Julale premache naate - 78 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते-भाग-७८।।

Featured Books
  • నిరుపమ - 7

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 20

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • మనసిచ్చి చూడు - 6

                         మనసిచ్చి చూడు -06అప్పుడే సడన్గా కరెంట్...

  • నిరుపమ - 6

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 19

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते-भाग-७८।।

सकाळी लवकरचं मला जाग आली. आणि का नाही येणार. जर तुम्हाला माहीत असेल की तुमचा आवडता व्यक्ती तुमच्यासोबत एकाच घरात आहे. हा, आता जवळ नाही. पण एकाच छताखाली..... मग कसली झोप आणि कसलं काय..!!

माझं ही अगदी तसचं झालं होतं. निशांत इकडे असल्याने मला आज लवकरच जाग आली. आणि ती देखील आईच्या हाकेशिवाय... असो. "होता है कभी कभी।।....."

लवकर उठुन मस्त काही तर बनवेल अस ठरवुन बाहेर आले खरं... पण मी लेट होते किचनमध्ये पोहोचायला... कारण आई आज लवकरच उठली होती आणि तिने सगळा नाश्ता ही तय्यार केला होता. ते बघून माझा थोडा हिडमुस झालेला. मग आईनेच मला निशांतला उठवायला पाठवलं तसा माझा चेहरा गुलाबाच्या कळी सारखा खुलला..

मी हसतच त्याच्या रूमजवळ गेले.. दार ढकलला तर दार उघडच होत. पक्का रात्री विसरला असेल. आत पाहिल तर हिरो बेडवर मस्त लोळत पडले होते..

बनियान वर असल्याने त्याचे मसल्स दिसतं होते. चेहऱ्यावर आलेले केस उगाचंच त्याची झोपमोड करण्याच्या प्रयत्नांत होते. मी जाऊन खिडकी उघडली तशी कोवळी सोनेरी किरण जाऊन त्याच्या चेहऱ्यावर जाऊन विसावली...

कितीतरी वेळ मी त्याचा तो चेहरा बघत होते.. तसा तो हलका उठण्याच्या प्रयत्नात दिसला. आणि मी त्याच्या समोर जाऊन उभी राहिले... त्याने डोळे उघडले आणि मी जोरात गुड मॉर्निंग विश केलं...

"गुड मॉर्निंग...." माझ्या हसऱ्या आणि प्रसन्न चेहऱ्याला बघत त्याने ही मला विश केलं.

"गुड मॉर्निंग हनी-बी.."

"चला आता पटकन फ्रेश हो. आपल्याला नाश्ता करून लगेच निघायचं आहे." मी त्याला सुचना दिल्या व मी किचनमध्ये आईला मदत करायला गेले.

काहीवेळाने आम्ही सगळेच डायनींग टेबलवर बसलो होतो. नाश्ता करत. निशांतचे आवडीचे आईच्या हातचे कांदेपोहे होते.

"वाह!! मस्त झाले आहेत पोहे.. आई काही बोला तुमच्या पोह्यांसारखे पोहे कुठेच मिळु शकत नाही.." निशांत च्या वाक्यावर आई लाजली...

"काही असत हा निशांत तुझं...." एवढं बोलुन आई किचनमध्ये गेली चहा घ्यायला.

"मग काय झाली की नाही पॅकिंग..??" बाबा कांदेपोहे खात विचारते झाले..

"हो बाबा.. माझी तर झाली. याची आणि आई ची नाही माहीत.." मी शांतपणे बोलले तस आतून आईचा आवाज आला.

"हो हो आमची देखील झाली हा पॅकिंग.." आईचा आवाज येताच मी माझ्या तोंडावर हात धरला.. आणि हसु लागले.. खरतर आईच्या आलेल्या रिअकॅशनवर आम्ही सगळेच हसु लागलो.

मग आम्ही सगळेच भरभर आवरून जायची तय्यारी करण्यात बिजी झालो.. यादरम्यान मी आणि निशांतने राजला कॉल करूम विश ही केलं..

त्यानंतर आवरून आम्ही चौघे निघालो... आम्हाला निघायला दुपारचे बारा वाजले.. बाबांनी गाडी काढली.. बाबा गाडी चालवणार होते तर कंटाळा आलाय तर निशांत. अस त्यांनी त्यांचं ठरवलं होतं. मी आणि आई मस्त मागे झोपा काढणार होतो..

देवाचं नाव घेऊन निघालो आम्ही आमच्या प्रवासाला....
हिवाळ्याचे दिवस असल्याने गर्मी जाणवत नव्हती. आणि त्यात गाडीमध्ये एसी म्हटल्यावर कसली गर्मी आणि कसलं काय...!

गाडीमध्ये गाणी लागली होती... मग काय बाबाही गायला लागले. हा आता ते काही सिंगर नव्हते.. पण कॉलेज मध्ये गायचे.. आणि त्यामुळेच आईचं त्यांच्यावर प्रेम जडलं अस आम्हाला कळलं.. मग काय आईला चिडवण्याचा मौकाच हाती लागला होता.. थोडं चिडवत, हसने, फुगने, लाजवत आम्ही प्रवास करत होतो..

बर्यापैकी आम्ही अंतर कापलं होत.. शहऱ्याच्या वस्तीपासून दुर आलो.. गावं बघुन मला माझ्या गावाची आठवण झाली.. अचानक आठवले ते आजोबा.. थोडी अस्वस्थ झाले म्हणून सीटला टेकुन डोळे बंद केले..

"हनी-बी...! काय ग झोपा काढतेस चल लवकर..." निशांत हाक मारून उठवत होता.. त्याचा पुढे आलेला हात बघुन मी देखील माझा हात त्याच्या हातात देणारच होते की....,, तो दुर होत हवेत विरून जावा अस वाटलं आणि मी डोळे उघडले... ते स्वप्न होत. नशीब ते स्वप्न होतं ते...

समोर पाहिलं तर निशांत गाडी चालवत होता आणि बाबा त्याच्याशी गप्पा मारत होते.. त्याने समोरच्या काचेतून डोळ्यांनीच मला ईशारा करून "ठीक आहेस ना..?" विचारलं.... मी देखील नजरेने उत्तर देऊ केलं..

काही वेळ थांबायचं ठरवुन आम्ही सगळे एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलो.. ढाबा बघताच भुकेची जाणीव आम्हा सर्वांना झाली...
एका टेबलावर आम्ही बसलो आणि ऑर्डर दिल्या.. साधचं जेवून आम्ही पुन्हा प्रवासाला लागलो..



To be continued...