Samarpan - 9 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | समर्पण - ९

Featured Books
Categories
Share

समर्पण - ९

समर्पण-९

बिना तेरे साँस भी ना ले पाँऊ,
इतनी है मेरे लिए अहमियत तेरी।
मेरा प्यार भी तेरी परेशान बन जाये,
क्यूँ करते हो इतनी शिकायतें मेरी।


खूप जास्त विचार करायची माझी वाईट सवय आहे. एखाद्या गोष्टीचा अतिजास्त विचार करणं फक्त आपला त्रास वाढवतो. माझ्या साठी हीच सवय माझ्या दुःखाच कारण बनत गेली. विक्रम ने जरी ती गोष्ट मजाक म्हणून बोलली होती तरी माझ्या मनाला कुठेतरी हे वाटत होतं की मी खरंच खूप हक्क गाजवते का त्याच्यावर. मला नाही आवडत माझ्यामुळे कोणाला त्रास व्हावा आणि त्यात विक्रम तर माझ्या मनाच्या एवढ्या जवळ होता. मला हे वाटत होतं की जर खरंच विक्रम माझ्यामुळे कंटाळत असेल तर जबरदस्ती म्हणून मला नाही ठेवायची मैत्री त्याच्यासोबत. कोणत्याही नात्या मध्ये दोन्ही कडून जपण्याची ओढ असावी, काळजी असावी...एकतर्फी कुठलंच नात टिकत नाही आणि मी या परिस्थिती मधून गेली होती अभय सोबत त्यामुळे मला विक्रम सोबत जबरदस्तीची मैत्री नको होती. अर्थात एवढा सगळा विचार फक्त मीच करत होती आणि तेही फक्त विक्रम ने केलेल्या एका गंमतीमुळे. तिकडे विक्रम मात्र खूप अस्वस्थ होता की मी त्याला भेटणार की नाही म्हणून.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि अभय ऑफिस साठी रेडी झालो, माझ्या मनात अजूनही विक्रम चा राग होता त्यामुळे मी त्याला भेटू की नको या संभ्रमात होती. निघताना अभय बोलला,

"चल मी सोडतो तुला ऑफिसला आज, ये खाली लवकर"

मी मात्र या विचारात होती की विक्रम स्टेशन येऊन माझी वाट पाहत असेल आणि मी इतकी कठोर नाही वागू शकत त्याच्यासोबत. मी विक्रम च्या बाबतीत दिवसेंदिवस खुप हळवी होत होती. मी विचार केला आता खरंच विक्रम ला माझा राग दाखवते आणि मी त्याला भेटायचं ठरवलं आणि अभय ला बोलली,

"अरे मला ना आता आठवलं अभय, नम्रता मला भेटणार आहे आज स्टेशन ला त्यामुळे मी आधी भेटते तिला आणि नंतर जाते ऑफिस मध्ये, तू थांबला तर तुला उशीर होईल ना जायला...."

"बर ठीक आहे...ऐक ना, संध्याकाळी लवकर ये, बाहेर जाऊया आपण"

"हो नक्की"

अभय निघाल्यावर मी पण स्टेशन ला गेली आणि तेवढ्यात विक्रम चा मेसेज आला की,
📱"मला माहीत आहे सोनू तू नक्की येणार...स्टेशन च्या बाहेर पार्किंग मध्ये उभा आहे....ये लवकर"

तस तर विक्रम वरचा माझा राग त्याचा मेसेज पाहूनच निघून गेला आणि माझ्या चेहऱ्यावर हास्य आलं पण विक्रम ला हे दाखवायचं होत मला की मी अजून चिडली आहे, त्याला पण त्रास द्यायला पाहिजे ना😜...त्यामुळे मी खोटा राग दाखवत त्याच्या गाडीत जाऊन बसली, त्या दिवशी पाऊस सुरू होता, वातावरण खूप थंड होत, आणि विक्रम मला पाहून बोलला,

"आज वातावरण खूपच गरम होतंय ना सोनू...मी एसी लावतो😜😜"

मला हसायला येत होतं खूप त्यामुळे मी त्याच्याकडे बघतच नव्हती, मी गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत होती, त्यात तो पुन्हा बोलला,

"एवढं काय आहे बाहेर बघण्यासारखं....मान वाकडी होईल सोनू,😂😂"

मला आता हसू आवरत नव्हत, पण तरीही मी बघितलं नाही त्याच्याकडे, आणि माझ्या बॅगेतून त्याच्या आवडीचं चॉकलेट त्याच्या हातात ठेवलं,

"अरे वा, हे चॉकलेट मी एकटाच खाणार का? हो मलाच खावं लागेल ना, कारण इथे लोकं तर आधीपासूनच गोड आहेत, मग त्यांना गोड खायची काय गरज"

आता मात्र मी हसलीच. विक्रम ला बरोबर माहीत होतं मला कस मनवायचं. आपलं मन खूप स्वार्थी होत कधी कधी. कोणी मनवणारे असेल तर जास्त रुसायची ईच्छा होते. विक्रम माझे सगळे नखरे सहन करायचा आणि मी तेवढ्याच हक्काने त्याच्यावर रागवायची. आम्ही बोलायचो, हसायचो, भांडायचो, गंभीर विषयावर चर्चा ही करायचो......आम्ही जेंव्हा सोबत असायचो आम्हाला कोणाचीच गरज नसायची. जस काय आम्ही एकमेकांना पूर्ण करायचो...

गप्पा मारता मारता माझ्या लक्षातच आल नाही की आम्ही खुप लांब आलोय, मला जेंव्हा हे कळाल मी विक्रम ला विचारलं,

"आपण कुठे जातोय विक्रम? खूप लांब आलो आपण? कुठे नेतोएस मला?"

"एका खास ठिकाणी जातोय आपण, थोडं लांब आहे पण तुला नक्कीच चांगलं वाटेल तिथे"

"हो रे पण खूप लांब आहे का?"

"जास्त नाही ग अजून अर्ध्या तासात पोचू आपण.....का तुला भीती वाटत आहे का?"

"हो ना, एकतर इतक्या लांब अन त्यात तूझ्या सारखा फ्लर्ट माणूस सोबत...भीती तर वाटणारच ना😜😜...पण खबरदार मिस्टर विक्रम जर माझ्यासोबत काही केलं तर"

"अगदी माझ्या मनातल बोललीस तू सोनू, मी पण हाच विचार करत होतो, चान्स चांगला आहे, काय करता येईल मला या मुली बरोबर,🤣🤣🤣🤣"

"विक्रम...नालायक, खरच तू हा विचार करतो आहे...लोफर कुठला..."

"बघ आता जसा पण आहे तुझा..."

"हो गप्प बस कळलं...."

आणि अस हसत हसत आम्ही त्या ठिकाणी पोचलो. विक्रम मला अतिशय सुंदर ठिकाणी घेऊन गेला होता. त्याला माहित होतं मला गजबजलेल्या ठिकाणी जायला आवडत नाही त्यामुळे तो मला राधाकृष्णाच्या मंदिरात घेऊन गेला. कृष्णा वर माझं विशेष प्रेम आहे. माझ्या सगळ्या शंका मी माझ्या कान्हाला बोलून दाखवते. आणि त्याच कान्हाला माझी चिंता असेल त्यामुळे त्यांनी विक्रम ला माझ्या आयुष्यात पाठवलं असेल अशी माझी श्रद्धा होती. अतिशय सुंदर मंदिर होत ते आणि मंदिराच्या परिसरातच आश्रम होत. सगळीकडे मोठी मोठी हिरवीगार झाडे, आणि आश्रमाच्या मागे एक नदी वाहत होती. मला खूप प्रसन्न वाटत होतं तिथे. विक्रम माझं मन इतकं कस ओळखायचा हे खरच एक कोडं होत माझ्यासमोर. पण त्याच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला त्याच्या खुप जवळ घेऊन जायच्या. पाऊस बंद झाला होता पण हवेत गारवा अजूनही होता...आम्ही दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडलो,

"सोनू इथेच थांब मी आलो लगेच...."

विक्रम गाडीतून गिटार घेऊन आला. विक्रमच गिटार म्हणजे त्याचा जीव की प्राण होता. खर तर गाणं त्याच्यासाठी खूप जवळ होतं मनाच्या. आणि आज त्याने गिटार मला गाणं ऐकवून दाखवण्यासाठी आणलं होतं.

"विक्रम मला खूप खूप छान वाटतंय रे इथे, यासाठी मी तुला कितीही थँक्स बोलली तरी कमी आहे...हे ठिकाण खुप आवडलं मला"

"तुला आवडल ना बस, माझी मेहनत सफल झाली, तुझ्या या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी मी काहीही करू शकतो सोनू"

"का??"

"का म्हणजे.... खास मैत्रीण आहे तू माझी"

"फक्त खास मैत्रीण?? माझ्या सारखे खूप मित्र मैत्रिणी आहेत तुला विक्रम...मग प्रत्येकासाठीच तू एवढं सगळं करतो"

"मी बोललो ना तुला, तू स्पेशल आहेस...आणि काय तू हे घेऊन बसलीस बघ बर किती छान वातावरण आहे..चल तुझे छान छान फोटो क्लीक करतो मी"

आणि अस बोलून विक्रम कॅमेरा आणायला गेला, पुन्हा एक निरर्थक प्रयत्न त्याचा.....पण आज मी त्याला सोडणार नव्हती, मी का त्याच्यासाठी एवढी महत्त्वाची आहे हे जाणूनच घेणार होति कारण कदाचित त्याच्या उत्तरात मला माझ्या प्रश्नांची उत्तरं पण मिळणार होती.

खुप सारे फोटो काढल्यावर आम्हाला भूक लागली, मला आठवलं मी सकाळी टिफिन घेऊन निघाली होती. विक्रम जेवायची वेळ नेहमी चुकवायचा त्यामुळे आज मी मुद्दाम त्याचसाठी डब्बा आणला होता. डब्ब्या उघडल्यावर जेंव्हा विक्रम ने आलूगोबी मिक्स भाजी बघितली तो तुटून पडला, त्याची आवडती भाजी होती. त्याला जेवताना बघून मला खुप समाधान मिळालं. त्याला भाजी खूप आवडली,
"व्वा सोनू...काय चव आहे तुझ्या हाताला...😘😘😘"

"तुला खरच आवडलं का रे?"

"खूप छान बनलं आहे ग सगळं, तु मला आधी का नाही भेटलीस ग?"

"आधी म्हणजे कधी?"

"तुझ्या माझ्या लग्नाच्या आधी ग, तेंव्हा भेटली असती ना तर आज माझ्या घरी तू माझ्या साठी टिफिन बनवला असता, माझी किती काळजी घेतली असती"

"काळजी तर मी आत्ताही करते रे, अन काय रे शहाण्या सगळं मीच केलं असत अन तू काय केलं असत मग"

"मी फक्त तुझा लाड केला असता, तू सगळे काम केले असते, मी तुला बघत बसलो असतो"

"वा वा वा...म्हणजे गोड बोलून सगळं माझ्याकडूनच करून घ्यायच, मी खूप रागावली असती तुझ्यावर विक्रम"

"अस कस...मी आपल्यात भांडणं होऊच दिली नसती, अन झालं जरी असतं तरी मी तुला लगेच मनवलं असत"

"कस मनवलं असतं?"

विक्रम ने माझे दोन्ही हात धरून त्याच्या समोर बसवलं अन बोलला,

"तुला अस बसवलं असत माझ्या समोर अन माझ्या हाताने जेवण भरवल असत अन तुला गालावर किस करून लव्ह यु बोललो असतो..."

"मग मी पण तुला लव्ह..."

अन बोलता बोलता दोघांनाही भान राहील नाही की आम्ही एकमेकांत हरवून काय बोलतो आहे, पण जेव्हा जाणीव झाली तेंव्हा मात्र आम्ही एकमेकांच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हतो. मला स्वतःलाच कळत नव्हतं मी इतकी कशी वाहवत जाते विक्रम सोबत......

"अग...मी विसारलोच की मी गिटार आणलं आहे"

"कशाला आणलं ते ओझं..?"

"ते का, माझा अजून राग आला तुला तर ते गिटार माझ्या डोक्यात घाल 😂😂"

"मूर्ख....तुझी शिक्षा बिचाऱ्या गिटार ला का देऊ मी😅😅, चल पटकन एक चांगल गाणं म्हणून दाखव मला, तुझी शिक्षा आहे ती मला काल त्रास दिल्याबद्दल"

"हो गाणं तर नक्कीच म्हणेल मी पण आधी तसा माहोल तर बनव.."

"आता मी काय करू त्यासाठी,,😦😦"

"काही नको फक्त बघ माझ्याकडे...आणि लाजू नको😂😂"

आणि विक्रम ने गाणं म्हणायला सुरू केलं, त्याचा आवाजच एवढा मधुर होता की त्यात मी सगळं विसरून जायची...


"मेरी सांसो में बसा है, तेरा ही एक नाम
तेरी याद हमसफर सुबह शाम
तू मेरे दिन में, रातों में, खामोशी में, बातों में
बादल के हाथों मैं भेजू तुझ को यह पयाम
तेरी याद हमसफर सुबह शाम"


मला आणि विक्रम ला हे गाणं खुप आवडायचं. पण आज फक्त हे गाणं आवड म्हणून विक्रम ने म्हटलं नव्हतं, त्याच्या भावना मला
कळत होत्या, त्यामुळे मी त्याच्याकडे बघायचं टाळलच. आणि नजर चोरत च बोलली,

"छान म्हटलं रे गाणं...निघुयात का आता?"

"थोडा वेळ थांब ना प्लिज...बघ ना अर्धा वेळ तुला मनवण्यातच गेला, थोड्या वेळ गप्पा मारू ना चांगल्या"

"मग तू काल असा का मजाक केला, मला किती दुखलं मनात, त्यामुळेच मी रागवली"

"तुला का एवढा फरक पडतो ग माझ्यामुळे..."

"तुला नाही कळणार विक्रम तू काय आहेस माझ्यासाठी, तू ना माझ्यासाठी ऑक्सिजन सारखा आहेस, मला तुला गमवायच नाही रे, मला काही टेन्शन असेल अन तुला बोलली ना तर सगळं हलकं होत माझं मन, आनंद जरी असेल तरी तुला सांगितल्याशिवाय मी तो आनंद उपभोगू शकत नाही आणि त्यामुळेच मला असं वाटत की आपल नातं दोन्हीकडूनही तसच असावं, तू खुप खूप खास आहेस........हे तर माझे विचार आहेत तुझ्याबद्दल, तुला काय वाटत रे माझ्या बद्दल???"

"तुझं ऐकून मला काहीच सुचत नाही आहे ग, नको मला इतकं महत्व देऊ, कधी आयुष्यात आपले मार्ग वेगळे झाले तर तुला त्रासात नाही पाहू शकणार मी,"

"पण तरी काही तरी वाटत असेल ना तुला माझ्याबद्दल?"

"मी नाही सांगू शकत तुला काय वाटतं मला तुझ्याबद्दल सोनू....प्लिज मला पुन्हा नको विचारू"

विक्रम च उत्तर ऐकून खुप राग आला मला. पुन्हा नको विचारू असं कसं बोलू शकतो तो...म्हणजे माझ्या भावनांची कदर नाही का याला....मी रागारागत उठली अन जायला निघाली,,

"थांब ना ग, नको इतका राग करुस"

"नाही मला उशीर होतोय मला जायचं आहे विक्रम"

आणि मी रागारागत जायला निघाली. मला वाटत होतं मी विक्रम ला काही विचारायलाच नको होतं, विचारलं नसत तर मला त्रास झालाच नसता. मी गाडीत जाऊन बसणार तर गाडी लॉक होती, मागे वळून बघितलं तर विक्रम कुठेच दिसत नव्हता. मी इकडे तिकडे शोधलं त्याला पण तो कुठेच दिसत नव्हता, त्याचा फोन ही लागत नव्हता. मी खूप घाबरली की कुठे गेला असेल विक्रम. मी असं रागवून निघायला नको होतं, अस वाटायला लागलं मला. मी त्याला खूप आवाज दिले पण विक्रम कुठेच दिसत नव्हता आणि मला आता रडू कोसळलं....मी हुंदके देऊन रडायला लागली आणि मला आवाज आला.......

--------------------------------------------------------------–---

क्रमशः