bhakt bhagwant charitra in Marathi Spiritual Stories by Archana Rahul Mate Patil books and stories PDF | भक्त भगवंत चरित्र

Featured Books
Categories
Share

भक्त भगवंत चरित्र

🌹श्री कृष्ण: शरणम् मम:🌹

महाराष्ट्र ही संताची जन्मभूमी मानली जाते..याच भूमी ला अनेक संतांनी आपली कर्मभूमी म्हंटले आहे 😊. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्दैवत भक्तवत्सल श्री विठ्ठल.. ❣️साक्षात परमेश्वरच वास्तव्य असलेलं भु वैकुंठ पंढरपूर ...🤗

संत श्रेष्ठ श्री ्ञानेश्वर संत नामदेव ,संत तुकाराम,संत चोखामेळा , निवृती महाराज, सोपान महाराज,संत मुक्ताबाई, संत जनाबाई, सावता महाराज, नरहरी सोनार ई...अश्या अनेक संतांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे..

😊 संतांच्या जीवनात अनेक संकटे येतात.. पण ते भाव भक्तीने प्रत्येक संकटाना सामोरे जातात🧘, असेच काही प्रसंग आठवणीत राहतात..संत रुपी गंगेत स्नान केले तर आपण आपोआपच शुद्ध होतो...नाही का?...

स्वतः भगवंतांनी आपल्या भक्ताच्या भेटीसाठी ..संत रामा सुगंधी उद्धारासाठी रचलेली ही एक लिळा...मुक्ताबाई चरित्र मधील पांडुरंगाच्या मूर्तीला महारोग झालेला हा दृष्टांत .,...

एकदा भगवंत विठ्ठलाच्या नाभीतून घाण पाणी येऊ लागले.. तेव्हा भगवंताने प्रल्हाद शास्त्री बाबा पुजाऱ्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला..🤗 तुम्ही पंचामृताने स्नान घातले, अभिषेक केला, सगळ्यांनी अग्निहोत्र केले ,,महापूजा केल्या ,,होम केले तरीही देवाच्या नाभीतून यायचे पाणी काही बंद झाले नाही😭

सगळे म्हणे पांडुरंगाच्या मूर्तीला महारोग जडला... यज्ञ झाले जप झाले , तप झाले,, सारे उपचार करून झाले🤦 तरीही पांडुरंगाच्या मूर्तीतून घाण पाणी यायचे काही थांबेना🙅
प्रल्हाद शास्त्रींच्या स्वप्नात येऊन भगवंतांनी सांगितले की भूवैकुंठ असलेले पंढरपुरामध्ये माझा भक्त रामा सुगांधी नावाचा भक्त आहे त्याला बोलावून आणा तोच माझा उपचार करीन...😇
सकाळी प्रल्हाद शास्त्रींनी सगळ्या ब्राह्मनाना जमा करून त्यांचे विचार जाणून घेतले..🧐🧐

ब्राह्मण म्हणाले,; कोण आहे हा राम सुगंधी ?कुठे राहतो ?हा आपल्याला माहित नाही कसा..🤔. मग कुणीतरी सांगितले की रामा सुगंधी हा एक अंत्यज आहे.. 🤨गाव कूशीला राहणारे रामा सुगंधी हे वैद्य म्हणून गरजूंना मदत उपचार करत असत..🥺 लहानपापासूनच देवाची आवड असणाऱ्या रामा सुंगाधिना इतर जमातींचे असल्यामुळं कधी देवाचे दर्शन घेता आले नाही..😟😟 सतत नामस्मरण करत करत ते आपली दिनचर्या करत असत.. देवावर अप्रतिम श्रध्दा ठेवून... लोकामध्येच देव पाहणारे ते एक सामान्य व्यक्ती होते... 😊😊

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या ब्रह्मवृंद यांनी विचार केला की सोहळ्या ओवल्यातल्या ब्राह्मणांनी त्यांच्या घरी जायचं की नाही ??????😥😥 जावे तर धर्म भ्रष्ट न जावे तर देवाचा निरोप 🤔🤔
इथपासून विचारांचा मतभेद चालू झाला😟

पण देवांच्या आज्ञा कशी मोडणार...देवाचा निरोप तर सांगावाच लागेल न.👏👏 शास्त्री ने सांगितलं की माझा सगळ्यांनी निषेध केला तरी चालेल पण मला रामा सुगंधी ला बोलवावेच लागेल.. 🙃🙃जो काळ स्पृश्य-अस्पृश्य याचा होता😥 ज्याकाळात स्पृश्य-अस्पृश्यता हा मतभेद मानला जात होता😟😟 त्याकाळात रामा सुगंधी यांचा शोध घेत घेत त्यांच्या घरी जाणे म्हणजे एक मोठी समस्या😔😔

प्रल्हाद शास्त्री बाबा गाव कुशी ला गेले आणि विचारलं की इथे रामा सुगंधी महाराजांचे घर कुठे आहे.. हेच घर का🤔असे ऐकल्यावर रामा सुगंधी बाहेर आले आणि भगवान श्री पांडुरंगाची महापूजा करणारे शास्त्री बाबा "जर माझ्या घरी आले असतील तर साक्षात श्री विठ्ठल पांडुरंगाचे माझ्या घरात आगमन झाले ""
ब्राह्मण देव जर घरी आले तर ते देवाच्या रुपाने आले अशी त्यांची धारणा..😌
शास्त्री बाबांच्या पायाखालची माती घेऊन रामा सुगंधी नि ती आपल्या मस्तकाला लावली..कपाळाला लावली अंगाला चोळू लागले 😌😌..साक्षात परब्रह्म श्री पांडुरंगाने आज माझा उद्धार केला असे म्हणून तो आनंदाने रडू लागले.

.शास्त्री बाबा तुम्ही येण्याचा का त्रास घेतला ??का तसदी घेतली?? तुम्ही मला निरोप पाठवला असता तर मी धावत पळत आपल्या दर्शनास आलो असतो..😥 सांगा ना आपण का आणि कशासाठी आला आहात.. 😟तेव्हा शास्त्री बाबा म्हणाले रामा सुगंधी तूच ना.!
... हो बाबा; पण तुम्ही मला आवाज दिला असता तरी मी पळत आलो असतो.🏃. प्रल्हाद शास्त्री म्हणाले अरे रामा सुगंधी मला देवाने स्वप्नात येऊन साक्षात्कार दिला रे .,😌..की देवाच्या नाभीतून जे खराब पाणी वाहत आहे त्याचा उपचार फक्त रामा सुगंधिच करू शकेल..पांडुरंगाच्या मूर्तीतून देवाच्या नाभीतून चे घाण पाणी वाहते ना त्याचा उपचार करण्यासाठी देवाने तुला बोलवायला सांगितले आहे रे म्हणून मी तुझ्या दारी एक याचक म्हणून आलो आहे. 🙍असे ऐकता रामा सुगंधी च्या अंगावर रोमांच उठले ते विठ्ठल विठ्ठल असे म्हणू लागले
..
माझ्या पांडुरंगाने मला बोलावले आहे ना ..🤗ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला मी लहानपणापासून पंढरपूर मध्ये असून देखील कळ वळलो आहे😥 कधी त्यांच्या दर्शनास जाता आले नाही त्या पांडुरंग विठ्ठलाचे मला आज दर्शन घेता येणार आहे 😇ज्या मंदिराची मी आज पर्यंत पायरी देखील पाहिली नाही किंवा मी पायरीचे दर्शन देखील घेऊ शकलो नाही😔..रामा सुगंध तिच्या आनंदाला उधाण आलं 😄😊त्यांच्या डोळ्यांच्या अश्रूंनी देखील वाट मोकळी केली ते चंद्रभागेला येऊन मिळाल 🙃..रामा सुगंधी म्हणाले; शास्त्री बाबा मी देवाच्या मूर्तीवर उपचार करण्यासाठी औषध घेऊन येत आहे.. ☺️असे म्हणता शास्त्री पुढे निघून गेले आणि सगळे ब्राह्मण वृंद विठ्ठलाच्या महाद्वारात रामा सुगंधी ची येण्याची वाट बघु लागले..🧐

राम सुगंधी नी हातात काही औषधे घेतली.. महाद्वारी गेले आणि नामदेव पायरी ला आपल्या अश्रूंनी स्नान घातले 😭😭नामदेव पायरीचे दर्शन घेतले. 🧘विठोबाच्या पायरीवर पाय ठेवला आणि डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या 😔😔माझ्या विठुरायाला मी आज पाहणार आहे... 🤗भगवंताचे दर्शन होणार...😊

रामा सुगंधी महाराज धावत पळत पांडुरंगाच्या चरणाला कडकडून मिठी मारतात.. ,🤗आक्रोश करत आलिंगन देतात.🤗. देवाचे श्रीमुख पाहून अत्यानंदाने😊😊 देवाच्या नामाचा जयघोष करत करत हातातील औषधी घेतात न पांडुरंगाच्या मूर्तीच्या नाभित भरतात....😌आणि काय आश्चर्य 😲😲.. मूर्तीच्या नाभितून येणारे खराब पाणी तत्क्षणी बाहेर यायचे बंद झालं.😲🥺..

असे पाहता सगळ्या ब्रह्म वृंदा नी हात जोडले..👏👏 म्हणाले देवा,, रामा सुगंधी महाराज तुम्ही असे कोणते 🤔उपचार पद्धती🧐🧐 वापरली की भगवंताच्या मूर्तीच्या नाभितुन येणारे पाणी थांबल....😟

रामा सुंगधी हात जोडत म्हणाले...,👏👏


💞*****अती प्रिय तुळसी बुक्का*****❣️
❣️तैसे पावे भोळ्या भाविका,❣️
❣️तुझ चरण पादुका❣️
❣️शिरी मस्तक वंदितासे*****💞


❣️❣️भगवंताला सगळ्यात अतिप्रिय तुळशी न बुक्का आहेत..😌 त्ाव्यतिरिक्त देवाला काहीही नको..😊 म्हणुनच मी तुळसी न बुक्याच्या लेप भगवंताला माझ्या भक्ति भावसहित लावले आहे.😊..❣️❣️

मी करणारा कोण??? करणारा आणि करवून घेणारा परब्रम्ह परमेश्वर तर हाच आहे.. 🤗आज माझ्या जन्माचे सार्थक झालं,😊


क्रमशः
(टिपः हा एक मुक्ताबाई चरित्रग्रंथामधील 1 भक्त प्रसंग आहे.. असे दृष्टांत अनेक आहेत..यापुढे वेगवेगळ्या संतांच्या कथा टाकणार आहे..त्या आपण कधीतरी एकलेल्याच असतील..😊 सत्य घटना वर आधारित असून काल्पनिक नाही हे...🙃 तरी काही चूक उणीव असल्यास हक्काने कळवा; खरंच 😊 तुमच्या आमच्या मधील 💞archu 💞)