तुझाच मी अन माझीच तू...भाग १०
आभा चे बोलणे ऐकून आईला हसूच आले. आभा तशी लहानपणापासूनच भांडखोर आणि स्वतःच्या मत बद्दल ठाम होती. आभा मध्ये काहीच बदल झालेला नव्हता. आईने आभा ला छोटा फटका मारला,
"काय ग भांडत असतेस सारखी... आता काय लहान आहेस का सारखी भांडण करायला?"
"आई... यु नो, मी माझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगत आलीये.. कोणाची अरेरावी किंवा गळेपडूपना का सहन करू ग.. तुम्हीच तर बनवलं मला इंडिपेंडन्ट..." चहा चा घोट घेत आभा बोलली..
"हो हो.. माहितीये पण सारखी भांडू नकोस ग आभा.. मैत्री कर लोकांशी... मग तेच मित्र आपल्या बरोबर राहतात जन्मभर.."
"हो ग आई... आय नो.. पण काहींही कसं घेऊ ऐकून.." आभा ने आईला प्रश्न केला.. "आणि मैत्रीची म्हणशील तर यु नो माय थॉट्स.. टाईमपास मैत्री पुरे.. म्हणजे मला नकोय टाईमपास मैत्री.. आधीपासून मी चूझी आहे मित्रांच्या बाबतीत...पण चुकला होता एकदा निर्णय!! किती त्रास झाल होता तेव्हा..सो आता ह्यापुढे उगाच बळजुबरीने केलेली मैत्री नकोय.. अशी मैत्री काय कामाची ना.." आभा चा आवाज थोडा बदलला होता.. ते आईने हेरले..
"आभा नको होऊस ग उदास... ठीके... झालं ते विसरून जा.." आई आभा ला समजावत बोलली.. त्यावेळी तिने आभा च्या केसावरून हात फिरवला..
"आय अॅम गुड आई..इट्स ओके.. विसरू कशी? मैत्रीतला विश्वासघात विसायचा नसतो.. बर झाला मी म्हणते गिरीश माझ्या आयुष्यात मित्र म्हणून आला होता.. मित्र असेही असू शकतात हे मला माहिती नव्हते.. इतकी स्वार्थी मैत्री मी कधीही पहिली नव्हती.. पण असो, त्यानी मला उत्तम शिकवण दिली. काय चूक करायची नाही हे शिकवून गेला गिरीश!! सो नो बॅड थॉट्स फॉर हिम.." आभा चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न करत बोलली..
"ते सोड आभा.. तू ऑफिस मधली मजा सांगत होतीस ना.. उगाच भूतकाळात कशाला गेलीस?"
"येस आई..." आभा चा मूड परत नॉर्मल झाला.. आणि ती बोलायला लागली, "ऐक न आई, ऑफिस इतक भारी आहे!! एकदम पॉश.. आणि पॉझीटीव्ह वाटलं एकदम!! काम करतांना मजा येणारे..." आभा एकदम खुलून बोलली..आई तिच बोलण शांतपणे ऐकत होती. आणि आभाची खुललेली काळी पाहून आई सुद्धा खुश झाली..
"मस्त आभा.. शेवटी तुझ्या कष्टांच चीज झालं म्हणायचं.. खूप अभ्यास केलास आणि प्रत्येक पायरीवर तुला यश मिळत गेल...आता अशीच प्रगती करत राहा..छोट्या छोट्या गोष्टींनी ऑफ नाही व्हायचं आता.. " आईने आभा च्या डोक्यावरून हात फिरवला... आणि ती बोलली..
"येस ग मम्मी... तू आणि बाबा मला फार आवडता. मी उत्तम शिक्षण घ्याव म्हणून तुम्ही मला किती पुश केल... म्हणजे मी आज जी आहे ती तुमच्या दोघांमुळे. आय लव्ह यु आई...पण आय लव्ह बाबा मोअर ग.. तू धाक लावतेस आणि ते लाड करतात.." आभा हसली आणि तिने पटकन आईला मिठी मारली...
"हो का.. बाबा जास्ती आवडतात..." आई हसली, "काही हरकत नाही.. आमच पिलू आता स्वतःच्या पायावर उभ राहणार.. अजून काय हव असत आई बापाला? आणि मग तस ठरलंच होत आमच..दोघांपैकी एक कडक आणि दुसरा लाड करणार.. नाहीतर प्रगती कशी होईल ना आमच्या पिल्लू ची.. शिस्त लागली पाहिजेच पण आपण एकटे नाही हे सुद्धा कळल पाहिजे ना.."आई मनसोक्त हसत बोलली...
"ओह माय मम्मी... स्मार्ट आहात दोघ.. सो ओन्ली आय लव्ह यु बोथ!!! अभ्यास, काम येत ग..पण मला कुठे काय येत आई स्वयपाकघरात?"
"ते तुझ्या बाबामुळे.. मी किती वेळा प्रयत्न केला तुला सगळ शिकवायचा.. पण तुझा बाबा.. याच सारख तेच तेच.. राहू दे ग.. छोटीशीच आहे आपली आभा.. कशाला उगाच कामाला लावतेस...म्हणून तुला काहीही येत नाही..बाकी अगदी हुशार पण स्वयपाक घरात काहीही करता येत नाही.. कशी ग तू अशी?" आई लाडात येऊन आभा शी बोलत होती.. आईचे बोलणे ऐकून आभा जरा शांत झाली. तिने थोडा विचार केला आणि ती आई शी बोलायला लागली,
"ए आई, मला शिकवशील का ग भरलं वांग्याची भाजी?" आभा ने आईला अनपेक्षित प्रश्न केला.. आभा च्या त्या प्रश्नाने आई जरा बावचळून गेली.. आपण काहीतरी चुकीचे ऐकले असं तिला वाटून गेले..नी आईने आभा ला प्रश्न केला,
"मी काहीतरी चुकीच ऐकल ग आभा.. मला असं वाटतंय की मला चित्र विचित्र काही ऐकू यायला लागलाय हल्ली.."
"काहीतरी बडबडू नकोस ग आई.."
"मग मी जे ऐकल रे बरोबर होतं?" आईने भुवया उंचावत प्रश्न केला.. आणि मग मात्र आभा ची आई जोरात हसायला लागली...
"काय ग आई.. असं काय करतेस ग.. मी स्वयपाक घरात काहीच करत नाही म्हणून ओरडत असतेस आणि आज म्हणाले मला भरलं वांग शिकवशील का तर हसतीयेस काय ग?" आभा खट्टू होऊन बोलली.
"सॉरी सॉरी!! मला माहितीये की तुला स्वयपाकाची अजिबातच आवड नाहीये. आणि ठीके.. असं थोडी असत की मुलींना स्वयपाक यायलाच पाहिजे? आम्ही तसा अट्टाहास कधीच केला नाही.. पण आज एकदमच काय स्वयपाकाच खूळ? एकदमच काय वाटल की तुला स्वयपाक घरात वेळ घालवावासा वाटायला लागला? सो हसू आला ग आभा..."
"असच ग आई.."
"ओह..असच!! की कोणी आवडलाय पहिल्याच ऑफिस च्या दिवशी? त्याला खुश करायला वांग्याचं भरीत बिरीत?" आईने हळूच डोळा मारता आभा ला प्रश्न केला..
"आई.. तुझ काहीतरीच असत ग आई.. आज पहिला दिवस होता कामाचा.. अजून कोणाशी जास्ती ओळखी पण नाही झाल्यात आणि आवडेल कसं कोणी? तुझ आपलं काहीतरीच असत ग आई.."
"आमचा विश्वास आहे बाई.. लव्ह अॅट फर्स्ट साईट वर.. तुझा बाबा आणि मी पण असेच पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो.. तेव्हा काही माहिती पण नव्हते.. पण आपलेपणाची जाणीव झाली ती पहिल्याच भेटीत... आणि मग काही दिवसातच दोघांनी एकमेकांना विचारलं आणि आमची लव्ह स्टोरी खऱ्या अर्थाने सुरु झाली.. आणि तू आमचीच मुलगी आहेस.. सो तुझ्याही बाबतीत असच होऊ शकत बर का आभा!!" आई पुन्हा हसली..पण तिचे बोलणे ऐकून आभा ने कपाळावर हात मारून घेतला..
"नो नो..असं कोणीच नाही भेटलाय अजून.. मी तुला सांगितलं की मगाशी.. पहिल्याच दिवशी भांडण झालाय.. आणि यु नो.. आता मी ताक सुद्धा फुंकून पिणारे.. सो बाकी विचार करू नकोस!! कधी शिकवणार सांग मला भरलं वांग?" आभा चे बोलणे ऐकून आई फक्त हसली... तिला उगाचच पण असं वाटून गेलं की आभा ला भरलं वांग शिकायचं आहे ते राजस साठी..पण आई आपल्या मुलीला नीट ओळखत होती.. सो तिने ते बोलणे टाळले.. पण आई काहीतरी विचार करायला लागली.. आई विचार करतीये हे जाणवून आभा ने तिला प्रश्न केला,
"सांग ना ग आई.. कधी शिकवणार भरलं वांग.. आणि काय विचार करतीयेस?"
"मी हा विचार करतीये की स्वयपाक घरात बाकी काहीच माहिती नाही..काहीच येत नाही आणि उडी डायरेक्ट भरल्या वांग्यावर? कसं जमणार ह्याचा विचार कात होते."
"थोडी मोघम माहिती आहे की मला... आणि जमेल जमेल.. तुझ्या सारखी टीचर असेल तर नक्की जमेल.." आभा आईला बिलगत बोलली..
"ओह...मस्का पॉलिश... फारच मनावर घेतलेले दिसतंय आमच्या पिल्लुने स्वयपाकाचे..."
"हो मम्मे..शिकव प्लीज!!"
"डन.. ह्या शनिवारी शिकवते तुला.. अजून काही शिकायचं असेल तर त्याची पण यादी काढून ठेव आभा.."
"ओके... आणि थँक्यू थँक्यू थँक्यू आई.. आय लव्ह यु.." आभा मनोमन खुश झाली.. तिच्या मनात सुद्धा काहीतरी शिजत होते.. तिचा सुद्धा इगो दुखावला गेला होता... आणि ती राजस ला उत्तर देणार होतीच!! तिला भरलं वांग शिकायचं होतं ते राजस ला दाखवून द्यायला की ती सुद्धा उत्तम स्वयपाक करते..
क्रमशः...