Julale premache naate - 84 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते-भाग-८४।।

Featured Books
Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते-भाग-८४।।

जाग आली ती दरवाजा वाजवण्याची.. कोणी तरी ते वाजवत होत. मी कसे तरी डोळे उघडत बेडवरून उठले आणि दरवाजा उघडला.., तर समोर निशांत होता. हातात कॉफीचा मग घेऊन...

"गुड मॉर्निंग मॅडम..., इन युअर सर्व्हिस मॅम. फॉर यु कप ऑफ कॉफी..." एवढ बोलून त्याने माझ्याकडे पाहिलं.

"गुड मॉर्निंग.. क्या तुम इतना लेट कॉफी लाया। अभि साहेब को पता चला ना तो बोहोत दाटेंगे हा। बाद मे बोलने का नई बताया क्यु नही।।"

"हो का मॅडम....!! अस बोलतच तो रूममध्ये घुसला.

हातातला ट्रे बाजुच्या टेबलवर ठेवत त्याने माझ्या कमरेत हात घालत मला स्वतःच्या जवळ खेचलं...

"अरे काय करतोस तू...?? सोड मला, वेडा आहेस का, कोणी बघेल ना...! आई येईल खडूस यार गप्प हा...!" मी घाबरतच लाजत होते.. माझ्या प्रत्येक बोलण्यावर तो त्याचा माझ्या कामरेवरचा हात घट्ट करत होता..

"खडूस यार काय हे., असं काय करतो...!"

"काय करू हनी-बी खूप दिवस तुझ्यापासुन दूर होतो ना.. सो आज म्हटलं लगेच चान्स मारुया..." अस बोलत त्याने मला अजूनच त्याच्या जवळ खेचलं.. आता आमच्या दोघांमध्ये खूपच कमी अंतर बाकी होत..

"चल पटकन एक किस दे मग सोडतो तुला.."

"वेडा आहेस का..? मी अजून फ्रेश ही झाली नाहीये, की ब्रश केला नाहीये.."

"चालेल मला अशीच किस कर. बघु ब्रश न केलेल्या ओठांची किस ची टेस्ट कशी लागते.." हे ऐकताच मी त्याच्या पाठीत एक फाईट टाकली...

"आई ग...!!! काय ग हे.. किस मागितली ग मी फाईट नाही.."

"घाणिरडा मुलगा..."

त्याला दूर करत मी ब्रश करायला गेले.. आधी कॉफी घेईल म्हणून मी बाहेर आले नाही तर ती थंड झाली असती.. मी बाहेर आले तेव्हा निशांत माझ्या रूममध्ये नव्हता. एक क्षण वाटलं तो खरच आला होता, की मला भास झाला. पण जेव्हा लक्ष टेबलावर गेलं तेव्हा जाणवलं की तो खरच आला होता कारण टेबलावर त्याने आणलेला कॉफीचा मग होता.. पण त्याच्या बाजुला एक नोट ही होती..

मी जाऊन ती नोट उघडली त्यात त्याने फक्त "कॉलेजमध्ये भेटुया",एवढंच लिहिलं होतं.. घड्याळात पाहिलं तर सकाळचे आठ वाजले होते. मी बाहेर आले तेव्हा आई डायनिंग टेबलावर बसून चहा पीत होती.. पण बाबा दिसत नव्हते. कदाचित ऑफिसला गेले असावेत.

मी पुन्हा आत आले आणि कॉफी संपवली.. ती संपवुन बाथ घेण्यासाठी निघून गेले... स्वतःच आवरून मी बाहेर आले तेव्हा मी आई ला विचारलं ही...

"काय ग आई.. निशांत कुठे गेला.???"

"अग तुला बोलला नाही का.?? तो गेला घरी.. तुझ्यासाठी मस्त कॉफी बनवली होती घेतलीस का?? पण त्याला आजोबांचा कॉल आलेला म्हणून घाईतच गेला. तुला कॉलेजमध्ये भेटेल बोलला..." अस बोलून आई माझ्यासाठी नाश्ता आणायला किचनमध्ये गेली.

नाश्ता करून मी काही वेळ टीपी केला आणि त्यानंतर कॉलेजला जायला निघाले..

कॉलेजमध्ये तेच रोजचे लेक्चर्स आणि त्यानंतर लंच ब्रेक. मी धावतच कँटीनमध्ये आले आणि निशांतला कॉल केला...

"हेय., कुठे आहेस..? म्हणजे आला आहेस ना तू कॉलेजला..??"

"हो.., भेटतो तुला." एवढं बोलून त्याने कॉल कट ही केला..

मी कँटीनमधल्या एका टेबलावर बसले असता मागून दोन हातांनी माझे डोळे बंद केले.

"निशांत..., चल आता लहानमुलांसारखं वागणं बंद करा." मी हसतच बोलले.. पण मी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा समोर निशांत नाही तर राज होता..

"अग मी होतो ग...निशांत नाही.!!!" अस बोलून राज माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसला..

"अरे सॉरी.., मला वाटलं निशांत असेल. अरे आताच बोलणं झालं आमचं कॉल वर. सो मला वाटलं की तोच असेल..." मी कस तरी त्याला उत्तर देऊ केल.

"इट्स ओके ग प्रांजल.. सो कशी वाटली पार्टी आणि आमचं हॉटेल.???"

"काय ते हॉटेल तुमचं होत..??"

"हो.., डॅड ने मला ही हे नंतर सांगितलं. असो एक बर झालं.. आता आपण हवं तेव्हा जाऊ शकतो तिकडे एन्जॉय करायला..??" त्याच्या या बोलण्यावर मी फक्त मान डोलावली.. पण माझं लक्ष होत ते निशांतकडे..तो अजुन ही आला नव्हता.

"काही खाणार आहेस का..?? मी मागावत आहे माझ्यासाठी..." राज ने विचारलं त्याकडे ही माझं लक्ष नव्हत. मला फक्त निशांतला बघायचं होत. आणि देवाने माझं मागं ऐकलं..., कारण समोरून निशांत चालत येत होता..कोणाशी तरी कॉलवर बोलत.

निशांत समोरून येत असताना अचानक मला असं जाणवलं की सगळं काही थांबलं आहे.. आजूबाजूचं.. स्लोवं मोशन सारख वाटत होतं.. कानामध्ये गिटार ची धुंद ऐकू येत होती..

पण हे सगळं खोट होत कारण निशांत कधीच माझ्यासमोर येऊन टिचकी वाजवत होता...

"हेय हनी-बी... प्रांजल..!! काय ग काय झालं.??? तू ठीक आहेस ना.???"

"हो, मी ठीक आहे." एवढं बोलून मी बॉटल मधल पाणी पीत स्वतःच्या डोक्यावर हात मारला.. "पागल मुलगी."

तेवढ्यात राज ही खायला घेऊन आला.. त्याने कदाचित निशांतला पाहिलं असावं म्हणून त्याच्यासाठी ही सॅंडविच आणलं होतं आणि माझ्यासाठी ही..

"छोटीशी पार्टी माझ्याकडून..." अस बोलुन त्याने खायला सुरुवात केली. मग काय मी आणि निशांतने ही सँडविच संपवल.

पोट भरल्यावर निशांतनेच विषय काढला...

"सो गाईज... मी काल बोलल्याप्रमाणे येत्या दोन-एक दिवसांत होळी दहन आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी.. त्यामुळे मी तुम्हाला आमंत्रण करत आहे, की तुम्ही त्या सणात आमच्याकडे येऊन सणाची मज्जा लुटा.."

"फक्त तुम्हीच नाही हा... प्रांजल तू आई-बाबांना घेऊन यायचं आहेस आणि राज तू तुझ्या डॅडला.. मला माहित आहे त्यांना कामं असतील.. पण तरीही त्यांना घेऊन आलास तर आम्हाला आवडेल. हवतर काही वेळासाठीच बोलावं. त्यानंतर ते गेले तरी चालेल. पण ते आले तर आनंदात भर पडेल.." यावर राज ने आपल्या हाताचा अंगठा दाखवत.. मी प्रयत्न करतो.. अस खुणावल.

वाह...!! मी होळी यावर्षी निशांतसोबत साजरा करणार याचा मला चांगलाच आनंद झाला होता.. तो दिवस आता काही दिवसांनी येईल जेव्हा मी माझ्या प्रेमाचा रंग निशांतला लावेल..

जसा माझ्या प्रेमात तो बुडाला आहेच.., तस त्याला रंगात ही बुडवण्याचा प्लॅन माझ्या डोक्यात शिजू लागले होते... पण मनोमन मी आनंदी होते..

आता वाट बघायची होती ती त्या होळीच्या दिवसाची...
जेव्हा मी माझ्या कृष्णाला माझ्या प्रेमाच्या रंगासोबत होळीच्या रंगात ही नाहु घालणार होते....

to be continued....

(कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

स्टेय ट्यून अँड हॅप्पी रिडींग गाईज.. टेक केअर.

©हेमांगी सावंत(कादंबरी)