Novel - Jivalaga Part - 38 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी- जिवलगा ...भाग - ३८ वा

Featured Books
Categories
Share

कादंबरी- जिवलगा ...भाग - ३८ वा

कादंबरी – जिवलगा

भाग -३८ वा

------------------------------------------------------------------------------

निराशेने हेमूच्या मनाला वेढून टाकलेले असतांना ..मामाचा आलेला फोन .आणि आज

संध्याकाळी मुकामाला येतो आहे..या बातमीने हेमूच्या मनाला मोठा धीर आल्या सारखे वाटू लागले .

“बुडत्याला जसा काडीचा आधार पुरेसा असतो असे म्हणतात “ अगदी तसेच झाले होते हे.

मामाचे मुक्कामी येणे ..ते पण एकट्याने ..याचा नक्कीच आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो .

या उलट जर मामी आणि मामा दोघे ही आजच आले असते तर ..परिस्थिती तितक्शी अनुकूल राहिली

नसती .

मुख्य म्हणजे ..मामीने पसंत करून ठेवलेली आणि उदयाला जिला पाहण्याचा कार्यक्रम ठरला आहे,

तिच्याबद्दल मामाकडून माहिती पण घेता येणार होती . या मुलीला नकार देणे “ हे तर अखेरचे

शत्र होते ..ते न वापरता जर गोडी –गुलाबीने सगळ पार पडत असेल तर उगीच्याउगीच आपल्यातली

गोडी का घालवून बसायचे ?”

असा विचार करण्याची सवय ..खरे तर हेमुला नव्हती ..

पण,इकडे येतांना अनिता, सोनिया आणि त्याच्या प्रिय नेहाने त्याला धडा समजवून सांगितले होते ...

" हेमू - तू जे करशील , ते शांत मनाने , थंड डोक्याने विचारपूर्वक करावेस “, विनाकारण भडकून जाऊ नकोस .

तुला वाटायचे एक आणि प्रत्यक्षात असे काही नाही झाले तर ..” सगळ्या समोर तू वाईट ठरायला

नको ..!

एरव्ही असे कंट्रोल करणे आपल्या जमले असते का ? या प्रःनाचे उत्तर “नाही “ असेच होते.

पण, नेहाच्या सहवासात तिचा हा गुण आपल्यात सहजपणाने आलाय ,म्हणून तर आज ही परिस्थिती

हाताळणे फारसे कठीण नाहीये ..असा विश्वास आपल्या मनाला आलेला आहे.

किती तरी दिवसा नंतर ..हेमू त्याच्या घरी निवांतपणे आलेला होता . कालचा प्रवास ,

सकाळी सकाळी आलेला मामाचा फोन ..आणि उद्याचे टेन्शन ..याचे प्रमाण कमी झाले आहे,

असेच हेमुला वाटत होते .

स्नान झाल्यावर ,आईने त्याच्या आवडीचे झणझणीत कांदे-पोहे बनवले ..आई -बाबांच्या सोबत मस्त

फराळ झाला , चहा घेऊन झाल्यावर ..हेमुला सुस्ती आल्यासारखे वाटत होते.

हे पाहून ..आई म्हणाली ..

हेमू , पड थोडावेळ ,एक डुलकी घेतली की मग बरे वाटेल. ट्रेन मध्ये झोप लागते ..पण ती घरच्या

सारखी शांत झोप थोडीच असते ..

तू उठेपर्यंत ..मी स्वयंपाकाचे बघते ..

तुझ्या आवडीचे काय गोड करू ?

हे ऐकून हेमू म्हणाला –

आई – उद्या पाहुणे येणार ..म्हणजे ..काही ना काही गोड –धोड होईलच ..

तू आज मस्त भाकरी आणि पिठलं असा बेत कर ..सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा तर असायलाच

हवा ..

लेकाची फर्माईश ऐकून म्हणाली ..

मोठ्या शहरात राहून ..तुझी खाण्याची सवय मात्र अजून इकडची आहे ,पाहून छान वाटले .

तू पड, जेवणाचे तयार झाले की ..मी आवाज देते तुला.

बाहेरच्या खोलीतील पलंगावर हेमू आडवा झाला ..डोळे जड झालेले होते ..झकास डुलकी घेऊ या आता !

असे म्हणून उबदार पांघरून अंगावर घेऊन तो पडून राहिला .

.अर्धवट गुंगीत असतांना ..त्याला जाणवले ..

त्याचे आई आणि बाबा किचन मध्ये बसून ..आपल्याबद्दलच काही बोलत आहेत..

हेमू कान देऊन ऐकू लागला ..

आई बाबांना म्हणत होती ..

माझ्या भावजयीने कुणाला न सांगता –विचारता परस्पर आपल्या हेमू साठी मुलगी ठरवलीय ,

आणि हेमुला , आपल्या दोघांना त्या मुलीला दाखवण्यासाठी उद्या घेऊन येते आहे ..हे मला अजिबात आवडले नाहीये .

कोण आहे मुलगी –कशी आहे मुलगी , ?

तिचे शिक्षण , तिचे आई-वडील , घराणे –खानदान काही म्हणजे काही माहिती नाही आपल्याला .

तिला आवडली म्हणजे ..ही मुलगी आपल्याला आवडेल असे कसे होईल ?

ज्याला आयुष्य काढायचे तिच्या बरोबर ..त्या हेमुला तरी मुलगी आवडेल का ? याचा तरी विचार

करायचा होता तिने ?

आपला हेमू किती शिकलेला आहे, मोठ्या शहरात ,मोठ्या कंपनीत ,मोठ्या हुद्द्यावर नौकरी करतो ,

निदान ..त्याला शोभणारी तरी आहे कि नाही ?

मला तर खूप काळजी लागून राहिली आहे..

कारण ..हेमुला न शोभणारी पोरगी तर मी पसंत करणारच नाही ..स्पष्टपणे तोंडावर नाही म्हणेल मी “

कारण या गोष्टीत भीड-भाड काही कामाची नाहीये “ हे मला कळतंय .

हे सगळे ऐकून घेत हेमुचे बाबा म्हणाले –

हे बघ – इतके वैतागून जाण्याचे काही कारण नाही .उद्या होऊन होऊन काय होईल ..

मुलगी अनुरूप असेल तर ..आपल्याला नक्कीच तिचा विचार करावा लागेल ..सगळ्या दृष्टीकोनातून

जर ही मुलगी आपल्या हेमुसाठी आपल्याला योग्य वाटत असेल ..तर आपण हेमुला सुद्धा समजावून

सांगू या – की बाबा रे ..

मोठ्या माणसांचे ऐक , अनुभवातून जास्त पाहता येते आम्हाला , ही मुलगी योग्यच वाटते ,

तू हो म्हण “आणि मोकळा हो ..!

आम्ही लागतो तयारीला

आणि समजा असे नसेल तर ..”नाही “म्हणयचे हे तर आपले ठरले आहे.

पण, आपण नेहमी चांगलेच व्हावे असा विचार करीत जावा “असे मला वाटते.

बाबांच्या या बोलण्याने ..हेमूच्या डोळ्यावरची झोपच उडाली ..

बाबांचे वाक्य ..

मुलगी अनुरूप असेल तर “ आपण नक्कीच तिचा विचार करायचा ..!

बाप रे ! असे ही काही होऊ शकते ? याची तर कल्पना पण नव्हती केली आपण .

तो उठून बसला ..त्याला वाटत होते .

आपल्या आई-बाबांना आपणहून सगळे सांगून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे.

पुन्हा त्याची आई काही बोलते आहे हेलक्षात आले ..तो ऐकू लागला –

आई बाबांना म्हणत होती ..

हेमुसाठी मुलगी पाहण्यसाठी आता सुरुवातच झाली आहे असे समजू या आपण .

अनायसे हेमू आलेलाच आहे..तर ..

संध्यकाळी ..त्याचा मामा आल्यावर ..आपण मिळून ..हेमुलाच विचारू या ..

बाबारे ..तुझ्यासाठी बायको म्हणून आम्ही कशी मुलगी शोधावी ?

तुझ्या अपेक्षा काय ते सरळ सरळ सांग एकदा आम्हाला .

आम्ही काय लहान गावात राहणारे . मोठ्या शहरात राहून तुझ्या बघण्यात ,आमच्या बघण्यात

खुप फरक पडलेला आहे” हे समजते आम्हाला .

उद्याची मुलगी ..तुझ्या अपेक्षे प्रमाणे असली तर ..प्रश्नच मिटला , पण नसेल तर

शोध सुरु ठेवावा लागेल आपल्याला .

हे ऐकून बाबा म्हणाले ..

आपल्या मुलाची काळजी घेणे ..त्याबद्दल असा विचार करणे ..हा प्रत्येक आईचा ,स्वभाव

असतो ..त्याला शोभेल असेच आहे हे सगळे.

काही हरकत नाही .. संध्याकाळी ..मामा आला म्हणजे आपण हेमुशी सामोरा समोर बसून

चर्चाच करू या ..कारण विषय देखील तितकाच महत्वाचा आहे.

हे ऐकून..लगेच सांगण्याचा मोह हेमूने आवरला ..

आता आई-बाबांना सांगायचे , संध्याकाळी मामा आल्यवर पुन्हा तेच सांगत बसायचे .असे नकोच.

सगळे समोरासमोर बसुत त्यावेळी नेहा बद्दल सांगून टाकायचे ..त्याशिवाय मनावरचे हे ओझे काही

उतरणार नाहीये “ हेच खरे .

हेमू तसाच लोळत राहिला .

इकडे ..

रूमवर नेहा आणि सोनिया दोघीच होत्या .अनिता सकाळीच तिच्या रोहनला भेटायला गेली होती.

नेहा म्हणाली ..

सोनिया ..चल ,आपण पण बाहेर पडू या ..इथे घरात बसून मला अन-इझी वाटते आहे .

आता या वेळी ..हेमूच्या घरी काय चालले असेल ? या विचाराने डोके गरगरून गेलाय.

तो काही बोलला असेल का ? आमच्या बद्दल त्याने त्याच्या आई-बाबांना सांगितले असेल का ?

आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी ..आजच त्याचे मामा आणि मामी येणार आहेत..

आणि हेमूने काही हि अपडेट दिलेले नाहीत ..माझे टेन्शन सारखे वाढतच आहे.

नेहाचे बोलणे ऐकल्यावर सोनिया म्हणाली ..

हे बघ नेहा ..

आता या अशा वेळी घडणार्या गोष्टींना धीराने सामोरे जायचे असते “ इतकेच तुला सांगेन.

तुला इथे बसून फक्त काळजी करयला काय जाते .

तो हेमू स्वतः तिकडे युद्ध-भूमीवर आहे” त्याच्या मनाचा जरा विचार कर .

तुझ्या पेक्षा जास्त काळजी त्याला करायची आहे ..कारण प्रसंग त्याला फेस करायचा आहे.

त्यामुळे ..तुला काळजी वाटते आहे “ हे मी समजू शकते .

पण,असे घाबरून , हातपाय गाळून बसण्य इतके काहीच झालेले नाही.

यावर नेहा सोनियाला म्हणाली –

तुझे म्हणणे पटत नाहीये ! असे कुठे म्हणते आहे मी ,

पण, माझे मन स्थिर नाही रहात त्याला मी काय करू ?

सोनिया तिला सांगू लागली .. नेहा , लहान मुला सारखी वागू नकोस .कंट्रोल कर स्वतःला .

जे होईल ते होईल , ते चांगलेच होईल ..यावर विश्वास ठेव .

चाल ..तयार हो ..आपण मस्त विनाकारण भटकू-फिरू , मॉल मध्ये टाईम-पास करू या.

नेहाला ही आयडिया आवडली ..ती म्हणाली ..

यस ,मनाला गुंतवले नाही तर ते जास्तच परेशान करीत राहणार , त्या पेक्षा बिझी राहिलेले बरे.

दोघी तयार होऊन बाहेर पडणार ..

तेव्हढ्यात अनिताचा कॉल आला ..

सोनिया बोलत होती ..

नेहा आणि हेमूच्या अपडेट बद्दल विचारले ..तेव्हा सोनिया म्हणाली ..

ए बाई.आता काही या विषयावर नको न विचारू ..

ती वेडाबाई .आधीच हेमूचा काही मेसेज नाहीये म्हणून रडवेली होऊन बसली आहे.

अनिताने ऐकून घेत म्हटले ..ओके ,ओके , बरे बाबा नाही विचारीत .

सोनिया ,ऐक ना ,एक मस्त आणि गुड न्यूज आहे ..!

अरे वा ..अनिता ..सांग सांग पटकन ..!

सोनियाने स्पीकर ओन केल्यामुळे नेहा पण लक्ष देऊन ऐकू लागली

अनिता सांगू लागली ..

सोनिया – ज्या दिवसाची आम्ही खूप खूप वाट पाहत होतो , तो दिवस, तो क्षण आता अगदी लवकरच

आमच्या दोघांच्या आयुष्यात येतो आहे.

रोहनला त्याच्या हकाचा ,मालकीचा flat मिळतो आहे , त्यच्या मोठ्या भावाने काही वर्षापूर्वी एका

स्कीम मध्ये बुकिंग केले होते . ती स्कीम पूर्ण होत आली आहे , तीन-चार महिन्यात रोहनला

म्हणजे आम्हाला पझेशन मिळणार आहे आमच्या ड्रीम –हाउसचे .

सो, मी आता अजून दोन दिवस काही तुमच्यात येणार नाही ,आपली भेट थेट बुधवारी .

रोहन आणि मी , आम्हा दोघांचे " नोंदणी विवाह करु या “ याबद्दल आता एकमत झाले आहे .

चलो बाय , बाकी डीटेल्स ..आपल्या रूमवर आल्यावर मिळतीलच.

आणि हो ..नेहाला सांग..

घाबरू नको ..ओल विल वेल ..!

सोनियाने फोन ऑफ करीत नेहाला म्हटले ..

चला ..अनिताच्या बाबतीत हे फार छान होते आहे.

रोहन –अनिताचा जिवलग ..तिला मिळतोय .

नेहा ..तू निर्धास्त रहा ..तुझा जिवलग ..हेमू शिवाय दुसरा कुणीच असू शकत नाही.

नेहाचे मन ,विचारात हरवून गेलेले होते - काय चालू असेल तिथे ?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढच्या भागात –

भाग – ३९ वा लवकरच येतो आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे – पुणे.

9850177342

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------