Samarpan - 12 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | समर्पण - १२

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

समर्पण - १२

समर्पण-१२

मेरे हर रोम मे बसर तुम्हारा है,
कैसे खुद को किसी और को सोप दूँ।
प्यार और फर्ज की लड़ाई मे,
फर्ज निभना ही है प्यार का दस्तुर।


मी आणि विक्रम जेंव्हा जेंव्हा भेटलो आमचं बोलणं अभय आणि दिशा वर येऊन थांबायचं. आम्हाला दोघांनाही अभय आणि दिशा बद्दल खूप आपुलकी, काळजी वाटायची. आणि नेहमी आमच्या मनात एक अपराधीपणाची भावना असायची की जे काही आमच्या मनात सुरू आहे त्यात अभय आणि दिशा ची काय चूक आहे. पण एक गोष्ट जी आमच्या दोघांनाही माहीत होती की ती म्हणजे आम्ही आमच्या जोडीदाराला कधीच दुखवण्याचा विचार करू शकत नव्हतो. खुप वेळा मी आणि विक्रम ने विचार ही केला की अभय आणि दिशा ला आमच्या मैत्रीबद्दल सांगावं, पण हाच विचार करून नाही सांगितलं की खरचं ते आमच्या मैत्रीला समजू शकतील का? त्यावेळेला हाच विचार आम्ही केला की कदाचित आमच्या मैत्रीमुळे त्यांची मन दुखावतील आणि आम्हाला त्यांना कोणत्याच परिस्थिती मध्ये दुखवायच नव्हतं. विक्रम नेहमी बोलायचा की सोनू आपलं मैत्रितील प्रेम कोणीच समजू शकणार नाही, आपले जोडीदार ही नाही आणि झालंही तसंच...

नैतिक अनैतिक या गोष्टींवर मी भाष्य नाही करू शकत किंवा त्या गोष्टींची गहिरता समजण्या इतपत माझं व्यक्तिमत्त्व ही नाही. पण माझं प्रामाणिक मत आहे की प्रेम हे नैतिकच असतं. कारण प्रेम ही फक्त एक भावना आहे, जी मनातून निघते आणि मनापर्यंत पोचते. प्रेमाचा दुसरा अर्थच समर्पण असतं. आणि समर्पण तर मनातून निघणारा भाव आहे. एखादं नात अनैतिक कधी होत जेंव्हा आपण तिथे आपला स्वार्थ बघतो आणि तो स्वार्थ साधण्यात एवढे आंधळे होतो की त्यात आपण आपल्या जोडीदाराचे दुःख त्याच्या यातना पाहू शकत नाही. पण विक्रम ने मला नेहमीच माझा संसार सावरण्यात मदत केली. माझ्या आणि अभय च्या नात्यात कटुता यावी असे प्रयत्न विक्रम चे कधीच नव्हते, त्याच्या अडचणींच्या आधी त्याने माझा विचार केला, माझ्या घराचा विचार केला. आणि त्याचा हाच स्वभाव मला त्याच्या आणखी जवळ नेत होता. तो त्याच्या भावनांवर खूप तटस्थ होता. तो नेहमी बोलायचा,

"सोनू, एक मैत्रीण म्हणून तू मला खुप आवडतेस, तुझे विचार, तुझं वागणं, तुझा स्वभाव खुप भावतो मला आणि जसा मी तुला समजत गेलो, नकळत तुझ्या प्रेमात पडलो, आणि माझं प्रेम मला हेच म्हणत की तू अभय सोबत खूप आनंदी राहाविस, मला तुला मिळवण्याची ईच्छा कधीच नाही आणि राहणार ही नाही पण तुझी जागा माझ्या मनात खूप स्पेशल आहे...तू मनाने शरीराने फक्त अन फक्त अभयची आहेस, आणि त्याची राहणार..."

विक्रम जेंव्हा अस काही मला बोलायचा ना मला त्याच्याबद्दल प्रेमापेक्षाही जास्त आदर वाटायचा त्याचा. आणि मलाही वाटायचं की त्याच्या अन दिशा मध्ये जो अबोला आहे तो कमी व्हावा, त्याने पण खुश राहावं दिशा सोबत. पण आमचं हे नातं किती आदरयुक्त प्रेम आणि मैत्री ने भरलं आहे ही गोष्ट आम्ही अभय आणि दिशा ला नाही सांगू शकलो आणि ते समजू ही शकले नाही. कदाचित ते त्यांच्या जागेवर बरोबरच असावेत. कदाचित त्यांच्या नजरेतून आम्ही स्वतःला बघितलं नाही त्यामुळे आम्हाला आमच्या चूका कळल्या नाहीत.

मला असं वाटतं प्रेम हे मुक्त असतं आणि ज्या दिवशी प्रेम हे बंधन वाटायला लागलं त्यादिवशी प्रेम संपतं. आपण जर कोणावर खरच प्रेम करत असू तर ही अपेक्षा करणं चुकीचं आहे की त्यानेही आपल्यावर प्रेम करावं. अभय मला बोलला खर की त्याच माझ्यावर प्रेम आहे पण मला मात्र त्याच्या बोलण्यात, त्याच्या डोळ्यांत हेच दिसलं की तो आमच्या सहवासाला किंवा त्याला माझी सवय झाली होती त्या गोष्टीला प्रेम समजत असावा. कदाचित माझा हा विचार चुकीचाही असेल पण एक मात्र खर होत की मी दिवसेंदिवस त्याची जिद्द बनत होती, आणि याच गोष्टीची मला भीती वाटत होती.

आम्ही त्या रात्री घरी आलो, अभय खुश होता, त्याला बघून मला पण चांगल वाटत होतं, मात्र मनात खंत होती की मला माझी बाजू अभय समोर मांडता नाही आली आणि मी जे बोलली ते अभय बद्दल नाही तर विक्रम साठी होत आणि यासगळ्यांमुळे गुंता अजून वाढला होता. घरी आल्यावर आम्ही फ्रेश झालो अन अभय माझ्या जवळ येत बोलला,

"नैना, मी आज खरच खुश आहे आता फक्त एकच गोष्ट बाकी आहे
आपल्यामध्ये"

"काय अभय"

"आपल्यातला हा दुरावा...."

मला अभयच्या बोलण्याचा अर्थ कळाला पण यावेळी मला विक्रमच बोलणं आठवलं की जर मला त्याला आनंदी बघायचं आहे तर मला माझ्या संसारात आनंदी राहायला पाहिजे आणि त्यासाठी खुप गरजेचं होतं मला आजच्या परिस्थितीला सामोरे जायचं. आणि मी ठरवलं की मी अभय साठी माझा पत्नीधर्म निभावणार, त्याला त्याच्या कोणत्याच अधिकारापासून लांब ठेवणार नाही. माझ्यासाठी ही खरच खुप मोठी परीक्षा होती. मी माझ्या संसारात जर प्रामाणिक राहायचं होत तर मला अभय चा मनापासून स्वीकार करणं गरजेचं होतं. लग्न काय असतं? हा प्रश्न मला माझ्या लग्नानंतर खुप वेळा पडायचा कारण अभय आणि माझं नातं ज्या वळणावर येऊन थांबलं होतं तिथे मला लग्न म्हणजे माझ्या पायातल्या बेड्या वाटत होतं. माझे हे विचार किती चुकीचे आहेत हे मला विक्रम ने पटवून दिलं. तो मला नेहमी समजावून सांगायचा,

"सोनू, जबरदस्तीच्या बंधनात नक्कीच अडकून राहायचं नाही, अगदी शेवटच्या मंगलाष्टकापर्यंत आपल्याकडे वेळ असतो आपल्याला आपला निर्णय घ्यायला, पण जर एकदा एकमेकांशी जुळलो गेलो तर त्या बंधनात आपण एकटे नसतो आपल्यासोबत एक व्यक्ती अजून असते तेंव्हा ते बंधन तोडतानाही आपण त्या व्यक्ती चा विचार करायला हवा, त्याने कस ही वागलं तरी आपण मात्र आपल्या बाजूने प्रामाणिकपणे ते नातं निभवायचं, म्हणजे जेंव्हा नातं तोडायची जरी वेळ आली तरी आपल्या मनात राहायला नको की मी अजून प्रयत्न करायला पाहिजे होते, जर आपण स्वतः याला बेडी म्हणायला लागलो तर आपल्या जोडीदाराला दोष देण्यात अर्थ नाही..."

विक्रम चे हेच शब्द आठवून मी डोळे मिटले अन विचार केला आता काहीही झालं तरी मी अभयला टाळू शकत नाही आणि तो क्षण आलाच आहे जेंव्हा अभय मला त्याची बनवुनच राहणार, पण तेवढ्यात अभय पुन्हा बोलला,

"नैना, मान्य आहे दुरावा आहे आपल्यामध्ये पण हे असं इतक्या घाईघाईमध्ये तुझी ईच्छा नसताना मला काहीच नको त्यामुळे शांत हो...आणि तसही आपण महाबळेश्वर ला जातच आहोत ना, तेंव्हा सगळा हिशोब बरोबर करेल तुझ्याकडून मी😉"

अभय मिश्कीलपणे बोलून गेला, पण माझी घालमेल मात्र काही कमी झाली नाही. माझं मन खूप अशांत होत, आणि माझ्या मनाला शांतता फक्त विक्रम शी बोलूनच होणार होती.


"कुछ भी कही पर भाये ना,
क्षण भर को भी चैन आये ना,
सबकुछ है किंतु कुछ नही,
संसार मन को लुभाये ना।"


असच काहीतरी माझ्या बाबतीत झालं होत. मला माहीत नव्हतं किती दिवस अजून मला अश्याप्रकारच आयुष्य जगायचं आहे पण माझ्यासाठी खूप कठीण होतं या सगळ्या गोष्टींचा सामना करणं.

------------------------------------------------------------------

मी आणि विक्रम आश्रमातून आल्यापासून व्यवस्थित बोलणं झालं नव्हतं आणि त्यात अभय ने पण त्याच्या मनातलं बोलुन दाखवलं त्यामुळे माझी द्विधा मनस्थिती फक्त विक्रमच दूर करू शकत होता त्यामुळे मी विक्रमला फोन केला,

"बोला मॅडम...आली माझी आठवण, पण मी तुला बोलनार नाही आता"

"ठीक आहे मी ठेवते फोन"

"अरे कमाल आहे यार, असं कोणी करत का? म्हणजे माणुसकीच नाही लोकांना आजकाल😑😑"

"तूच बोलला ना नाही बोलायचं मग का मी जबरदस्ती करू"

"हो पण हे नाही विचारणार की का बोलायच नाही, सोड...तू नाही विचरणार पण मीच सांगतो, मी रागवलोय तुझ्यावर 😞😞"

"का मी काय केलं?"

"काय केलं? एक तर तुला इतक्या चांगल्या ठिकाणी घेऊन गेलो, तुला गाणं ऐकवलं माझं, इतकी मेहनत केली मी न तू सरळ निघून गेली, मागे एकदा वळून ही बघितलं नाहीस मला☹️☹️"

" तुला माहीत आहे मला घाई होती अभय सोबत बाहेर जायचं होतं, आणि तुला वळून बघितलं असत तर अभय सोबत बाहेर जाऊ शकली नसती "

"ओहो, म्हणजे कोणीतरी खूप बिझी होत...हम्म..मग कशी झाली डेट... अभयला इम्प्रेस केलं की नाही, की अशीच काकूबाई बनून गेली होती...."

"केलं ना खूप इम्प्रेस केलं...इतकं की अभय माझ्यावर प्रेम करायला लागलाय आणि आता त्याला आमच्यातला दुरावा भरून काढायचं..."

"अरे व्वा, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे, मी खुप खुश आहे"

" तुला आनंद होतोय विक्रम? तुला काहीच वाटत नाही आहे? मी आणि अभय फिरायला जाणार, तो इतक्या जवळ असेल माझ्या, अन तुला काहीच वाटत नाही आहे, हेचं आहे तुझं प्रेम? "

"हो...हेच आहे माझं प्रेम सोनू, मी तुला हे तर बोललो की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण तुला कदाचित प्रेमचा अर्थ नाही समजावू शकलो, काय वाटतं ग तुला मला काही वाटत नसेल? पण एक सांगू, मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने वाटते...ती म्हणजे माझ्यामुळे तुझ्या अन अभय मध्ये कोणतेच प्रॉब्लेम नको व्हायला, माझं प्रेम हेच आहे सोनू जे तुला अडचणीत नाही पाहू शकत, आणि तुला काय वाटतं ग की प्रेम आहे म्हणजे दोन व्यक्ती शरीराने एकत्र आल्याच पाहिजे? जर हे वाटत असेल तर खुप चुकीची मानसिकता आहे तुझी, प्रेम आपल्याला दूर राहून एकमेकांची काळजी करायला शिकवतं, एकमेकांना प्रेरित करायला शिकवतं, प्रेम कमजोरी नाही आहे सोनू, प्रेम ताकत आहे....आणि जर माझं प्रेम तुला कमजोर बनवत असेल तर नको मला ही मैत्री पण..."

" सॉरी विक्रम, नको ना चिडू प्लिज, मला काही कळत नव्हतं रे, आश्रमात तू जे काही बोलला अन त्यानंतर अभय ने ज्याप्रकारे त्याच्या गोष्टी माझ्या समोर मांडल्या मला कळत नव्हतं काय करू, आणि आताही कळत नाही आहे काय करू त्यामुळे तुला फोन केला तर तू माझ्यावरच चिडतो आहेस...."

"मी चिडत नाही आहे राणी...बर ऐक, तुला नाही कळत आहे ना काय करायचं तर माझं ऐकशील? माझ्यावर विश्वास आहे ना तर एक कर..अभय स्वतः हून तुझ्या जवळ आलाय, त्याच्या बाजूचे प्रयत्न त्याने केले, आता तुझी बारी आहे, बघ अभय खुप चांगला जीवनसाथी बनेल, त्याचे प्रयत्न व्यर्थ नको घालूस, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर, आणि जर तुला मला खरंच आनंदी पाहायचं आहे तर तू आनंदी रहा..."

"मी नक्की प्रयत्न करेल....एक काम कर ना तू पण चल आमच्या बरोबर दिशा ला घेऊन "

" नको मला कबाब मे हड्डी नाही बनायचं😜😜, आणि तस पण आता मी पण ठरवलंय दिशा ला वेळ द्यायचा, पुढच्या महिन्यात मी तिला शिमल्या ला घेऊन जाणार आहे "

"अरे वा, तू तर फुल प्लॅंनिंग केली आहे रे....छान.... एक विचारू?"

"बोल ना"

"काही नाही"

"माहिती आहे तुला काय विचारायचं आहे ते? हेच ना की माझं दिशावर प्रेम आहे की नाही"

"तुला सगळंच कळत ना, मला काय बोलायच असत काय नाही"

"हो मला कळत, अन राहिला प्रश्न दिशाचा तर आमचं लग्न फक्त घरच्यांना खुश करण्यासाठी केलं आम्ही, पण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस ना मी तुझ्यामध्ये स्वतःला शोधतो, खोटं नाही सांगणार सोनू, पण मी प्रयत्न केलाच नाही दिशाच्या अन माझ्या नात्यासाठी, खूप बिझी करून घेतलं स्वतःला कामात, पण जेंव्हा तुझे प्रयत्न बघायचो ना अभय साठी, तुझं लग्न वाचवण्यासाठी, मला खूप अप्रूप वाटायचं, आणि तुझ्या याच गोष्टी मला प्रेरणा देतात, त्यामुळे मी ठरवलं आहे की मी दिशाला वेळ देणार, आणि फक्त मीच नाही तर तू पण अभय सोबत चांगली वाग....माझ्या सोबत जशी लेडी सिंघम सारखी भांडते तशी त्याच्यासोबत भांडू नको जाडे😝😝😝"

" तू पुन्हा बोलला मला जाडी, 😫😫, बघ आता जर गेली ना अभय सोबत तर येणारच नाही परत, मग बस रडत..."

"जा जा...मी पण गेलो ना तर नाही येणार परत... तूच बस रडत😜😜"

गेला निघून....तो पण रडला आणि मी पण खूप रडली...आम्ही एकमेकांविना किती अधुरे आहोत हे माहीत असताना ही, आपापल्या जोडीदारासोबत आमच्या आयुष्याला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही....बंधनात असताना नातं निभावणं खूप सोप्प असत, पण अस नातं ज्याला नाव नाही कींवा जे नातं कोणत्याही बंधनात अडकलेल नाही असं नात आयुष्य भर फक्त मनात जपणं म्हणजे म्हणजे प्रेम...आणि त्या प्रेमाचा आदर राखून आपले कर्तव्य निभावणं म्हणजे समर्पण.....

मी आणि विक्रम ने अस नातं स्विकारुन संसार करण्याचं धाडस केलं होतं.....मी अभय सोबत नव्याने सगळं सुरू करण्याच्या प्रयत्नात होती, तिकडे विक्रम ने ही दिशा सोबत सगळं काही व्यवस्थित करण्याचा निर्णय घेतला होता....पण आम्ही आमच्या जोडीदारविषयी किती काळजी करतो किंवा आम्हाला त्यांना दुखावण्याचा हेतू आहे की नाही हे फक्त वेळ आणि अभय दिशाच सांगणार होते.......

------------------------------------------------------------------

क्रमशः