"कोण म्हणजे.. आहे एक मुलगी.!!"
"अरे मुलगीच असणार ना...!! पण तिला काही नाव.., गाव असेल ना.??"
"हा.. आहे ना. पण नंतर सांगेल. चल तिथे जाऊन बसु या का आपण.???" राजने हॉटेलच्या जवळ असलेल्या बाकांड्याकडे बोट दाखवत विचारलं तस मी मानेनेच होकार दिला. मग आम्ही चालत तिथे पोहोचलो आणि बसलो..
"राज... किती छान वाटतं नाही हा अथांग पसरलेला समुद्र... लाटांचा आवाज. म्हणजे बघ ना काय नात असेल ना त्या लाटांचं आणि किनाऱ्याच.. आणि त्यात हा मधे पसरलेला दूरवर नजर जाईल एवढा विशाल समुद्र.. पण तरीही त्यांच्या नात्याच्या मध्ये काही तो येऊ शकत नाही.. लाटांना भले दूर घेऊन जातो पण त्या लाटा बघ किती प्रेम करतात त्या किनाऱ्यावर.. कितीही दूर गेल्या तरी किनाऱ्याच्या ओढीने त्याच्याकडे धाव घेतात.. हेच असत "नातं".."
"खुप कमी जणांना माहीत असत नक्की "नातं" म्हणजे काय...ओढ म्हणजे काय.. प्रेम म्हणजे काय आणि आकर्षक म्हणजे काय... प्रत्येकाला नाही कळत ते.. प्रेम आणि आकर्षणामधली हकली लकीर ज्याला दिसली, कळली तोच ते "नातं" नीट टिकवु शकतो..." मी शांतपणे समुद्राकडे बघुन बोलत होते.. आणि राज फक्त ऐकत होता.
"वाह...!!! काय मस्त बोलतेस प्रांजल तु... म्हणजे ऐकत राहावसं वाटत. किती तो डीप मिनींग. पण किती सहज समजवलास तु... खरचं थँक्स प्रांजल..."
"बस बस आता किती ती उगाचच ची तारीफ..." मी हसुन त्याच्याकडे पाहिलं.
"बाय द वे डॅडनी तुझ्या किती भारी सरप्राईज गिफ्ट दिल नाही..!!"
"हो ग.. म्हणजे मला वाटलं नव्हतं डॅड एवढ्या लवकर मला माझं ड्रीम होम देतील. तस त्यांनी नेहमीच सगळं काहि दिल आहे. म्हणजे मॉम गेल्यापासून त्यांनी दुसर लग्न नाही केलं. का तर सावत्र आईने माझा छळ केला तर...!
माझ्या शाळेपासून ते कॉलेजपर्यंत सर्वांवर त्यांचं लक्ष असायचं. आज सर्वात जास्त मी मॉम ला मिस करतोय. आज ती असती ना तर डॅड वर प्रॉउड फील केलं असत.
प्रकर्षाने आज तिची पोकळी जाणवतेय ग."
हे बोलताना अचानकपणे राज रडु लागला. मला तर सुचत नव्हतं काय बोलु..
"अरे असा लहानमुला सारखं रडतात का.. बर्थडे आहे ना आज तुझा मग.. चल आता डोळे पूस बघु नाही तर भुवा येऊन घेऊन जाईल हा तुला..." माझ्या "भुवा" या शब्दावर त्याला चांगलच हसु आल...
"काय ग प्रांजल मी काय लहान आहे का जो मला "भुवा" घेऊन जाईल.." यावर आम्ही दोघे ही हसलो.
"मग डोळे तर पुसा.." मी बोलताच तो त्याच्या पॅन्ट मधुन रूमाल काढायला गेला आणि एक बॉक्स उडून माझ्या समोर पडला.... मी त्याला बघितलं तेव्हा त्याचा पांढरा पडलेला चेहारा बघून तर आधी मी हसले. आणि उठून तो बॉक्स घेतला. तो उघडण्याचा किती प्रयत्न केला पण तो काही उघडला नाही. शेवटी कंटाळून त्याला परत केला..
"काय... कसला बॉक्स आहे..??? रिंग वैगेरे आहेत की काय यात.???!" मी आनंदाने बोलले तसा राज फक्त हसला. त्या हसण्याचा नक्की अर्थ काय हे मात्र मला काही कळलं नाही. नक्की हो की नाही.!!
"अच्छा बच्चू म्हणजे तू तय्यारीतच आहेस तर.. म्हणजे ती मुलगी पार्टी मध्ये आली होती. म्हणजे ती आपल्या सोबत या हॉटेलवर आहे." माझ्या आता फक्त उड्या मारायच्या बाकी होत्या. आणि राज चांगलाच लाले लाल होत होता हे बघून माझं हसू काही आवारात नव्हतं.
"अग अस काही नाही.. चल आता खुप उशीर झाला आहे. परत जाऊ नाही तर सगळे शोधत इकडे येतील." राज च्या वाक्यावर मी भानावर आले आणि आम्ही हॉटेलकडे जायला निघालो.
मी माझ्या हातातल्या घड्याळात पाहिलं तर बारा वाजयला एक मिनिट बाकी होत.
"ओह मिस्टर सरनाईक..." मी हात पुढे केलेला पाहुन राज चांगलाच गोंधळला.
"काय ग. आता संपला बर्थडे माझा.."
"अजून नाही. एक मिनिट बाकी आहे." अस बोलून मी परत एकदा त्याला विश केलं. आणि गुड नाईट बोलून मी माझ्या रूममध्ये जायला निघाले. पण त्या आधी निशांतच्या रूमध्ये डोकावुन पाहिलं तर तो शांत झोपला होता. ते बघून जरा बर वाटल. मग माझ्या रूममध्ये आले. फ्रेश होऊन बेडवर पडले तर सगळं काही पिक्चर सारख डोळ्यासमोर फिरत होत.
"कोण बर असेल ती मुलगी...??" स्वतःलाच प्रश्न विचारता उत्तर तर एकच वाटलं... "सोनिया..???"
असेल कदाचित.. मग जास्त डोक्यावर ताण न देता मी झोपेला मिठी मारली आणि शांत झोपले... कारण उद्या थोडा वेळ एन्जॉय करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होतो....
to be continued.....
(कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)
स्टेय ट्यून अँड हॅप्पी रीडिंग गाईज.
@हेमांगी सावंत(कादंबरी)