"ओह माय गॉड... आता या सोनियचीच कमी होती तुमच्या लाईफ मध्ये..." प्रिया ओरडतच बोलली.
"हो ना यार. काय मंद आहे ती.. पैशासाठी लोक काय काय करतात नाही..!!" वृदाने प्रियाला दुजोरा दिला.
हे ऐकून मी फक्त हात वर केले.. आणि पुढे बोलू लागली..
आम्ही बीच वरून आलो.. मस्त रिफ्रेश वाटत होतं. बीचवरून येताच मी आणि निशांत फ्रेश होऊन राज ला भेटायला त्याच्या रूममध्ये गेलो.
"हेय राज, येऊ का आत...??" माझ्या प्रश्नावर राजने हसतच आत यायला सांगितलं.
"राज, आम्ही सगळे निघत आहोत. हेच सांगायला आलो होतो. मी आणि प्राजु..."
"अरे यार.., निघालात तुम्ही...??? मला वाटलं अजून काही दिवस आपण इथे थांबु मस्त धमाल करू. सोनियामुळे झालेल्या प्रकाराने आपल्याला एन्जॉय ही करता आलं नाही...!" राज थोडा निराश होत बोलला.
"इट्स ओके ब्रो.. आता आपण मज्जा इथे नाही तर माझ्या घरी करायची आहे..." अस निशांत बोलताच मी आणि राजने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं.
"गाईज, या दोन दिवसांत जे काही झालं त्यामध्ये आपण सगळेच विसरून गेलो की येत्या दोन- एक दिवसांत होळी येतेय. आणि आमच्याकडे खुप मज्जा केली जाते. होळी आणि रंगपंचमीमध्ये. आणि म्हणुनच मी तुम्हला आताच इन्व्हाइट करत आहे..."
"अरे वाह!! चला मग लवकरच भेटु आता निशांतच्या घरी." राजने निशांतशी हात मिळवणी करत टाळी दिली.
"चल मग आता आम्हाला आज्ञा दे... भेटुया कॉलेजमध्ये" एवढं बोलुन मी आणि निशांत जायला निघालो.
खाली कार जवळ आई-बाबा आमची वाट बघत होते. आम्ही खाली आलो.. पण निशांतच काही तरी राहिल्यामुळे तो परत रूममध्ये गेला. पण जेव्हा परत आला तेव्हा मात्र त्याचा चेहरा उतरलेला वाटला. मी विचारलं ही, पण त्याने ते सांगायच टाळल.., मग आम्ही कारमध्ये बसलो.
संध्याकाळचे सात वाजले होते आम्ही निघालो तेव्हा... आभाळ ही भरून आलं होतं.. आभाळात काळ्या ढगांनी स्वतःचं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती.
गाडीमध्ये चालु असलेली गाणी.., की थकवा माहीत नाही., पण माझे डोळे जड होत गेले आणि मी झोपेच्या स्वाधीन झाले..
"अग प्राजु, उठ गं...! किती झोपा काढशील. चल जेवायला." आई कधीपासून हाक मारत होती काय माहीत...
मी डोळे किलकिले करत आईकडे पाहिलं.. समोर आई अजून ही मला उठवतच होती...
"अग चल ना... निशांत आणि बाबा गेले बघ पुढे आपली वाट बघत आहेत ते.. आणि तु उठत नाहीस. चल लवकर हा.. मला खुप भूल लागली आहे. तू येते आहेस की मी जाऊ...???!" आता मात्र आई चिडून बोलली तशी मी पटकन उठून बसले..
"हो ग आई, उठले मी. चल जाऊया." एवढं बोलून मी आईसोबत हॉटेल जवळ आले. मी आधी फ्रेश झाले सोबत आई होतीच. आणि त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये इंटर केलं.
समोर एका टेबलवर निशांत आणि बाबा बसले होते. मग आम्ही ही त्यांना जॉईन झालो.
पोटभर जेवुन शेवटी आईस्क्रीम खाऊन आम्ही आमच्या प्रवासाला लागलो.. संध्याकाळ संपुन रात्रीचा प्रारंभ झाला होता..
बाबांचं डोकं दुखत असल्याने ते मागे झोपले होते.. बघता बघता आई ही झोपली.. आता जागे होतो ते मी आणि निशांत...
त्या शांत, निरव रात्रीमध्ये चंद्र ही आकाशात आमच्यासोबत धावत होता.. मी हळुच खिडकीची काच खाली केली.. थंड गारवारा अंगावर शहारा देऊन गेला...
"हनी- बी.., काच वर कर ग.. गाडीमध्ये एसी लावला आहे ना..!!"
"काय रे...!" मी जरा तोंड वाकड करतच काच वर केली आणि बसले..
गाडीमधल्या रेडिओवर मस्त गाण वाजत होत.. अचानक एका गाण्याची म्युझिक वाजली आणि मी ओरडलेच....
"येsss... माझं आवडत गाणं..." त्यावर निशांतने स्वतःचे डोळे मोठे करत शांत राहण्याची खुण केली...
"अग हळु आई-बाबा झोपले आहेत ग मागे.. काय हे तुझं अस अचानक ओरडणं...???"
"अरे ते माझं आवडत सॉंग..." अस बोलत मी रेडिओसमोर माझं बोट करून दाखवलं.
"अच्छा हे काय.. मला ही आवडत हे गाणं. मस्त आहे ना..??" यावर मी माझी मान डोळे बंद करून डोलावली..
गाणं सुरू झालं....,
"तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये।।
ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूँगा ज़िन्दगी भर
सारे संसार का प्यार मैं ने तुझी में पाया
तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये।।
चँदा तुझे देखने को निकला करता है
आइना भी ओ ... दीदार को तरसा करता है
इतनी हसीं कोई नहीं
हुस्न दोनो जहाँ का एक तुझमे सिमट के आया
तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये।।
प्यार कभी मरता नहीं हम तू मरते हैं
होते हैं वो लोग अमर प्यार जो करते हैं
जितनी अदा उतनी वफ़ा
इक नज़र प्यार से देख लो फिर से ज़िन्दा करदो
तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये।।
ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूँगा ज़िन्दगी भर
सारे संसार का प्यार मैने तुझी में पाया
तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये।।
गाणं संपेपर्यंत मी आणि निशांत काहीच बोलत नव्हतो.. कारण आम्ही दोघे ही ते गाणं फील करत होतो.. त्यातला प्रत्येक शब्द आणि त्यामागचा अर्थ.. जस्ट ग्रेट वर्क डन बाय सिंगर्स, ते गाण लिहिणारे आणि चाल.. सगळं काही बेभान करणार होत.
"मस्त होत नाही गाणं..." ती शांतता भंग करत निशांत बोलला.. मी त्याच्याकडे बघुन डोळ्यानेच होकार दिला.
"किती अर्थपूर्ण गाणं आहे नाही..." अस बोलताच तो हसला..
"अरे यात काय हसण्यसारखं...???"
"अग तुझ्यावर नाही ग हसलो.. पण तुला माहीत आहे का... काही लोकं ते गाणं फक्त ऐकतात तर काही लोकं ते फील करतात.." यावर मला तर काही कळलं नाही. म्हणजे गाणं ऐकूनच फील करायचं असत ना, मी स्वतःच्या मनाशी बोलले.
"काय मॅडम.., नाही कळलं ना..?? सांगतो.. म्हणजे बघ जेव्हा आपण प्रेमात असतो ना तेव्हा आपण ते गाणं आणि त्यातलं म्युझिक एन्जॉय करतो. पण तेच जेव्हा आपण दुःखात असतो.., किव्हा आपला ब्रेकअप झालेला असतो ना तेव्हा आपण गाणं फक्त ऐकत नाही तर त्यातला प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळत असतो.. तो अर्थ आपल्या आताच्या परिस्थितीला जुळला जातो."
"आणि म्हणुन बघ ना काही लोक शांत गाणं ऐकून रडतात.., कारण त्यातले शब्द त्यांना त्यांच्या परिस्थितीला रिलेट करत असतात... कळलं का काही??"
" हो हो.., लव्ह गुरू कळलं हा मला." मी देखील लगेच निशांतची टांग खेचली. पण खरचं त्याने सांगितलेलं कुठे तरी मलाही पटत होत..
मग गप्पा-गोष्टी करत आम्ही आमच्या बिल्डिंगजवळ पोहोचलो.. यादरम्यान त्याने आजी-आजोबांना तो घरी येणार नाही हे कळवलं होत. कारण आम्हाला पोहोचायला बराच वेळ लागणार होता..
आई- बाबाही उठले होते. गाडी पार्किंग मध्ये लावुन आम्ही सगळे घरी परतलो... मी तर माझ्या घरला मिस करत होते.. दोन दिवस दूर राहणं आणि आयुष्यभर दूर राहणे.. बापरे..!! विचार करूनच चक्कर येईल.
घरात येताच सर्वजण फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेले.. निशांत ही त्याला दिलेल्या रूममध्ये निघून गेला.. आणि मी माझ्या रूममध्ये.
फ्रेश होऊन आम्ही परत हॉलमध्ये जमलो खर पण कोणी ही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाही.., हे बघुन बाबांनी सर्वांना झोपायला जायला सांगितलं..
मग आम्ही सगळे रूममध्ये निघुन गेलो.. मी बेडवर पडल्या पडल्याचं विचार करत होते.. आपण किती लकी आहोत नाही...!! म्हणजे निशांतसारखा समजूतदार मुलगा आपल्या नशिबी आहे.. देवाचे आभार मारत मी निद्रेच्या स्वाधीन झाले ही...
***********
To be continued....