💞रंगी सोहळ्या रींगणी...
देह दंग सावळ्या अंगणी...💞
आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राची शेकडो वर्षाची परंपरा हा सोहळा अविस्मरणीय असा आहे.. लाखोंच्या संख्येने भाविक वारकरी पायी पंढरपूरची वारी करीत असतात...विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे भाविक आळंदी ते पंढरपूर असा अडीशे किलोमीटर प्रवास पंधरा दिवस करीत असतात...👏
वारीचा तेराव्या शतकापासूनच इतिहास आहे...ही वारी सर्वप्रथम पंढरपूरचा संत नामदेव यांनी, संत ज्ञनेश्वरांनी व त्यांच्या भावंडांना भेटून खरेतर वारीचे पुनरुज्जीवन केलेअसावे असे सांगण्यात येते...🤗
ज्याप्रमाणे फाटलेल्या कपड्यांना शिवून त्यांना एक रूप करण्यात येते किंवा शरीरावर काही घाव असल्यास औषधाने ते भरून निघतात अगदी त्याच प्रमाणे मनाच्या शांतीसाठी देवाचा ध्यास व त्याचे नामस्मरणाने मन शांत होते नाही का....
ज्यासाठी वारीही एक मोठी धार्मिक यात्रा आहे..हिंदू धर्मात धार्मिक यात्रेचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा अविभाज्य भाग आहे..अशा यात्रेमुळे फक्त देव दर्शनच नाही तर आपल्याला जीवन जगण्याची स्फूर्ती मिळते .. प्रेरणा मिळते आपल्याला आपले यश मिळवण्यासाठी आवश्यक असते.. त्याच बरोबर आपल्याला अध्यात्मिक व आत्मिक शांती ही मिळते.. पंढरपूर क्षेत्र ही महाराष्ट्रातील विदख्यात असे स्थान आहे..
आठशे वर्षापासून चालत असलेली ही परंपरा संत तुकारामांच्या वंशांचे वंशजांनी चालू केली असल्याचे आढळते त्यांनी संत तुकाराम यांच्या पादुका देहू वरून आळंदीस आणल्या व आळंदी मध्ये इंद्रायणीत स्नान करून संत श्री ज्ञानेश्वरांच्या चरण पादुका ही एका पालखीत ठेवून पुणे जेजुरी यामार्गे पंढरी नेल्या आणि तेव्हापासूनच वारीची ही परंपरा चालू झाली..
आजही गावागावातून अनेक दिंड्या या आळंदी मध्ये येऊन ज्ञानेश्वरांच्या व संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकारामांच्या पालखी सोबत दिंड्या पंढरपुराकडे मार्गक्रमण करीत असतात... ज्या वाटेने या दिंड्या जातात त्या गावातील नागरिक दिंड्याचे आदित्य स्वागत व त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था करतात..
वारकऱ्यांना वैष्णव असे म्हटले जाते...💖
पंढरीची वारी ही वारकरी च्यासाठी मोठी आनंदाची पर्वणी.. विठोबाचे राज्य हे वारकऱ्यांसाठी दिवाळी वारकरी मोठ्या आनंदाने या पर्वणीत उत्साहाने सोहळ्यासाठी येतात..मातीला जशी पावसाची ओढ असते तशीच ओढ वारकऱ्याला विठ्ठलाला भेटण्यासाठी असते🥰 ज्याप्रमाणे पाऊस पडल्यावर मातीचा सुगंध अगणित असा होतो त्याचप्रमाणे वारकरी विठ्ठलाला भेटल्यानंतर त्याचा आनंद द्विगुणित होतो❣️...मोठ्या उत्साहाने वारकरी आपली शेतातली व इतर सर्व कामे आटोपून विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरतेने वारीला निघतात...आपल्या लाडक्या विठोबाचे एक भेट घेण्यासाठी ते आसुसलेले असतात....
ती आस संपते आषाढी एकादशीला पाऊले चालती पंढरीची वाट असे पुटपुटत त्यांची पावले भराभर पंढरीनाथाच्या दर्शनास निघतात... अनवाणी पायाने उन्हाची, पावसाची व इतर कश्यचीही पर्वा न करता आपल्या लाडक्या विठोबाला भेटण्यासाठी शेकडो वारकरी निघतात ..🤗
शेकडो वर्षांपासून पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या अनेक वर्षांपासून बारी करतात... कुणाच्या घरात दहा पिढ्यांपासून ,तर कुणाच्या घरी 5पिढ्यांपासून व अश्या अनेक पिढ्या न पिढ्या चालत असलेले पंढरीची मोठ्या निष्ट्रणे, श्रध्देने,आनंदाने व नितूनियमने केली जाते.. वैष्णवांच्या सोबत राहून त्यांच्यासोबत राहण्याचा अनुभव हा काही वेगळाच असतो नाही का..असा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी एकदा तरी प्रत्यक्षात अनुभवावा...💕
विठ्ठल नामाच्या गजरात हा सोहळा पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असतो ज्ञानोबा माऊली तुकाराम असा अखंड चालू राहतो...
🌹हाती पताका घेऊनी..
वारी निघाली निघाली..
सारी विष्णु माय झाली...
माळ तुळशीची गळा
शोभे गंध वैष्णवांचा भाळी..
रमलो संसारात खरा
ऐक रुक्माई च्या वरा
तरी जीवालागला खरा तुझ्या पायरी...
नाव दारी उभ्या माझ्या
देतो विट पाई तुझ्या
सेवा करीना युगे युगे तुझी माऊली..
हरी मुखी नाम घोष विठ्ठला
रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी..
देह दंग सावळ्याच्या अंगणी...
जडो तुझे नाम कर्म तुझे नाम धर्म
वारकरी पंथ पांडुरंग...
वैकुंठी दिसे स्वर्ग रे....🌹
.....
भूवैकुंठ अवघ्या विश्वात ख्याती असलेले पंढरपूर हे साक्षात आपल्या सर्वांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल यांचे धाम... पंढरपुरात येण्यासाठी किती वारकरी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या सावळ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आतुरतेने येत असतात...❣️
पुरुष वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशी माळा, कपाळावर गोपीचंद टिळा ,हातात टाळ वीणा, मृदुंग , भगवा ध्वज व पताका घेऊन व सतत नामाचा गजर करीत वारकऱ्यांची वारी व त्यांचा समूह पुढे पंढरीच्या वाटेने वाटचाल करीत असतात....
तसेच महिला वारकरी ही गळ्यात तुळशीमाळा डोक्यावर पवित्र तुळशी वृंदावन घेऊन तर कोणी पाण्याच्या घागरी घेऊन वाटेने विठ्ठल रुक्माई चा जप करीत मार्गक्रमण करीत असतात...💕
वाहे चंद्रभागा वारकरी दंग भजनात
पंढरीच्या नाथा तुला माझा दंडवत...
आषाढी-कार्तिकी एकादशीला
साधु संत येती देवा तुझ्या दर्शनाला...
तुझ्यावरी भाव देवा...
तूच मला पाव रे..
जनी म्हणे बा विठ्ठला
तुझ्या चरणाचा देवा ध्यास लागला
गरुड खांबा जवळी देवा...
घेते तुझे नाव रे...💕
खरंच वारी इतका पवित्र स्थान कुठेही आपल्याला आढळत नाही... वारीमध्ये कुठल्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे, सामान्य नागरिका पासून ते धनाढ्य पर्यंत,..... राजापासून रंकापर्यंत तुम्ही वारीत सहभागी होऊ शकता... वारीमध्ये एकमेकांना माऊली म्हणून हाक मारली जाते... लहान असो वा मोठे तुम्ही त्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा माऊली म्हणून आशीर्वाद घेतला जातो...वारकर्यांना माऊली म्हणून हाक मारताना त्यांना त्या वारकऱ्यांमध्ये माऊलीचे दर्शन होत असते ज्याप्रमाणे मंदिराच्या कळसाकडे पाहूनच देवाचे दर्शन घेतल्याचे समाधान होते अगदी त्याचप्रमाणे.....
खरंच, आजही ही वारी आपल्याला खूप काही शिकवून जाते... माणसांमध्ये ही माणुसकी आजही टिकून आहे... खरंतर सनातन धर्मामध्ये किंवा वैदिक शास्त्रांमध्ये वारीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे... 20 दिवसांचा हा वारीचा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो वारीमध्ये आपल्याला खरंच परमात्म्याशी एकरूप झाल्याचा अनुभव येतो.. दोन आठवड्या हूनही अधिक काळ पाय चालत असलेले वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेऊनच आपली आस पूर्ण करतात.
खरंच.वारकरी म्हटलं की अंगावर रोमांच उठतो...
💞🌹सखा वैष्णवांचा पंढरीसी जातो...
कानिनाद येतो अभंगाचा..
मृंदुगचे बोल टाळाचा गजर...
नामाचा गजर ऐकू येतो ..
सासर माहेर नको वाटे...
कीअभंगांची ओळ एकु येते....
म्हणे मुक्ताबाई सावळ्या विठ्ठला...
राहीन मी तुमच्या चरणा पासी...🌹💞..
या अभंगात मुक्ताबाई म्हणतात की माझा सखा पांडुरंग हा पंढरीसी आहे .. तर माझी कोणत्याही कामात मन कसे बरी लागेल, सतत माझ्या कानानी अभंगाचा नाद येतो.. मला भगवंताचे ध्यास लागली आहे ...मृदुंगाच्या तालात व काळाच्या गजरामध्ये देवाचे नामस्मरण मला ऐकू येते सासर माहेर हे नको वाटे..आता माझी माय बाप विठाबाई जवळच आहे.. माझे विठ्ठला मायबापा मी एक वारकरी म्हणून तुमच्या भेटीस आली आहे मला तुमच्या चरणाची जागा द्या....
❣️कानडीया विठोबा कानडीया...
बहू आवडती जीवा पासूनया...
बापरखुमादेवीवरु विठ्ठल राया ...
बहु आवडती जीवा पासूनया...❣️
देवाची मुखदर्शन घेण्यासही आसुसलेले डोळे किती तरी दिवसांनी भगवंताच्या दर्शनासाठी झालेले आहेत...
अनंत जन्मीचे विसरलो दुःख
पाहता तुझे मुख पांडुरंगा...
आमचे अनेक जन्मीचे दुःखही आणि तुझे मुखदर्शन झाल्याने विसरून जातो तुझे तेज आणि लोभसवाणे ते रूप पाहून आपल्या डोळ्याचे पारणे फिटते झाले असे वाटते...
आज देवाच्या दर्शन आणि माझा देह पवित्र झाला आहे .. आत्मा शुद्ध होऊन तुझ्या चरणाशी एकरूप झाला आहे ...असे या वारकऱ्यांच्या मनातील भाव आपल्या लाडक्या विठोबाला सांगून वारकरी काल्याचे किर्तन करून माघारी परतत असतो ....
आपल्या घरी परतत असताना ही देवाला एकच मागणी असते ,की देवा माझ्या मुखात सतत तुझे नाम दे व माझ्या देहाकडून पुन्हा एकदा तुझी वारी करून घे...
मी जरी माझ्या संसारात गुंतलं तरी मी तुझे नामस्मरण विसरणार नाही, किंबहुना तू ते माझ्याकडून करून घेणार आहे ...असा तो दयाळू मायाळू परमेश्वर विठ्ठलाच्या दर्शनाने वारकरी कृतार्थ होतो...
अशा वारकऱ्यांच्या पायी नतमस्तक होऊन मी माझे लिखाण थांबवते.....💞 Archu💞
धन्य ते वारकरी
धन्य त्यांची वारी
धन्य ती पंढरी
आणि महान असा
परब्रम्ह श्री विठ्ठल,💖💖
...