Salute to our teenage - 2 in Marathi Fiction Stories by शमिका books and stories PDF | सोलाह बरस की बाली उमर को सलाम (भाग 2)

Featured Books
  • My Devil CEO - 2

    सभी नाश्ता करके अपने काम पे निकल जाते है अक्षत और जसवंत जी क...

  • Love Blossom Devil's Unwanted Wife - 1

    वीरेंद्र प्रताप सिंह , बाड़मेर के हुकुम सा , साक्षात यमराज ,...

  • क्या खूब कहा है...

    कोई ठहर नहीं जाता किसी के भी जाने से यहां कहां फुरसत है किसी...

  • शोहरत का घमंड - 109

    आलिया के आंखों के सामने अंधेरा छा जाता है और उसे कुछ भी समझ...

  • वीर साधना

    वीर  बहुत प्रकार के होते हैं।। जैसे की वीर हनुमान , वीर बेता...

Categories
Share

सोलाह बरस की बाली उमर को सलाम (भाग 2)

भाग २



अंकुशने घेतलेल्या नकळत आणि अचानक अशा किसमुळे अर्पिता थोडी भांबावलेल्या अवस्थेत थोडा वेळ तशीच रूममध्ये बसली आणि थोड्या वेळानी स्वतःच सावरून बाहेर आली.. ते दोघेही आपापल्या गाडीने एकमेकांना बाय म्हणून आपल्या आपल्या वाट्याला निघाले... गाडी चालवत असताना अर्पिताला अंकुशने तिच्या ओठांचे घेतलेले चुंबन पुन्हा पुन्हा आठवत होते, आत्तापर्यंत कधी अंकुशला गालाची किस घेऊ नव्हती दिली पण त्याने अचानक ओठांची किस घेतल्यामुळे तिला फार भीती वाटत होती... ती तशाच अवस्थेत कॉलेज ला पोहचली तिथे लेक्चर अटेंड केले, तिथून पुढं जॉबवर पोहचली, अर्पिता बँकेत इन्फॉर्मेशन सेक्शनला काम करत होती, तिथंही तिचं कामात लक्ष लागत नव्हतं.. अंकुश आज आपल्याशी असा का वागला असेल, याचाच ती विचार करत होती... आपण फसले जाऊ, उद्या आपल्याला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही आणि नको नको ते विचार तिच्या मनात आले.. आजच का अंकुश असं माझ्याशी वागला असेल, तो माझ्या बद्दल वेगळाच काही विचार तर करत नाही ना, तो मला तशी मुलगी...!!

नाही नाही... ती स्वतःचीच समजूत घालत कामात मग्न झाली.,


दुपारी लंच टाईम ला तिला अंकुशचा फोन आला...

अंकुश - हाय बेबी... ( एकदम लाडाने बोलला )

असं बोलताच अर्पिता फार भडकली...

"कोण रे बेबी, तू मला काय तसली मुलगी समजतो का ?? "अर्पिता रागात म्हणाली.

अंकुश हसत बोलला, " कसली मुलगी ?? "

अर्पिता जरा बावचळली.... "कसली नाही पण हे मला असलं बेबी वगैरे बोलायचं नाही..."

"मग काय बोलायचं? आंबा बाई...?" असं बोलून अंकुश मोठ्या मोठ्याने हसू लागला...

अर्पितालाही नकळत हसू आल...

"ठेव फोन मला कामं आहे..." अर्पिता रागात बोलली.

"अच्छा मी असाच बसलोय गोट्या खेळत, मला काही कामच नाही बघ..." अंकुश मज्जेत बोलला.

"नसेलही मला काय माहीत, ठेव फोन आणि परत फोन करू नको, मी तसली मुलगी नाही..."

अंकुश पुन्हा हसतच बोलला, "कसली मुलगी ते तर सांग..."

"ठेव फोन डोन्ट रिप्लाय..." असं बोलत अर्पिताने ताडकन फोन ठेवला..

अंकुश थोडा हसला पण त्याला प्रश्न पडला, ही आपल्याशी अशी का वागत आहे.. सकाळी तर खारी पण भरपूर खाल्ली काही भांडण ही झाली नाही तरी काय झालं हिला...

अंकुशने असाच विचार केला नि नंतर विसरून तो ही पुन्हा कामाला लागला.. अंकुश एका गाडी शोरूम मध्ये बॅक ऑफिस मध्ये काम करत होता...

अर्पिताची नकळत किस घेतल्याने ती रागात आहे याची त्याला कल्पना देखील नव्हती...

असं पाहता पाहता संध्याकाळ झाली आणि दोघांच्या ऑफिस ची सुटण्याची वेळ झाली... अर्पिताने ठरवलेलं होत की अंकुश ला बिलकुल भेटायचं नाही, सरळ घरी जायचं..

अंकुशने अर्पिताला निघताना मेसेज टाकला की 'मी निघालो आहे तू पण निघ उशीर करू नको' , पण अर्पिताने त्याला काही रिप्लाय दिला नाही...

मेसेज ला रिप्लाय न दिल्यामुळं अंकुशने तिला फोन केला आणि तिने त्याला सांगितले की मला आज लवकर घरी जायचं आहे आपण नको भेटायला...

अचानक हिला काय झालं अशी का ही टाळा टाळ करत आहे हे त्याला समजत नव्हतं..

शेवटी अंकुश लवकर निघाला आणि अर्पिता रोज ज्या रोड ने घरी येत असत त्या रोड ला तिची वाट पाहत थांबला..

अर्पिता येताच त्याने तिला अडवले आणि तिने गाडी थांबवली...

तो रस्ता थोडा दाट झाडींचा आणि तिथे फारच तुरळक लोकांची आणि गाड्यांची ये - जा असायची..

अंकुश ने गाडी थांबवलेली पाहून अर्पिताच्या मनात काहीस वेगळच आलं आणि ती आरडा ओरडा करू लागली...

"तू माझी छेड काढतो का..??" अर्पिता खट्याळ संशयाने म्हणाली..

"नाही बाळा मी का तुझी छेड काढू..? आणि तुला काय झालंय असं का वागत आहे तू माझ्याशी...??" अंकुश लाडी गोडीमध्ये येत बोलला..

"मला नाही भेटायचं तुला." त्याच्याकडे रागाने पाहत अर्पिता म्हणाली.

"का पण सकाळी तर तू चांगली होती, छान चहा खारी खाल्ली..." अंकुश असाच बोलून गेला.

"तुला तुझी खारी परत हविये का...य़ म्हणजे तू आता माझी खाल्लेली खारी काढतो का .. थांब मी तुला पैसे देते ...मला पण ना सगळ संपवायचं च आहे..." असं बोलून ती तिच्या बॅगेत हात घालू लागली.

तोच अंकुश ला फार हसू यायला लागलं... तो तिला जवळ घेत बोलला...

"मला खारी नाही... चहा खारी खाणारी गोड मुलगीच हवी आहे, बोल देती का..."

अर्पिताने त्याचा हात झिडकारला आणि म्हणाली, "खबरदार परत मला हात लावला तर... मला हात नाही लावायचा..."

"का हात लावल्याने काय होणारे ??" किंचितस हसू लपवत अंकुश बोलला.

"होत काही तरी..." अर्पिता थोडी रागात म्हणाली.

अंकुश हसत हसत तिच्या गाडीच्या मागे बसला आणि म्हणाला "चल..."

अर्पिता रागारागात त्याला म्हणाली, "नाही उठ मला घरी जायचं आहे..."

चल गं चल तुला भूक लागली असेल, कणीस खाऊ आपण.. लस्सी प्यायची ना तुला...?" अंकुश च्या या लाडीगोडीमुळे अर्पिता शांत बसली अन् गाडीला स्टार्टर मारून गाडी चालवू लागली, गाडीवर अंकुश तिच्याशी फार बोलायचा प्रयत्न करत होता पण अर्पिता त्याला टाळत होती...

शेवटी ते दोघे गार्डन जवळ पोहचले... अर्पिताने गाडी पार्क केली आणि अंकुश तिच्या साठी लस्सी आणि कणीस आणायला गेला.. तिची आवडच अशी काही वेगळी होती की ती कशा सोबत काहीही खात असे... पण अंकुश ला तिचा हाच स्वभाव फार आवडायचा, ती किती निरागस आहे हे त्याला चांगलच माहीत होते, म्हणून तो तिची कोणतीच गोष्ट मनाला लावत नसे..

दोघेही एका बाकावर बसले, तिने आधी कणीस खायला सुरुवात केली आणि तोपर्यंत अंकुश हातात लस्सी चा ग्लास घेऊन बसला....

अंकुश तिच्या जवळ यायचा प्रयत्न करत होता पण ती त्याला दूर करत होती...

शेवटी तिचं कणीस आणि लस्सी दोन्ही खाऊन झाल ...

"अग तुझ्या ओठाला बघ काय लागलं आहे.." अंकुश तिच्या ओठांकडे बोट दाखवत बोलला.

"काय?" अर्पिता मोबाईल काढत त्यामध्ये बघू लागली...

"अग थांब मी पुसतो..." अंकुश जवळ आला आणि म्हणाला.

"का नोकर आहेस का माझा..?? मला येतं पुसायला..." अंकुश ला दूर करत नाक फुगवून अर्पिता बोलली.

"हा हा हा लयच राग आलेला दिसत आहे.." अंकुश तिच्या रागाचा अंदाज घेत म्हणाला.

आणि अर्पिता रुमालाने ओठाच्या आजूबाजूला लागलेला कणसाचा मसाला पुसत होती...

"अग थांब तुला नाही येत नीट पुसता ... ये इकडे " आणि त्याने तिला त्याच्या जवळ वळविले... तिने टक्क त्याच्या डोळ्यात पाहिले, त्याच्या काळ्याभोर डोळ्यात तिला तिच्यासाठी असलेली काळजी, प्रेम दिसू लागली.. त्याने तिला जसं जसं जवळ घेतले तिला खूप सुरक्षित आणि मायेचा ओलावा जाणवू लागला, त्याच्या स्पर्शातही कुठे जबरदस्ती नव्हती ओढओढी नाही की कृत्रिमपणा नव्हता... तो तिचे गालावर येणारे केस मागे सारंत, तिच्या गालावरून हात फिरवत, त्याची नजर तिच्या डोळ्यात बुडाली होती..... अंकुश हळूहळू तिच्या ओठांवर हात फिरवू लागला..त्याचा एक एक स्पर्श तिच्या अंतःकरणापर्यंत पोहचत होता, तो तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवत डोळे बंद करून तिच्या निरागसते मध्ये हरवून गेला आणि तिनेही आपसुकच त्याला परवानगी दिली.

थोड्यावेळाने अर्पिता भानावर आली आणि त्याला मागे सारत " सोड सोड " अस बोलून त्याचं अंग झीडकरू लागली.

अंकुशला त्याच्या इराद्याप्रमाणे तिची लाँग किस घ्यायची होती. आजू बाजूला कुणी नाही हे पाहून त्याला थांबवत नव्हत... पण अर्पिताचे डोळे रागाने भरलेले होते आणि ती रडत होती...

२-३ मिनिटानंतर तो तिच्या मिठीतून बाहेर आला आणि तिच्याकडं पाहिले तर ती रडत होती..

"अग काय झालं बाळा...?" अंकुश ने एकदम काळजीने विचारले.

तशी अर्पिताने आपली बॅग उचलली नि तोंड रुमालाने पुसत निघाली.

अंकुशने पळत जाऊन तिचा हात पकडत ... "अग काय झालं, थांब जाऊ नको, बस इथे..."

त्याने तिला बाकावर बसविले आणि तो तिच्या समोर तिच्या मांडीवर हात ठेवून खाली बसला...

"बोल काय झालं..?" एखाद्या लहान मुलाला विचारावं असं त्याने तिला विचारले.

आणि ती पण तशीच रडत म्हणाली. "मला माहित नाही मला घरी जायचं आहे..."

"का...? रडतेस का मग ? "

"मला घरी जायचं उठ.." ती त्याला झिडकारू लागली.

"नाही आधी सांग, मी किस घेतलेली आवडली नाही का...?"

असं अंकुश ने विचारल्यावर अर्पिता ला फारच राग आला, ती संतापत म्हणाली, "खबरदार परत हात लावायचा जरी प्रयत्न केला तर,तुम्ही सगळे मुलं अशीच असता.. आधी कोणत्याही मुलीसोबत असं वागायचं आणि नंतर तिला सोडायचं... आता माझं सगळं संपलय.. मला कुणी विचारणार नाही... मला आमच्या घरी जायला आता तोंड नाही... सगळ संपल.." अर्पिता निरागस रागाने बडबड करू लागली.

"अगं बाळा पण असं झालं काय पण... मी एक किस तर घेतली, तीन वर्षात पहिल्यांदा एक किस घेतली..., आत्तापर्यंत नेहमी मला दूर ठेवलं... तुझं प्रेम खरं असेल तर मला हात लावायचा नाही, मला चार चौघात गर्लफ्रेंड म्हणून माझी ओळख करून द्यायची नाही, आत्तापर्यंत हॉटेल आणि गार्डन या दोन गोष्टी सोडल्या तर कुठे एकांत मिळाला का आपल्याला, एकतर तुझा सहवास मला एक वेगळीच ऊर्जा देतो, मला त्या सहवासातून कधीच बाहेर पडू वाटत नाही. " केविलवाण्या चेहऱ्याने अंकुश बोलत होता.

"एका किस मध्ये पण खूप काही होत... आणि मी तुला सांगितलेलं आपण आधी आपलं करिअर बनवायचं, मला बाकीच्या लोकांप्रमाणे प्रेम करून पश्चाताप करत नाही बसायचंय, आणि तुला मी अजुनही सांगतेय तुझ जर खरं प्रेम असेल तर तू माझ्याशी हे असं वागणं नाही..." अर्पिता रागारागात त्याला बोलत होती.

आणि अंकुश तिच्या या स्पष्ट मतावर प्रश्न करत म्हणाला, "म्हणजे मी तुझी किस नाही घ्यायची, तुझ्या जवळ नाही यायचं असं च ना..."

अर्पिता निरुत्तर झाली आणि इकडे तिकडे पाहू लागली. आणि अंकुश उठून तिच्या शेजारी बसला तशी अर्पिताने तिची मान वळवली आणि दुसरीकडे पाहू लागली, अंकुश तिला स्वतः कडे वळवत तिच्या डोळ्यात डोळे घालत बोलू लागला,

"बोल ना अर्पिता, सांग मला मी तुला कधीच हक्काने हात लावू शकत नाही का, आपल नात काय आहे, तू का कधीच मला तुझ्या जवळ येऊ देत नाही, फक्त मलाच तुझा हेवा वाटतो का, तुला माझ्याबद्दल काही वाटत नाही का... ?? अंकुश बोलता बोलता रडवेला झालेला होता तो तिच्या आणखी जवळ गेला आणि तिला विचारणा करू लागला..

तशी अर्पिता त्याला दूर सारत अडखळत म्हणाली, तू दूर हो, प्रेमाचं नाटक करून सर्वच जन असं मुलींना जाळ्यात ओढतात आणि नंतर सोडून जातात.. तू पण आता मला ब्लॅकमेल करत आहे.... मी तुझी पोलिसांत कंप्लेंट करीन.

अंकुश थोडा सावरला आणि हसतच बोलला, "काय करशील कंप्लेंट???"

"तू माझ्याशी जबरदस्ती केली.. आणि जर मला उद्या बाळ झालं तर मी या जगात राहणार नाही...." असं बोलून अर्पिता मोठ्या मोठ्यांनी रडू लागली.

आणि तेवढ्याच मोठ्याने अंकुश हसू लागला...

काही वेळानं अर्पिताचं रडू थांबल पण अंकुश हसायचा काही थांबला नाही...

"हस तू.. हस... तुला तर फक्त हसायलाच येणार.." अर्पिता संतापून म्हणाली.

"अग मग काय करू... तुला उद्या बाळ कस होणार???, एक किस घेतल्याने...."

अंकुश खूपच मोठ्याने हसू लागला...

अर्पिता चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाडून बसलेली होती.

"अग येडू बाई..." असं बोलत अंकुश तिचे जोरात गाल ओढू लागला...

"सोड हो तिकडं... मला वेळ नाही बाय..." आणि अर्पिता ताड कन उठून पुढे चालू लागली... अंकुश हसतच तिच्या मागे मागे आला...

अर्पिताने गाडीला स्टार्टर मारला आणि ती तिथून निघाली...

"अग मला तर घे... माझी गाडी मी तिकडचं लावलीये..."

"बस इथंच मला काय करायचय... बाय..."

असं बोलून अर्पिता फास्ट गाडी घेऊन निघून गेली...

अंकुश अजून हसत होता.. आपली गर्लफ्रेंड एवढी क्युट कशी असू शकते... तो मनाशीच विचार करत होता...

तो तसाच तिथून जवळच्या बस स्टॉप वर येऊन थांबला आणि पुन्हा पुन्हा ते आठवून गालातल्या गालात हसत होता..


अशा प्रकारे त्यांचा तो दिवस गेला.. अर्पिता घरी येऊन पटकन जेवली आणि आपला मोबाईल व लॅपटॉप काढून आपली assignment पूर्ण करत बसलेली... तेवढ्यात तिला अंकुशचा मेसेज आला...

Hi baby 😘

अर्पिता ला हे असे बेबी शोना शब्द वापरल्यावर फार राग येत असे..

म्हणून त्यावर तिने रागारागाने रिप्लाय केला..

don't call me baby otherwise I will block you...😠😠

यावर अंकुशने 😂😂😂😂😂 फक्त एवढं रिप्लाय केला...

अर्पिताने रागाने फोन ऑफ केला आणि झोपी गेली...

तिकडे अंकुश मात्र अजून ही तिच्या त्या वाक्यावर हसत होता.. अंकुश अजून झोपलेला नव्हता, तो बाहेर फेरफटका मारत होता.. वाटेत त्याला त्याचा जिवलग मित्र भेटला... सहसा ते दोघं नेहमीच वेळात वेळ काढून एकमेकांना भेटत पण नुकताच अंकुश जॉबला लागल्यामुळे ते खूप दिवसांनी एकमेकांसमोर आलेले होते...

दोघांनीही एकमेकांना आनंदाने आलिंगन केले आणि फिरत फिरत ते गप्पा मारू लागले.. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर त्याच्या मित्राने अंकुशला अर्पिता बद्दल विचारले..तेव्हा अंकुश फार मोठ्याने हसू लागला..

"काय रे एवढं हसू आलं... काय बात काय आहे ..." त्याने अंकुश ला कोपरखळी मारून विचारले.

"नाही बाबा कसली काही बात नाही," अंकुश हसतच बोलला.

"काय मग, विषय झाला असेल.. आं...." त्याचा मित्र कुतूहलाने विचारत होता..

अंकुशला तो काय विचारत आहे हे समजले होते पण त्याला त्याची पर्सनल लाईफ अगदी त्याच्या मित्राशीही शेअर करू वाटत नसायची, कारण त्याला अर्पिता ही किती निरागस आणि स्वच्छ मनाची आहे हे माहीत होत त्यामुळे त्या दोघांमधला खाजगी गोष्ट तो कोणत्याच मित्राला सांगत नसत...

म्हणून त्याला चांगले प्रत्युतर म्हणून अंकुश म्हणाला, "लग्नाचा विषय होय... हो झाला ना अजून सात आठ वर्षांनी करू...."

"अरे काय.." तोंड पाडत त्याचा मित्र बोलला..., "मुलं कुठल्या कुठं गेली आणि तू लग्नाचा विषय घेऊन बसलाय... "

अंकुश विषय टाळत म्हणाला, "चल खूप रात्र झाली आहे, निघतो... गूड नाईट.."

असं बोलून अंकुश घरी गेला..

घरी शांतपणे झोपायचा प्रयत्न करत होता पण त्याला थोडा वेळ काही झोप येत नव्हती, पण रात्री उशिरा तो निजून जातो...

********

दुसऱ्या दिवशी अर्पिता जरा लवकरच उठली , कारण ती रात्रभर जागलेली नव्हती, तीने तिचं सगळ काम आवरून घेतल आणि आईला थोडी फार मदत करण्यामध्ये तिच्या कामामध्ये लुडबूड करू लागली... आईचा नाष्टा तयार झाल्यावर तीने नाष्टा केला आणि निवांत पेपर वाचत बसली, अधून मधून फोन चेक करत होती की अंकुश चा काही मेसेज येत आहे का...

"काय गं आज काय कॉलेजला नाही जायचं वाटत.." आईने काम करता करताच तिच्याकडे पाहत विचारले.

"नाही, आज मूड नाहीये... बघू ऑफिस ला जाईल ..." अर्पिता निराशपणे म्हणाली.

"काय झालं तुझ्या मूडला..." आईने काम करता करताच विचारले .

"काही नाही असंच..."

अर्पिता तिच्या आई सोबत फार फ्रेंडली होती, तिच्या घरचे कधी तिला कोणत्याच गोष्टीचं कसलीच बंधन तिच्यावर पाडत नव्हते, त्यामुळे ती त्यांच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करत असायची, पण अंकुश चा विषय जरा तिने त्यांच्या पासून लांबच ठेवलेला होता, अंकुश चांगल्या जॉब ला लागेपर्यंत, सेटल होई पर्यंत कुणाला सांगायचं नाही, असं त्यांनी ठरवलं होत.. त्यामुळे ती दोघेही आपण कुठे पकडले जाणार नाही, कुणाच्या नजरेस पडणार नाही याची फार काळजी घेत होते.

आई शी गप्पा मारता मारता अंकुश चा मेसेज आला...

Gm Bala...😘😘

तोच अर्पिताला आनंद झाला.. पण तिला त्याचा राग आलेला आहे असं तिला त्याला दाखवायचं होत त्यामुळे तीने त्याला

😠😠😠

एवढाच मेसेज केला...

तेवढ्यात तिला अंकुशने फोनच केला, आणि अर्पिता फोन उचलत आईला म्हणाली, "आई ऑफिस मधून फोन आहे, फोन घेते.."

आणि बाहेर आली,

"बोला.. काये..."

"कुठं काय.. गूड मॉर्निंग करायला फोन केला" अंकुश खट्याळपणे बोलला.

"ओके झालं मग, ठेव आता.." अर्पिता खोट्या रागात बोलली.

अर्पिता फोन कट करणार एवढ्यात अंकुश म्हणाला.. "अग ऐकून तरी घे, एवढी का रागवलीये आणि तू जो विचार करत आहे ना असं काही नाही, मुळात तू बावळट आहे तुला काही कळतंच नाही..." एक आवंढा गिळत अंकुश म्हणाला.

"अच्छा मी बावळट आणि तू शहाणा.. बरं अजून काही..." अर्पिता चिडून बोलली..

"अग असं नाही गं बाळा... तुला अजुन कसलीच काही माहीत नाहीये नीट.., तू उगाच छोट्या छोट्या गोष्टीचा बाऊ करते..." अंकुश तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता.

"म्हणजे किस घेणं ही छोटी गोष्ट आहे.." अर्पिता जरा रागात आवाज वाढवत पण लगेच इकडे तिकडे पाहत हळूच कुजबुजत बोलली...

"हो मग... किस घेतल्याने काही होत नसतं..." अंकुश पण हळूच बोलला...

अर्पिता रागातच म्हणाली, "मला या विषयावर नाही बोलायचं.."

"पण मला बोलायचय ना..." अंकुश विषय पुढे वाढवत म्हणाला.

"मला फोन वर ह्या अशा गोष्टी डिस्कस करायची सवय नाहीये.." अर्पिता त्याला तिरस्काराने बोलत होती.

"म्हणजे भेटायचं म्हणते का.."

"असं बोलली नाही मी, फोन ठेव..."

"अग बाळा का तू अशी करते, अग तीन वर्ष झाली आपण रिलेशन मध्ये आहोत पण अजून तू मला एक किस पण नीट घेऊ दिलेली नाहीस, मग त्या बाकीच्या गोष्टी तर लांबच..."

"कोणत्या बाकीच्या गोष्टी...?" अर्पिताने पटकन विचारले.

"आता तूच बोलती ना फोन वर या अशा गोष्टी डिस्कस करता येत नाही... "

"ओके दे सोडून ..."

"बरं आवर पटकन, मी येतोय..."

"काही गरज नाही, मला काही कुणाला भेटायचं नाहीये..."

"अग तुला ते एक्स्प्लेन करतो ना ज्या बद्दल तू भलतंच खूळ धरून बसलीय.. चल पटकन फोन ठेव आणि आपल्या हॉटेल जवळ ये..."

"मी नाही येणार..." अर्पिता रागाने ओरडत म्हणाली.

"ही ही ही... गपचुप आवर पटकन आणि ये..." अंकुश तिचा खोटा राग समजून घेत बोलला.

अंकुश ने फोन ठेवला.

अर्पिता थोडी विचारात पडलेली होती की खरंच मला काहीच माहीत नाही का...

त्या दोघांकडेही नोकियाचा छोटा फोन होता, जसं आता आपण प्रत्येक गोष्ट ऑनलाईन सर्च करून समजून घेऊ शकतो पण ती दोघंही एकदम साधं नि सरळ जीवन जगणारी मुलं होती, सर्वांकडे samsung चा टच स्क्रिन चा साधा तरी फोन होता पण ही दोघे कधी आपले पैसे वायफळ गोष्टींमध्ये घालवत नसंत, आयुष्यात आनंद करणं गरजेचं आहे पण दोघेही आपल्या भविष्यावर लक्षकेंद्रित होते, त्यामुळे आपलं राहणीमान हे उच्च च हवं असं त्यांचं बिलकुल अट्टहास नव्हता.

अर्पिताने तिच्या त्या छोट्या मोबाईल वर सर्च करण्याचा प्रयत्न केला पण तिला ते पटत नव्हतं.

तिने पटकन आवरले आणि ते दोघेही ठरलेल्या वेळेत हॉटेल जवळ भेटले..

अर्पिता ने छान ड्रेस घातलेला होता, आज कॉलेजला नाही जायचं म्हणून तिने छान सलवार कमीज घातलेला होता त्याच्यावर छान मोठे कानातले, मोकळे केस सोडलेल, हातात छान कडे, थोडंसं ओठाला लिपस्टिकही लावलेली होती.. हे तिचं रूप पाहून अंकुश नेहमीसारखाच फिदा झाला...

दोघेही थोडा वेळ गाडी पार्क करून शांत उभे राहिले कारण पहिल्यांदा त्यांच्यामध्ये असा लाजवणारा विषय निघालेला होता, याआधी ते एकमेकांचे प्रियकर प्रेयसी पेक्षा एकमेकांचे जिवलग मित्र मैत्रीण जास्त होते, त्यांनी कधी अशा गोष्टींची खुली चर्चा केलेली नव्हती.. अंकुश आणि अर्पिता दोघेही एकदम नवेच प्रेमी असल्यासारखे एकमेकांना न्याहाळत होते..

अंकुश लाजूनच म्हणाला "आज गार्डन मध्ये जाऊयात.."

"नाही मला भूक नाहीये आज मी नाष्टा करून आली आहे..." अर्पिता नेहमी प्रमाणे पूर्ण न ऐकता पटकन बोलली.

अंकुश काय विचारणार, काय बोलणार याची अर्पिताला एवढी खात्री पटलेली होती की तिचं त्याचं बोलणं पूर्ण होई पर्यंत उत्तर ठरलेले असायचं..
हा तिचा अंकुश वर असलेला विश्वास होता, ती त्याला आपल्या आयुष्यातली एक सुरक्षित आणि खात्रीची व्यक्ती मानत. हे तिच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट दिसत असे.

अंकुश जोरा जोरात हसू लागला आणि तिला चिडवत म्हणाला, "अगं भुक्कड मी गार्डन बोललो, हॉटेल नाही, हे असं असत तुला सगळीकडे फक्त खायचं च सुचत..."

अर्पिता थोडी खट्याळ रागवत म्हणाली, "हो राहुदे.. मला उशीर होईल बँकेत जायला, चल जाऊया..."

"असं कसं, जॉबचा टायमिंग दहा वाजताचा आहे, आता काय झाडू मारायला जाते काय बँकेत ?" , असं बोलून अंकुशने त्याची गाडी स्टार्ट केली आणि अर्पिता ही विना तक्रार त्याच्या मागे बसली..

दोघेही गार्डन च्या दिशेने निघाले...

****************

क्रमशः

© Bhartie "शमिका❣️"