Reshmi Nate - 4 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - ४

Featured Books
Categories
Share

रेशमी नाते - ४

विराटने स्लाइडींगचा डोर ओपन केला .समोर पिहुला आवरताना तो तिलाच बघत होता .

तिने नुकतीच अंघोळ केली होती रेड कलरची साडी,ओले केस कपाळाला रेड कलरची छोटीसी टिकली तीच ती मीरर मध्ये बघुन आवरत होती.ती वळाली समोर विराटला बघुन तिला कालच आठवलं .रागाच्या भरात आपण काहीही बोलुन गेलो.

विराट तिला रागात एक लुक देऊन पिलो नीट बेडवर ठेवतो.

पिहु जवळ येत:- मी ....मी...काल ..

विराट तिच्या कडे रागाने बघतो.

पिहु हळुच म्हणाली ...सॉरीsss मला तसं म्हणायच नव्हतं.

विराट काही न बोलता वर्कऑऊट करायला गेला.


तो आत गेला कि पिहु रिलॅक्स होत, काय रे देवा हसायच बटण म्यूट करुन पाठवला का.. सकाळ सकाळी हसरा चेहरा ठेवायचा ,तर सारख्या आट्या पडल्याच असतात हुहहह.

पिहुने खाली येऊन पुजा करुन घेतली.तिने छान स्वतःच्या हाताने जास्वंद दुर्वाचा हार केला...

सुमन:- हसत)पिहु हार छान केलास विकत पेक्षा स्वतःच्या,हाताने केला ना समाधान मिळते.

पिहु:- हो,आई मला खुप आवडते करायला आई,मंदिरात जाऊन येऊ आपण आता

सुमन: हो जाऊ, आले थांब...दोघी,मंदिरात जाऊन आले ..

सूमन:-पिहु आज काय वीरा येणार नाही कॉलेजला उठलीच नाही नऊ वाजुन गेले...किती वेळच उठवते पण क‌ाय‌ तिचा मुड नाही दिसत ‌ये .तु काय करतेस जाते का एकटी...नाही तर ..

पिहु:- आई मी जाते,कालच तर चालु झाले मला मागच पण स्टडी कव्हर करायच ‌..

सुमन:-ठिक ये जा आव‌‌र...

पिहु रुममध्ये आली..

.
विराट त्याच आवरत होता. .. विराट ने एक नजर टाकली ती त्याला न बघताच चेजिंग रुममध्ये गेली..ड्रेस घालुन .दुपट्टा नीट करतच बाहेर आली..

तिने त्याच्याकडे बघितलं. त्याने ग्रे ब्लॅक कलरचा वेस्टकोट घातला होता .स्लीव्ह कोपरयापर्यंत फोल्ड केला होता‌. त्याचे कट्स उठुन दिसत होते...आवरता आवरता लॅपटॉप बघत ब्लुथुट वर बोलण चालूच त्याला आज पहिल्यांदाच पिहुने नीट निहाळले होते. विराट च लक्ष तिच्यावर गेलं..

पिहुला कळताच घाबरून कावरीबावरी होतच तिची बॅग चेक करु लागली.

विराट मनीला हाक मारणार कि, पिहु रुममध्ये आहे लक्षात येताच तो शांत झाला..त्याने स्वतःच शुज घेतले....तो ड्रावरमध्ये रुमाल शोधत होता..सापडतच नव्हता....

पिहुच आर्ध लक्ष होतच😂😂तो काय काय करतो..ती न बोलताच त्याच्या मागुन पुढे येत ‌खालच्या ड्रावर मधुन रुमाल काढुन त्याच्यासमोर धरला...त्याने तिच्या हाताकडे एकदा तिच्याकडे बघत रुमाल घेतला.

विराट इकडे तिकडे बघत :-थँक्यु ..बोलला..

पिहु वि‌राट तिला कस इग्नोर करतो, तसच रीसपॉन्स न करता तिची सॅक उचलून बाहेर आली...तिला तिचच हसु आलं ..तिच्या हसण्याच कारण तिलाच कळत नव्हतं ....

विराट ही तिच्या मागे आला...

सुमन:- विराट नाश्ता केलास का??
..
विराट:-हो मॉम

सुमन:-आज वी‌रा नाही तर जाता जाता पिहुला पण सोड कॉलेजला....

पिहूने विराट कडे बघतिले..तो‌ बोलणारच कि पिहु बोलली :- राहु द्या आई मी जाईन उगाच त्यांना उशीर होईल...

विराट तिला लुक देत :-मॉम मी पण त्याच रुटने चाललो सोडेन अस बोलत बाहेर निघून गेला..


सुमन गालात हसत:- पिहु जा स्वतःहुन बोललाय..मी चार वाजता ड्रायव्हरला,पाठवते...

पिहु काही न बोलता निघुन गेली....दोघेही गाडीत शांतच होते.

विराट चा फोन वाजल्यावर तिच्या लक्षात आले . फोनचा विचार करत‌ बसली कस सांगायच....फोन शिवाय तर करमणार नाही सारख हातात घ्यायची सवय आहे...तिने दोन तीन वेळा विराट कडे बघितलं .शब्द ओठांपर्यंत येत परत गिळले जात होते..

त्याच्या लक्षात येताच त्याने पिहुवर नजर टाकत परत पुढे बघत:- काय बोलायच आहे का?

पिहु :-अअअ..ते काल ती बोलणार कि,परत विराटचा मोबाईल वाजला...ती शांत‌ झाली.

विराट:- हा मॉम बोल..

सुमन:- पिहु आहे का ???? तिचा मोबाईल स्विच ऑफ लागतोय तिच्या मम्मींने फोन केला होता...आहे का दे तिला.

त्याने पिहुसमोर मोबाईल धरला.

पिहु:- बोला ना आई ‌‌‌

सुमन:- मोबाईल कुठे आहे मम्मी तूझी किती वेळची कॉल करते.
ते आई मोबाईल बंद पडला काल हातातुन पडला बंद झाला मी घरी आले कि करेन ..सांगा मम्मीला

सुमन:-हम्म...

पिहुने‌‌ मोबाईल बंद करुन विराटकडे दिला..दोघे शांतच होते...(पिहु मनातच विचार करत होती...आता माहित असुन सुध्दा ए्का शब्दाने म्हणत नाही येत बर झालं काही बोलले नाही .तिच कुठेतरी मन दु‌खत होते..)

विराटला विचारायचे होते पण काल पर्स घे बोललं तर नाही ते लेक्चर देत होती.म्हणून त्याने बोलायचे टाळलेच ..कॉलेज आल्यावर त्याने कार ‌थांबवली‌‌.ती खाली उतरली तस त्याने तिच्याकडे न बघताच कार मागे घेऊन काही क्षणात नाहीसा झाला.‌

तिने सगळे विचार झटकले .क्लास मध्ये गेली...

आदित्य:- हाय पिहु तिच्या समोर येऊन बसला.

पिहु‌ हसून हाय म्हणाली

आदित्य:-पिहु हे धर तुझ्यासाठी नोट्स

पिहु ब्लँक होते...ती बोलणारच आदित्य तिला थांबवत आय नो तु विचा‌शील कस तुला माझ्या मानतले कळले..(तो हसत) तुझा चेहरा काल सगळ सांगत होता..त्यात नविन कॉलेज कस आणि काय ..तुला कुठली हेल्प हवी असेल त‌र मला सांग... आय‌ एम ऑलवेज रेडी तो‌ झुकुन हसत म्हणतो...

पिहु खुदकन हसतली.. त्याच्या अश्या फ्रेंडली नेचरने ती ही कंर्फटेबल त्याच्याशी बोलत‌ होती.एक दोन सोडले कि आदित्यच्या ग्रुपमधले पिहुशी छान बोलत होते..लास्ट चे दोन लेक्च‌र होणार नव्हते..‌आता तिला टेंशन आले....कारण घरी चारला कॉलेज सुटणार सांगितले आता घरी कळवायचे कस? ..मोबाईल नाही.
विचार करत क्लासच्या बाहेर पडली ओळख झालेले मस्ती करतच चालले होते...तिला आता विराटचा राग येत होता...का ते माहीत नाही. पण कुठेतरी वि‌राटाने तिची काळजी घ्यावी असे ही वाटत होते सगळ नविन होतं तिला फक्त डोळ्‌यात पाणी यायच बाकी होते.कधी आईवडीलांशिवाय न राहिलेली पिहु एकटी पडली होती...आईवडीलांनी ज्याच्या हातात विश्वासाने आपला हात दिला त्यानी फुलसारखे नाही तर‌ फुलाच्या पाकळी सारखे तर
आपल्याला जपावे ..असे सारखे वाटत होते. विचार करत कॉलेजच्या गेट पर्यंत पोहचली .तिला समोर कार दिसली तिला शॉकच बसला. ती पटकन कार जवळ जात होती..ड्रायव्हर‌ने बाहेर येऊन डोर ओपन केले...

पिहु:- काका तुम्हाला कस कळलं कि कॉलेज आता सुटणार आहे.

ड्रायव्हर:- मॅडम मी सकाळपासूनच ईथे थांबलोय..सरांनी सांगितले. हे ऐकताच पिहुला इतका वेळ विराटचा राग आला होता तो गायबच झाला. चेहरा थोडा रिलॅक्स झाला होता. धडधड पण आता बंद झाली होती. मनातच हसत बोलली ऐवढे पण वाईट नाहीये उागचच इतकावेळ आपण काहीतरीच विचार करतो..

ड्रायव्हरने तिला हाक मारल्याने तिची तंद्री तुटली
हा बोला काका .

ड्रायव्हर ने तिला बॉक्स दिला ती अजुन शॉक लागल्यासारखी करत‌‌ बॉक्स घेऊन काय आहे...काका

सरांनी दिलं तूम्हाला द्यायला सांगितले .

ती‌ उघडुन बघते तर‌ मोबाईल असतो‌.आता त‌‌र तिचे पाय‌ हवेतच असतात..आपण ‌खुप चुकिचे समजत होतो.तिने बॉक्स मधुन मोबाईल काढला आय फोन बघुन तोंडालाच हात लावला..ती दोन मिनीट दचकलीच एवढा महगाचा का मोबाईल घेतला.तिने परत मोबाईल बॉक्स मध्ये ठेवुन दिला‌. पिहु घरी येऊन फ्रेश होऊन बेड वर विचार करत पडली. थोडासा आराम करुन चार साडे चारच्या दरम्यान ती खाली आली.

सुमन:- पिहु कधी आली..
.
पिहु:- मी‌ अडीच ला आले.

हम्म ,गीता पिहुला फ्रुट्स कट करुन आण ...

पिहु:- आई वी‌रा कुठे आहे..

वी‌रा तिच्या फ्रेड्स ब‌रोबर मुव्हीला गेलीय‌ कॉलेज सोडुन असलच सुचते तिला ..

पिहु हसत:- असु दया आई हेच दिवस ऐन्जॉ‌‌य करायचे असतात मी पण असच करायचे..

सुमन:- तु मोबाईल खराब झाला का नाही सांगितले‌.

ते आई ..पिहु शांतच‌ बसते..

पिहु तु सांगितल्यावरच कळणार ना तुला काय हवं काय नाही..हे तुझ घर आहे.तुला काय‌ हवे काय नाही हे आम्हाला,कळले पाहिजे परत असे होता कामा नये...हे धर‌ तुझ्यासाठी मोबाईल..

पिहु ब्लँक होती.

अगं विराटच्या,लक्षात ‌येत नाही ह्या छोटछोट्या गोष्टी धर.

आई माझ्याकडे आहे‌ मोबाईल

सुमन:- तु कधी जाऊन घेऊन आली त्या थोड्या नाराजीच्या स्वरात‌ बोलल्या .

आई मी नाही ह्यांनीच आणला आहे ड्रायव्ह‌र कडे दिला आहे.

काय??? त्या थोड्या दचकल्याच.

पिहुला कळलच नाही काय झालं ...आई.‌

खर बोलतेस तू

हो ड्रायव्हर काका मला हेच बोलले.

सुमन: मनात विचार करत विराट कस काय ? तो पिहुचा विचार कारयला लागला हे त्यांना सुखवत‌ होते.

पण आई ऐवढ्या महागाचा मोबाईल मी वापरला नाही मला‌ साधा जरी दिला तरी चालेल

अग पिहु त्याने तुला आणलं हेच ‌खुप महत्तवाचे‌ आहे.

आई पण

पण बिन काही नाही जा सिम घाल आणि वापर जा लव्कर
मॉमने तिला घाईतच पाठवले.त्यांना इतका आंनद झाला होता विराट कुठेतरी बदलतच चाललाय..

रात्री पिहुने आरती करुन उपवास सोडला. सगळ आवरुन ती रुममध्ये गेली.विराट त्याच काम करत बसला होता.पिहु फ्रेश होऊन नाईट सुट घालुन आली विराटच्या समोरून गेल्यामुळे व‌िराटची नजर पडली ..तिने लाईट‌ येलो कलरचा व्ही नेकचा टीशर्ट आणि खाली पर्पल कलरची पँट‌ आज पहिल्यांदाच त्याने तिला अस बघितले होते..तो यायच्या आत ती ब्लँकेट ओढुन घ्यायची नाही तर तो आत गेल्यावर चेंज करायची .त्याने परत‌ लॅपटॉप कडे डोक वळवले....

पिहू मोबाईल घेऊन त्याच्या शेजारच्या चेअर बसली तसे त्याने तिच्या कडे प्रश्नअर्थी नजरेने बघितले .

तिने मोबाईल समोर धरत मी ..ती पुढे बोलणार कि हाच बरसला
कळलं ...मोबाईल नको ,आता त्यावर मल‌ा काही ऐकून घ्यायच नाही. तुम्ही कश्याला घेतला मी तुमच्यावर माझी जबबादरी ऑल अॅन दॅट हे बघ मोबाईल काळाची गरज आहे.आता‌ तुला‌ वापरयाचा नसेल तर‌ फेकून दे.

पिहु घाबरुन हळु आवाजतच :-मी फक्त थँक्यु बोलत होते.

तिच बोलण ऐकून तो‌‌ लगेच शांत होतो.

तो शांत झालेला बघुन ती पुढे बोलत :-मी कधी वापरला नाही आय फोन काही कळतच नाहीये वीरा पण बाहेरुन आताच आली म्हणुन तुम्हाला विचाराव.

तो शांत होत मोबाईल घेत.तिला माहिती देतो..त्याच्या शांत‌ आवाजात ती गूंतत जात होती.‌ त्याचे तीक्ष्ण पाणीदार डोळे ,मोठे कपाळ ,केस थोडे विसकटलेले, बोलताना केसांनामधुन हात फिरवणे ती आज पहिल्यादांच त्याच्या ऐवढ्या जवळ बसुन निहाळत होती.त्याच लक्ष तिच्या कडे गेलं .तशी ती लगेच भानावर आली.त्याला ही कळले होते.पण त्याने चेहरयावर आणु दिले नाही..

ती घाबरत घाईघाईत पटकन मोबाईल घेत बेडवर जाऊन बसते.(पिहु मनातच काय तु पण काय झालं तुला वेड्यासारख बघत‌ होती काय विचार करेल ..ती ब्लँकेट घेऊन झोपली..)

व‌िराटने ही लॅपटॉप उचलला आणि स्टडीरुममध्ये गेला.
.
.
.

.
दोघेही जास्त बोलत‌ नव्हते ,पण दोघांना आता कंफर्ट फिल होत होते. पिहुला वाटत‌ होते विराटने पूढाकार‌ घेऊन आपल्याशी बोलावे .पण तस कधी झालं नाही .तो फक्त काम‌ काम ...कुठुन आपला फायदा होतो आणि बिझनेस वाढवता येईल ऐवढेच‌ डोक्यात..

पिहुचे आई वडील‌ घरी आले .आई मुलीच वैभव बघुन तृप्त झाली .चार -पाच दिवस राहीले तेव्हा विराट ने ही त्यांची काळजी घेतली.तो ही बघत होता आपल नातं कस ही असले तरी पिहु सगळ्यांशी नीट वागत होती.


कॉलेज ,घरातलं सगळ बघुन पिहु पार दमुन जायची तिला स्टडीसाठी जास्त वेळ मिळतच नव्हता. घरात जरी सगळया कामाला बायक्या असल्या तरी आपण स्वतःहुंन सगळ लक्ष द्याव हेच तिच होतं.दोन महिन्यात ती नीट घर संभळ्याला शिकली होती..रोहिणी पण मुद्दाम तिला काही‌ना काही जबबादारी देऊन मोकळी होत होती..पिहु ला कधी कधी राग यायचा पण बोलणार कस .राग तसाच ती गिळत‌ होती.

रोहिणी:- पिहु उद्या गेस्ट येणार कॉलेज जाऊ नकोस..

पिहु सुमन कडे बघत :-आई उद्या महत्वाचे दोन लेक्चर आहे ते करुन येते मी ..

रोहीणी:- सुमन सांग तिला गेस्ट महत्वाहचे आहे .त्यांनी विचारले कि सुन कुठे? काय सांगणार .

सुमन:- पिहु उद्या तु सुट्टीच घे गेस्ट समोर‌ चांगले नाही वाटत.मला पण माहीत आहे तुला घर कॉलेज खुप अवघड जाते...थोड समजुन घे बाळा...

आता पिहुला काहीच पर्याय नसतो..ती‌ निराश होऊन मानेनेच हा म्हणते.सगळ आवरुन ती रुममध्ये येते.विराट अजुन आला नव्हता. आज पहिल्यांदाच त्याला उशीर झाला होता..दररोज नऊ पर्य़त येत होता..पण आज दहा वाजुन गेले होते..ती परत‌ खाली आईंच्या रुममध्ये येते...

सुमन:पिहु अजुन झोपली नाही का ...

हा झोपणारच होते पण आई ती बोलायची थांबली.

काय हवं आहे का..

नाही ...

मग

आई हे अजुन आले नाही दहा वाजुन गेलेत तेच ..ती परत शांत झाली.
.

सुमन यांच्या लक्षात आले.त्यांना माहित होते.विराटला उशीर होणार पण पिहुला त्यांनी सांगितलेच नाही..पिहु हो गं मी फोन केला पण त्यांने उचलला नाही. तु बघ बर कॉल करुन .

मी ...पिहु थोड शॉक होतच बघते.

अग ऐकदा बघ करून उचलतो का मगास पासुन करते.

ती काही न बोलता रुममध्ये येते.

रुममध्ये येऊन इकडुन तिकडुन फिरत होती...काय करु फोन करु कि नको...कधी दोघांनी एकमेकांना फोन केलाच नव्हता. ती मोबाईल घेऊन दोन तीन वेळा तिचा हात जातो परत मोबाईल‌ ठेवुन देते.फोन केल्यावर‌ काय बोलु..पण काळजी ही होती.तिने परत मोबाईल घेऊन हिम्मत करुन विराटला फोन लावला,छाती तर धडधड करतच होती.चार-पाच रिंग नंतर विराट ने फोन रीसीव केला.

हॅलो.

आता काय बोलायच.हेच कळेना..ती बोलणार.

त्याने परत‌ हॅलो कोण???...

हे ऐकताच पिहुच्या डोळ्यातुन ‌टचकन पाणी यायला चालु झाले.तिने मोबाईलच कट करुन मोबाईल बेडवर फेकुन दिला...ती रडतच‌ स्वतःशी बोलु लागली.दोन महिने झाले .साधा नंबर स्वेह‌ नाही ..तिने रागाने मोबाईल घेत विराटचा नंबरच डिलीट‌ केला.


त्याने ट्रुकॉलरवर बघितला तर पिहुच नाव आलं तो दोन मिनीट ब्लँकच झाला फोन का केला असेलं परत त्याच्या लक्षात आले आपण कोण आहे‌ हे विचारले.त्याला कसतरीच होते .काय‌ विचार करत असेल.

पिहुला रडु आवरतच नव्हते डोळ्यातल पाणी काही केल्या थांबत नव्हते.तिला अस वाटत होते .सगळ‌ सोडुन निघून जाव .पिहु विचार करता‌ करता झोपून जाते.विराटला ‌यायला जवळजवळ साडे बारा वाजतात. तो‌ एक नजर तिच्या वर‌ टाकुन फ्रेश होयला जातो.

सकाळी पिहुला थोडा उशीरच होतो.ती पटकन आवरायला घेते.विराट तिची घाईगडबड बघत असतो.ती‌ आरश्यात बघुन आवरत होती.

विराट:- ऐवढी काय घाई करतेस हळु कोणीही अजुन रुमच्या बाहेर येत नाही.त्याला दिसत होते लग्न झाल्यापासुन एकटीच सकाळी उठुन आवरत होती.तिची जबाबदारी ती छान रीत्या पार पाडत होती.

तिने आरश्यातुन एक नजर टाकुन रागानेच बांगडया घालत होती.तिने काही रीप्लाय दिला नाही यांच कुठेतरी त्याला वाईट वाटत होते. ती काही न बोलता रुम‌मधुन बाहेर गेली..

खाली किचन मध्ये येऊन नाश्ता , जेवणात काय काय बनवायच सगळ गीता मधुला (कामवाली बाई.)सांगुन‌ पुजा करायला गेली.

सुधा:- गीता हे कोण सांगितले तुला करायला.

गीता:- ताईंनी सांगितले .पिहु ति‌थेच होती काय झालं आत्या.

सुधा:- पिहु ,कोण सांगितले तुला करायला.

पिहु:- आत्या मी मोठ्या आईंना विचारले कालच ....त्यांनीच सांगितले.

सुधा रागातच ,रोहिणी ला हाक मारू लागली.पिहुला काय झालं कळालंच नाही ती

रोहिणी सुमन दोघीही आल्या.

रोहिणी:- काय झालं सुधा ,

सुधा:- वहिनी माझ्या मुलीला बघायला येणार आणि तुम्ही काय गीता ,मधु कडुन संयपाक करुन घेणार का .जेव्हा गेस्ट येतात तर तुम्ही कूक बोलवता तूम्हाला बोलवायच नसेल तर मी सांगितले असते.

रोहिणी:- तुला कोण बोलले.

पिहुने सांगितले.

रोहिणी:- पिहु तुला काय करायचे ते बोलले होते गीताला सांग
बोलले नव्हते त्या पिहुला रागातच ओरडल्या.

पिहुला तर काय बोलाव कळलच नाही.( काल त्या स्वतः तिला
बोलल्या होत्या आणि आज वेगळ.) ‌आई मी तुम्हाला विचारले होते तुम्हीच बोलल्या.

रोहिणी:- तिला थांबवत.पहिले नीट ऐकून घेत जा सुमन तिला समाजावुन सांग अश्या ने घरात भांडण होतात.पिहु परत‌ अस काही बोलत जाऊ नाही.

विराट पण ‌खालीच येत होता.त्याला‌ ऐकु येतच होते.

पिहु :- आई हे मी माझ्य‌ा मनाने करत नाही.आईंना मी स्वत:ती विराटला समोर बघताच शांत होते..

विराट आत येत आवाज चढवतच :- आत्या पटत नाही ना ,मग स्वत: लवकर उठुन तयारी बघायची .ती नवीन आहे.तिला माहीत आहे का तुम्हाल‌ा काय करायचे. तो आई कडे नजर वळत आई तिला जर कळत नसेल तर नीट ही सांगता येते
.त्याचा आवाज ऐकुन सगळे शांत‌ होतात

रोहिणी :- अरे मी तिला कालच सांगितले होते.

बस मला यावर चर्चा नकोय.मॉम नऊ वाजुन गेलेत कॉलेज नाही का हे सगळ करत बसली.

सुमन:- ते तिने सुट्टी घेतली.गेस्ट येणार आहे काय बोलतील.

का , गेस्ट आल्यावर तिच्याशीच गप्पा‌ मारणार आहेत तुम्ही आहेत ना सगळे. तिच कॉलेज महत्वाचे आहे.तिला काय लग्न करुन तु घरातली काम करायला आणलेस का. वीरा दिपा कॉलेज करुनच येणार आहेत.

कोणाला काय बोलाव कळतच नाही.

तो बोलुन निघुन जातो.

पिहुला तर‌ शॉकच बसतो.आज तर विराटच तिने वेगळच रुप‌ बघितले.

सुमन रोहिणी कडे बघत:-ताई जाऊ दे का..

रोहिणी काही न बोलता निघुन जातात.

सुमन पिहुला डोळ्यानेच जा आवर म्हणतात.


काय कळतच नाही कसा स्वभाव आहे माझ्या तर डोक्याबाहेर आहे सगळ. पिहु स्वतःशीच बडबड करत रुममध्ये येते.

विराट कॉफी पित त्याच आवरत फोन बोलत‌ असतो.

पिहु आत‌ येत त्यालाच बघत होती...तिला कालच आठवत परत पारा चाढतो. रागातच आवरुन येते...तिचा हात वाझला‌ लागुन खाली पडतो. दोघेही एकदम दचकुन एकमेकांनाकडे बघतात.

तो‌ पटकन जवळ येत तिचा पाय‌ पडु नये म्हणून खाली वाकुन काच उचलत होता.

पिहुला‌ 😅 वाटते कि विराटला माझी काळजी नाही तर‌ वाझ पडल्याचे दु‌ख झाल.

तो‌ उठुन काच हातात धरत तिला लागलं तर नाही ना हे विचारणारच कि पिहु बोलते

पिहु रागातच चुकून पडले,मूद्दाम नाही केलं.

वि‌राट ती चिडलेले बघुन- माझ ते म्हण नाही ये .

मग काय बोलायचे खुप‌ महागाचे असेल हेच का हे बघा ...माझ्याकडुन तुमच्या रुममधले जे काही सामान तुटेल ते तुम्ही अॅलमनी मधुन कट करुन घ्या.

विराटला🙄 दोन मिनीट कळतच नाही.अॅलमनी..???व‌िराट बोलतो.


हो ...माझ्याकडे पैसे तर नाहीये.द्यायला तुमच्या वस्तुची भरपाई
द्यायला‌.आणि मोबाईल पण जाताना ठेवुन जाईल.

विराट दोन मिनीट तिच्या कडे ब्लँक होत बघतो. नंतर‌ तिच बोलण ऐकुन त्याला हसु आवरतच नाही तो जोरातच हसतो...

ती चमकुन बघते.तिला कळतच नाही विराट का हसतो‌य.आज ती पहिल्यांदा हसताना बघत होती.त्यात आपण काही तरी वेगळच बोललो ते ही जाणवते.पिहु (चिडत )हसताय का मी काय जोकर वाटले का तुम्हाला .

विराट हसु आवरत एक टक तिच्या निरानस चेहरयाकडे बघत मनातच बोलतो.जोकर नाही क्यूट दिसते बोलताना.त्याचा फोन वाजतो तो भानावर येत‌ फोन रिसीव करत निघुन जातो.

ती बॅग घेऊन बडबड करतच खाली येते.परत‌ पिहु विचार करते.ह्यांना वाटेल मी खरच डिवो‌‌र्स नंतर पैसे घेणार आहे का... काय‌‌ म्हणतील किती लालची .विराट चालला होता.ती पळतच
त्याच्यासमोर आली.

विराट कार मध्ये बसणार होता तिला बघुन थांबला .

मला पिहु बोलतच होती कि विराट वॉच कडे बघत लेट होतोय मला

तिला बोलायच होते म्हणुन :-मला ही होतोय मला सोडा ती पटकन गाडीत जाऊन बसली.

विराट अजुन तिचे एक्सप्रेशन तिच ते निरागस बोलण आठवत हसु येत होत. तिच्याकडे बघुन गाडीत बसला.

दोघे गाडीत थोड्यावेळ‌ शांतच होते.

विराट तिच्याकडे नजर वळवुन :-तुला काही तरी बोलायच आहे ना.

पिहु:- मी चुकुन म्हणाले मला तुमच्याकडुन पैसे वैगेरे काही नकोय.

विराट :- तो थोडावेळ‌ शांत होत.... सॉरी ,

पिहु चमकुन बघत सॉरी का??

काल तु कॉल केला माझ्याकडे नंबर स्वेह नव्हता.माझ चुकलं .

हुम्म ..मला काही फरक पडत नाही तूम्ही स्वेह करा नाहीतर नका करु तसही मी ही स्वेह केला नाही तुमचा नंबर चार महिन्यासाठी कश्याला नंबर स्वेह‌ करायचा ..नंतर आपण दोघे आयूष्यभर एकमेंकाच तोंड बघणार नाही ..कळलं मिस्टर देशमुख ती नजर रोखुन रागात बोलते.

कॉलेज आल्यावर तो कार थांबवतो.ती जे बोलली ते मनाला लागत होते.पण का हळहळ‌ होते विराटला कळतच नाही.

ती रागातच दार उघडुन बाहेर येते.नकळतच तिचे ही डोळे पाणवतात.तिलाही‌ कळत नव्हते अस का होते आधीपासुनच सगळे ठरले आहे तर का त्रास होतोय.


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

(लग्न झाल्यावर शिकत असलेल्या मुलींना किती तरी वेळा प्रोब्लेम येत असतात.तेव्हा त्यांना सासरकडच्यांनी सपोर्ट का‌रयला हवा .)

क्रमशः