kadambari jivalaga Part 36 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी- जिवलगा ...भाग -३६ वा

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

कादंबरी- जिवलगा ...भाग -३६ वा

कादंबरी – जिवलगा

भाग -३६ वा

-----------------------------------------------------------

येणाऱ्या रविवारी हेमूच्या गावी मामा,मामी आणि एक फमिली त्यांच्या मुलीला

घेऊन येणार आहेत हे कळल्या पासून हेमू आणि नेहा दोघांचा मूड गेलेला होता .

शुक्रवारी सकाळी नेहेमीप्रमाणे दोघे ही ऑफिसला आले .

थोड्यावेळाने हेमू नेहाला म्हणाला ,हे बघ ..मी काय म्हणतो ते शांतपणे ऐकून घे ,

आणि तू अजिबात अपसेट होऊन जाऊ नको .

तुला असे पाहून माझा निर्धार डळमळू लागतो .

नेहा म्हणाली –

हेमू, काही तरीच टेन्शन आलाय हे ,

किती छान पार्टी झाली आपली , किती खुश झालो होतो आपण सगळे ..

पण, तुझ्या मामाचा फोन काय आला , आणि आपल्या आनंदवर विरजण टाकून गेला .

हेमूने नेहाला समजावीत म्हटले –

तू अशी टेन्शन मध्ये येऊ नकोस ..कंट्रोल कर जरा .

मला सुद्धा कसे तरीच वाटते आहे , त्यादिवशी मामाला बोलून काय बसलो मी ,

सगळा गोंधळ निस्तरणे आलाय आता . त्याशिवाय दुसरा उपाय नाहीये ,

गावाकडे गेल्याशिवाय हा प्रश्न सुटणारा नाहीये नेहा .

म्हणून मी काय ठरवले आहे ते तुला सांगतो ..लक्षात असू दे तुझ्या .

तो म्हणाला ..मी शुक्रवारी रात्रीच्या ट्रेनचे रिझर्वेशन केले आहे ...शनिवारी घरी

गेलो की अगोदर आई-आणि बाबांना आपल्या बद्दलचे सगळ सांगतो . आणि मग

मामाला फोनवर बोलतो ,त्याने रविवारी नेमके काय नि कसे ठरवले आहे ? याची

माहिती घेतो आणि मग ठरवतो त्याला कसे नि काय उत्तर द्यायचे ..!

हेमुचे ऐकून घेत –नेहा म्हणाली –

हो ,हे असेच ठीक आहे . उगीच घाई नि गडबड करून ..त्या भरात भलतेच काही

बोलून बसलास तर ..अजून गोंधळात भर पडायची . तू शांतपणे ,आणि धीराने

वाग आणि बोलण्यावर कंट्रोल ठेव.

सगळ्यांचे ऐकून घे..लगेच इरीटेट होऊन उलट काही बोलून बसू नकोस .

हे बघ नेहा .. तिकडे काही म्हणजे काही ही होवो ..

आपल्या नात्यात या गोष्टीनी काही म्हणजे काहीच फरक पडणार नाहीये .

काय होईल आता पुढे ? या भीतीने आणि कल्पनेने ..हात पाय गाळून बसू नको .

तिचा हात हातात घेत हेमू म्हणाला ..

नेहा – आय लव्ह यु ..

तुझ्यावर माझे प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील

विश्वास ठेव माझ्यावर .

हेमूकडे पाहत नेहा म्हणाली ..

यस , तुझ्या प्रेमाबद्दल माझ्या मनात कधीच शंका नव्हती आणि नसेल ..

हेमू- आय लव्ह यु फॉरएव्हर ...!

भीती फक्त एकच वाटते ..इतक्या प्रतीक्षेनंतर मला हवे तसे प्रेम मिळाले आहे ..

आता हे सुख नशिबाने आपल्यापासून हिरावून घेऊ नये .

हेमू म्हणाला – ए -वेडाबाई ..असे काही होणार नाही .

मी तुझा – तू माझी “ असेच असेल नेहमीसाठी .

तू मला धीर द्यायचे सोडून ..तुझ्या अशा बोलण्याने जास्तच घाबरवून टाकते आहेस ,

प्लीज असे नको ना करू ..!

हेमूच्या चेहेर्यावरचे भाव पाहून ..नेहा म्हणाली –

असे काही नाही रे , उलट तू या कठीण प्रसंगातून नक्कीच मार्ग काढशील याचा मला विश्वास

आहे .

तू निश्चिंत मनाने जाऊन ये...आणि शांतपणे सगळ्या गोष्टी कर. आणि मला अपडेट देत जा ,

माझे सगळे लक्ष ..तुझ्या अपडेटकड असणार आहे.

माझा जीव टांगणीला लावू नकोस ..कळले ना ?

नेहाच्या डोळ्यात पाणी तरळते आहे की काय ?

या कल्पनेने हेमू अधिकच बावरून गेला . मनात तो म्हणाला ..

नेहा ..आतून खूपच घाबरून गेली आहे , आता हा विषय इथेच थांबवला पाहिजे .

आणखी एक सांगतो –

नेहा ..मला सोमवारची रजा घ्यावी लागणार आहे , कारण रविवारी रात्री निघून

सोमवारी ऑफिसमध्ये वेळेवर मी येउच शकत नाही . त्यामुळे गावाकडे गेलो की मी नेहमीच

सोमवारी न येता मंगळवारी येत असतो .

हे पण तुला सांगितले पाहिजे ..नसता ..तुझ्या डोक्यात अजून एक भुंगा शिरायचा .

का बरे हा थांबला असेल ? नक्कीच काही तरी मोठ्ठा प्रोब्लेम झाला असणार ..?

हेमूने आपल्याबद्दल सांगितल्यावर ..मामा आणि मामी ..विरुध्द ..हेमुचे आई-बाबा यांच्यात

वाद ,भांडण वगरे तर झाले नसेल ना ?

हेमुचे हे लांबलचक बोलणे ऐकून नेहाला हसू आले ..ती म्हणाली ..

बाप रे .. कित्ती स्टडी केले आहेस रे माझी ..ओ माय god...!

मी कबुल करते ..की

आज -रविवारी ..निघालो नाही ..

उद्या निघणार आहे, असे तू सांगितले असतेस आणि मग

या नेहाच्या मनात तू आत्ता जेजे बोलून दाखवलेस ..अगदी तसेच विचार

सुरु झाले असते .

.आणि तू येई पर्यंत मीच माझे डोके खात बसले असते .

हे मला माहिती आहे नेहा ..इतक्या दिवसाच्या सहवासात ..तुला असे थोडेफार तरी नक्कीच

ओळखले आहे मी .

नेहाने मोठ्या प्रेमाच्या नजरेने त्याच्याकडे पहात म्हंटले ..

राजा ..असेच भरभरून प्रेम कर रे नेहमी ..तुझ्या या वेड्या नेहावर . लव्ह यु हेमू ..!

तिच्याकडे पाहत हेमू म्हणाला .. आपला प्रेमाचा ..एपिसोड इथेच थांबवू या आता .

मी सोमवारी नाहीये ..सो, ऑफिसची सगळी कामे ..माझ्या नंतरच्या माणसाला सांगावी लागतील ,

आणि तू त्याला मदत करशील ..

मी जाऊन येतो मोठा राउंड करून येतो ..सिस्टीम चेक करून घेतली म्हणजे ,,माझी सुट्टी

मी विना-काळजीत घालवू शकेन.

हेमू निघून गेला ..आणि नेहा विचार करू लागली ..

हा हेमू मनाने खरेच आपल्यापेक्षा खूपच कणखर आहे . स्वतःला कंट्रोल करणे त्याला किती सहजपणे

जमते याला . त्याचे असे वागणे पाहिले की ..वाटते ..

भलत्या –सलत्या कल्पना करून घाबरून जाण्याचा आपलाच स्वभाव ..आपल्या आनंदात आडवा

येत असतो , हे असे बरोबर नाही .

हेमुला वाटले पाहिजे ..की..

त्याची नेहा त्याच्यामागे भक्कमपणे उभी असणार आहे. असे वाटले तरच तो किती ही कठीण

प्रसंगातून साहिसालामात बाहेर पडू शकतो . तेवढी समजदारी हेमूच्या मनात आणि विचारात नक्कीच

आहे ...

हेमूच्या स्वभावातील अनेक पैलू आपण गेल्या किती तरी दिवसापासून पहात आलेलो आहोत ..

आणि हेमुसाठी –आपण अनुरूप आहोत ..” हे ठरवणार्या मधुरिमा दीदीने खरेच खूप मोठे उपकारच केले आहेत .

पण, तिला याबद्दल सध्या काही ही सांगायचे नाहीये ..हे तर आपण पक्के ठरवले आहे .

त्यामुळे आपली लव्ह-स्टोरी ..फक्त आणि फक्त ..सोनिया –अनिता याच दोघींना माहिती आहे .

सगळ्यांना सांगण्यासाठी अजून थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.

त्यात आता हे टेन्शन आली मनावर ..

हेमूच्या मामाने कधी नव्हे ते .त्याच्या भाच्यासाठी ..पोरगी पसंत करून ठेवीत

..आता फक्त ..हेमुला “हो” म्हणायला लावायचे .

म्हणजे ..अगदी लग्नाचा बार उडवून द्यायचा ..असाच तयारीने रविवारी

हेमुचे मामा आणि मामी ..हेमूच्या घरी येणार आहेत ..

आणि त्या आधीच ..हेमू मामांना खरी गोष्ट काय आहे हे सांगणार आहे ..!

बाप रे ..! काय होईल ? कल्पनेने नेहाचे मन भीतीने थरथरत होते.

मनात प्रार्थना सुरु झाली होती ..

हे अंबाबाई ..या कठीण प्रसंगातून सुखरूप सुटका कर.

हेमुला घेऊन मी तुझ्या दर्शनाला येईन !

कुलदेवी अंबाबाईच्या पायी असे मनोमन साकडे घातल्यावर .नेहाच्या मनाला बराच धीर आलाय

असे वाटत होते.

ऑफिस सुटेपर्यंत हेमूची आणि तिची भेट होऊ शकणार नव्हती ..

त्याचाच फोन आला ..

नेहा ..तू तुझी वेळ झाली की घरी जा , माझी वाट पाहत बसू नको ..

मला एक मिटिंग पण आहे..एरव्ही सोमवारी होती ही मिटिंग ..पण..मी सोमवारी नाहीये

म्हटल्यावर ..

साहेब म्हणाले .. काही महत्वाचे कस्टमर आहेत, त्यांना टाळता येणार नाहीये , आपण, आजच

मिटिंग -घेऊन टाकूया . म्हणजे सगळ्यांच्या सोयीचे होईल.

रात्री ट्रेन निघाली की ..नंतर बोलू या आपण..

आणि हो ..आता कसलाही विचार करू नको .

अनिता आणि सोनिया बरोबर शनिवार –रविवार मस्त एन्जोय कर.

हे ऐकल्यावर ..नेहाने ..हेमुला बेस्ट लक म्हटले .

आणि ती घराकडे निघाली.

रोजच्या प्रमाणे रात्रीची जेवणे आटोपली .आणि तिघींच्या गप्पा सुरु झाल्या बोलण्याचा

विषय तोच..

गावाकडे गेल्यावर हेमू ..काय नि कसे सगळी परिस्थिती हाताळणार आहे ?

कारण..इथे बसून बोलणे ,अंदाज करणे वेगळे आणि तिथे ऐनवेळी नेमकी सिच्युएशन जर

तणावग्रस्त होऊन बसली तर कसे ?

एकूणच हेमुची मोठी परीक्षा असणार आहे रविवारी ..

आपल्याला वाटते ..त्याचे आई-बाबा त्याच्या सांगण्यावरून न पाहिलेल्या नेहाला हो “म्हणतील ,

पण, तेच जर ..”बघू, ठरवू , विचार करू ..” असे म्हणू लागले तर ?

हेमूच्या मामाला तर अगदी हेच उत्तर अपेक्षित असणार ..

ते बरोब्बर याचा फायदा घेत ..त्यांनी ठरवलेल्या मुलीसाठी जर..हेमूच्या आई आणि बाबांचा अनुकूल

प्रतिसाद मिळवला तर ..हेमूला तर ती मुलगी पहावी लागणार ..!आणि हेमुची मामी ..या मुलीसाठी

फार आग्रही आहे ..हे तर हेमूच्या मामाने स्पष्ट सांगून टाकले आहे.

हे सगळे विचार करून झाल्यावर ..सोनिया आणि अनिता वैतागून गेल्या आणि म्हणाल्या ..

बघ ..नेहा ..तू सुरुवातीला हेमुकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम ..

त्यादिवशी ..तुला खिजवण्यासाठी , चिडवण्यासाठी ..म्हणून हेमूने मामला फोनवर मारे थाटात

सांगून टाकले ..तुम्ही पसंद करा माझ्यासाठी मुलगी ..मी तुमच्या शब्दा बाहेर नाही.

अनिता म्हणाली- हेमू ने अक्कल कुठे गहाण टाकली होती कुणास ठाऊक त्यादिवशी ?

आता घ्या ..स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय . ..बोंबलून पण काही उपयोग नाही.

आता काय काय होईल ?, काय होणार रविवारी ..हे त्या एका देवालाच माहिती .

दोघींचे असे निराश होऊन बोलणे ऐकणे ..नेहाला सहन करणे शक्य नव्हते ..

ती दोघींना हात जोडीत म्हणाली ..

प्लीज प्लीज ..असे काही म्हणू नका ..होपफुल राहू या न आपण.

तुम्हीच मला असे घाबरवून टाकू लागलात तर..मी कसे सावरू स्वतःला ..!

तिची ही अवस्था पाहून ..दोघींना तिची दया आली.

तिला धीर देत त्या म्हणाल्या ..सोरी बेबी ..आता नाही बोलणार ..ओके..

सावर स्वतःला .

मग असाच इकडच्या तिकडच्या गप्पा करून मन जाग्यावर आले ..त्या दोघी झोपी गेल्या ..

नेहा एकटीच जागी होती ..हेमूच्या फोनची वाट पहात ..

गावाकडे निघालेल्या हेमुला संकटातून सोडव रे देवा ..

नेहा डोळे मिटून प्राथना करू लागली.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढच्या भागात ..

भाग -३७ वा लवकरच येतो आहे .

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------