Mahanti shaktipithanchi - 7 in Marathi Spiritual Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | महती शक्तीपिठांची भाग ७

Featured Books
Categories
Share

महती शक्तीपिठांची भाग ७

महती शक्तीपिठांची भाग ७

३२) विभाष- कपालिनी शक्तीपीठ

पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात आईचा डावा घोटा पडला.

हे विभाष शक्तीपीठ कोलकातापासून जवळ आहे,आणि बंगालच्या उपसागराजवळ रन्नारायण नदीच्या काठावर आहे.

हे शक्तीपीठ हे विशाल मंदिर आहे.

हे दक्षिण पूर्व रेल्वेच्या कुडा स्टेशनपासून २४ कि.मी. अंतरावर आहे.

इथे आईचे रूप 'कपालिनी'असुन शिवशंकर 'भीमरूपा' आणि 'सर्वानंद' रुपात विराजमान आहेत .





३३) कलामाधव – देवी काली शक्तीपीठ

हे शक्तीपीठ मध्य प्रदेश राज्य, या अमरकंटक येथे स्थित आहे असे मानले जाते.

हे शोन नदी तटावरील एका गुहेत आहे

मध्य प्रदेशातील अमरकंटकमधील कलामाधवमधील शोन नदीजवळ सती आईचा डावा नितंब पडला..

इथे आईचे रूप 'काली' असुन सोबत शिवशंकर 'असितांग' रुपात विराजमान आहेत.

३४) शोणदेश - नर्मदा (शोनाक्षी) शक्तीपीठ

मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात असलेल्या नर्मदेच्या उगमस्थानी हे शक्तीपीठ आहे .

हे ठिकाण शोणदेश येथे आहे .

इथे सती आईचा उजवा नितंब पडला होता .

इथे आई “नर्मदा” रुपात असुन सोबत शिवशंकर ‘भद्रसेन” रुपात विराजमान आहेत .

35)रामगिरि शिवानी चित्रकूट शक्तीपीठ

उत्तर प्रदेशातील चित्रकूटजवळ झांसी माणिकपुर रेल्वे स्टेशन जवळ रामगिरीच्या ठिकाणी आईचा उजवा स्तन खाली पडला.

रामगिरी शक्तीपीठच्या दोन स्थानावर विभागले गेले आहे.

काहीजण मैहर ( मध्य प्रदेश ) च्या शारदा देवी मंदिराला शक्तीपीठ मानतात तर काही चित्रकूटच्या शारदा मंदिराला शक्तीपीठ मानतात .

ही दोन्ही ठिकाणे देवस्थाने मानली जातात.

चित्रकूटमध्ये रामगिरी पर्वत आहे.

इथे आई “शिवानी “रुपात असुन सोबत शिवशंकर “चंड”रुपात विराजमान आहेत .

चित्रकूट हजरत निजामुद्दीन- जबलपूर रेल्वे मार्गावर आहे. 'चित्रकूट धाम कर्वी' असे स्टेशनचे नाव आहे.

माणिकपूर स्टेशनपासून ३० कि.मी.वर आहे चित्रकूट धाम.

चित्रकूट पर्यटनाच्या दृष्टीने एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि पावसाळ्यात हे फार प्रेक्षणीय स्थळ आहे.

मंदाकिनी नदीच्या काठावर चित्रकूटच्या 2 किमी दक्षिणेस स्थित जानकी सरोवर / जानकी कुंड नावाचा पवित्र तलाव आहे .

काही लोक याला राजगिरी (आधुनिक राजगीर) म्हणतात, हे एक प्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र आहे.

३६)शुचि-नारायणी शक्तीपीठ

तामिळनाडू मध्ये कन्याकुमारी संगम त्रीसागर साइटवरून १३ किलोमीटर अंतरावर आहे

येथे शुचीन्द्रम स्थापीत शुची शक्ती मंदिर स्थनु शिव आहेत.

तामिळनाडूतील कन्याकुमारी-तिरुवनंतपुरम मार्गावर शुचिर्थीम शिव मंदिर आहे, जेथे सती आईचे वरचे दात पडले.

इथे आईचे रूप 'नारायणी' असुन शिवशंकर 'संहार ' किंवा 'संकूर' रुपात विराजमान आहेत .

असे मानले जाते की देवी अजूनही येथे ध्यान करीत आहेत.

शुचिंद्रम प्रदेश ज्ञानवाण प्रदेश म्हणूनही ओळखला जातो.

तामिळनाडु मध्ये कन्याकुमारीच्या 'त्रिसागर' संगम पासून 13 किलोमीटर की दूर शुचींद्रम मध्ये स्थित स्थाणु-शिव मंदिरात हे शुचि शक्तिपीठ स्थापित आहे .

महर्षि गौतमांच्या शापा पासून इंद्राला येथे इथे मुक्ति मिळाली होती .

इंद्राला शुचिता (पवित्रता) प्राप्त झाली म्हणुन त्याचे नाव शुचींद्रम पडले .

पौराणिक गोष्टी अनुसार ..

बाणासुर राक्षसाने घोर तपश्चर्या करून शिव शंकराकडून अमरत्वाचे वरदान मागितले .

शिवशंकर म्हणाले कन्याकुमारी व्यतिरिक्त इतर सर्व जागी तो “अजेय” असेल .

असा वर मिळाल्यावर तो उन्मत्त झाला .

त्याने देव देवतांना पण त्रस्त करून टाकले .

त्यामुळे देवलोकात पण हाहाकार माजला .

सर्व देवगण विष्णुला शरण गेले आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी महायज्ञ केला .

ज्यातून भगवती दुर्गा एका कन्येच्या रूपात प्रकटली .

देवी ने शिवाला पति रूपात प्राप्त करण्यासाठी दक्षिण समुद्र तटावर जाऊन तप केले .

शिवशंकराने तिला मनाजोगता वर दिला .

तेंव्हा देवतांना चिंता पडली की जर या कन्येचा शिवशंकरा सोबत विवाह झाला तर बाणासुराचा वध कसा होईल ?

तेव्हा नारदाने शिवाला शुचींद्रम तीर्थच्या प्रपंचात गुंतवून ठेवले, ज्यामुळे विवाह मुहूर्त निघून गेला .

त्यामुळे शिव तेथेच स्थाणु रूपात स्थिर राहिले .

देवीने पुन्हा तप प्रारंभ केले आणि असे मानतात की ती अजूनही कन्यारूपात तपश्चर्येत मग्न आहे .

इकडे आपल्या दूतांकडून देवीच्या सौंदर्याची चर्चा ऐकून बाणासुराने तिच्यासोबत विवाहाचा प्रस्ताव दिला .

त्यावेळेस त्याचे देवीबरोबर युद्ध झाले आणि शेवटी बाणासुराचा वध देवीच्या हातुन झाला .

या मंदिरात नारायणी आईची भव्य आणि उत्कट प्रतिमा आहे आणि तिच्या हातात एक वरमाला आहे .

मंदिरात भद्रकाली देवीचे सुद्धा मंदिर आहे .

ही भगवती पार्वती देवीची सखी मानली जाते .

आईच्या या शक्तिपीठात पूजा अर्चेचे एक वेगळेच महत्व आहे .

भक्तांच्या म्हणण्यानुसार पूजा केल्यानंतर वैदिक आणि इतर अन्य मंत्र सिद्द्धी होते .

नवरात्र, चैत्र पौर्णिमा ,आषाढ़ आणि आश्विन अमावस्या, शिवरात्रि अशा विशेष प्रसंगाच्या वेळेस इथे विशेष उत्सव होतात .

तेव्हा देवी आईचा हिरे वापरुन श्रृंगार केला जातो .

कन्याकुमारी मध्ये स्नान केल्याने भक्तांची सर्व पापे नष्ट होतात आणि ते पावन होतात .

३७)प्रभास – चंद्रभागा शक्तीपीठ

गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील वेरावळ मध्ये सोमनाथ मंदिराच्या जवळ प्रभास भागात आईचे उदर (पोट)पडले. गुजरातच्या प्रभास प्रदेशात त्रिवेणी संगम जवळ हे शक्तीपीठ आहे .
चंद्रभागा शक्तिपीठाचे वर्णन पुराणात देखील आहे.
कपिला हिरण्य आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमाजवळ स्मशानभूमीजवळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाजवळ हे आहे.
आईच्या या रूपाचे रक्षण करण्यासाठी शिवशंकर कायम सोबत बसले आहेत .

सध्या हे शक्तिपीठ सोमनाथ ट्रस्टच्या श्री राम मंदिराच्या मागील बाजूस आणि हरिहर जंगलाजवळ आहे.
मंदिराकडे जाणारा रस्ता श्रीराम मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूने जातो.
सोमनाथ प्रदेशात या शक्तीपीठाच्या सामर्थ्याविषयी माहितीचा अभाव आहे.
बहुतेक मार्गदर्शकांमध्ये तेथील स्थानिक धार्मिक मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश नाही.
म्हणून भाविकांना स्वत: हून आई सतीचे हे रूप पहाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात .
इथे आई चे रूप “चंद्रभागा “असुन सोबत शिवशंकर “वक्रतुंड “रुपात विराजमान आहेत .

३८) भैरव पर्वत - अवंती शक्तीपीठ

मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील क्षिप्रा नदीच्या काठाजवळ भैरव डोंगरावर सती आईचे ओठ पडले .
या स्थानाबद्दल विद्वानांचे मतभेद आहेत .
काही उज्जैन जवळ क्षिप्रा नदीतीरावर आहे असे मानतात .
तर काहीजण हे गुजरातच्या गिरनार डोंगराजवळ आहे असे मानतात ,त्यामुळे दोन्ही ठिकाणी शक्तीपीठाची ओळख आहे.
अवन्तीपेक्षा उज्जैनमध्ये या शक्तीपीठाचा विचार करणे अधिक योग्य वाटते.
इथे आईचे रूप 'अवंती' असुन सोबत शिवशंकर 'लंबकर्ण' रुपात विराजमान आहेत .
उज्जैनचे महाकालेश्वर मंदिरदेखील पाहण्यासारखे आहे .

क्रमशः