भाग १
अंधार पडला होता , सूनसाम रस्त्यावरून एक कार भरधाव वेगाने जात होती . ड्रायव्हर ने करकचून ब्रेक मारला , मागे बसलेल्या व्यक्ती ने विचारल , केशव काय झाल , अचानक का थांबवली गाडी
ड्राइव्हवर घाबरून - साहेब पुढून कुणीतरी धावत कार पुढे आलाय .
त्याने दार उघडलं , जॅकेट काढून ठेवाल बाहेर आला ,24 वर्षा च तरुण लाईट ब्ल्यू फॉर्मल शर्ट वरची दोन बटण काढलेली ,ब्राऊन ट्राऊ सर् , उचं 6ft , Gym करून कमावलेलं एकदम पीळदार शरीर , गव्हाळ गोरा रंग ,थोडेसे रागीट भाव चेहऱ्यावर पाहताक्षणी भुरळ पडाव असा व्यक्तिमत्व.
तो पुढे जाऊ लागला हाताच्या बाह्य फोल्ड करत होता, एक 18-19 वर्षाची असावी 7-8 महिने प्रेग्नंट मुलगी बेभान धावत मागे बघत येत होती आणि त्याच्या भारदस्त छातीवर आदळली , खूप घाबरली होती ती, तिने त्याचा कॉलर जवळ शर्ट खूप घट्टा पकडला , त्याचा कंबरे भोवती हाथ घालून त्याला घट्टा पकडून ठेवला . श्वास खूप भरून आल्याने शब्दा पण निघत नव्हते त्याच्या डोळ्यात बघत .. help help म्हणत बेशुध्द झाली.
त्याने तिला त्याचा हातात पकडलं, तिच्या निरागस निळे डोळे बघत होता , घामनी भिजलेले. शरीर, डोक्यावर घामाचे बिंदू , चेहऱ्यावर भीती दुःख , ती त्याच्या कडे खूप मदतीच्या अपेक्षेने बघत होती, आणि तिची शुद्ध हरवली.
तिच्या मागे 2 मुलं गुंड च दिसत होते धावत येत होती .
येह तिला सोड आणि पल इथून , त्यातला एक बोलला
तो नजर रोखून त्या गुंडांना बघत होता
गुंड पुढे येत होते, एक त्याचा वर वार करणार तेवढ्यात काही कळायच्या आत
तो - तिला एका हातानी घट्ट मिठीत पकडून दुसऱ्या हाताने त्या गुंडाच्या डोक्यावर पंच केला ... धडाम तो गुंड खालीच कोसळला
दुसरा गुंड त्याल बघून त्याने त्याच्या जवळ असलेला चाकु काढला आणि वार करणार तेवढयात त्यानी गुंडाचा पोटाखाली एक पायाने किक मारली , गुंड कळवळून खाली पडला .
त्याने तिला त्याचा दोन्ही हातावर उचलून घेतले ,त्याला त्याच्या हाताला थोडा ओल ओल जाणवलं , हाथ बघतो त लाल लाल झालेलं बहुतेक रक्त होत , तो घाबराला , दर उघडून तिला आत बसवत केशव काका हॉस्पिटलमध्ये घ्या गाडी ... फास्ट ...
केशव ने जवळ असलेल्या हॉस्पिटलकडे घेतली कार.
हॉस्पिटल ला आल्या बरोबर त्याने तिला उचललं स्ट्रेचर ची वाट न बघता आत मध्ये घेऊन गेला , डॉक्टर नर्स आलेत . डाक्टर ने तिला चेक केले
डाक्टर - इमर्जन्सी आहे सर , ऑपरेशन करावे लागेल
नर्स ऑपरेशन ची तयारी करा
तो भांबावल्या गडबडलेला नजरेनी बघत होता सगळं , त्याला काही च कळतं नव्हते
नर्स - सर त्या डॉक्युमेंट्स वर साइन करून द्या लवकर , वेळ फार कमी आहे madam च्या आणि होणाऱ्या बाळाच्या जिवाला धोका आहे
तो - मला काहीच कळत नाहीये , मला समजेल असा सांगाल काय
नर्स - सर 9महिना सुरू आहे , वॉटर broke झालंय , बाळाला movement nahi होत आहे आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल आणि निघून गेली
तो केशव कडे बघत होता , काय करावं कळत नव्हते , आपण त फॅमिली मेंबर पण नाही , तेवढयात त्याला आठवलं तिच्या खांद्यावर पर्स होती ती कार मध्ये च राहिलेली , केशव काका जा कार मधून पर्स घेऊन या , बघू त्यात काही कॉन्टॅक्ट सापडतो काय
इकडे नर्स खूपदा येऊन पेपर चेक करत होती , सर प्लीज लवकर करा , जोपर्यंत साईन नाही होणार आम्ही पुढे जाऊ शकत नाही
त्याला काय बोलावं कळत नव्हते, आपण हीचे कोणी नाही सांगितले तर ते तिची केस हॅण्डल नाही करणार असा वाटून तो चूप होता , का कोणास ठाऊक पण त्याला ती फार जवळ असल्या सारखी वाटली ,तिला काही झालं तर , या विचारानेच हृदयामध्ये एक कळ येऊन गेली .
केशव पर्स घेऊन आला , त्या मध्ये तो चेक करत होता काही मिळते काय, फोन भेटला पण त्याला लॉक होत , काहीच कळत नव्हतं
नर्स आली सर मॅडम ची कंडीशन खूप खराब होतेय
आता त्याने मागचा पुढचा विचार न करता त्या पेपर वर फादर चा ठिकाणी स्वतः ची सईन केली .
इकडे त्याचा घरून फोन येत होता वारंवार , आणि का नाही येणार आज तो तब्बल तीन वर्षांनी भारतात परत आला होता , आणि एअरपोर्ट वरून घरी जातांना हे सगळं घडल होत . तो तसा खूप रागीट, त्याच मन असा कधी पिघालयच नाही , पण मदतीला नेहमी धाऊन जाणारा .
केशव आणि तो बाहेर थांबले होते, तेवढयात नर्स आली पेपर घेऊन गेली आणि काळजी करू नका म्हणली
परत त्याचा फोन वाजला , बघतो तर आई चा होता, त्याने उचलला , हो आई येतोच आहे बोलला आणि फोन ठेवला.
केशव काका मला घरी निघायला हवं , तुम्ही इथे थांबा , त्या मुलीची सगळी सोय करून या आणि काही लागलं तर मला सांगा , अस बोलून तो सगळं हॉस्पिटल च सगळं बिल अडवन्स मध्ये पे करून निघाला .
इकडे तो घरी जायला निघाला, कार एका मोठ्या बंगलो, बंगला काय छोटा महाल च दिसत होता, जवळ येऊन थांबली . रात्री लाईटनिंग चा प्रकशात घर सगळ उजळून निघालं होत .
कार गेट मधून आत आली, मोठं गेट, आजूबाजूला छान मोठे मोठे झाड , कार छोट्या रस्त्यातून आत आली , रस्त्याच्या बाजूला छोटी छोटी रंगबिरगी फुलांची झाडे , एका साईड ला पार्किंग तिथे चार कार उभ्या, दोन बाईक , एक स्कूटर उभ्या होत्या. दुसऱ्या साईड ला मस्त मोठं लॉन, त्यात झोपाळा लावला होता, आजूबाजूला फुलाची झाड , छान गंध पसरला होता , झोपालयाच्या थोड पुढे टेबल खुर्च्या ठेवल्या होत्या . सगळं खूप सुंदर दिसत होत .
तो कार मधून खाली उतरला, जॅकेट घातला , आणि आतमध्ये गेला.. तो आत पाय ठेवणार तोच आवाज आला .. अर्जुन थांब...
तर हा आपला हिरो अर्जुन ..
क्रमशः