महती शक्तीपिठांची भाग ८
३९)जनस्थान- भ्रामरी शक्तीपीठ
महाराष्ट्रातील नाशिक येथे जनस्थान येथे आईची हनुवटी पडली होती .
हे शक्तीपीठ नासिकच्या पंचवटी मध्ये आहे .
इथे आईचे रूप “ भ्रामरी” असुन शिवशंकर ‘विकृताक्ष”रुपात विराजमान आहेत .
या मंदिराला शिखर नाही .
सिंहासनावर नव-दुर्गांच्या मूर्ति असुन मध्यभागी भद्रकालीची मूर्ति आहे .
४०)रत्नावली – कुमारी शक्तीपीठ
बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील खानकुल-कृष्णानगर रोडवर आईचा उजवा खांदा पडला.
हे रत्नावली शक्तीपीठ हे हिंदूंचे एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे.
पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी जिल्ह्यात खानकुल-कृष्णनगर रत्नाकर नदीच्या काठावर एक मंदिर आहे.
ज्याला रत्नावली शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.
सर्व उत्सव रत्नावली शक्तीपीठात साजरे करतात, विशेषत: नवरात्रोत्सवात दुर्गापूजा आणि विशेष पूजेचे आयोजन केले जाते.
या सणांच्या वेळी, काही लोक देवाच्या उपासनेचा आदर आणि समर्पण म्हणून व्रत करतात.
सणाच्या दिवसात हे मंदिर फुले व दिवे यांनी सजलेले असते .
मंदिराचे आध्यात्मिक वातावरण भाविकांच्या अंतःकरणात आणि शांती निर्माण करते .
इथे आईचे रूप “कुमारी “ असुन सोबत शिवशंकर “शिवा “रुपात विराजमान आहेत .
४१)मिथीला- उमा (महादेवी) शक्तीपीठ
भारत-नेपाळ सीमेवर जनकपूर रेल्वे स्थानकाजवळ मिथिला येथे आईचा डावा खांदा पडला.
मिथीला शक्तीपीठ हे हिंदूंचे एक धार्मिक स्थळ आहे.
असे मानले जाते की मिथिला शक्तीपीठाच्या अचूक स्थानाबद्दल अद्याप मतभेद आहे, म्हणजेच योग्य स्थानाबद्दल बरेच मतांतर आहे.
मिथिला शक्तीपीठ या उल्लेखाची तीन मुख्य ठिकाणची मंदिरे मानली जाते.
प्रथम स्थान नेपाळमध्ये असल्याचे मानले जाते, जे जनकपूपासून १५ कि.मी. पूर्वेला मधुबनीच्या उंच ठिकाणी 'वनदुर्ग मंदिर' आहे.
दुसरे स्थान म्हणजे भारताच्या बिहार राज्यातील 'जयमंगला देवी मंदिर', समस्तीपूरपासून जवळ असलेले आणि सलोना रेल्वे स्थानकापासून नऊ किलोमीटर अंतरावर.
तिसरे स्थान हे बिहार राज्यातील सहरसा स्टेशन जवळील 'उग्रतारा मंदिर' आहे.
मिथिला शक्तीपीठ भारत आणि नेपाळच्या सीमेवर दरभंगा येथे आहे असे मानले जाते.
इतर ठिकाणांपेक्षा हे स्थान अधिक लोकप्रिय मानले जाते.
या मंदिरात उमा आणि भगवान महोदर देवीची मूर्ती स्थापित आहे.
या मंदिरात आईचे रूप ‘उमा’ किंवा ‘महादेवी’ म्हणून आहे सोबत शिवशंकर ‘महोदर’ रुपात विराजमान आहेत .
४२) नलहाटी – कालिका( तारापीठ )शक्तीपीठ
नलहाटी जंक्शन पासून शक्तीपीठ १.८ किलोमीटर अंतरावर आहे .
इथे आईच्या पायाची हाडे पडली.
असे म्हटले जाते की, मंदिराच्या मूळ मूर्तीच्या खाली आईचा 'खोडा' आणि घसा आहे. ज्यामध्ये कोणतेही पाणी ओतले जात नाही किंवा पाणी सुकत नाही
नलहाटी शक्तीपीठ हे हिंदूंचे एक पवित्र ठिकाण आहे, जे पश्चिम बंगालच्या (कोलकाता) राज्यातील बीरभुल जिल्ह्यातील रामपूरहाट येथे आहे.
हे मंदिर माँ नालतेश्वरी म्हणूनही ओळखले जाते.
नलहाटी शक्तीपीठाभोवतीचा परिसर डोंगर आणि सुंदर जंगलाने वेढलेला आहे.
असे मानले जाते की २२२ वे बंगाली वर्ष किंवा ‘बोंगापाटो’, या शक्तिपीठाच्या अस्तित्वाबद्दल स्वप्न पाहणारे ‘कामदेव’ (या हिंदू कामदेव), या सखोल जंगलात माता सतीची ‘उटर नाली’ शोधत आहेत.
हे मंदिर सकाळी ५.३० वाजता उघडते आणि रात्री ८.३० वाजता बंद होते .
सर्व उत्सव नल्हाटी शक्तीपीठात साजरे करतात, विशेषत: नवरात्रोत्सवात दुर्गापूजा आणि विशेष पूजेचे आयोजन केले जाते.
या सणांच्या वेळी, काही लोक देवाच्या उपासनेचा आदर आणि समर्पण म्हणून व्रत करतात.
सणाच्या दिवसात हे मंदिर फुले व दिवे यांनी सजलेले असते .
मंदिराच्या आध्यात्मिक वातावरणात भाविकांच्या अंतःकरणात शांती राहते.
भेट देण्याची उत्तम वेळ ऑगस्ट ते मार्च दरम्यान आणि दुर्गापूजा आणि नवरात्र उत्सव दरम्यान असते .
अप्रतिम निसर्गाचे दर्शन पण याच काळात होते .
इथे आईचे रूप “कालिका “ असुन सोबत शिवशंकर “योगेश “रुपात विराजमान आहेत .
४३) .वक्रेश्वर- महिषमर्दिनी शक्तीपीठ
पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्याच्या दुबराजपुर स्टेशन पासुन सात किमी दूर वक्रेश्वर मध्ये पापहर नदीच्या तटावर आईचे भ्रूमध्य (मन:) पडले .
इथे आई चे रूप “महिषमर्दिनी” आहे सोबत शिवशंकर “वक्रनाथ “रुपात विराजमान आहेत .
४४)कर्नाट जयदुर्ग शक्तीपीठ
कर्नाट शक्तीपीठ हिमाचल प्रदेशच्या कांग्रा येथे आहे.
सती आईचे दोन्ही कान इथे पडले.
येथे आईचे रूप “जयदुर्गा” असुन सोबत शिवशंकर “अभीरू” रुपात विराजमान आहेत .
हिमाचल प्रदेशातील धर्मशाला हे याच्या सर्वात जवळचे विमानतळ आहे.
कर्नाट शक्तिपीठ विषयी फारशी माहिती नाही पण बरेचसे विद्वान् याला कांगड़ा, हिमाचल प्रदेशमध्ये आहे असे मानतात .
४५)यशोर - यशोश्वरी शक्तीपीठ
बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील ईश्वरीपुरातील यशोर येथे सती आईचा हात आणि पाय (पाणिपद्म) पडला होता .
ईश्वरपूर हे शक्तीपीठ सध्याच्या बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील जेसोर नावाच्या शहरात आहे.
येथे आईचे रूप 'यशोरेश्वरी' आहे सोबत शिवशंकर 'चंड' रुपात विराजमान आहेत.
४६)अटाहास – फुल्लरा शक्तीपीठ
आईचे ओठ पश्चिम बंगल्याच्या अटाहास ठिकाणी पडले .
लाभपुर स्टेशन, बीरभूम जिल्हा इथे हे ठिकाण आहे .
हे कोलकत्तापासून जवळच आहे .
इथे आईचे रूप “फुल्लरा “ असुन सोबत शिवशंकर “विश्वेश “ रुपात विराजमान आहेत .
४७) नंदीपूर – नंदिनी शक्तीपीठ
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात हे शक्तीपीठ आहे .
पश्चिम बंगालच्या 'बोलपूर' (शांती निकेतन) पासून 33 कि.मी. सांठिया रेल्वे जंक्शनपासून दूर, अग्निशोक, रेल्वे लाईनजवळ थोड्या अंतरावर चार भिंतीच्या आत एक वटवृक्ष असुन तेथेच देवीचे मंदिर आहे.
या वट वृक्षाजवळ आईच्या गळ्यातील “कंठहार” पडला .
इथे आईचे रूप 'नंदिनी' आणि सोबत शिवशंकर 'नंदिकेश्वर' रूपात विराजमान आहेत.
४८)लंका – इंद्राक्षी शक्तीपीठ
श्रीलंकेत ट्रिंकोमालीमध्ये आईच्या पायातील पैंजण पडले .
हे शक्तीपीठ श्रीलंकेच्या जाफनापासून नल्लूर येथे 35 कि.मी. अंतरावर नैनातिव्हि (मनिपल्लम) येथे आहे.
त्रिंकोमाली मधील त्रीकोणेश्वर मंदिराजवळ आहे .
हे मंदिर पूर्वी पोर्तुगाल बॉम्बस्फोटात ऊध्वस्त झाले होते .
रावण (श्रीलंकेचा राजा ) आणि भगवान राम यांनीही येथे पूजा केली.
इथे आईचे रूप “इंद्राक्षी “असुन सोबत शिवशंकर “राक्षसेश्वर “रुपात विराजमान आहेत .
क्रमशः