तुझाच मी अन माझीच तू...भाग ११
तिकडे राजस सुद्धा आभाच्याच विचारात होता. तो पण घरी पोचला आणि सोफ्यावर पहुडला. त्याने घरी पोचल्या पोचल्या आई ला हाक मारली..."ए आई..आहेस ना? मला प्लीज मस्त कॉफी हवीये!! दे ना..." राजस स्वतःच्या धुंदीत बोलला पण त्याला काही उत्तर मिळाले नाही...आणि त्याला आठवलं आई ने त्यला सांगितलं होत की ती आणि बाबा आत्या कडे जाणार आहेत.. त्याने डोक्याला हात मारून घेतला..
"माझीच मला कॉफी करावी लागणार.. नो!!" राजस जोरात ओरडला.. पण त्याचा आवाज ऐकायला कोणीच नव्हत. त्याचा आरडा ओरडा ऐकून घ्यायला आई घरी नव्हतीच.. त्याने मनात एक शिवी हासडली.. तो एकुलता एक असल्यामुळे आई बाबाचा लाडका त्यामुळे अति शेफारलेला आणि लाडावलेला राजस..तसा आयतोबा.. पण अतिशय हुशार आणि चाणाक्ष!! पण आज आयता चहा मिळणार नाही ह्या विचाराने तो जरा वैतागला.. आता लगेच कॉफी घेण्यापेक्षा जरा जरा शांत बसू असा विचार त्याने केला. त्याने तसेच केले कारण उठून पटापट कॉफी करायचा त्याला कंटाळा आला होता. त्याने डोळे मिटून घेतले.. तेव्हा अचानक त्याच्या नजरेसमोर आभा आली.. तिचा चेहरा काही केल्या त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता. त्यानी डोळे खाडकन उघडले.. "डोळे मिटले तरी आभाच? ही आभा आता आपला पिच्छा सोडणार नाही वाटत. भुतासारखी मानगुटीवर बसून राहणार.." त्याच्या चेहऱ्यावर हसू आले पण नंतर त्याला हे काहीतरी नवीन होतंय आपल्याला हे जाणवले.. आणि त्याने कपाळवर हात मारून घेतला.. आणि त्याच्या मनात विचार चक्र चालू झाले..
"काय होतंय काय राजस साहेब तुम्हाला?. तुम्ही काय प्रेमात बिमात पडलात का काय? आज पहिल्यांदी भेटलोय आभा ला तरी तिने माझ्या मनावर इतकी जादू कशी काय केलीये? पण हे दिसत तितक सोप्प नाही.. ठीके... सोप्प्या गोष्टी कुठे करता तुम्ही?? सो धिस इस गोइंग टू बी फन.. पण इतक्यात कोणच्या प्रेमात पडायचं नव्हतंच न तुम्हाला?? मग कशी ही वाट निवडलीत साहेब? आणि प्रेमात पडलात तर कोणाच्या? आखडू आभा च्या जिच्याबद्दल काहीही माहिती नाहीये? आणि नक्की खात्री पण नाही की हे प्रेमच आहे.. पण डोळे बंद केल्यावर सारखा तिचा चेहरा डोळ्यासमोर येण हे काय आहे? म्हणजे मोस्टली प्रेमात पडलात..आणि अरे वा साहेब, शेवटी प्रेमात पडलात.." राजस च्या मनात विचारांचे थैमान चालू होते आणि मनात गुदगुल्या होत होत्या. राजस स्वप्न रंगवायला लागला पण त्याला थोड दडपण सुद्धा आले होते. "आपल्याला लई होईल प्रेम बीम. पण आखडू आभा हो म्हणली पाहिजे न..आणि ती आखडू मैत्री करयला सुद्धा आखडती आहे.." त्याने नजर वर टिकवली... पण थोडा विचार करून विचित्र हसला आणि उठला.. मग तो डायरेक्ट स्वयपाक घरात कॉफी करायला लागला.. त्याने एकदम कडक कॉफी केली आणि कॉफी घेऊन हॉल मध्ये आला..त्याने कॉफी चा एक घोट घेतला. आणि टिव्ही चालू केला.. टिव्ही वर मस्त मुव्ही लागला होता..थ्री इडियट्स.. त्याच्या तोंडातून "वॉव" आले.. आणि राजस चा मूड एकदमच बदलला.. त्याने मस्त मांडी घातली आणि तो आता मुव्ही पहायच्या मूड मध्ये गेला होता. दिवस भर ऑफिस मध्ये काय झाले आणि मेन म्हणजे आभा बद्दल त्याला विसर पडला होता. खर तर राजस असा कुणाच्या विचारात त्याचा बहुमोल वेळ वाया घालवायचा नाहीच.. पण आजचा दिवस जरा जास्तीच आभामय झाला होता.
मुव्ही च्या नादात राजस ला सगळ्याचा विसर पडल आणि आता काही काळ आभा त्याच्या मनातून बाहेर गेली होती. आता राजस ला एकदा का एखाद्या गोष्टीचा विसर पडला की ती गोष्ट परत आठवत नसे..
राजस तल्लीन होऊन मुव्ही पाहत होता. "थ्री इडियट्स हा असा एक मुव्ही आहे की जो कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही..मस्त मुव्ही आहे.. एकदम रिफ्रेशिंग!!" राजस मधेच स्वतःशी बोलत होता आणि हसत देखील होता... "आपलं पण आयुष्य असच एक्सायाटिंग पाहिजे ह्या विचारांवर तो आला आणि मुव्ही संपला.. मुव्ही पाहून आणि कडक कॉफी पिऊन तो मस्त फ्रेश झाला होता. तो स्वयपाक घरात काही खायला आहे का ते पाहायला गेला.. पण आई ने तर काहीच केले नव्हते. आणि कपाटातले डबे भरले होते ते सगळ्या त्याला न आवडणाऱ्या पदार्थांनी... राजस ने तोंड वाकड केल.. आणि काहीतरी विचार केला. आणि बाहेर येऊन मोबाईल वर त्याच्या मित्राला अमेय ला फोन लावला,
"हे अमेय.."
"अरे वा साहेब.. आज झाली का आठवण? मी मध्ये फोन केला होता तो तू घेतला नाहीस आणि उलटा फोन पण नाही केलास.."
"हो रे सॉरी! मी नेमका कामात होतो आणि नंतर राहून गेल.."
"चलता हे यार!! बोल का केलास आत्ता फोन.." हसत अमेय बोलला..
"वेळ आहे आत्ता? भेटतोस का?" राजस बोलला. आणि त्याच बोलण ऐकून अमेय जरा वेळ शांत झाला.. आणि मग मात्र तो बोलायला लागला,
"चलेगा.. कुठे सांग!!"
"अरे ग्रेट!! थँक्यू.. आत्ता घरी आई नाहीये आणि मला जाम भूक लागलीये सो..."
"ओह... मग डिनर ला जायचं?"
"येस येस... डिनर ला जाऊ!! आणि माझी गरज सो माझी ट्रीट बर का.. तुला काहीही खड्डा नाही पडणार.. "
"बस क्या राजस.. आपल्यात पैसे कुठून आणलेस रे? मी कधी बोलतो का पैश्याबद्दल??" थोडा वैतागून अमेय बोलला.. त्याचे बोलणे ऐकून राजस जरा ओशाळला..
"सॉरी सॉरी! पण उगाच तुला खड्ड्यात का पाडायचं ह्या विचारने बोललो.. सो भेटू आपल्या नेहमीच्या जागेवर.."
"येस.. येतो.. आणि आता बघच! आणणारच नाहीये आज माझं पाकीट.. आणि पोट फुटेपर्यंत खाणार.. मग बघू पुढच्या वेळी बघू हे बोलायची हिम्मत करतोस का?" थोडासा चिडूनच अमेय बोलला आणि मनात सुद्धा बोलला, "आता काही खैर नाही बघ राजस तुझी.. आज स्वतःला जास्ती शहाणा समजलास ना.. भेट आणि बघ!!"
अमेय चे बलाने ऐकून राजस ला हसूच आलं पण आपण हसलो तर अमेय बुकलून काढेल ह्याची त्याला जाणीव होती.. सो त्याने हसू कंट्रोल केले आणि फक्त "ओके" म्हणून त्याने फोन बंद केला आणि लगेच आईला सुद्धा फोन लावला,
"आई.. कधी येताय?
"राजस.. मी तुला आत्ताच फोन करणार होते, आम्हाला उशीर होतोय.. घरी खाण्यासाठी काहीच नाही केलंय मी सो तू काहीतरी ऑर्डर कर.. किंवा आज बाहेर जाऊन खाशील?"
"हो हो.. मी तेच सांगायला फोन केलाय!! घरी काहीच नाहीये खायला.. सो मी अमेय बरोबर बाहेर जातोय.. बाहेरच जेवून येईन सो माझी वाट पाहू नका.."
"बर झालं अमेय आहे.. तो आहे म्हणून आम्हाला टेन्शन नाही! तो नेहमीच असतो तुझ्या आस पास.. करा दोघ मजा! आणि अमेय ला निरोप दे की मला सुद्धा काहीधीतरी भेटायला येत जा..आधी फोन करायचा पण आता फोन करायला पण वेळ होत नाही त्याला.. त्याला सांग मी आणि बाबा दोघे चिडलो आहोत!!"
"हो हो आई... झापतोच त्याला.. पण फार झापणे जमणार नाही कारण आज अमेय साहेब चिडलेत.."
"काय केलं राजस? अमेय उगाच चिडत नाही.. मी त्याला तुझ्यापेक्षा जास्ती चांगली ओळखती.. तू फिरवल असशील त्याच डोकं.. हो न?" आई च बोलण ऐकून राजस ला हसूच आलं..
"माहितीये.. तुला अमेय जास्ती आवडतो..माझ्याही पेक्षा!! आणि काय झालं ते सांगतो नंतर.. तुम्ही करा तुमच काम आणि मी मनावतो अमेय ला.. आणि हो, तुझा निरोप सागतो!! आता बाय.."
राजस ने लगेचच फोन बंद केला आणि आवरायला लागला.. अमेय चिडलाय त्यामुळे त्याला शांत करण्यासाठी काहीतरी आयडिया करायचं राजस ने ठरवलं.. आणि त्याने समोरचे कपाट उघडले..
क्रमशः..