देखकर आयने मे खूदको
हस पडी हु खुदही पे
वैसे तो पूजी जाती हु हर मंदिर मे
फिरभी उलझी पडी हु खुदही की पहचान मे..
हा नारी हु मै ..हा नारी हु मै ..
नित्या दिवसेंदिवस नैराश्याग्रस्त होऊ लागली होती ..जवळपास बाहेरच्या जगाशी तिचा संपर्क तुटलाच होता फक्त मार्केटमध्ये भाजी आणायला जाणे ह्याची काय तिला मोकळीक मिळाली होती..मृन्मयच्या मोठ्या भावाची बायको आपल्या माहेरी नेहमी जात असे तर नित्याला मात्र आपल्या माहेरी जाण्याची कधीच इच्छा नसे त्यामुळे ती एखाद्या यंत्रासारखी रात्रंदिवस काम करत बसायची ..जिला आपल्याविरुद्ध कुणाकडे तक्रार देखील करता येत नव्हती ..पण कधी कधी ती अनुशी बोलत असे ...सार काही साठवून ठेवेलेलं ती अनुषी शेअर करत होती विशेष म्हणजे डोळ्यात साठवून ठेवलेले अश्रू तिच्यासमोर आपोआपच बोलते व्हायचे त्यामुळे नित्याला तिच्याशी बोलून फार समाधान मिळायचं ..अनु बोलता - बोलता तिला यातून बाहेर निघण्यासाठी एक कल्पना देऊन गेली आणि तिलाही ती पटली होती ..त्यामुळे अनुसोबत बोलणं झाल्यावर ती आज खूप दिवसाने खुश भासत होती .आज तर नित्याला मृन्मयच्या येण्याची जणू ओढच लागली होती ..म्हणूनच की काय ती घरातले सर्व काम न कंटाळता करत होती ..ती त्याची वाट पाहत होती आणि आजही मृन्मय थोडा उशिराच घरी आला .. तो दारू पिऊन आला हे पाहुनदेखील ती त्याच्यावर ओरडली नव्हती उलट आनंदाने त्याला जेवण वाढल ..तो तिच्या अशा वागण्याने भारावून गेला होता आणि तिच्याकडे पाहू लागला आणि ती हसतमुखाने त्याच सर्व काही करू लागली .आज त्याच्या आवडीचं सर्व जेवण बनविल होत त्यामुळे जेवण करून त्याचा चेहरा आनंददायी भासत जात ..जेवण आटोपलं आणि झोपेच अंथरून टाकल्या गेलं ..अंथरुणावर पडूनच घरात सर्वच गप्पा मारत बसले होते ..त्यामुळे नित्याही त्याच्या जवळ येऊन बसली . घरातील वातावरण जरा प्रफुल्लित वाटत होतं म्हणून संधी शोधत नित्या म्हणाली , " मृन्मय मी जॉब करू शकते का ? , लग्नाची बोलणी करताना तू म्हणाला होतास की मी जॉब केली तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नसेल ? " ...नित्या तर सर्व एका श्वासात बोलून गेली आणि तिच्या शब्दांनी घरातील वातावरण शांत झाल ..आईचा चेहरा रागाने भरलेला दिसत होता तर वडिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते ...वातावरण शांत असल्याने मृन्मय काय बोलतो यावर आता सर्वांचं लक्ष लागून होत ..तो काहीच बोलत नाही हे पाहून नित्या म्हणाली , " सांग ना मृन्मय !! "
आणि चेहऱ्यावर विचित्र भाव आणत मृन्मय म्हणाला , " त्याची गरज नाहींये .."
त्याच उत्तर एकूण नित्याला शॉकच बसला कारण लग्नाआधी त्यांनी स्वतःहून तिला जॉब करण्यासाठी होकार कळविला होता आणि आता अचानक तो असा कसा वागू शकतो असे बरेच प्रश्न तिच्या मनी डोकावू लागले आणि तिने न राहवता रागात विचारले , " का पण ? ..मला कारण जाणून घ्यायचं आहे ? "
आणि शांत बसलेला मृन्मय तिच्यावर चढत म्हणाला , " काय कमी आहे ग तुला इथे ..चांगलं चांगलं खायला मिळत ..अंगावर दागिने आहेत ..कसलीही कमी होऊ देत नाही तुला मग तुला काय येऊन पडलं नौकरिच !!..मस्त खावं नि राहावं घरात पडून तर जॉब करायचं आहे म्हणे .. "
त्याच बोलणं तोडत आई म्हणाली , " आणि आम्हाला सुनेला कामावर पाठवून आमची इज्जत कमी करून घ्यायची नाही आहे ..काय बोलतील लोक आम्हाला ? ..शेण घालतील आमच्या तोंडात ? "
एवढं सर्व ऐकल्यावर नित्याही जरा जोरात बोलून गेली , " मग लग्नाची बोलणी करताना कशाला इतकं मोठेपण दाखवलं ..तेव्हा का दाखवली नाही ही तुमची तुच्छ विचारसरणी .."
तिचे हे शब्द कानावर पडताच मृन्मयचा हात तिच्या गालावर पडला ..त्याचा तो बलदंड हात तिच्या गालावर येऊन पडला आणि तिला चक्कर येऊ लागली ..गालावर हाताचे व्रण देखील उमटले होते ..तो तिचा हात जोराने दाबत म्हणाला , " हे बघ जे मिळत आहे त्यात चुपचाप पडून रहायच ..जास्त तोंड चालवायचं नाही ।.नाही तर तुझे इथे काय हाल होतील ते देखील कळणार नाहीत ..आणि नौकरिच म्हणते आहेस ..माझ्या आईच उतरत वय पाहून तुला काहीच वाटत नाही का ? तू कामावर गेल्यावर तिलाच सर्व करावं लागेल आणि मला हे मान्य नाही ..तेव्हा घरातील काम करायचं आणि चुपचाप बसायचं इथेच .."
त्याचे शब्द पूर्ण झाले नव्हतेच की नित्या रडत रडत म्हणाली , " म्हणजे तुम्ही माझा विश्वासघात केला ? ..मला फक्त इथे मोलकरीण म्हणून आणलं आहे का ? "
आणि तो तिच्या हाताला जोराने दाबत म्हणाला , " हो आहेस तू मोलकरीण !! कळलं ..आता जाऊन झोप ..उगाच डोकं खाऊ नको आणि हा विषय पुन्हा कधीच काढायचा नाही ..नाही तर यापुढे तुझं काही खर नाही .."
मृन्मयच्या बाबांनी कसातरी त्याचा हात सोडवला ..मृन्मयच स्वतःच भानावर नसल्याने अंथरुणावर पडताच झोपी गेला तर त्याची आई तिच्यावर हसत होती ..झालेल्या प्रकाराने तिला फारच आनंद झाला होता ..काही वेळात घरचे सर्व झोपी गेली ..पण नित्याला मात्र झोप लागली नाही ..
ती विचारात हरवली होती ...स्त्री पुरुषाच्या हातातील एक खेळण असत ..त्याला जेव्हा वाटेल तेव्हा त्याचा उपयोग करतो आणि नंतर फेकून देतो ..हे तिला कळून चुकलं ..तिला दिलेले सर्व वचन त्याने काहीच दिवसात मोडले आणि म्हणून तिने ठरवलं की आता त्याने कितीही प्रयत्न केले तरी आपण त्याच्यासमोर हरायच नाही ..आणि त्याच्या चुकीच्या वर्तनाविरुद्ध आपण आवाज उठवायचा आणि मनात हा प्रण ठरवून ती झोपी गेली..
दुसरा दिवस उजाळला आणि नेहमीप्रमाणे तिने कामाला सुरुवात केली पण रात्री त्याच तिच्यावर हात उचलणं अजूनही तिच्या डोळ्यासमोर जसच्या तस उभं राहतं होत ..सकाळपासून ती सर्व काम करत असली तरीही ती कुणाशी शब्द देखील बोलली नव्हती परंतु ते सर्व मनातून काढून टाकण देखील तिला शक्य नव्हतं ..या नादात मात्र तिच्याकडून काम करण्यात फार चुका होत होत्या आणि सासूबाईं तिला नको ते बोलू लागल्या पण ती सर्व मुकाट्याने सहन करत होती ..
घरातले सर्व काम आवरून ती एकटीच खिडकीजवळ बसली होती ..स्वतःच्या विचारात हरवून बसलेली असताना तिच्या मागून कुणीतरी आलंय हे लक्षात आलं नाही .त्या व्यक्तीने नित्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती घाबरून मागे बघू लागली ..मागे बघताच तिचा जीव भांड्यात पडला कारण तो मृन्मय होता ..मृन्मय आज दुपारीच घरी आला होता ..त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलणार नव्हती .. आज तो तिला बाहेर घेऊन जायचं म्हणत होता तरीही ती त्याला बधली नव्हती ..पण तो वारंवार विनंती करत असल्याने मात्र तिने शेवटी बाहेर यायला होकार भरला ..आज कधी नव्हे ती थोडी फार सजून बाहेर निघाली होती ..तर सासूबाई आपल्या मुलांकडे टक लावून पाहत होत्या ..कालच्या प्रकारानंतर तिचा मुलगा अस काही वागेल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता त्यामुळे ती नित्याकडे रागाने पाहत होती ..नित्या तयार होऊन बाहेर आली ..जरी तिने त्याला माफ केल नसलं तरीही आज तो तिला पहिल्यांदा बाहेर फिरायला नेणार असल्याने ती मनातून थोडी आनंदी झाली होती ..ती तयार होऊन बाहेर पोहोचली तेव्हा मृन्मय तिची गाडीवर वाट पाहत होता ..ती त्याच्या मागे जाऊन बसली आणि त्याने गाडी सुरू केली ..त्याच्या खांद्यावर हात ठेवून फिरताना तिला वेगळाच आनंद मिळत होता ..तिला वाटत होतं की त्याला विचारावं आपण नक्की कुठे जाणार आहोत पण त्याला वाटू नये की आपण हरलो म्हणून ती त्याला एक शब्दही बोलली नव्हती ..आज खूप दिवसाने ती बाहेर निघाली असल्याने तिला तो बाहेरचा परिसर खूपच भारी वाटत होता आणि जणू ती त्यातच हरवली होती ..अचानक गाडीचा ब्रेक लागला आणि ती भानावर आली आणि मृन्मय म्हणाला , " मॅडम उतरणार आहात की पुन्हा गाडीने परत घरी जायचं " ..त्याचा टोमणा एकूण ती लगेच खाली उतरली ..तिने आपली नजर बाजूला टाकली व तिच्या लक्षात आले की मृन्मय आपल्याला आज मूवी पाहायला घेऊन आला आहे ...तिलाही दररोजच्या जीवनातून बाहेर येऊन काही क्षण आनंदात घालवता येईल म्हणून आनंद झाला ..नित्या थोड्या दूर जाऊन उभी झाली तर मृन्मय मूवीचे तिकीट घेऊन आला..त्याने तिला आतमध्ये जाण्याचा इशारा करताच ती त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली आणि दोघेही जोडीने आतमध्ये जाऊ लागले ..काहीच वेळात मूवी सुरू झाली ..मृन्मय तिला कॉमेडी मूवी पाहायला घेऊन आला होता ..त्यामुळे प्रत्येक सेकंदानंतर नित्या पोट धरून हसत होती ..आज पहिल्यांदाच ती इतकी मनसोक्त जगत होती ..तिला त्याक्षणी मृन्मयवर किंचित प्रेम जाग झालं ..त्याला माफ करून टाकाव म्हणून तीच मन सांगू लागल पण त्याची थोडी खेचावी म्हणून ती जाणूनच त्याकडे दुर्लक्ष करत होती ..तीच पूर्ण मन मूवी पाहण्यात लागलच होत की मागून तिच्या पृष्ठावर हात फिरताना जाणवला ..तिने मागे पलटून पाहिलं तर तो मृन्मय होता ..लक्षात येताच तिने त्याचा हात रागाने झटकून दिला आणि पुन्हा मूवी पाहण्यात व्यस्त झाली ..काहीच वेळ झाला असेल की मृन्मयचा हात तिच्या छातीवर आला आणि तीला मनातून कसतरीच वाटू लागलं ..इतक्या साऱ्या लोकांमध्ये त्याच तस ते निर्लज्जपणे वागणं तिला मनातून तोडत होत पण इथे तरी गोंधळ होऊ नये म्हणून तिने शांत राहणंच पसंद केलं ..तरीही मृन्मय काही थांबायचं नाव घेत नव्हता ..कधी मागे , कधी पुढे तर कधी छातीवर हात येऊ लागल्याने नित्या मनातून दुखावली होती ..तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू बाहेर यायचे उरले होते..तरीही तिने स्वतःला सावरून घेतलं ..मूवी संपण्याच्या मार्गावर आली आणि ती क्षणभरही न थांबता बाहेर येऊ लागली ..तीचे डोळे भरून आलें होतें त्यामुळे रुमाल काढून तिने ते पुसले तर आपण तिची कशी छेड काढली म्हणून मृन्मय हसत हसत येत होता ..त्यानंतर ते जेवायला हॉटेल मध्ये गेले तेव्हाची त्याची नजर फक्त तिच्या शरीरावर होती ..नित्याला आपण केव्हा घरी जातो अस झालं होतं ..त्यामुळे शक्य होइल तेव्हढ्या लवकर तिने जेवण आटोपलं आणि ते घरी आले ..
नित्याची प्रत्येक रात्र जागण्यात जात होती ..आजच्या क्षणानंतर तिला कळून चुकलं होत की ह्याला सरविकडे तेच दिसत ..त्यामुळे जर आपण ह्याला वेळेवर आवर घातला नाही तर कदाचित हा मला ओरबाडून खाताना विचार देखील करणार नाही ..त्यामुळे शक्य होईल तितकं तरी याला दूर ठेवायचं ..कदाचित हे सर्व तिला वाटत तेवढं सोपं नव्हतं पण तरीही तिने त्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला होता ..
त्या दिवसानंतर एक निर्भीड नित्या सर्वाना पहायला मिळाली ..कधी कधी सासूबाईंना देखील ती उत्तर द्यायची फक्त टाकून बोलणे तिला कधीच जमलं नाही ..मृन्मयच्या बाबतीत घेतलेला पवित्रा तिला फार कामी येत होता ..ती त्याला नाही म्हणाली की तो फार रागाला यायचा पण ओरडलो तर घरच्याना कळेल म्हणून तो काहीही बोलू शकत नव्हता ..कधी कधी तो नित्याला सकाळी सकाळी उठवायचा पण ती जाणून उठायची नाही त्यामुळे त्याची दिवसभर चिडचिड व्हायची आणि कामात चुका झाल्याने बॉस ओरडल्यावर मात्र त्याच डोकं आणखीच जड होऊन जायचं ..कधी कधी तो दारू पिऊन यायचा आणि लगेच झोपी यायचा तर कधी कधी तिच्यावर हात उचलायला तो मागे बघायचा नाही पण आपल्या लढाईमध्ये आपण हळूहळू जिंकतोय हे पाहून नित्याला थोडा आनंद होऊ लागला आणि महत्त्वाचं म्हणजे ती आता कामातून स्वतःच्या आरामासाठी वेळ काढू लागली होती ..नित्यासाठी सर्व काही नीट घडायला लागलं होत त्यामुळे ती खुश होती ..
एक असाच दिवस ...आज त्याला सुट्टी होती ..या काही दिवसात त्याला नित्याला मनसोक्त उपभोगता आलं नव्हतं त्यामुळे तो मनातून जळून निघाला होता तर तिच्या वागण्याची शिक्षा त्याला द्यायची होती ..त्या दिवशी बाबा नेहमीप्रमाणे बाहेर गेले होते ..नित्याही सर्व काही आवरून जेवायला बसली होती ..मृन्मयने काहीतरी कारण काढून आपल्या आईला बाहेर पाठवले होते ..तो आईला बाहेर जाताना पाहत होता आणि आई जाताच तो नित्याकडे आला .नित्या त्यावेळी जेवण करत होती ..त्याने आता येताच तिचा हात धरला आणि ती त्याच्याकडे पाहू लागली ..त्याच्या नजरेवरून त्याला काय म्हणायचं आहे हे तिला कळलं आणि बसूनच ती म्हणाली , " मृन्मय ही काही वेळ नाहीये आणि मला जेवण करू दे गुपचूप ..जा बस आपला टीव्ही बघत .." तिने काही बोलावं आणि त्याने तिचा हात जोराने धरून खेचायला सुरवात केली .तसेच तिच्या हातातले ताट जोराने खाली पडले ..ती त्याला नको नको म्हणत असतानाच त्याने तिचा हात बळजबरीने धुतला आणि लगेच बाजूला असलेल्या गादीवर तिला नेऊन टाकले ..ती त्याला संपूर्ण ताकदीने ढकलत म्हणाली , " तुला वेळ लागल आहे का मृन्मय ? मी जेवण करत होते ...तुला माझ्या भावनांचा काहीही फरक पडत नाही का ? ..हो बाजूला मला जेवण करू दे .."
ती समोर जाणारच तेवढ्यात त्याने हात धरून पुन्हा खाली पाडले ..आणि रागात म्हणाला , " अलीकडे तुझी जीभ खूप तुरुतुरु चालू लागली आहे ..जेव्हा पाहिलं तेव्हा नाही नाही म्हणत असतेस ..तुझा नवरा आहे मी हे तरी लक्षात आहे ना ? .की आता तुला माझा स्पर्शच नकोसा झाला आहे ..मला तर वाटत तुला दुसरा कुणी आवडला असेल म्हणून मी नकोसा झालोय .."
तो रागात बरच काही बोलून गेला आणि नित्याचे डोळे टचकन भरून आले ...तिच्या नाहीचा त्याने असा अर्थ लावला होता ..त्यामुळे आता त्याला नाही म्हणायला देखील काहीच जागा उरली नव्हती ..त्याने पुन्हा एकदा पुरुषी जोराने तिला आपलं बनवून घेतलं आणि विशेष म्हणजे तिने आजपर्यन्त त्याला जितक्या वेळ नाही म्हटलं त्याचा बदला घेता यावा म्हणून तो तिच्या शरीराला जिथे हवं तिथे चावा घेत होता ..ती वेदनेने ओरडत होती पण त्याला तीच काहीच करायचं नव्हतं ..त्याला फक्त हवी होती ती भूक आणि तो तिला मनसोक्त भोगत होता ..मग त्यासमोर त्याला वेदनेने ओरडणारी ती कुठेच दिसत नव्हती आणि तिला भोगून झाल्यावर विजयी मुद्रेने तो पुन्हा उठला ..लगेच कपडे घालून तो बाहेर पडला ..नित्या मात्र आताही स्वतःला सावरत होती ..तीच संपूर्ण शरीर जखमांनि न्हाहून निघालं होत ..अशा जखमा ज्या काही काळाने शरीर भरून काढणार होत पण मनात मात्र त्या कायम जपल्या जाणार होत्या ..
क्रमशः ...
( कुणाला वाटत असेल की हे खरंच घडत का तर माझं उत्तर आहे ..हो ..कितीतरी पुरुष जळती सिगारेट स्त्रियांच्या शरीराला लावतात ..खरच हे माणुसकीला धरून आहे का याचा नक्की विचार करावा । स्पर्श म्हणजे आनंद होऊ शकतो पण समोरच्याला यातना देऊन आनंद मिळविण्यात कुठला मर्दांनगीपणा असतो या गोष्टीचा नक्की विचार व्हावा ..)