माझे ओले केस मी टॉवेलने बांधले होते. एका हातात चहाचा कप घेऊन मी रूममधे आले. "अजून हा झोपला आहे..!! किती हा आळशीपणा...!!
"खडूस उठ ना... आता काय रविवारचे बारा वाजवणार आहेस का..???" तरीही हा चादर डोक्यावर घेऊन घेऊन झोपत होता. मी चहाचा कप टेबलावर ठेवला आणि माझे ओले केस त्या टॉवेलमधून मोकळे केले...
त्या पिक्चर च्या हिरोईन सारखं करत मी ही माझे केस झटकले.. त्या ओल्या केसांमधल पाणी जाऊन निशांतच्या चेहऱ्यावर एखाद्या कारंज्यासारख उडाल...
"काय ग हनी-बी झोपू दे ना मला... रोज लवकर उठुन जातो ना ग ऑफिसला. आज रविवार आहे. आणि मी झोपणार आहे..." निशांत चादर घेऊन परत झोपला...
"थांब तु असा नाही उठणार...!!" अस बोलून मी गरम चहाचा चटकाच त्याला दिला. तसा "आई गं..." करत उठला.
"बायको., काय ग हे...?? अस कोणी आपल्या नवऱ्याला छळतात का.??" निशांत चेहऱ्यावरील चादर बाजुला सरकवत बोलला.
"मग, तु उठ ना लवकर की सगळा रविवार असाच झोपण्याचा संपवायचा आहे...??" माझ्या या वाक्यावर निशांत लगेच उठला आणि माझ्या जवळ आला...
"नाही ग... झोपेत नाही.. तुझ्या मिठीत घालवायचा आहे..." अस बोलत त्याने मला त्याच्या कवेत घेतलं..
त्याच्या त्या स्पर्शाने हृदयाचे ठोके जलदगतीने वाढले होते.. पोटामध्ये मोठा गोळा यावा असच काहीसं झालं..
"खुप गोड बोलतोस हा..." अस बोलत मी स्वतःला त्याच्यापासून सोडवत बोलले.. पण त्याच्यापासून दूर होणं केवळ अशक्य होतं.. त्याची ती घट्ट मिठी मला काही त्याच्यापासून दूर होऊ देत नव्हती.
"मॅडम किती ही प्रयत्न करा. पण ही मिठी काही सुटणार नाहीये...." आणि तो आता जास्तच जवळ खेचत होता. आता मी इतके जवळ होते की त्याच्या हृदयाचे ठोके ही ऐकू शकतं होते..
"अरे कोणी बघेल...!! मला जाऊदे खूप काम आहेत किचनमध्ये...!!" माझा काही तरी कारण देऊन पळण्याचा हलका प्रयत्न चालु होता. पण त्याच्या मिठीतुन सुटणं काही जमल नाही.
"हनी-बी., तुला काय वाटतं. तु काही ही कारण सांगशील आणि मी ऐकून घेईल. ये नही चलेगा बॉस...!!" अस बोलत तो अजूनच माझ्या जवळ आला. त्याचा श्वास मला आता जाणवत होता.. तो किस घेणार इतक्यात मी त्याच्या ओठांवर माझे हात धरले....
"आधी ब्रश कर...." एवढं बोलून मी त्याला धक्का मारत पळुन गेले.
"अच्छा बेटू....!! थांब हनी-बी.... बायको थांब...!!" त्याचे आवाज ऐकू येत होते आणि मी धावत किचनमध्ये निघून गेले... तो ही धावत माझ्या मागे आला... माझा हात धरणार इतक्यातच... कोणी तरी माझ्या चेहऱ्यावर पाणी शिंपडल..
डोळे उघडले तर मी माझ्या रूममधे होते. म्हणजे आमचं काही लग्न झालं नव्हतं.. मी स्वप्न बघत होते.. स्वतःच्या डोक्यावर हात मारत मी उठले.. समोर पाहिलं तर निशांत होता.. मी परत डोळे चोळले...
"आता स्वप्नातला निशांत समोर ही दिसायला लागला तर...!!" स्वतःशी हसत मी माझ्या डोक्यावर टपली मारली आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेले.. फ्रेश होऊन आले तर रूममधे कोणी ही नव्हतं... स्वतःशीच हसले आणि कपडे बदलुन मी केस विंचरत होते की मला आज सकाळचं स्वप्न आठवलं आणि मी शहारले....
स्वतःच्या डोळ्यांवर हात ठेवून मी लाजत होते. जेव्हा चेहऱ्यावरचा हात काढला.., तेव्हा मला आरश्यामध्ये निशांतच प्रतिबिंब दिसलं...
"अरे तु परत आलास...?? आता किती वेळा असा समोर येणार आहेस खडूस... यार का तु इतका गोड आहेस.. काल तर एवढा हँडसम दिसत होतास की अस वाटत होतं की एक घट्ट मिठी मारावी आणि तुझ्या माथ्यावर एक चुंबन घ्यावं. वाटलं नजर काढावी की तुला कधीच कोणाची नजर ना लागो... अगदी माझी ही नको. मघाशी स्वप्नात होतास तेव्हा झोपलेला खडूस किती गोड दिसत होता. आणि हा आरशामधला खडूस.."
To be continued...