Salute to our teenage - 3 in Marathi Fiction Stories by शमिका books and stories PDF | सोलाह बरस की बाली उमर को सलाम (भाग 3)

Featured Books
  • ફરે તે ફરફરે - 37

    "ડેડી  તમે મુંબઇમા ચાલવાનુ બિલકુલ બંધ કરી દીધેલુ છે.ઘરથ...

  • પ્રેમ સમાધિ - પ્રકરણ-122

    પ્રેમ સમાધિ પ્રકરણ-122 બધાં જમી પરવાર્યા.... પછી વિજયે કહ્યુ...

  • સિંઘમ અગેન

    સિંઘમ અગેન- રાકેશ ઠક્કર       જો ‘સિંઘમ અગેન’ 2024 ની દિવાળી...

  • સરખામણી

    સરખામણી એટલે તુલના , મુકાબલો..માનવી નો સ્વભાવ જ છે સરખામણી ક...

  • ભાગવત રહસ્ય - 109

    ભાગવત રહસ્ય-૧૦૯   જીવ હાય-હાય કરતો એકલો જ જાય છે. અંતકાળે યમ...

Categories
Share

सोलाह बरस की बाली उमर को सलाम (भाग 3)

भाग ३


दोघेही गार्डन च्या दिशेने निघाले, पण तेवढ्यात अंकुशला ऑफिस मधून महत्त्वाचा फोन आला आणि त्यांचे गार्डन मध्ये जाणे राहून गेले आणि म्हणून दोघांना ही आपापल्या जॉबला जावं लागले .

अंकुश ला खूप राग आलेला होता... तो रागातच बडबड करत काम करत होता...

"दरवेळेस काही तरी निवांत वेळ घालवावा म्हटलं की कोण ना कोणी मध्ये टपकतोच... काय शेवटी आयुष्यंच खराब, खा प्या, काम करा घरी जा, उद्या उठा कॉलेजला जा, नुसत हेच चालू आहे आयुष्यात ... अर्पिता कधी जवळ येऊ देत नाही, अन् कधी चान्स मिळाला की हे असं कोणतरी आडवे येत... "

असं बडबडत तो काम करत होता, ऑफिस मधला त्याचा जिग्री दोस्त दीपक त्याला कधीपासून पाहत होता, आज काही तरी बिनसलंय हे त्याला समजलं होतं... पण कामाचा लोड जास्त होता त्यात आपण मध्येच येऊन विचारल्या ने त्याला राग येईल म्हणून तो शांत होता...

थोड्या वेळाने अंकुश शांत काम करत आहे हे पाहून त्याचा मित्र त्याच्याजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला, "काय अंक्या आज एवढा काय स्ट्रेस मध्ये दिसतोय... आज मूड दिसत नाहीये कामात..."

अंकुश शांतपणेच म्हणाला .. "मला आता कशातच मूड नाहीये... सगळ करायचं म्हणून करायचं..."

दीपक काळजीने म्हणाला, "काय रे घरी सगळ ठीक आहे ना".

"हो घरी सगळ ठीक आहे," अंकुश काम करता करताच म्हणाला.

"मग आज काय भांडला कि काय अर्पिता सोबत... " दीपकने हसत हसत विचारले..

"तुला वाटतं कधी मी तिच्यासोबत भांडेल" , अंकुश कामातून डोकं वर काढत म्हणाला...

"मग काय अर्पितानेच आज राडा केलेला दिसतोय" दीपक हसतच बोलत होता..

अंकुश त्याचं काम बाजूला ठेवत म्हणाला, "नाही रे असं काही झालं नाहीये, पण आज काल भांडण जास्त करते ती माझ्यासोबत, हे मात्र खर आहे."

"चालायचं रे, आता तुम्ही लव्ह बर्ड्स... आणि ते म्हणतात ना तुझ माझ जमेना, तुझ्या वाचून करमेना.. असे आहे तुमच".

"हो ते तर आहे" अंकुश शांतपणे म्हणाला आणि पुन्हा कामात डोक खुपसुन बसला.


"चल कॉफी घेऊया, जरा बरं वाटेल तुला"

अंकुशलाही थोडे फ्रेश व्हावेसेचे वाटले म्हणून त्याने होकारार्थी मान हलवली आणि दोघेही कॉफी प्यायला गेले.


कॉफी घेत घेता दिपकने अंकुश ला विचारले, "तुमचा पुढचा काही प्लॅन वगैरे झाला की नाही रे ?"

"कसला रे?" अंकुश कॉफी चा घोट घेत म्हणाला...

"अरे लग्नाचा, एकमेकांच्या घरी सांगण्याचा... म्हणजे तुम्ही हे असं बाहेर फिरता, कुणी पाहिलं आणि लावली घरी पिन तर..."

"नाही रे आज पर्यंत कुणी काही पहिलं नाही, अरे आम्ही जाऊन जाऊन जातो तरी कुठं, आमचं ते रोजचं हॉटेल, आणि ते गार्डन.. तिथं कोण आम्हाला पाहायला लागलंय, मॅडम अजून कधी फिरायला तरी आल्यात का माझ्या सोबत??, एक ते पहिलं महाबळेश्वर आणि रायगड या दोन ठिकाणी गेलेलो आम्ही फिरायला, ते पण दोन वर्षांपूर्वी... तेव्हाही असं गेलो नी असं आलो, वन डे मध्ये शक्य आहे का... कुठं जाणं..." , अंकुश खराब मूड मध्येच बोलला...

"मग काय वैतागला की काय अर्पिताला" , दीपक मस्करी त म्हणाला...

"मी एकवेळेस स्वतःला वैतागेल"... अंकुश दीपक कडे एकटक पाहत आणि छोटेसे स्मित देत पुढे बोलू लागला, "ती माझी सर्वस्व बनलीय रे... कसा होतो मी आधी हे मला माहीत आहे फक्त, मी कधी आधी विचार केला नव्हता की मी एवढ्या गोड, सुंदर, प्रामाणिक, निरागस मुलीवर प्रेम करीन.... प्रेम करीन कसल... मी तर पडलो अर्पिताच्या प्रेमात... तिच्या साधे पणाने मला रोज प्रेमात पाडलं".

"बापरे... अर्पिता चा विषय काढला की तू एकदम फ्रेशच होतो... "

"तिने माझं आयुष्य फ्रेश करून टाकलंय, मला जगणं माहीत नव्हतं तिने मला जगायला शिकवलं, कुणाचं तरी असणं हे किती महत्त्वाचं असत हे शिकवलं, आधी माझं आयुष्य कसलं, धर्मशाळा होती.. कुणीही यायचं वाटेल तो पर्यंत माझ्या सोबत सलगी करायचं आणि वाटेल तेव्हा जायचं... एक अर्पिता आहे जी अजून माझ्या जवळ माझ्या प्रत्येक अडीअडचणीत सोबत आहे.."

"तुझी प्रेम कहाणी खूपच मोठी आहे असं दिसतय, तीन वर्षात आख्खं आयुष्य तिच्या सोबत घालवल्यासारखं बोलतोय..." दीपक हसत म्हणाला..

"जेव्हा ती मला भेटते ना मला असं वाटतं माझं आयुष्य इथेच थांबावं, घडाळ्याने पुढे जाणं थांबवावं, दिवस असेल तर दिवसच रहावा, आणि रात्र असेल तर कधीच सकाळ होऊ नये..." अंकुश कॉफी चा कप खाली ठेवत म्हणाला, "पण साला जेव्हा आम्ही भेटतो तेव्हाच वेळ अशी कुत्रं मागे लागल्या सारखी पळते.. आणि मग सगळंच कोलमडतं... "

असं बोलताना अंकुश चा हात घडयाळकडे गेला आणि त्याला समजल की आपण कॉफी प्यायला येऊन खूप वेळ झालेला आहे.

"चल माझी लव्ह स्टोरी ऐकत बसशील तर तुलाही ऐकतच बसविशी वाटेल..." अंकुश प्रवाहातून बाहेर येत बोलला.

"बस का भाऊ तुझी लव्ह स्टोरी आपण पाहत आलोय, एक एक किस्से अजून लक्षात आहेत माझ्या" .. दीपक खुर्चीवरून उठत म्हणाला... "तरी तुला पूर्ण ऐकावयची असेल तर ठेव रात्री पार्टी... तेच दोन्ही कामं होऊन जाईल आमची, गोष्ट पण ऐकू आणि...

अंकुश त्याला मध्येच थांबवत हसत म्हणाला, नाही रे बाबा मॅडमचा हुकुम आहे, एकट्यात दारू घ्यायची नाही, माझ्या सोबत घ्यायची, आता तिच्या समोर दारू घ्यायला जमेल का मला..."

"डेंजरे बाबा, तुमचं... दीपक मान हलवत हसत म्हणाला.

दोघेही आपापल्या डेस्क वर जाऊन काम करू लागले.

***
पूर्ण काम आटपून साडे पाच वाजता अंकुश थोडा मनातल्या मनात खुश होता, सकाळी अपूर्ण राहिलेली भेट, बोलणं आता संध्याकाळी पूर्ण होणार होतं... सकाळ पासून तो अर्पिताशी बोलला नव्हता, पण निघताना त्याने तिला फोन केला..

पहिल्याच रिंग मध्ये अर्पिता ने फोन उचलला आणि तो काय बोलायच्या आधीच म्हणाली, "निघाले मी... तू पण निघ.."

अंकुश ते ऐकून मनोमन खुश झालेला होता, तो तसाच कानाला फोन लावून बसलेला पाहून दीपक त्याला म्हणाला, "झाला ठेवला असेल तिथून फोन, ठेव तु पण... "

दीपकचं बोलणं ऐकून अंकुशने फोन ठेवला आणि तो खूप आनंदाने आटोपून निघू लागला...

"काय रे तुम्हाला रोज रोज भेटून बोर नाही होत का..." दीपक ने मज्जेत विचारले.

दीपक च्या प्रश्नावर उत्तर देत अंकुश म्हणाला,

"भाऊ प्रेम म्हणजे प्रेम असत ते...
आणि तुमचं आणि आमचं काही सेम नसत...
आपल्या प्रेमाचा पॅटर्न च वेगळा असतो.."


असं बोलत अंकुश तिथून निघाला, आणि त्याचे मित्र त्याच्याकडे बघत 'गेला बाबा हा, पहिली भेट असल्यासारखं करतोय',... अशी चर्चा करू लागले..

*******

अंकुश मस्त गाडीवर गाणं गुणगुणत गार्डन जवळ गेला, संध्याकाळची वेळ असल्याने तो खूप प्रसन्न होता, जसा तो तिला प्रपोज करताना होता तसाच तो आज तिला भेटायला जाताना होता... त्याला आज तिच्याशी नवा विषय बोलायचा होता...

गार्डन जवळ येताच अंकुश ने गाडी स्लो केली आणि तो इकडे तिकडे अर्पिता ला शोधू लागला, फुगे वाला रंगीबेरंगी फुगे घेऊन फिरत होता आणि तो त्या फुग्याच्या अधून मधून अर्पिता ला पहायचा प्रयत्न करत होता... त्याने गाडी पार्क केली आणि त्याला समोर त्याची लाल हेल्मेट वाली अर्पिता दिसली... तिच्या त्या लुक मध्ये त्याला थ्री इडियट मधली करीना वाटायची आणि ती तशीच हेल्मेट काढायची तसा तो तिच्या सौंदर्याचा पूर्ण हरवून जात...

तिने तसेच हेल्मेट काढले आणि डिकीत ठेवले, गाडीच्या आरशात आपला चेहरा पाहत तिने इकडे तिकडे नजर टाकली आणि तिला समोर अंकुश हसत तिच्याकडे पाहत असलेला दिसला...

अंकुश तसा पुढं येऊ लागला, तो असा लाजत होता की जणू ते पहिल्यांदा भेटत आहे आणि तो तिला प्रपोज करणार आहे...

अंकुशला असं पाहून अर्पिता मोठ्या मोठ्याने हसू लागली...

तो जवळ येत त्याला म्हणाली, "हे असं काय येड्या सारखं पाहत होता...." असं बोलून अर्पिता मोठ्या मोठ्या हसू लागली..

ते दोघे तसेच एकमेकांकडे थोडा वेळ पाहत बसले, हसत होते इकडे तिकडे पाहत होते..


ते इकडे तिकडे नजर फिरवून तिथलं वातावरण अनुभवत होते.


संध्याकाळची वेळ होती, ढग थोडे ढगाळलेले होते त्यामुळे वातावरण ही लोभणीय झालेले होते, तप्त उन्हाच्या झळा झेलून धरती थंड पडलेली होती, थंड वारा वाहू लागलेला आणि पावसाचे चिन्हही दिसू लागलेली.. अर्पिताला हे वातावरण फार आवडत होते, प्रत्येक पावसाळ्यातला पहिला पावसाळा तर ती पूर्ण एन्जॉय करायचं, पूर्ण चिंब पावसात भिजून कणीस खायचं, लस्सी खायची, थोड्या वेळानी घरी जाताना त्यांच्या हॉटेल मध्ये बसून एकच कप चहा पीत सुंदर भविष्याच्या गप्पा रंगवणे नंतर पाऊस थांबला की अंकुश च्या गाडीवरून छान लाँग ड्राईव्ह करून रात्री उशिरा घरी जाणं... घरी जाऊन उडवा उडवी ची उत्तर देऊन तिचा पहिला पाऊस आठवत स्वप्न रंगवत झोपणं.. ह्या सर्व गोष्टींमुळे अर्पितला पाऊस खूप आवडायचा...

तर अंकुशचं याच्या उलट, त्याला पाऊस आवडत होता पण तितक्यात तितका, म्हणजे चिंब भिजणं, पावसात नाचणं ह्या अशा गोष्टी त्याला आवडत नव्हत्या कारण त्याला पावसात फार थंडी वाजायची, आणि त्याहीपेक्षा तो अर्पिता सारखा प्रत्येक गोष्टीत आनंद शोधत नसायचा, त्याची स्वप्न ही लहानचं आणि जेवढं आपल्याला झेपेल, जमेल तेवढीच स्वप्न पहायची, अशा विचाराचा तो होता.. त्याला अर्पिता कडे पाहिलं की खूप हेवा वाटायचा, तिचा मनमोकळे पणा, स्पष्टपणे एखादी गोष्ट बोलून टाकणे, प्रत्येक गोष्ट मनमुराद एन्जॉय करणे... ह्या गोष्टीमुळे तो तिच्यात पूर्ण बुडून गेलेला होता, त्याला ती त्याची प्रेरणा स्थान वाटतं म्हणजे कोणत्याही समस्येचे हाल हे तिच्या सहवासात होते, ती सोबत असली की त्याला एक वेगळीच ऊर्जा मिळायची, म्हणून तो कधीच तिला सोडुन जायचा विचार करत नव्हता. तिचे मन, स्वभाव, सहवास, तिचा बिंदासपणा पण तितकाच निरागसपणा एखाद्या गोष्टीला पटकन घाबरणं, पण नंतर स्वतःवरच हसणं, अशी मोकळ्या स्वभावाच्या मुली आजकाल मिळत नाही आणि अर्पिता आपल्या सारख्या शांत लगेच लोकांमध्ये न मिसळणार्या, दिसायला ही एवढा खास नसलेल्या मुलाला हो म्हणाली, ह्यातच त्याला फार अप्रूप वाटे... आणि त्यामुळे तो तिची जीवा पलीकडे काळजी घेत असायचा...

दोघेही गार्डन मधलं वातावरण पाहून सुखावलेले होते, एकीकडे दोन तीन आजी आजोबा जॉगिंग करत होते, एकीकडे लहान मूलं खेळत होते आणि काही झाडांचा आसरा घेत प्रेमवीर आपल्या आयुष्याची स्वप्नं रंगवत होते, हा देखावा एकदम प्रसन्न करणारा होता..

ते दोघे मात्र शांतच होते, नाहीतर एव्हाना सगळ्या कपल्स ला डिस्टर्ब होईल एवढा ह्या दोघांचा गोंधळ चालु असायचा, पण आज एकदम शांतपणे त्यांनी गार्डन मध्ये एंट्री मारलेली होती, संथ वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अर्पिता चे केस उडत होते आणि ती ते सारखी कानामागे टाकत होती.. अंकुश तर तिच्याकडे न बघताही तिचे सौंदर्य न्याहाळत होता, त्याला खूप प्रसन्न वाटत होते, पण तेवढेच odd ही वाटत होते..

गार्डन मधल्या सर्व जागा बघून त्यांना छान एका झाडाखाली जागा मिळाली, तिथं आजूबाजूला कुणी नव्हतं फक्त पक्षांचा किलबिलाट आणि बाहेरून वाहणाऱ्या गाड्यांचा आवाज होता... शेजारी वाहणारी नदी त्यांच्या त्या देखव्यामध्ये आणखीन सौंदर्य ओतत होती, सहा वाजून गेलेले होते पण वातावरण ढगाळ झालेले असल्यामुळे लवकर अंधार पडला होता..

समोरच्या बाकावर ते दोघेही बसले...

अर्पिता नुसते आजूबाजूचे सौंदर्य न्याहाळत होती आणि अंकुश अधूनमधून तिला पाहत होता आणि तिचे लक्ष गेले की दुसरीकडे पहायचा...

आजूबाजूला दूरवर असलेले काही कपल्स चुंबन घेत होते, एकमेकांना बिलगून बसलेले होती आणि अर्पिता ते पुन्हा पुन्हा डोकावून पहायचा प्रयत्न करत होती... तिच्या मनात वेगळेच प्रश्न सुरू होते...

अंकुशला हे पाहून हसू आलं.. तो तिला समजावत म्हणाला...

"असं कोणत्या कपल कडे पहायचं नसतं",

ती त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून बोलली, का??..

""नसत पहायचं, चांगलं नसत.. bad manners"... अंकुश स्मित देत म्हणाला.

"आता दिसत असेल तर काय डोळे झाकून बसू... आता त्यांना समजत असेल ना कोणी तरी आपल्याला पाहत आहे, मग शांत बसावं ना.. ह्या लोकांना कसलीच कशी भीती नसती बाबा..." अर्पिता त्यांच्या कडून नजर हटवत बोलली...

अंकुशला समजलेलं होतं ती कोणत्या विषयावर बोलत आहे, पण तोच तो विषय टाळत तिला म्हणाला, जाऊदे ना, आपण काय लोकांविषयी बोलायला आलो आहे का इथे...

अंकुशने तिचा हात हातात घेतला... तसं अर्पिताने सुद्धा त्याच्याकडे टक्कं पाहिले,.
अंकुश ने तिचा हात हातात घेतला आणि त्याला तो विषय काढायचा होता पण त्याला ते जमत नव्हते म्हणून तो वेगळाच विषय काढत तिच्याशी बोलू लागला..

"अपु, आपण लग्न कधी करायचं ग"... अंकुश एकदम लाडात येऊन बोलला...

यावर अर्पिता ला हसू अवरलं नाही, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली...
"लोक हसतील आपल्याला १९ व्यां वर्षात लग्न केलं की..."

हे त्यालाही कळत होत पण त्याने उगाच बोलण सुरू करण्यासाठी विषय काढला...

"अग मग तू मला अशी लांब लांब नाही ना करणार... " अंकुश केविलवाणा चेहरा करत म्हणाला.

अर्पिता त्याच्या हातातला हात सोडत म्हणाली, "आज लवकर जायचं घरी..."

अंकुश तिच्याकडे पाहून बोलला, "पहिलंस कसं करते, हे अशी रोज घरी जायचं, कॉलेजला, ऑफिसला जायचं, नुसत तुला माझ्यापासून लांब जायचं असत, कधी मला वेळ देत नाही ..

असं बोलत अंकुश रागात तोंड फिरवून बसला...

अर्पिता त्याला तिच्याकडे वळवत म्हणाली, "अरे मग रोज तर भेटतो की आपण.."

"पण अपूर्ण.." अंकुश तिचा हात झिडकरात रागात म्हणाला...

"अपूर्ण ???? आता हे अपूर्ण म्हणजे काय... " अर्पिताने बालिशपणे विचारले...

अंकुश तिच्याकडे तोंड फिरवत म्हणाला, "काही नाही चल जाऊदे, आपण वेगळ्या विषया वर बोलू... "

अंकुशला माहीत होते त्याने जर त्याच विषयावर लांबण लावत बसला तर अर्पिता पुन्हा आज ही रागाने निघून जाईल.

"दुसरा कोणता विषय" , असं अर्पिता बोलली..

तेवढ्यात मोठ्याने विजा कडकडू लागल्या... ढगांचा गडगडाट सुरू झाला, जोराने सुसाट्याचा वारा सुरू झाला, अंगावर मोठमोठे पावसाचे थेंब पडू लागले, तसे सर्व कपल्स आपापल्या गाड्या घेऊन निघू लागले, बागेत खेळणारी लहान मुलंही आपापल्या आई वडिलांसोबत घरी निघाली, सर्व पाणी पुरी, डोसा, वडापाव चे गाडी वाले आपली गाडी झाकू लागले..

पाहता पाहता पूर्ण गार्डन मोकळं झालं... आणि पावसाचा वेगळी वाढू लागला ... तसा अर्पिताने आनंदाने अंकुशचा हात पकडला आणि त्याला उठायला सांगितलं... अर्पिता तिचा चेहरा ढगाकडे करून गोल गोल फिरू लागली, ती एक एक पावसाचा थेंब उडवत अंकुश ला ही ये बोलली.. पण अंकुश तिला आपल्या बॅग भिजतील असं सांगू लागला.. "चल आपण चहा पिऊ" असं बोलला...
"भिजू दे भिजल्या तर काही नाही त्यात फक्त डब्बा आहे..." अर्पिता पावसात गोल फिरतच बोलली..

"अग पण माझ्या बॅगेत बुक्स आहेत..."

अर्पिता खूप उत्साहाने त्याला म्हणाली, "काय यार अंकुश ठेव तिकड ती बॅग आणि ये..." त्याला ती ओढू लागली...

"नाही थांब... मी लस्सी च्या दुकानात बॅग ठेऊन येतो... तू थांब इथे..."

असं बोलून तो बॅग डोक्यावर धरत पळत पळत लस्सी च्या दुकानात गेला नि तिथल्या काकांना बॅग ठेवायला सांगितली..

त्या गार्डन मधली सर्वच जण ह्या दोघांना चांगली ओळखत होती, जसे ते हॉटेल मधले फिक्स कस्टमर तसेच ह्या गार्डन मधली सुद्धा सर्वांच्या ओळखीचे होते, तिथला माळी, झाडू वाल्या बायका त्या दोघांना घरचे मानायचे, त्यांना खूपदा घरी जेवायला बोलवायचे, त्यामुळे त्या दोघांना ते गार्डन ही आपलंच असल्यासारखं वाटायचं...
तिथला माळी नेहमी त्यांच्याशी सर्व मनातल्या गोष्टी बोलायचा, तिथं येणाऱ्या प्रत्येक कपलची त्याच्याकडे माहिती असायची, आणि तो त्यांना इकडची तिकडची सगळी खबर सांगून हसवत असे..

'अरे आज त्या पोरासोबत जी पोरगी होती, ती मला काल बस स्टॉप ला दुसऱ्याच मुलासोबत दिसली... काय ही पोरं.. आज एक तर उद्या दुसरा..'असं बोलत तो सर्वच कपलची खिल्ली उडवायचा, पण ही दोघे फार लक्ष देत नव्हते.

तिथंच कडेला एक लस्सीचं दुकान होतं, एक काका ते दुकान चालवायचे, रिटायर झाल्यामुळे त्यांनी लस्सीचं दुकान टाकलेलं होतं, त्यांची दोन्ही मुलं ही परदेशी होती, मग घरात बसून राहण्यापेक्षा त्यांनी थोडाफार काम करायच्या हेतू ने लस्सीचं दुकान उघडल होतं.. तिथे रोज त्यांची भरपूर कमाई व्हायची, आणि त्यातले त्यांचे तगडे कस्टमर म्हणजे अंकुश आणि अर्पिता... अर्पिता एका वेळेस ३-४ ग्लास आरामात प्यायची... त्यामुळे ते काकाही अर्पिता दिसली की लस्सीचा ग्लास भरून ठेवायचे.. एखादे दिवस अर्पिताने एकच ग्लास लस्सी पिली की ते तिला आवर्जून बोलायचे,
'अग, पैसे उद्या द्या .' आणि हक्काने त्यांना फुकट पण खूपदा लस्सी द्यायचे.. त्यामुळे त्या काकांशी ही अर्पिता आणि अंकुश मस्त गप्पा मारायचे... खूपदा ते दोघं त्यांच्याशीच गप्पा मारायला गार्डन मध्ये यायचे... ते अंकुश मध्ये त्यांच्या मुलाला पाहायचे, ते त्याच्या जवळ वाटेल ते सर्व मोकळेपणाने बोलायचे...

एकंदरीत ते गार्डन मध्ये त्यांचे घर बनले होते, खूपदा ते तिथल्या झाडू वाल्या बायकांसोबत बसून डब्बा खायचे, त्यांच्या सोबत मनमुराद गप्पा मारायचे... त्यांच्या कडे पाहणाऱ्या खूप जणांना वाटायचे की ती दोघंही तिथे कामालच आहे.... पण त्यांना त्याचे काही वाटायचे नाही... अर्पिता ही कुणामध्ये ही सहज मिसळायची त्यामुळे आपोआपच सर्व जण अंकुश सोबत ही बोलायचे... अशा प्रकारे त्यांनी गार्डन ला त्यांचे कुटुंब बनवले होते..


असाच त्या पावसात अंकुश धावत पळत त्यांच्याकडे गेला,

ते काका त्याच्याकडे हसत म्हणाले,

"अरे काय लका, किती भिजलाया, गेले सगळे घरी.. आता मोठा पाऊस येईल बघ नि तुम्ही काय भिजताय... जा घरी तुम्ही पण..."

"अहो काका आता तर कुठं आमच्या लव्हस्टोरीला सुरुवात झालीय... बाकीचे कपल वेडे आहेत.. छान रोमँटिक वातावरण झालंय आणि आता गेलेत..." असं बोलून तो बॅग त्यांच्याकडे देत कुडकुडत तसाच पळत आला...

तो लांबूनच अर्पिताला पाहत आला, त्याची सगळी थंडी कुठल्या कुठे पळून गेलेली होती आणि त्याने धावत येऊन तिला पकडले...

ती पावसात मनमुराद भिजत होती, तिला कसली थंडी वाजत नव्हती, ती खूप एन्जॉय करत होती...

हळूहळू पाऊस वाढू लागला... अंकुश तिला असे आनंदाने पाहत एक वेगळ्याच विश्वात पोहचला, तिला ओढून जवळ घेतले, अख्ख्या गार्डन मध्ये काळ कुत्रंही नव्हते... फक्त ती आणि तो....

अंकुश जसा तिच्या जवळ जाऊ लागला तशी ती लाजू लागली आणि दूर पळू लागली...

अंकुश मनातल्या मनात म्हणाला,

यह इश्क नाहीं असान...
बस इतना समज लिजिये...
इक प्यार का दर्या हैं...
और डूब जाना हैं...

अर्पिता कडे दिलवाले स्टाईल ने हात करत त्याने तिला यायचा इशारा केला..

आणि अर्पिता ही पळत येऊन त्याच्या मिठीत शिरली... पाऊस भयंकर वाढलेला होता, विजा कडाडून कडकडत होत्या, आणि अंकुश आणि अर्पिताचं प्रेम एका नव्या वळणावर येऊन ठेपलेलं होत... अर्पिताने मारलेली घट्ट मिठी आणि ते ही अशा मूड मध्ये... ही त्याच्यासाठी पहिली मिठी होती...

त्याने तिला घट्ट पकडले आणि मनाशीच म्हणाला,

"प्रेम म्हणजे प्रेम असत...
पण तुमच आमचं सेम नसत..

माझं प्रेम हे असं अल्लड आहे...
खरंच प्रेम ही अशी गोष्ट आहे जी बळजबरी करता येऊच शकत नाही..."

अंकुश ने तिला घट्ट पकडले त्याचा हात तिच्या मानेवर होता, त्याची नजर तिच्या डोळ्यात बुडाली होती वरून धो धो पाऊस पडत होता आणि ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात अकंठ बुडाले होते, अंकुश ने गोड स्मित देत तिच्या कपाळा चे चुंबन घेतले, तसे अर्पिताने डोळे बंद केले.. अंकुश तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता...

अंकुश तिच्याकडे पाहत गाणं म्हणू लागला,

तेरे चेहरे में वो जादू हैं... बिन दोर खीचा जाता हूं... जाना होता हैं और काही तेरी और चला आता हूं...

"ह आलं तुझ्यावर..." तो तिला बिलगत म्हणाला,

"हमें ओर जिने की चाहत ना होती, अगर तुम ना होते... अगर तुम ना होते...

तुझ्यावर त.... " अर्पिता खट्याळ हसत बोलली...

"आं.... त वरून गाणं.... आ" असं बोलत अंकुश गाणं आठवू लागला.
"नाही येत मला त वरून..." अंकुश लाडात येऊन म्हणाला..

"असं कसं येत नाही किती गाणे आहेत त वरून..." अंकुशला ढकलत म्हणाली..

"मला स वरून येतं बोलू का..." अंकुश तिला जवळ घेऊन म्हणाला..

"तुला एकच गाणं येतं का.... तुला आठवत का आपण तेव्हा रस्त्याने चालत अंताक्षरी खेळत होतो... तेव्हाही तू एकच गाणं गात होता...." अर्पिता जोरजोरात हसत बोलली.

"हो ना.... काय भारी अंताक्षरी जमलेली आपली तेव्हा..."

"पण तू सारखं तेच गाणं गात होतास.." अर्पिता हसतच बोलली..

"तेव्हा सोळा वर्षाचे होतो ना आपण.."

"नाही मी सोळा आणि तू सतरा..."

अर्पिता आणि अंकुश दोघेही मोठ्याने हसू लागले..

आणि दोघांच्या डोळ्यासमोर त्यांची पहिली भेट, आणि तीन वर्षांपूर्वीचे ते दिवस फिरू लागले.


******

क्रमशः

© Bhartie "शमिका❣️"

क्रमशः