथ महाराज म्हणाले अहो ऐकलत का आपले अतिथी पडतील बरं त्यांना तेवढे सांभाळून घ्या एकनिष्ठ पतिव्रता एकनिष्ठ पत्नी गिरजाबाई हसून त्याच वेळी बोलल्या अहो हे काय सांगायचं झालं मला काही आता हे नवीन नाही मलाही मुलेबाळे सांभाळण्याची सवय झाली आहे म्हटलं आणि त्यांनी आनंदाने त्यांचे वजन पेलून .धरले आता मात्र ब्राम्हण पुरता खजील झाला... त्यांनी उभय दांपत्याला दंडवत प्रणाम केला आणि रडून क्षमा मागू लागला ..एकनाथ महाराजांनी त्याला असे करण्याचे कारण विचारले असता त्यांनी संपूर्ण इत्यंभूत माहिती एकनाथांना दिली ...
नाथ महाराज म्हणाले, एवढच न.. आदी सांगायचं न मला..हे घे दोनशे रुपये.. आणि तुला मी आणखीन दोनशे रुपये देखील मिळवून देतो ते कशाला बरे बुडवायचे!!! त्यांनी त्या ब्राम्हणाला दंडाशी धरून दरवाजात ओढून आणले व मोठ्याने त्याला बोलू लागली ही काय पद्धत झाली?? तुमच्या वागण्याची!!! चला चालते व्हा !!माझ्या घरून मला पुन्हा कधी तोंड दाखवू नका ..!!!ब्राम्हण देखील तेथेच हजर होते..
.ते म्हणाले" हा कसला आलाय शांतीचा महासागर करुणा सिंधु म्हणी" ... नाथ रागावला, नाथ रागावला असे ते म्हणू लागले..
तेवढ्यात नाथ म्हणाले" तुम्हाला हेच ऐकायचं होतं ना बघा मी त्याला रागावलो ,काढा दोनशे रुपये" असे म्हणून त्यांनी त्या ब्राह्मणांकडून दोनशे रुपये मुलीच्या लग्नासाठी मिळवून दिले त्या त्या ब्राह्मणाच्या मुलीचे लग्न यथासांग पार पडले...
केवढे व्यापक स्वरूप, केवढ विलक्षणत्व..संताना आपण अपकार जरी केले तरी ते आपल्यावर उपकारच करतात,हे नाथ महाराज यांनी दाखवून दिले..

एकनाथ महाराज यांच्या कथाकिर्तन ऐकण्यासाठी सर्व जण येत होते.. काही शूद्र त्या ठिकाणी येत होते.(. इथे चरित्रत वर्णन केल्याप्रमाणे जातीचा उल्लेख केलेला आहे, कोणाचे ही जतीवर्णन करण्याचे अजिबात माझे शब्द नाहीत..माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही..)तिथे एक महार समाजाचा रणू नावाचा माणूस त्याच्या पत्नीसोबत कथा एकायलं येत होता.. भगवान श्यामसुंदर चे चरित्र वाचन चालू होते.. नाथांची वाणी अमोघ होती.. त्यांचे शब्द अंत्करणात प्रवेश करत होते..त्या सदग्रहस्थाची पत्नी त्यांना म्हणाली,हे नाथ महाराज किती गोड कथा सांगताहेत नाही, परमेश्वरा चे स्वरुप असलेले नाथांना आपल्या घरी जेवायला बोलवता का?मला एक हजार ब्राह्मण जेवू घालण्याचा नवस होता.. पण कुणीही ब्राह्मण तयार होईना..यांना म्हणून तरी पहा. तेव्हा रानु म्हणाला,अग वेडी आहेस काय?असे बोलू पण नको..ते एवढे श्रेष्ठ,आपल्या घरी कसे बरे येतील??का नाहि व्येनार?? पांडुरंग नाही का आपल्या भक्तासाठी चोखोबांच्या घरी गेला होता,हे आपले पांडुरंगाचा आहेत की!!. राणू ने जरा घाबरतच कीर्तन संपल्यावर एकनाथांना आपली विनवणी सांगितली.. तुम्ही येणार का?? नाथ महाराज म्हणाले, हो..ठीक आहे, केववा येवू मग मी??त्यांना वाटले नाथ नाही म्हणतील,पण ते तर चक्क हो म्हणाले.. तेथे सगळेच कर्मठ ब्राह्मण होते, त्यांनी हे एकल..ते म्हणाले की, हा व्यभिचार आहे, शुद्राच्या घरी जाणे योग्य नाही,, धर्म बुळवितीस काय??वर्णाचा अभिमान तु ला अजिबात नाही.तू उद्या कसा जातोस,तेच आम्ही पाहतो..पण नाथांना कडीमत्र फरक पडला नाही. सगळ्या गावात चर्चा झाली, नाथ उद्या जेवा याला जाणार म्हणून...

दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म आटोपून जाण्याकरिता निघाले.. सगळे ब्राह्मवरद जमा झाले.. नाथांना अडवू लागले.पण नाथांनी मात्र कुणाचं काहीच एकल नाही.. नाथ त्यांच्या घरी जाऊन जेवायला बसले..आता मात्र ब्रह्म पंडितांनी नाथावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.. इतक्यात तिथे श्रीखंद्या गिरिजाबई समोर गेला.. आईसाहेब तुम्ही काही चिंता करू नका..मी आहे न..देवाने हुबेहूब नाथाचे रूप धारण केले. नाथांची वस्त्रे परिधान करून डोक्यात त्यांच्यासारखी पगडी व कानात बाळी घातली.. हातात पोथी घेतली आणि निघाले कथा सांगायला. ..
लोक म्हणू लागले अरे ह नाथ तर आता तिकडे होता.. श्री खंड्या म्हणू लागला.. कोणता नाथ??मी ह इथे आहे तुमच्यासमोर.. चला पोथी एकायाला मंदिरात.. नाथ महाराज जसी पोथी सांगतात.. तशीच देव ही हुबेहूब सांगू लागले . सगळे लोक पाहण्याकरिता आले.. काही तिकेडे जायचे तर त्यांना जेवताना दिसायचे, पळत पळत पुन्हा मंदिरात येवून पाहायचे तर इथे पोथी सांगताना दिसायचे.. लोकांना कळेच ना..हे नेमके काय घडल ..

एकनाथ महाराज जेवून उठलायानानेर त्या बाईने पत्रावळी उचलून बाहेर नेली,आणि परत आली तर पुन्हा एक पत्रावळी..असे करता करता त्या बाईने एक हजार पत्रावळी उचलून टाकल्या... एवढे नाथांचे वैभव. एवढ्या मोठा अधिकार...

घरी गेल्यावर नाथांना समजले की मझ्याऐवजी कुणी सांगितली कथा!!! तर गिरिजा माईनी सांगितले की, आपला श्री खंड्या गेला होता.. नाथांना वाटले, इतके हुबेहूब कसे बरे जमले याला???पण देवाने माया टाकली,आपले खरे रूप झाकण्यासाठी नाथांना म्हणाले की कि दर्रोज एकूण एकून सांगण्याच प्रयत्न केला. .
नाथांना ही ते पटले...✍️✍️💞Archu💞

एकनाथ महाराज यांन राग येण्यासाठी इतर ब्राह्मनाची खुरप् त ही चालूच होती..🌹 यवन अंगावरी थुंकला..
प्रसाद देवून मुक्त केला..🌹
नाथ महाराज गंगेमध्ये अंघोळ करून आल्यानंतर तिथे तटवरच एक यवन पान खात बसला होता.. एकनाथ महाराज जसे त्याच्या जवळून जावू लागले, त्याचवेळी तो यवन पचकान नाथांच्या अंगावर थुंकला.. नाथांनी त्याच्याकडे वरसुधा पाहीले नाही..ते पुन्हा अंघोळ करून आले,तो यवन पुन्हा पुन्हा थुंक्त राहिला.. नाथ महाराज अंघोळ करायचे,तो थुंकुयाचा..असे त्याने एकवीस वेळा केले, तितक्या वेळेस नाथ महाराज यांनी स्नान केले.. आता यावणाच्या तोंड कात आणि चुना यामुळे दुखत होते, तरीही त्याने थुंकणे थांबवले नाही.. शेवटी त्याच्या मुखातून रक्त येवू लागले तेव्हा त्याने नाथ महाराज चे पाय धरुन क्षमा मागितली.. साष्टांग दंडवत केला.. नाथांनी त्याला समजावून माफ केले. ..✍️✍️💞Archu..💞

असेच एकदा दूपारच्या वेळी नाथ महाराज गोदावरी नदीच्या तीरावर आले होते.. दुपारचं कडाक्याचं ऊन पडले होते..त्या वाळवंटात हरिजन वाड्यातील एक लहानसा बाळ रडत होत..खूप ऊन असल्यामुळे वाळू तापलेली होती,ते आक्रोषणे रडू लागले.. नाथांनी त्याला पाहिलं नी झटकन कडेवर उचलून अलगद घेतल.. आणि हरिजन वाड्यात जवूनवते बाळ त्याच्या आईची विचारपूस करून त्यांच्या स्वाधीन केल.. एका सुद्राचे मुलं हाती घेतला म्हणून इतर ब्रह्मन त्यांची परखड मत मांडू लागले.. एकनाथांच्या घरी जायचं नाही, त्याने धर्म बुडविला..असे म्हणू लागले..लोक चिडले होते..

अश्यातच पित्रपाठ आला.. सगळ्या संतांच्या जीवनात पित्र येतात.. बर का. तर एकनाथ महाराज यांच्या वाड्यात ही पित्राचे आयोजन केले होते.. आदल्या दिवशीच सर्व ब्रह्मवरांदना आमंत्रण दिलं होतं..त्या दिवशी सकाळी उठल्यापासून गीरिजमाई सोबत भगवंत देखील स्वयंपाकाला लागले होते..आता साक्षात परब्रम्ह परमेश्वर भगवंताचे हातचे जेवण म्हंटल्यावर त्यामधून आमृता प्रमाणे चव आणि स्वाद सुगंध दरवळत होता. तेथूनच काही हरिजन आपल्या बायका मुलासोबत जात होते. रस्त्यानं जाताना एक मू ल आपल्या आईजवळ जेवणाचा हट्ट करत होता.. त्याची आई म्हणते बाळा आपल्या नशिबी नाही हे..हे तर ब्राह्मनाचा मान...असे म्हणून ते पुढे चालू लागले..पण ते मुल खूपच मोठ्याने रडायला लागल.. नाथांनी ते पाहिलं व त्यांना आवाज देवून थांबवलं.. आणि म्हणाले, स्वयंपाक तयार आहे, तुम्ही सर्व जण जेवूंच घ्या. आणि ते सगळे जरा बिचकत जेवू लागले.. नाथ महाराज आग्रहाने वाढू लागले..
सगळे लोक जेवून संतुष्ट झाले.. पण इकडे सगळ्या गावात बातमी पसरली.. नाथांनी महार यांना जेवू घातले.. नाथाने धर्म बुडविला...
त्याच्याकडे कुणीच जेवायला जायचं नाही..
त्या दिवशी पुन्हा शुचिर्भूत होऊन स्वयंपाक बनवला होता.. आणि पुन्हा एकदा सगळ्या ब्राहम्हंना ना आमंत्रण दिले गेले.. जेवयाला चला, उशीर होतो.. ब्राह्मणांनी नकार दिला.. आम्ही येत नाही म्हणे जा... नाथ महाराज चिंतातुर झाले..आता पितृ जेवायला कुणीच येणार नाही ...आता मी काय करू???
श्री खंड्या म्हणाला, महाराज नका चिंता करू, मी आहे न... यांची काय वाट पाहात, आपण खरोखरचे पितृ बोलाविया.. जेवू घालयचेत ना,त्यात काय एवढे... तुम्ही प्रेमाने तुमच्या पितरांना आवाज द्या..ते नक्की येतील..🤗
नाथ महाराज यांन आश्चर्य वाटले,ते म्हणाले नक्की काय होईल माहिती नाही..असे म्हणून ते आपल्या पितरांना येण्यासाठी विनवणी करू लागले.
नाथ महाराज यांच्या वाड्यात खरोखरच सगळे पितर जेवायला आले.. कुणी म्हणे,आपलेबाबा आले, तर कुणी म्हणे आजोबा, कुणाचे पणजोबा, तर कुणाचे खापर पणजोबा... सगळे खिडक्या तून डोकावून पाहू लागले..त्या ठिकाणी सगळ्यांचे वाडवडील जेवून तृप्त होवून नाथांना आशीर्वाद देवून गेले.. श्री खंड्या कुणीतरी अवतारी पुरूष आहे,हे यावेळी नाथांना समजले...
हा कसा काय हे सगळे करतो आहे,तो परमेश्वराचा अंश आहे असे त्यांना वाटले..✍️✍️💞Archu 💞

खरचं!!! खूपच सुंदर एकनाथ महाराज यांचे चरित्र आहे..ते जितके वाचत जावे त्यात नवनवीन भाव उत्पन्न होतात..मी तर या चारित्रमध्ये एवढी गुंतले की लिखाण करत रहावस वाटत.. मला वाटल होत या उत्तरार्ध भागात मी संपूर्ण कथा टाकील...पण ते काही शक्य झालं नाही, म्हणून मग मी याचा आणखी एक भाग लिहिणार आहे..
तुम्ही सर्व वाचक वर्गांची उत्सुकता वाढली पाहिजे,असे मला वाटते.. माझ्या कथांना भरपूर लाईक मिळत आहे,पण कमेंट करून कथा कसी वाटली,हे ही तुम्ही मला सांगितलं पाहिजे, तेव्ह तरी लिहिण्याचा हुरूप येतो..
बऱ्याच जणांनी मी या कथा कुणाच्या तरी कॉपी करतेय, किव्वा फॉरवर्ड करतेय,असे वाटत.पण मी माझ्या कथा स्वतः लिहिते...,मला नक्की कळवा.. तुमच्या आमच्या मधील...✍️✍️💞Archu💞