Sparsh - Anokhe roop hai - 6 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 6 )

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 6 )


अगर जिना है सब कुछ भुलकर
तो क्यूना खुद के अस्तित्त्व को भुला दु
सारी हसी सारा जीवन नीछावर कर दु
किसीं आदमी ना जानी हो एक ऐसी मै माँ बन जाऊ ..

मृन्मय डॉक्टरांना भेटून घराकडे यायला निघाला ..त्याने गाडी सुरू केली आणि नित्याही त्याच्या मागे येऊन बसली ..आज जाणूनच तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला .तिला मूल होणार आहे हे ऐकल्यावर तिचा चेहरा खुलून निघाला होता ..मग मागे एका वर्षात जे काही घडलं त्यातलं तिला काहीच लक्षात राहील नाही आणि ती एखाद्या पाखराप्रमाणे मनातच घिरट्या घेऊ लागली ..तिला त्या क्षणाचा मोह आवरेना आणि तिला बोलताही येईना अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली ..तिने मृन्मयकडे बघितलं तर तो लक्ष देऊन गाडी चालवत होता तर नित्या एका वेगळ्याच विश्वात हरवली होती ..तीच एक विश्व ..ज्यात तिच्यासारखच एक गोंडस बाळ जन्माला येणार होत ..सोसायटीत पोहोचताच त्याने गाडी पार्क केली आणि पटापट पाऊले टाकत तो घरात जाऊ लागला ..नित्याही त्याच्या पावला मागे पावले टाकत जाऊ लागली ..या क्षणी तर तिची नजर फक्त त्याला न्याहाळत होती ..तसा त्याचा चेहरा रागीट , कुणीही पहिल्यांदा बघितलं की त्याला घाबरून जाणार यात शंका नव्हती पण आज मात्र रागाचा लवलेशदेखील त्याचा चेहऱ्यावर नव्हता ...त्याला न्याहाळतच ते दोघे आत पोहोचले ..सासूबाई त्यांची वाटच पाहत होत्या ..आत येताच त्या म्हणाल्या , " काय झालं रे मृन्मय पुन्हा या महाराणीला ? की आपले पैसेच खर्च करायला आली आहे ही !! .."
मृन्मय आनंदित होत म्हणाला , " आई तू आजी होणार आहेस ..आपल्या घरी एक पाहुणा येणार आहे .."
तो अस बोलताच नित्या लाजून किचनरूम मध्ये निघून गेली तर सासूबाईंच्या आनंदाला पारावर उरला नाही ..त्यांनी आज नित्याला गोड जेवण बनवायला सांगितलं ..सासूबाई इतक्या आनंदून गेल्या होत्या की त्यांनी लगेच बाजूला असलेल्या आपल्या मुलीला व मोठ्या सुनेला बोलावून घेतले ..त्या दोघी आल्या आणि घर जस आनंदाने बहरून निघालं ...पहिल्यांदाच कुणीतरी तिच्यावर इतकं खुश होत ..याच आनंदात सासूबाईंनी सर्वांचं घरी जेवण ठेवलं ..

आज नित्याच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता ..पहिल्यांदा का होईना सासूबाई थोड्या शांत राहून तिच्याशी बोलल्या होत्या आणि आज घरी सर्वांचं जेवण ठरविल होत ..जेवणाच सांगितलं पण तो सर्व स्वयंपाक मात्र एकटीच्या माथ्यावर सोडून त्या त्यांच्यासोबत गप्पा मारायला बसल्या ...तस त्यांचं अस वागणं नित्याला नेहमीच आवडत नसे पण आज ती इतकी आनंदी होती की तिने जाणूनच दुर्लक्ष केलं आणि स्वतःहूनच सर्व काम करत होती ।.तिने सर्वाना जे जे आवडत ते ते बनविल होत ..त्यांच्या मोठा मुलगा आणि जावई घरी आले आणि पुन्हा त्या आनंदाला एक वेगळाच सुगंध झाला ..जेवण करतानादेखील एक वेगळीच मज्जा येत होती ..तर जेवण आटोपल्यावरदेखील सर्व गप्पा मारण्यात व्यस्त होते ..तर नित्या दूर एका कोपऱ्यात उभी राहून सर्व पाहत होती ..शेवटी सर्व आपल्याला घरी निघून गेले ।.आज पहिलाच दिवस होता जेव्हा नित्याला कुणीच काहीच टाकून बोललं नव्हतं आणि तिला वाटणारी आशा आता खरी होणार या विचारानेच ती आतून आनंदी होऊ लागली ..

आई म्हणजे त्याग ..आई म्हणजे काळजी आणि म्हणजेच परमेश्वर ..स्त्री हे एक वेगळंच रसायन आहे ..सर्वात सहनशील व्यक्तिमत्त्व तेच ..तिचे महत्त्व कुणीही कमी लेखू शकत नाही पण तिला पूर्णत्व देत ते म्हणजे तीच बाळ ..अस म्हणतात की एक आई आपल्या बाळासाठी किती नि काय करते पण ते बाळच तिला स्त्री म्हणून पूर्णत्त्व देत असत .ते बाळच तिला सर्वोच्च आनंद देत असत ..त्याचा स्पर्श तिला सुखावून जातो आणि त्याच्या खोड्याही ती हसून माफ करते ..मातृत्त्व अस एक वरदान जे पुरुषाला कधीच मिळत नाही म्हणून स्त्री सर्वच दृष्टीने श्रेष्ठ ठरत असते। .

दुसऱ्या दिवसांनंतर तीच आयुष्य बदललं ..मागील काही दिवसात ती एकटी राहू लागली होती पण अचानक तिला सर्व जग आपलंसं वाटू लागलं ..सतत चेहऱ्यावर दुःख घेऊन बसणारी नित्या आता मनमोकळं हसू लागली ..सासूचे टोमणे सोबत होते पण नित्याला आता त्यांच्या अशा वागण्यावर हसू येत होतं ..डॉक्टरांनी तिला काळजी घ्यायला सांगितल्याने ती काम करतानासुद्धा स्वतःला जास्त जपू लागली ..स्वताच्या पोटाला हात लावत , आपल्या बाळाला अनुभवत ती जीवन जगण्याचा आणि त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करू लागली ..मृन्मयदेखील या काळात थोडा फार बदलला होता ..तिला काय हवं नको याकडे लक्ष देऊ लागला ।.तिने शारीरिक संबंधाला नाही म्हटलं तर कधीतरी एकूण घ्यायचा पण स्वतःला सावरण झालं नाही की मग मात्र तिच्यावर तुटून पडायचा पण नित्या मात्र आता आनंदी असायची त्यामुळे ती त्याला उलटून बोलत नसे ..ती इतकी चांगली वागत असताना तोही शक्यतो तिला कमी त्रास देऊ लागला पण सुरुवातीचे काही महिने तरी त्याने शारीरिक संबंध बंद केले नव्हते .डॉक्टरांकडे चेकप करायला जायचं असेल की तो स्वतः नित्याला आठवण करून द्यायचा नि सोबत घेऊन जायचा पण कधी कधी त्याच ते अस वागणं त्याच्या आईला आवडायचं नाही ..त्या जुन्या काळातल्या त्यामुळे नित्याला एवढं सर्व हातात मिळू नये म्हणून त्याच्यावर रागवायच्या आणि तो मग त्यांच्यासमोर काहीच बोलत नसे ..त्यांना जो त्रास सहन झाला तोच तिलाही व्हावा म्हणून त्यांनी तिला काम जाणूनच करायला लावले होते ..पण नित्या त्या क्षणी देखील त्यांना काहीच बोलली नव्हती ।.

नित्याच्या आयुष्यातील हे सर्वात सुंदर पर्व होत .मृन्मय आज जॉबवर जाण्यासाठी निघाला होता तेव्हाच नित्या समोर येत म्हणाली , " मृन्मय तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी घरी जाऊन येऊ ..फार दिवस झाले रे घरच्यांची आठवण येत आहे ..प्लिज जाऊ का ? "

नित्याला वाटलं तो तिच्यावर रागावणार पण पुढच्याच क्षणी तो हसत म्हणाला , " ठीक आहे जा पण स्वतःकडे जरा लक्ष दे .."

तो अस म्हणाला नि नित्याला त्याचा हेवा वाटू लागला ..ती धावतच किचनमध्ये गेली तर मृन्मय बाहेर आला ..तेवढ्यात आई त्याला म्हणाल्या , " कशाला तिला बाहेर पाठवतो रे !! अशा स्थितीत तिने बाहेर पडण बर नव्हे..तुला कळत तरी कसं नाही .."

मृन्मय किंचित हसत म्हणाला , " अग आई ती लहान थोडी आहे ..ती घेईल आपली काळजी ..तिलाही वाटत असेल आपल्या घरच्याना भेटावं म्हणून जात असेल ..जाऊ दे तिला ..येईल लवकरच .."

आपल्या मुलाने आपलं एकल नाही म्हणून त्यांचा चेहरा आगीसारखा लाल झाला होता तर नित्या त्यांचं बोलणं कान लावून ऐकत होती त्यामुळे ती फारच खुश झाली ..नित्या आपलं सर्व काम आवरून घराबाहेर पडली ..जाताना मात्र सासूबाईनी तिला काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि तीनेही मान हलवून सर्व गोष्टी ऐकल्या ..नित्या घराबाहेर निघालीच होती की तिने अनुला कॉल केला ...अनु खूप दिवसांपासून तिला भेटायचं म्हणत होती त्यामूळे ही आनंदाची बातमी तिलाही द्यावी म्हणून सायंकाळी अनुला भेटायला बोलावून घेतलं ..अनुदेखील भेटायला तयार झाली आणि नित्या निवांत होऊन आपल्या बाबांकडे जाऊ लागली ..तिच्या मनात एक द्वंद्व सुरू होत ..तीच एक मन सांगत होत की हे सर्व घरच्याना सांगावं तर दुसर मन म्हणत होत की त्यांना सांगून काहीच फायदा नाही कारण त्यांना माझा आनंद काळजी असती तर आजपर्यंत साध भेटायला तरी आले असते ..ती विचारात हरवलीच होती की रिक्षा चालकाने घर आल्याचे सांगितले आणि नित्या पैसे देऊन घरात जाऊ लागली ..दार उघडच असल्याने ती सरळच आत गेली ..समोर तिची आई उभी होती ..नित्याला पाहून तिचा चेहरा थोडा कोमेजला पण चेहऱ्यावर खोटा आनंद आणत त्या म्हणाल्या , " नित्या आज इकडे कशी काय ? ..घरी सर्व ठीक आहे ना .." नित्याला साधा पाण्याचा ग्लाससुद्धा दिला नव्हता आणि तिच्या आईने सरळ बोलायला सुरुवात केली ..नित्याला थोडं वाईट वाटलं पण पुढच्याच क्षणी ती स्वतःला सावरत म्हणाली , " हो आई ठीक आहे ..घरची आठवण येत होती म्हणून आले .."

नित्याच बोलणं पूर्ण होत नाही तोच आई नित्याला म्हणाली , " थांब हा मी बाबाना बोलावून आणते ..!! "

नित्या अनोळखी व्यक्तीसारखी घरात बसून होती ..तिचा घसा कोरडा पडू लागल्याने ती स्वतःच जाऊन पाणी पिऊ लागली ..ती पुन्हा बाहेर सोफ्यावर येऊन बसली आणि बाबा बाहेर आले .. " काय ग आज इकडचा रस्ता कसा काय भटकलीस .." , बाबा म्हणाले

नित्या क्षणभर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि जणू स्वतःवरच हसत ती म्हणाली , " काही नाही हो बाबा इकडून जात होते म्हटलं भेटून घ्यावं तुम्हाला म्हणून आले .."

नित्याचे बाबा त्यावेळी कामावर जाण्यासाठी निघाले होते तर आई त्यांच्यासाठी डबा आणून देत होती तर नित्या त्यांना न्याहाळत होती ..हे बघून बाबा म्हणाले , " मग आज राहायला आली आहेस ना ? " आणि आता नित्यालाच वाईट वाटू लागलं .आले तेव्हापासून चहा नाही की पाणी नाही..वरून मी त्यांना इथे राहून त्यांच्यावर भार पडेल याची काळजी होती त्यामुळे तिला मी इथे आलेच का असा प्रश्न पडला आणि स्वतःवरच क्षणभर रागावत म्हणाली , " नाही हो बाबा घरी काम आहेत खूप तर आताच निघणार आहे ..तुम्ही माझी काळजी करु नका ..तुम्ही निवांत जा कामावर .."

ती बोलली आणि बाबा कामावर निघून गेले तर आई आपल्या कामात व्यस्त झाली ..स्वतःच्याच घरात तिला अनोळखी वाटू लागलं त्यामुळे आपल्या भाऊ बहिणींना भेटून ती रागातच बाहेर पडली ..बाहेर पडल्यावर तिने अनुला पहिला कॉल केला आणि अनुने सांगितलेल्या ठिकाणी ती जायला निघाली ..

नित्याचा चेहरा रागाने भरून निघाला होता ..तिने रागात घरच्याना आनंदाची बातमी देखील सांगितली नव्हती आणि अनुला भेटायला एका हॉटेल मध्ये गेली ..तिने एक चेअर घेतली आणि बसून राहिली ..वेटर तिला ऑर्डरबद्दल विचारत होता पण ती काहीच बोलली नाही .अनुलादेखील उशिर होऊ लागल्याने ती आणखीच भडकू लागली तेव्हाच कुणाचे तरी दोन्ही हात तिच्या डोळ्यावर येऊन थांबले ..नित्या त्या हाताना चाचपडू लागली आणि म्हणाली , " मी ना तुला सोडणारच नाही..किती वाट पाहायची बर अजून .." आणि समोरून अनु म्हणाली , " सॉरी ना मेरी जाण ..रिक्षा मिळायला उशीर झाला .." अनुने स्वतःचे कान पकडल्यावरच नित्याचा थोडा राग कमी झाला ..

अनु खुर्चीवर बसत म्हणाली , " हा मेरी जाण बता तेरे लिये क्या ऑर्डर करू ...कॉलेजमे जो खाते थें वही मांगे .."

ती ऑर्डर देणार तेवढ्यातच नित्या म्हणाली , " सॉरी हा अनु आता मला ते सर्व खाता येणार नाही ..माझ्यासाठी फक्त एक ग्लास ज्यूस मागव ..तेवढंच पुरे आहे मला !! "

अनु तिच्याकडे अवाक होऊन पाहत होती आणि पुढच्याच क्षणी तिची खेचत म्हणाली , " तू तर अशी म्हणत आहेस जर पोटात बापू आहे तुझ्या .."

तिने अस म्हणावं आणि नित्याचा चेहरा खुलला ..अनुच्या तर लक्षात यायला फार वेळ लागला नाही आणि खुर्ची बाजूला करत म्हणाली , " ओ माय गॉड !! तू आई होणार आहेस ..म्हणजे मी मावशी होणार ..आणि तू हे मला आता सांगत आहेस .." नित्या समोर काही बोलणार तेवढ्यातच अनु तिच्या पोटावर आपला कान टेकवू लागली ..तिला बघून नित्याला हसायला येत होतं आणि नित्या तिला बाजूला करत म्हणाली , अग बाई !! थांब जरा !! किती हा उतावीळपणा ..तो जेव्हा हालचाल करेन तेव्हा तुला एकवेन ..आता उठून बस सर्व आपल्याकडेच पाहत आहेत ..."

अनुने इकडे तिकडे बघितलं तर खरच सर्व त्यांच्याकडे पाहत होते ।.अनु नित्याला सॉरी म्हणत समोर जाऊन बसली ..काहीच वेळात तिने दोघांसाठी ऑर्डर दिले आणि बोलू लागली , " मेरी जाण ..बर सांग तू काही विचार केला आहेस का ? तुला कोण हवं ते ? म्हणजे मुलगा की मुलगी ? की एकाच वेळी दोन्हीही .."

नित्या समोर तिच्यावर डोळे मोठे करून पाहू लागली ..पण तिला न जुमानता अनु पुन्हा म्हणाली , " मला तर एक गोड परी दे बाबा ..अगदी तुझ्यासारखी ..मस्त खेळायच आहे मला तिच्याशी ..तिच्या कोमल हाताना हातात घ्यायच आहे आणि गालावर पप्पी .."

अनु आणखीही बरच काही बोलत होती पण तिला जाणवलं की नित्या मात्र शांत झाली आहे तेव्हा तिला बोलत करत म्हणाली , " सॉरी सॉरी केव्हाची मीच बोलतेय ..तू सांग तुला कोण हवं ? "

आतापर्यंत शांत असलेली ती म्हणाली , " मला न मुलगा हवा आहे ..अगदी कठोर कुणालाही न घाबरणारा ..फक्त मुलगाच हवा आहे .." तिचे शब्द तोडत पुन्हा अनु म्हणाली , " आणि मुलगी झाली तर .."

नित्या थोडी शांत झाली तर अनु तिच्याकडे पाहत होती..नित्याला तिच्या मनातल कळत होतं म्हणून ती म्हणाली , " झाली तरी आनंदच आहे फक्त तिला इतकं मजबूत बनवेन की तिला कुणावरही अवलंबून राहायची गरज पडणार नाही आणि तिला इतकं स्वातंत्र्य देईल की ती केव्हाही कुणालाही सोडून माझ्याकडे येऊ शकेल ..तिला माझ्यासारख काही सहन कराव लागणार नाही ..."

नित्याच्या बोलण्यात वेगळाच विश्वास होता आणि चेहऱ्यावर तेज ..अनुने ते सर्व अचूक हेरलं आणि पुढे ती काहीच बोलली नव्हती ..काहीच क्षणात तिने बिल पेड केलं आणि दोघेही एकमेकांना आलिंगन देऊन निघू लागल्या ..अनु आताही विचार करत होती आणि तिला पटलं मुलीला जन्म न देन हा योग्य पर्याय नाही तर तुला आवडेल ते कर..काहीही झालं तरी आमच्यासोबत आहोत हे जरी तिला सांगितलं तरीही एखादी स्त्री कुठलाही अन्याय होणार नाही ।.नित्याने हे समजून घेतलं फक्त आशा आहे की सर्वांनी समजून घ्यावे ।..

क्रमशः...