Mahanti shaktipithanchi - 11 in Marathi Spiritual Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | महती शक्तीपिठांची भाग ११

Featured Books
Categories
Share

महती शक्तीपिठांची भाग ११

महती शक्तीपिठांची भाग ११

१० ) पिठापुरम आंध्र प्रदेश शक्तीपीठ

इथे आई देवी “पुरुहुतीका “नावाने विराजित आहे .
सती आईचा डावा हात या ठिकाणी पडला .
याला पुष्करणी शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते .
या शक्तीपिठात आई “पुरुहुतिका” रुपात असुन शिवशंकर” कुकुटेश्वर स्वामी “नावाने विराजमान आहेत .
श्री पुरुहुतिका देवीचे देऊळ कुकुटेश्वर स्वामी देवळाच्या परिसरात पूर्व गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेश येथील पीठापुरम येथे आहे काकिनाडा पासून साधारण हे अंतर २० किलोमीटर आहे आणि राजमुंद्री पासून ६२ किलोमीटर आहे .
देवीचे मंदिर लहान असले तरी भिंतीवर अष्टदास शक्तीपिठांचे कोरीव काम केले असल्याने मोहक वाटते .
याच जागेवर देवीचे मुर्ती पुरलेली होती .
देवळात प्रवेश केल्यावर लगेच एक सरोवर दिसते ज्याचे नाव “पाडा गया सरोवर “ आहे .
यात भक्त पवित्र स्नान करतात .
सरोवराच्या उजव्या बाजूस कुकुटेश्वर स्वामीचे मंदिर असुन त्या मंदिराच्या उत्तर पूर्व बाजूस पुरुहुतिकादेवीचे मंदिर वसलेले आहे याचे प्रवेशद्वार दक्षिणेस आहे .
भक्त इथे स्नान करताना आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात कारण या देवळाचा परिसर “पाडा गया “म्हणून ओळखला जातो .
असा विश्वास आहे की ही गयासुर राक्षसाची आणि भगवान विष्णूची पावले आहेत .
भगवान विष्णूंनी गयासुर राक्षसाचा वध केल्यावर त्याचे शरीराचे तीन तुकडे करून फेकले होते .
त्यातील डोक्याचा भाग “सिरो गया” बिहार येथे पडला .
धडाचा बेंबी पर्यंतचा भाग “नाभी गया “ओरिसा जयपूर येथे पडला .
व कमरेखालील पायाचा भाग “पाडा गया “ येथे पडला .

एका पौराणिक कथेअनुसार...
एकदा इंद्राने गौतम ऋषींचा वेश घेऊन त्यांच्या पत्नीला अहिल्येला फसवले .
त्यामुळे चिडून गौतम ऋषिंनी त्याला शाप दिला .
या शापामुळे इंद्राच्या चवीच्या ग्रंथी निकामी झाल्या व त्याच्या संपूर्ण शरीरावर योनी आकाराची चिन्हे उमटली .
इंद्राला शरम वाटली व त्याने गौतम ऋषींची क्षमायाचना केली .
खुप याचनेनंतर गौतम ऋषींनी इंद्राला क्षमा केली व सांगितले की तुझ्या अंगावरील योनीची चिन्हे डोळ्यांच्या रुपात बदलतील व तु “सहस्त्राक्ष “ म्हणून ओळखला जाशील .
परंतु इंद्राच्या चवीच्या ग्रंथी मात्र अजुन परत मिळाल्या नाहीत .
त्या त्याला परत हव्या होत्या.
त्याने आपले राज्य सोडले,आणि पीठिकापुरी येथे आला .
तेथे त्याने जगन्मातेची तपश्चर्या केली .
बऱ्याच कालानंतर जगन्माता प्रसन्न झाली व तिने इंद्राला दर्शन दिले .
त्याला त्याच्या चवीच्या ग्रंथी परत देऊन सोबत भरपूर ऐश्वर्य दिले .
इंद्राला अतिशय आनंद झाला व त्याने या “पुरुहुतिका”देवीची उपासना सुरु केली .

यानंतर बर्याच कालावधी नंतर जगद्गुरू श्रीपादवल्लभ यांनी पीठापुरम येथे जन्म घेतला .
त्यांनी सुद्धा या “पुरुहुतिका” देवीची पुजा केल्यानंतर त्यांना “स्वत्व “उमगले .
श्रीपादवल्लभ हा “दत्तात्रेय “ यांचा पुनर्जन्म आहे .

११) ओड्डियाना शक्तिपीठ जजपुर, उड़ीसा

या ठिकाणी आईची नाभी पडली .


आईचे रूप येथे “बिरजा देवी” आहे .

बिरजा(गिरिजा) क्षेत्राचे माहात्म्य वर्णित कथांच्या अनुसार भगवान् ब्रह्मदेवाने एकदा वैतरणी नदी च्या किनाऱ्यावर एक यज्ञ करण्याचे आयोजन केले .
यज्ञ चालू असताना देवी पार्वती यज्ञ कुंडामधुन महिषासुरमर्दिनी च्या रूपात प्रकट झाल्या .
त्या ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेमुळे अतिशय प्रसन्न झाल्या होत्या आणि त्यांनी त्या वेळेस ब्रह्मदेवाला निर्देश दिले की ते त्यांना
“बिरजा” नावाने संबोधित करतील .
ब्रह्मदेवाने देवी माँना त्याच स्थानावर भगवान् शिव यांच्या पत्नीच्या रूपात उपस्थित होऊन या स्थळाला धन्य करण्याची प्रार्थना केली .
देवी माँने ब्रह्मदेवांच्या मागणीला सहमती दिली आणि त्यांनी त्रिकोण परिसरातील मध्य आपल्या आधिपत्याखाली घेतला .
माँ बिरजा देवी स्वतः या त्रिकोणाच्या मध्यभागी विराजमान झाली .
त्यांनी एक द्विभुज देवीचे रूप धारण केले जिच्या एका हातात महिषासुराची शेपूट होती दुसर्या हातात एक त्रिशूल होते जे त्या राक्षसाच्या छातीत घुसले होते .
त्यांनी आपल्या मस्तकातून नवदुर्गा, आठ चंडिका, आणि चौंसष्ठ योगिनिची उत्पत्ति करून या धार्मिक स्थळाला एक शक्तिशाली शक्ति स्थळ बनवले .
या स्थळाच्या रक्षकांच्या रुपात प्रत्येक कोपऱ्यात एक-एक शिवलिंग स्थापना केले आहे .
पश्चिमी कोपऱ्यात उत्तरेश्वर/विल्वेश्वर, दक्षिण-पूर्व कोपऱ्यात वरुणेश्वर आणि उत्तर-पूर्व कोपऱ्यात किलाटेश्वर/किलटेश्वर.
अशा प्रकारे हे स्थान एक पावन तीर्थ या रूपात पूजले गेले .

१२ ) द्रक्षराम शक्तिपीठ द्रक्षरामम, आंध्र प्रदेश

सती आईची बेंबी या ठिकाणी पडली होती .

आई इथे “माणीकाम्बा देवी” रुपात विराजमान आहे .

द्रक्षरामम हे राजमुंद्री पासून ५० किलोमीटर अंतरावर आहे .

माणीकाम्बा देवी” हीभगवान भिमेश्वर स्वामींची पत्नी होती .

भगवान भिमेश्वर पंचराम क्षेत्रापैकी एक होते जे क्षेत्र त्रिलिंग क्षेत्रा पैकी एक मानले जाते .
येथे एका तटबंदीत त्यांचे प्रांगणात त्यांचे मोठे देऊळ दिसून येते .
या देवळाच्या आतील वर्तुळात मणिक्याम्बा देवी”मंदिर आहे.
या परिसराच्या उत्तर पूर्व कोपर्यात हे देऊळ आहे .
माणीकाम्बा देवीच्या पुतळ्याखाली एक श्रीचक्र आहे .
माणीकाम्बा देवी” ची नजर डावीकडे आहे जणु काही ती आपल्याला सांगत आहे की ती यापूर्वी वाम मार्गाने (डावीबाजु )
पुजली गेली होती .
सूर्य देव आणि सप्तर्षी यांनी सुद्धा माणीकाम्बा देवी” आणि भगवान भीमेश्वर यांची येथे पुजा केली होती .
माणीकाम्बा देवीच्या संदर्भात काही कथा येथे प्रचलित आहेत .

एका कथेनुसार एका ब्राम्हण विधवेने आपल्या मृत कन्येचा आठवणीत एक सोन्याचा पुतळा बनवला होता .
कालांतराने तो पुतळा पावडर टाकू लागला .
हा पुतळा नंतर माणिक वापरून सजवला गेला म्हणून माणीकाम्बा किंवा माणकेश्वरी हे नाव दिले होते .
नवीन आलेल्या राजा भिमदेवाने तो पुतळा घेतला व त्याची आपली कुलदेवता म्हणून पूजा करण्यास सुरवात केली .
काही कथानुसार माणीकाम्बा किंवा माणिक्याम्बा ही मेनका देवी आणि हिमवंत यांची मुलगी होती .
काही काळानंतर माणीकाम्बा हा शब्द माणिक्याम्बा म्हणून सुद्धा वापरला जाऊ लागला .

आणखी एका महत्वाच्या गोष्टीत असे सांगतात की माणीकाम्बा देवी ही एका वेश्येची मुलगी होती .
एकदा तिच्या स्वप्नात भगवान भीमेश्वर आले .
तेव्हाच तिने ठरवले की भगवान भिमेश्वर यांना पती करून घ्यायचे .
तिने अतिशय मनापासून भगवान भिमेश्वरांची भक्ती केली .
आणि अखेर भगवान भिमेश्वर यांना तिने पतीच्या रुपात प्राप्त केले .

“भीमखंडम”या ग्रंथातून प्रसिद्ध कवी श्रीनाथ याने या कथेचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे,आणि त्याच ग्रंथात त्यांनी ही देवी एक महत्वाचे शक्तीपीठ आहे असेही त्यात सांगितले आहे .
त्यानंतर माणीकाम्बा देवी ही माता स्वरूपात पुजली जाऊ लागली .
वेश्यांची सुद्धा ती कुलदेवता मानली जाते .
प्रत्येक एकादशी दिवशी भगवान भिमेश्वर आणि माणीकाम्बा यांची “एकांत सेवा”साजरी केली जाते .
आठ श्लोकांचे गायन त्या दिवशी साधू संतांकडून केले जाते .
या श्लोकांमध्ये माणीकाम्बा देवी आणि भगवान भीमेश्वर यांच्या शृंगारीक प्रेमकथेचे वर्णन आहे .
शुक्रवार हा देवीच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो .
प्रत्येक शुक्रवारी देवीला “कुंकुमार्चन “ केले जाते .


क्रमशः