Samarpan - 11 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | समर्पण - ११

Featured Books
  • अपराध ही अपराध - भाग 24

    अध्याय 24   धना के ‘अपार्टमेंट’ के अंदर ड्र...

  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

Categories
Share

समर्पण - ११

समर्पण-११

तेरे ईस प्यार का शुक्रिया
लफ्जो मे करना नामुकीन है।
ग़म लेकर भी ये एहसान चूँका पाऊँ
यही दुआँ भगवान से करते है।


विक्रमने जरी त्याच्या भावनांना माझ्या साठी प्रेमाची उपमा दिली असली तरी माझ्यासाठी मात्र ते विक्रम चे उपकारच होते. खर तर जिथे प्रेम असतं तिथे उपकाराची भाषा करायला नको पण विक्रम ने त्याच्या जबाबदाऱ्या दूर सारून नेहमी मला मानसिक आधार दिला, माझं सगळं ऐकून घेतलं. आपण जर लोकांना आपलं काही देऊ शकतो तर तो आहे आपला मौल्यवान वेळ..आणि विक्रम ने त्याच्या आयुष्यातला खुप किमती वेळ मला दिला...त्याने मला नेहमीच जाणीव करून दिली की मी त्याच्या साठी खूप महत्त्वाची आहे...आणि आज तर त्याने मला आयुष्य भर पुरेल इतकं प्रेम दिल होत...

आम्ही आश्रमातून परत यायला निघालो, पण परत येण्याची ईच्छा दोघांचीही नव्हती...पण आमचा संसार आमच्या जबाबदाऱ्या आम्हाला परत बोलावत होत्या. विक्रम ने माझ्या बिल्डिंग पासून थोड्या लांबवर गाडी थांबवली, माझं मन खूप भरून आलं होतं, तरीही स्वतःला सावरत मी विक्रम ला बोलली,

"चल निघू मी आता..."

मी गाडीतून उतरणार तर त्याने माझी ओढणी गच्च पकडली आणि अनिमिष डोळ्यांनी माझ्याकडे बघत होता, त्याच्या नजरेतून मला जाणवत होतं की त्याला मला जाउद्यायच नाही,

"विक्रम...ओढणी सोड माझी, जाऊदे मला, हे काय लहान मुलांसारखं.."

"अग माझा हात पुसत होतो तुझ्या ओढणीने... पण बघ ना तुझ्या ओढणीचा सुगंध माझ्या हातातून निघणार नाही आता..."

"घरी जाऊन हात धुऊन घे "

"हातातून तर निघून जाईल पण तू जे माझ्या श्वासात माझ्या मनात भिनली आहेस ते कसं निघेल"

"विक्रम नको ना अवघड करुस सगळं, याचा त्रास खुप होईल आपल्याला, असं असेल तर आपण आपल्या संसारात लक्ष नाही देऊ शकत आणि एवढी मोठी फसवणूक आपण अभय आणि दिशाची नाही करू शकत"

"नाही करणार अवघड...जा पटकन"

"नको ना रागवू, पूर्ण दिवस चांगला घालवला आता शेवटी अस नको करू ना प्लिज"

"नाही रागवत सोनू...मी कधीच नाही रागवू शकत तुझ्यावर पण तू माझी नाही दुसऱ्या कोणाची आहे ही गोष्टच सहन नाही करू शकत मी...पण मी समजावतो मनाला माझ्या...आणि नाही करणार तुझ्यासाठी काहीच अवघड मी, तू मला आनंदी हवीस, तुला मी कोणत्याच टेन्शन मध्ये नाही बघू शकत...जा तू... तू आणि विक्रम नेहमी सोबत राहा आनंदी राहा..."

"विक्रम....मी आणि अभय....मला अभय सोबत राहायचं आहे..."

"अरे हो..विसरलो मी.. तू आणि अभय...पण यात चूक तुझीच आहे सोनू...मी तूझ्यासोबत असलो की सगळंच विसरतो..बघ ना हे पण विसरलो की तू माझी नाही अभयची आहेस...आता निघ ना पटकन मला उशीर होतोय जायला..."

विक्रम चे डोळे पाणावले होते त्यामुळे तो माझ्याकडे बघायचं टाळत होता, मला कळत होतं ते, पण माझी अवस्था ही त्याच्या पेक्षा वेगळी नव्हती त्यामुळे मी गाडीतून उतरली आणि सरळ निघाली... एकदाही मागे वळून बघितलं नाही कारण मला माहित होत जर मी मागे वळून बघितलं तर माझा अन विक्रम चा अश्रूंचा बांध नक्कीच फुटणार आणि आम्ही दोघेही या प्रवाहात वाहून जाऊ...आणि हे सगळं आमच्या संसारासाठी हितकारक नव्हतं...

ऐकलं होतं की प्रेम करणं सोपं असतं, पण प्रेमाची खरी परीक्षा प्रेम निभावण्यात आहे..आज त्याची प्रचिती येत होती मला...आज पहिल्यांदा मी माझ्या कन्हावर रागावली होती. खुप श्रद्धेने मी कन्हाला मानते जर त्याला हे सगळं घडवायचच होत तर माझ्या आयुष्यात अभय ला आणायचं नव्हतं आणि जर अभय माझ्या आयुष्यात होता तर विक्रम ला दूर ठेवायचं होतं. मला असं वाटतं होत कान्हाने सगळ्या गोष्टी अवघड करून ठेवल्या माझ्यासाठी. पण मी हे विसरली की तो तर विधाता असूनही त्याला राधा नाही मिळाली, पण त्याने रुक्मिणीशी कधीच भेदभाव केला नाही...पण कान्हाच्या मनात राधेची जागा मात्र रुक्मिणी घेऊ शकली नाही...मी विसरली होती त्या लिलाधरच्या लिला मनुष्य प्राणी कधीच समजू शकत नाही...

----------------------------------------------------------------

घरी पोचली तर बघितलं अभय माझ्या आधीच येऊन बसला आहे. तेंव्हा लक्षात आलं की आज अभय बाहेर जायचं बोलला होता त्यामुळे मी घरी लवकर पोचायला पाहिजे होतं. मला वाटलं अभय खूप रागवला त्यामुळे माझी हिम्मतच झाली नाही त्याच्या कडे पहायची आणि मी काही न बोलता सरळ आतमध्ये जाणार की अभय ने आवाज दिला मला,
"नैना...उशीर झाला यायला?"

"हं.. हो ते ना जरा..."

"मी बोललो होतो बाहेर जायचं पण मला पण उशीरच झाला यायला, तुझ्या फक्त पाच मिनिटं आधी आलोय मी, मला वाटलं तू माझ्याआधी येऊन तयार होऊन बसली असशील तर मॅडम स्वतःच उशिरा आल्यात..."

"हा ते..स..सॉरी"

"अग घाबरतेस का, मी काही शिक्षा नाही करणार तूला, चल अजून उशीर करण्यापेक्षा तयार होऊ अन निघुयात बाहेर.."

माझीतर अजिबात ईच्छा नव्हती जायची पण या वेळेस मला अभय ला दुखवायच नव्हतं, कारण तो जो काही करत होता फक्त माझ्यासाठी करत होता. जेंव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी काही करत असते तेंव्हा आपण त्याच्या भावनांचा सन्मान केला पाहीजे अश्या वेळेला आपली ईच्छा महत्त्वाची नसते, त्यावेळेला आपण त्या व्यक्तीच्या भावना जपायला हव्यात....

मी आणि अभय पटापट तयार होउन निघालो. अभय मला बाहेर हॉटेल मध्ये घेऊन गेला जेवणासाठी. समुद्रकाठचं हॉटेल खूप सुंदर होतं. अभय ने कदाचित आधीच सगळी बुकींग करून ठेवली असेल त्यामुळे वेटर आम्हाला टेबल पर्यंत घेऊन गेला, मला विशेष वाटलं एवढं सुंदर हॉटेल असूनही अभय ने बाहेर का टेबल बुक केला असेल, मला मात्र ते आवडलं होत, बाहेर मोकळ्या आकाशात, हॉटेल च्या हिरव्यागार लाँन्स मध्ये, सगळीकडे रंगबिरंगी लाईट्स, थंडगार वारा, आणि मधातच येणारा समुद्राच्या लाटांचा आवाज...सगळं काही अप्रतिम... मी तो नजारा बघण्यातच एवढी गुंग झाली होती की माझं अभय कडे लक्षच नव्हतं, जेंव्हा लक्ष गेलं तेंव्हा कळलं की अभय एकटक माझ्याकडे बघतो आहे,

"काय झालं? असा काय बघतोएस माझ्याकडे?"

"काही नाही..खूप छान दिसत आहेस...तुला आवडलं हे सगळं?"

"हो, खूप सुंदर आहे, पण जेवायचंच होत ना तर दुसरीकडे कुठे पण गेलो असतो, एवढा खर्च करून इथे..."

"पहिली गोष्ट तर खर्चाची चिंता तू नको करू, तुझा नवरा तुझा आनंद बघण्यासाठी खूप काही करू शकतो आणि दुसरी गोष्ट आपण इथे फक्त जेवण करायला नाही आलो, जेवण तर एक बहाणा आहे, खर तर मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि मला असं वाटलं की ते सगळं खूप स्पेशल असलं पाहिजे त्यामुळे मी तुला इथे घेऊन आलो"

"अस काय होत जे तू मला घरी नाही बोलू शकला"

"आहे काहीतरी, आधी जेवून घेऊ मग कळेलच तुला सगळं"

अभय ला नॉनव्हेज खूप आवडतं पण तरीही त्याने आज सगळं काही व्हेज डिशेस ऑर्डर केल्या. सगळं काही माझ्या आवडीचं होत, मला कमाल वाटत होती अभय ला माझ्या आवडीनिवडी कधी कळल्या, कारण आमच्या मध्ये संवादच नव्हता तर एवढं सगळं कुठून जाणून घेतलं त्याने,

"अभय, सगळं माझ्या आवडीचं...कस कळाल तुला, कुठून जासुसी केली माझी 😀"

"😊 ते महत्त्वाच नाही, तुला आवडलं ना ते महत्त्वाच आहे "

"बरं आता सांगशील काय बोलायच होत, घरी नाही जायचं का? उशीर झालाय खुप"

"ही उशीर तर खूपच केलाय मी...बस अजून दोन मिनिटं थांब आणि डोळे बंद कर"

"अभय काय चालू आहे तुझं, बोल ना पटकन"

"बस दोन मिनिटं नैना प्लिज डोळे बंद कर ना"

मी डोळे बंद करून उभी झाली, आणि जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा अभय माझ्या समोर गुडघ्यांवर बसलेला होता अन हातात फुलं होती..मला बोलला

"नैना, आजपर्यंत तुला माझ्यामुळे खुप त्रास झाला, मी तुला वेळ नाही दिला, तुला माझ्या पासून लांब ठेवलं, माझी कारण वेगळी होती पण आता मला भूतकाळ उकरून काढायचा नाही, मला तुझ्यासोबत नवीन सुरुवात करायची आहे..आणि खूप दिवसांपासून तुला सांगायचं होत..मला तू खुप आवडायला लागली आहेस....खर तर मला असं वाटतंय की मी प्रेम करायला लागलोय तुझ्यावर..आणि त्यासाठीच आज तुला इथे घेऊन आलोय, मला खरंच सगळं विसरून तुझ्यासोबत नवीन सुरुवात करायची आहे ....माझी साथ देशील नैना?"

माझं नशीब काय खेळ खेळत होता माझ्यासोबत...आज दिवसभर विक्रम सोबत घालवलेला दिवस मला आठवत होता, त्याच्याबद्दल असलेल्या माझ्या भावनांचा स्विकार करून पण मी प्रेमापेक्षा जास्त महत्त्व माझ्या संसाराला दिल होत, पण अभय अस काही करेल हे मला अपेक्षित नव्हतं.... नक्कीच मला अभय सोबतच सगळं आयुष्य काढायचं होत हे मला माहित होतं.. पण सगळं काही इतक्या अचानक घडेल याचा विचार मी केला नव्हता...खुप समजावलं होत मनाला की विक्रम साठी मला जे काही वाटते ते फक्त मनातच ठेवून मला हा संसार करायचा आहे, पण यातून सावरायला मला वेळ हवा होता. मला कळत नव्हतं अभयला काय उत्तर देऊ....प्रेम माझं विक्रम वर आहे, आयुष्य मला अभय सोबत घालवायचं आहे, कोणत्या वळणावर येऊन थांबलय हे सगळं..काहिच कळायला मार्ग नव्हता मला...

"अग बोल पटकन नैना, किती वेळ मी असाच बसून राहू?"

अभय च्या बोलण्याने माझी तंद्री भंगली, पण कळत नव्हतं काय बोलू, पण काहीतरी तर उत्तर द्यायच होत, त्यात मी अभयशी नजर मिळवू शकत नव्हती, मी त्याला पाठमोरी उभी राहून त्याला बोलली,

"मी तुझ्या सोबतच आहे ना, आणि तस पण लग्न झालंय तुझ्यासोबत तर कुठे जाणार तुला सोडून"

"ते मला माहित आहे की भले ही मजबुरी ने, पण तू राहशीलच माझ्या सोबत, पण मला तू तुझ्या मनातून माझ्या सोबत हवीस, मजबुरी म्हणून नाही...आणि जर मजबुरी असेल आज या क्षणाला तू तुझे मार्ग वेगळे करू शकते, पण एक सांगतो जर तुला माझ्या सोबत खरच आयुष्य जगायचं आहे तर तू ते अगदी मनातून स्विकारलं पाहिजे....जो निर्णय घ्यायचा आताच घे अन विचार करून घे, माझी कोणतीच जबरदस्ती नसेल तुला...आणि अजून एक गोष्ट नैना, एक वेळेस तू माझा राग, तिरस्कार केला तर चालेल पण मला अंधारात ठेवून मला धोका देणं मी अजिबात सहन नाही करू शकत, मला खूप चीड आहे अश्या लोकांची...पण माझा तुझ्या वर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे मी तुला कोणत्याच बंधनात ठेवणार नाही...."

अभयचे शब्द ऐकून मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. मी खरचं अभय चा विश्वास तोडला होता का? माझं डोकं सुन्न झाल होतं. मी अश्या परिस्थिती मध्ये होती जिथुन मला परतीचा मार्ग बंद झाला होता, मला पुढेच जायचं होतं...विक्रम आणि अभय माझ्या आयुष्यातले असे दोन व्यक्ती होते ज्यांचा मी खुल्या मनाने स्वीकारही करू शकत नव्हती अन नकारूही शकत नव्हती. अभय सोबत घेतलेले सप्तपदी मला सांगत होते की मला आयुष्यभर अभय सोबत चालायचं आहे आणि माझं मन बोलत होत की जर मनात विक्रम आहे तर मी अभय आणि माझ्या नात्याला न्याय नाही देऊ शकत. विक्रम बोलायचा जेंव्हा तुला दोन मार्गातून एकाची निवड करायची असेल आणि तुला सुचत नसेल कोणता मार्ग निवडावा तेंव्हा सगळं तुझ्या कान्हावर सोडून दे, तोच तुला मार्ग दाखवेल... आज पण मी सगळं कान्हावर सोडलं आणि डोळे मिटून घेतले, आणि मी जसे डोळे मिटले मला विक्रम आणि माझे सोबत घालवलेले एक एक क्षण हुबेहूब दिसायला लागले आणि माझ्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले,

"हो मला हवा आहेस तू माझ्या सोबत आयुष्यभरासाठी माझी ताकत बनून, माझी प्रेरणा बनून यापेक्षा जास्त काहीही नको मला, पण तू नसला आयुष्यात तर मी श्वास तर घेईन पण जगणं मात्र विसरून जाईल, तू हवा आहेस मला...."

आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, जेंव्हा मी डोळे उघडले माझ्या समोर अभय उभा होता. पुन्हा मी मूर्खपणा केला, मी हे काय बोलून बसली, जोपर्यंत मला या गोष्टीची जाणीव झाली, तोपर्यंत अभयचने येऊन मला घट्ट मिठी मारली अन बोलला,

"मला माहित होतं नैना, तू हेच बोलणार, आता बघ मी सगळं काही व्यवस्थित करतो...तुझ्या माझ्या मधात आता कोणीच येणार नाही, तू फक्त आणि फक्त माझीच आहेस..."

"अभय....सोड ना एक मिनिटं, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, हे जे मी आता तुला बोलली ना ते सगळं....."

"ते सगळं खरं आहे..हेच सांगायचं होत ना...माहिती आहे मला, आता प्लिज काही बोलू नको..."

मला अभय ला विक्रम बद्दल सगळं सांगायचं होत पण तो इतका खुश होता की त्यावेळेला त्याचा आनंदी चेहरा पाहून मी काही बोलू शकली नाही. सत्य सांगणं खुप महत्त्वाच असतं पण कधी कधी सत्य सांगण्यासाठी वेळ बरोबर नसते तर कधी कधी परिस्थिती बरोबर नसते, आणि आज तर वेळ आणि परिस्थिती दोन्ही माझ्या बाजूने नव्हते. मी आज जे भाव अभय च्या नजरेत बघितले ते फक्त प्रेम नाही तर त्याची जिद्द होती, आणि त्यावेळेला त्याला विरोध करण्याची मला भीती वाटली आणि हिच माझी सगळ्यात मोठी चूक ठरली माझ्या आयुष्यातली....

--------------------------------------------------------------------

क्रमशः