काळ आला होता पण वेळ नव्हती आली भाग ६
मिनी आपले कोरडे वस्त्र एका दगडावर ठेवून ती आंघोळीला गेली.नकळत माझी नजर त्या पोकळी वर गेली आणि त्यातून आंघोळ करणारी मिनी मला अर्धवट दिसू लागली.पहिल्यांदाच माझ्या मनाला एक हुरहुर जाणवली. मी तो नजारा एकटक बघू लागलो.पण मनात असे काही नव्हते बस पाहत होतो. नकळत माझ्या हृदयाचे ठोके जोराजोरात वाढू लागले आणि मी मंत्रमुग्ध झालो.मिनीच्या आवाजाने मला भाण आली. मला माझीच लाज वाटली. मला स्वतःवर क्रोध अाला मी हे काय करतोय.
ती एक साधवी आहे. याशिवाय ती माझ्या मित्राची प्रेयसी पण होती आणि तिच्यासाठी माझ्या मनात असे विचार हे पाप आहे. मी विचार करू लागलो तोच मिनीने पुन्हा हाक मारली. तिने तिचे वस्त्र दुर ठेवल्यामुळे तिला घेता येत नव्हते. म्हणून तिने ते मला देण्याची विनंती केली.
मी उठून उभा झालो तिचे वस्त्र एका हातात घेऊन त्या झऱ्याच्या जवळ दुसरीकडे मान करून तिला देण्याचा प्रयत्न करत होतो. पण ते काही तिच्या हातात मला देता येत नव्हते. नकळतच मी हात कुठे आहे हे बघण्यासाठी मी मान वळवली तोच माझ्या डोळ्यांनी तिचे नग्न शरीर बघितले. मी पटकन डोळे मिटले आणि वस्त्र देऊन चूकल्यागत आपल्या स्थानी येऊन मान खाली टाकून बसलो.
ती थोड्या वेळाने वस्त्र परिधान करून माझ्या पुढ्यात आ ली आणि विचारले काय झाले ?माझी हिम्मत नाही होत होती तिच्याशी नजर मिळवाची. "काय नाय"म्हणून मी विषय टाळण्याचा प्रयत्न केला. कदाचित माझी अवस्था बघून तिला कळून चुकले की माझ्या मनात काय द्वंद चालू आहे म्हणून.
ती म्हणाली ,"अरे काय वेड्यासारखा लाजत आहे. यात तुझी काही चूक नाही. हा देह तर नश्वर आहे यात काही बघण्यासारखे नाही आहे.जे तू बघितलं ती माया मोह आहे ते तुम्हाला मनुष्यांना वेड लावत. आम्ही संन्याशाना नाही. चल उठ आता माझ्या पूजेची वेळ झाली आहे. जर तुला नसेल तर यायचे तर आराम कर. तिच्या या धीराने मी सावरलो आणि मान वर करुन तिच्याकडे बघत असता तिच्या कपाळावर कसलेही त्राण नव्हते.
भगवे वस्त्र परिधान करून दोन्ही हाताला फुलांची माळ, गळ्यात रुद्राक्ष, चेहर्यावर एक विलक्षण तेज आणि ओठावर एक स्मितहास्य. मी याआधी ज्या मिनीला बघितले होते ती ही नव्हतीच. तिच्या रुपाने मी पूर्ण म्हणून गेलो होतो. असं वाटत होतं की मी तिला असच पाहत रहावं आणि ती माझ्यासमोर अशीच उभी राहाव. मला तिला पाहून तिची पूजा करावीशी वाटत होती. इतकी तिची प्रतिमा न्यारी होती."चालत आहे ना" तिच्या पुन्हा एकदा आवाजने मी "हो हो" म्हणत उठलो.
आता आम्ही जिथे शंकराची पिंड होती त्या गर्भगृहात आलो.हवन कुंड आता पण त्या चालीरीती मध्ये पेटत होते. आम्ही दोघेही पिंडीजवळ आलो. तिने हातात असलेल्या थाळी मधील फुले वाहिली. मलाही वाहण्यास सांगितले.त्यानंतर पांढऱ्या रंगाचा टिळा तिने माझ्या माथ्यावर लावला आणि इशाऱ्याने हवंनकुंडाजवळ बसण्यास सांगितले. मी चुपचाप कुंडाजवळ येऊन बसलो. काही वेळ स्तवन केल्यावर ती पण माझ्यासमोर येऊन बसली. पुढच्या क्षणी तिचे ध्यान लागले आणि मी मुकदर्शन होऊन ते सगळं पाहू लागलो.
काही समजत नव्हते तरी समजण्याचा प्रयत्न करत होतो. थोड्या वेळाने हवन कुंडातील अग्नीने जोर पकडला आणि ती आता अधिकच तीव्रतेने पेटू लागली. इकडे मिनी तोंडातून सारखी काही मंत्र पुटपुटत होती. अचानक तिच्या देहात कंपनी सुरू झाले. ती जोरजोरात शरीराला झटके देऊ लागली.एक प्रकारचे संगीत तिथे नांदू लागले. डमरू आणि घंटानाद मला स्पष्ट ऐकू येऊ लागला.आता ती उठून उभी झाली आणि त्या अग्नीभोवती गिरक्या घेऊन नाचू लागली. हे सगळं माझ्यासाठी अचंभीत करणारं होतं. पण मी चुपचाप सगळं बघत होतो.
तिथले वातावरण आता पूर्ण बदललेले होते. नाना तरेची आवाज मला येत होते. जणु काही इथे असंख्य भूत जमा होऊन नाचत असल्याचा मला भास झाला. पण भीती वाटत नसून उलट मला ते प्रसन्न करणारे वातावरण वाटत होते. थोड्या वेळाने मीनिने त्या हवनकुंडच्या आत हात टाकून त्यातील भस्म आपल्या कपाळाला लावली आणि माझेही कपाळाला लावली. आश्चर्य तिला काही झाले नाही आणि मलाही काही इजा झाली नाही.उलट एक तर तरी माझ्या अंगात निर्माण झाली आणि मी पण मीनि बरोबर तिच्या भोवती गिरकी घेऊन नाचु लागलो.थोड्यावेळाने दमून मी पुन्हा खाली बसलो. मीनि पण आता शांत होऊन आपल्या जागी येऊन बसली. हळूहळू अग्नि पण शांत झाली. विजेचा कडकडाट झाला आणि मीनिने ताडकन दोन्ही डोळे उघडले. तितक्यात आकाशवाणी झाली.
"हे बालीके तुझी तपश्चर्या सफल झाली. ज्या महत्त्वपूर्ण कामासाठी नियतीने तुझे निवड केली आहे. आज तो दिवस आला आहे. आता तुला संन्यासी जीवन सोडून गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा आहे.तुझा पती तुझ्यासमोर आहे. तू या बालका सोबत विवाह कर.याच्या आयुष्याला ग्रहण लागले आहे. ते तुझ्या सोबत विवाह झाल्यावर त्यावर अंकुश लागेल आणि तुमचे कल्याण होईल. तुझ्या पत्नी धर्माने यांचे जीवन काल दीर्घ होईल तथास्तु."
त्यानंतर अचानक पूर्ण वातावरण शांत झाले. मिनी आता आपल्या साध्या चेतने मध्ये आली होती. झालेल्या आकाशवाणीला तिने महादेवाची आज्ञा मानली आणि मला विवाह करण्यासाठी समोर यायचे आवाहन केले.पण माझ्या मनात वेगळेच गोंधळ चालू होते.एक तर माझ्या जीवनाचा काही भरवसा नाही होता. वरून मिनी माझ्या मित्राची प्रेयसी पण होती. जरी आज मला तिच्याबद्दल आकर्षण वाटले असले तरी माझे मन मला खात होते.तसेच ती आज या स्वरूपात होती त्यामुळे तिचे स्वत्व नाहीसे करणे मला जमलेच नसते.
माझी व्यथा कदाचित तिने ओळखून घेतली. मग तिनेच प्रश्न केला काय झाले?कसला विचार करतोय?
मी :- काई नाई असंच.
मिनी :- असंच काय असंच तु आकाशवाणी ऐकली ना मग तुला माझ्यासोबत विवाह करायचा आहे ना.
मी:- खरं सांगु त मले वाटतं मनातून म्या तुया सोबत लगीन करावं पर मला चुकल्या गत वाटत हाय.एक तर तू माया मित्राची प्रेयसी व्हती. वरून आता तू एक सातवी पर हाय मले काई बरोबर वाटत नाई हाय माय मन मलेच खात हाय. काय करू?काय नाय?काई सुचत नाई हाय.
मिनी:- अरे त्यात इतका काय विचार करतोस.ते माझ्या किंवा तुझ्या हातात नाही आहे. ही महादेवाची इच्छा आहे. ते नियतीनं ठरवल आहे त्यामुळे मनात काही ग्लानी करून नको घेऊ.जर तुला मी आवडत नसेल आणि तुला इच्छा नसेल तर काही हरकत नाही. (तसा तर तिला पहिल्यापासूनच मी तिच्या प्रेमात पडलो होतो तिच दिव्य रूप पाहून मनात नवीन अंकुर फुटले होते)
मी:- नाय नाय तशी गोष्ट नाई म्या तयार हाय.
मग आम्ही दोघांनी पण महादेवाला साक्ष म्हणून त्या गुहेत गंधर्व विवाह केला. इतक्या दिवसानंतर ही पहिली घटना होती जी माझ्याबाबतीत चांगली घडली होती. त्यामुळे मला आनंद तर होताच पण हे असे मला करायचे नव्हते. ते मला आपल्या मित्रांमध्ये करायचे होते कारण माझ्या मित्राशिवाय कोणती गोष्ट करणे मला पसंत नव्हते. पण आता परिस्थितीची अनुकुलता आणि माणसाची जिद्द या दोन्ही गोष्टींना अनुसरून मी पाय समोर टाकला होता.
विवाह संस्कार पुर्ण करुन आम्ही मग शयनकक्षाकडे गेलो.मी जाऊन त्या बिछान्यावर बसलो. मिनी म्हणाली,"तू बस मी थोडा वेळाने येते तोपर्यंत जर भूक लागली असेल तर ही फळे खाऊन घे" मला काही भूक नव्हती त्या दिव्य वातावरणात माझी तहान भूक केव्हाच संपली होती. मी तिथेच बसून मिनीची वाट बघू लागलो.
ती थोड्यावेळातच आली तिच्या एका हातात कसले तरी पात्र होते आणि दुसऱ्या हातात सुगंधी फुलांनी आणि ईत्तरांनी भरलेली एक टोकरी होती. ती जवळ आली तिने मला उठण्यास सांगितले तसा मी उठून उभा झालो असता तिने ती फुले बिछान्यावर सर्वत्र पसरवली.ज्यामुळे तो आता जणू फुलांचा गालिचा वाटत होता. त्यानंतर तिने सोबत आणलेले ईत्र जिकडेतिकडे शिंपडले ज्यामुळे तिथले वातावरण सुगंधित होऊन गेले.मन रोमांचित होऊन फुलू लागले. तिने सुद्धा मोगऱ्याची फुले आपल्या केसांना लावली होती आणि आता तिथे तिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले होते. ज्यामध्ये ती आणखीनच उठून दिसत होती.हा आता तिने मला इशारा करून बसण्यास सांगितले. तसा मी त्या सुवासाने मंत्रमुग्ध झालेला त्या पुष्प गालिचे वरती बसलो. ती चोर पावलांनी माझ्या जवळ येऊन बसली.
त्यानंतर मला मात्र मला काय करावे सुचेना मी अगदी भांबावून गेलो कारण अजूनही माझ्या मनातले द्वंद्व काही मला परवानगी देत नव्हते समोर वाढण्यास.काही वेळ असाच मी गप्प बसून राहिलो.
कदाचित मीनीला माझी व्यथा कळली. एक स्मितहास्य दे त तीने माझ्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाली, "जर तुला काही अडचण असेल तर मला सांग तू जर नाही म्हणत असेल तर मी दुसऱ्या खोलीत जाते तू आराम कर." तिच्या या धिराने मी मी थोडा सावरलो आणि म्हणालो," नाय नाय तसं काई नाई तू कुठ पण नग जाऊ."
त्या वातावरणात तिच्या त्या उबदार स्पर्शाने माझ्या शरीरात एक आगळी वेगळी चेतना लहरली. साधारण स्त्रीपेक्षा तिच्या शरीराचे तापमान निराळेच वाटले. तिचा हात तसाच हातात घेऊन मी तिच्या डोळ्यात बघू लागलो.ती निष्पक्ष माझ्या डोळ्यात डोळे टाकून पाहत होती. हळुच मि तिच्या गालावर चुंबन घेतले. एकादे गोड पदार्थ सारखे मला तिचे गाल वाटले.त्यानंतर तिच्या ओठावर आपले ओठ ठेवताना मला अमृत पिल्याचा परमानंद प्राप्त झाला. पण असे करताना मला असे जाणवत होते की माझ्या सर्वसाधारण देहामध्ये असंख्य शक्तींचा समावेश होत आहे.माझ्या रोम रोम मध्ये कमालीची स्फुर्ती येत होती. माझ्या शरीरातील रक्त प्रवाह आता प्रकाशाच्या गतीने अंगात वाहत होते. त्यानंतर मला स्वतःवर ताबा ठेवणे कठीण झाले आणि संपूर्ण रात्र मी तिच्यासोबत मधूचंद्रा मध्ये घालवली.
सकाळी ब्रह्म मुहूर्तावर मला जाग आली मीनि पण जागी झाली होती. नित्यकर्म आटोपून स्नानादी करून मी आता समोरच्या प्रवासासाठी तयारी करू लागलो. पण त्या आधी मी सकाळची महादेवाची पूजा अर्चना करून घेतली.
आता मला एक वेगळीच अनुभूती होती. असं वाटत होते माझ्या पाठीमागे आता कोणीतरी माझे रक्षण करण्याकरता उभे आहे.मनातून भीती,भय, शंका-कुशंका सर्वदूर झाल्या होत्या. आता फक्त गरज होती त्या महाराजाला भेटून यावरील उपाय शोधण्याची व या सर्व गोष्टी तून आपल्या मित्रांना वाचवण्याची. सर्व आटोपुन मी मिनीचा निरोप घेतला. मी परत येईपर्यंत तिला तिथेच वाट पाहण्यास सांगितले. ती अगदी निश्चिंत होती कारण तिला माहित होते की मी ज्या प्रवासाला लागलो आहे तिथे माझ्यासोबत काय होणार होते. तरीसुद्धा ईश्वर आज्ञा मानून तिने माझी एक दिवस या पत्नी होणे स्वीकारले. पण माझ्या विजयासाठी ती तिथेच महादेवाच्या चरणी ध्यानस्थ झाली.
मी आपले साहित्य घेऊन वर चढण्यास सुरुवात केली.खरंच तिथले दृष्य स्वर्गापेक्षा ही खूप सुंदर होते. रस्त्यात मला कुठे उंच शीला, छोटे झरे ,बर्फाचे दलदल सुद्धा लागले.ज्यामध्ये गुढगाभर पाय जमिनीत रोवला जायचा. एकेक पाय उचलत खूप मेहनतीने समोर वाढत होतो.तोच खूप जोराचे वादळ तिथे सुरू झाले. शरीरावर बर्फाचा मारा होऊ लागला. मी आणखीनच बर्फाच्या आत धसू लागलो. काही केल्या समोर वाढता येत नव्हते. अचानक खूप आवाज येऊ लागले. असं वाटत होते असंख्य भूत माझ्या भोवताली जमुन मला तिथे बर्फाची समाधी बनवण्यात लागले आहेत. काहीच दिसत नव्हते पण मी ते सर्व भासुन घेत होतो.
बर्फ आता माझ्या गळ्यापर्यंत आला होता आणि आता मला वाटले की मी इथे बर्फात दबून मरणार. वादळ अजून जोरात वाहत होते. हळूहळू मी संपूर्णतया बर्फात दबून गेलो. फक्त माझे दोन हात वर होते.आता मला माझे मरण स्पष्ट जाणवत होते. माझे पूर्ण शरीर आता थंड झाले होते. हृदयाची स्पंदने हळूहळू कमी होऊ लागली होती. एकूण आता मृत्यु माझ्यापासून दोन हातांनी फक्त लांब होता तो मला कोणत्याही क्षणी गिळणार होता.
इकडे सकाळ झाल्यावर मुक्याने आपली कुराड गोट्यावर पाजवली वरून कोईत्याला सुद्धा धार लावली . सकाळची न्याहारी करून त्या तिघांच्या शोधात घराच्या बाहेर पडला.आधी तो माझ्या घरी गेला पण मी तर केव्हाच गडाकडे कूच केली होती. माझ्या आईकडून त्याला कळले की मी कोणत्यातरी कामानिमित्त बाहेरगावी गेलोय म्हणून.मी घरी तसेच सांगितले होते. तसा मग तो कार्तिक कडे निघाला वाटेत त्याच्या डोक्यात विचार आला.
"कस्यापाई गेला असलं ह्यो पंक्या बायेर गावले? अन गेला त दोन सबद बोलुन बी नाई गेला. अचानक कोटी गेला? असं त नाई त्या हरामखोराइले हुडकायले त नसन गेला. कारण ह्यो बी काई गप्प बसून रायनारा त नाई व्हय. पण यकलाच गेला हे बराबर नाई. असं असन त मले लवकर त्याले गाठा लागते. नाई त अनर्त व्हईल. थे हारामखोर त्याले यकट पा ऊन काई बर वाईट करुन टाकल. तसे बी ते लई धड धाकट हायेत असं पंक्यान मले सांगितलं व्हत. थो यकटा काई तीगले नाई सांबडू सकण मले लवकर त्याले मदत कराले जावा लागल."म्हणत तो धावू लागला.
धावत धावत तो कार्तिकच्या घरी गेला पण कार्तिक त्यावेळेस घरी नव्हता.तो पण न सांगता घरून आपले लिखाण करण्यासाठी गेला होता. आता मात्र मुक्याला चांगलीच धास्ती भरली कारण त्याला माहित होते की माझी आणि कार्तिक चे धागेदोरे एकमेकांशी जुळवून आहेत.दोघेही जागेवर नसणे म्हणजे काहीतरी घोळ आहे हे त्याच्या लक्षात आले होते.
राहुल याच्या खुणा पासून तो खूप व्यथित झाला होता रात्रभर त्याला झोप नव्हती लागली रात्रभर तो स्वतःशीच पुटपुटत होता,"कोण हूते साले थे हरामखोर? यक वेडा हाती लागु दे साल्याले तुकडे तुकडे करून कावल्याले टाकीन. पर हे दोगे गेले कुठी? पंक्या बी नाय अन् कर्तिक्या बी नाय दोग त्यायच्या हाती त नाई लागले. देवा महादेवा माया मित्रायले वाचव रे बाबा. जर थे कुणत्या संकटात आसल त मले लवकर तीत ने रे बाबा."
शोधत शोधत अखेर मुक्याने कार्तिकला शोधून काढले तो एका झाडाखाली बसून कविता लिहिण्यात मग्न होता त्याला पाहून मुक्या थोडा रागातच म्हणाला,
मुक्या :- आर काय मानुस हाय तु म्या तूले पुऱ्या गावात हुडकत हावो अन् तु इत लिवत बसला हायस.
(कपडे झटकत उठत त्याच्याकडे बघत म्हणाला)
कार्तिक:- आर पर झालं काय असं मले सोदानले?
मुक्या:- आर म्या पंक्या कडे गेलो तिथ माईत पडलं थो कुट व्हय त बायर गावी गेला मंते. यक त पयलेच थे तिन हरामखोर राहुल्याचा खुन करुन मोकाट फिरत हायेत अन् ह्यो यकलाच गेला मनून तुले ईचारत हावो मईत असन त.
कार्तिक:- असं व्हय मंग काई टेनसन नग घेवु थे त्यायच्या हाती नाई लागत.
मुक्या:- मंजे तुले मनाचं तरी काय हाय ? डोकं बिक जागेवर हाय न व तुय. राहुल्या सोबत का झालं तुले ठाव नाई व्हय. पंक्या यकला त्यायचा हाती लागला त माईत नाई काय व्हईल त.
कार्तिक:- आर येड्या थे इतके येडे नाईत थ्या रिकामी लोकांच्या मांग लागण. थे गेले गडावर महादेवाच्या. राती यक सादू महाराज आला व्हता त्यानं सांगितलं त गेले आपल्या परस्नाच उत्तर सोदांले.
मुक्या:- (आपल्या जागेवरून आश्चर्याने मागं सरकत तो म्हणाला) गडावर महादेवाच्या गडावर आर येड बीड लागलं काय वय त्याले तिथं मराले गेला. थे वी भोंद्या महाराजाचं आय. अन अस कुणते प्ररसन पडले त्याले ज्याच्यासाठी थो तिथं मराले गेला मले काई समजत नाई.
कार्तिक:- आर टेन सन नग घेऊ काई नाई व्हत त्यायले थो महादेव हाय न बसला तितं तोच करन त्यायच राखण. तु उगा कायले डोक्यालं ताप करुन घेत.
मुक्या:- आर बयाड झाला का तु. तुले माईत नाई हाय का तीत आजपरत कुणी बी गेलं नाई जो बी गेला थो हाय खात परुन आला खालूनच. थो भंते गेला व्हता मंते लोक वर्त त आज परत आला नाई अन तु मंत का टेनसन नग घेऊ. बरं तीत त चवकीदार रायते मंग हा गेला कसा.
कार्तिक:- आर माया वडखीचा हाय न व थो म्याच परवाना काडून दिला यका पावती मंदी.(आपल्या टकल्यावर हात फेरत मनाला)
मुक्या: - वा तुया सारखा दोस्त रायला त दुस्मनची का गरज हाय. सवताच आपल्या दोस्तले मुरत्युच्या तोंडात धाडलास आन वर तोंड करुन सांगून बी रायलास. नाई तवा त सोबत जातं आन ह्या वेडेला तुले का झालं व्हत? संग जाता नाई आलं तुले.
कार्तिक:- म्या गेलो असतो त तुले कोण सांगितलं अस्त. तस बी भाऊ न मले तुयावर नजर ठेवा साठी मनल व्हत.
मुक्या:- वारे माया दोस्ता काय मानावा तुले बरं आता दोन पावतीचा जुगाड कर अन चाल माया सोबत त्याले सोदाले.
देव जाणे कोणत्या परीइस्थिती मंदी असल थो. आपल्या ले जाले पायजे लवकर नाई त म्या सवता ले कदी माफ नाई करु सकणार. तुले नसन याच त मले परवाना काढून दे.
कार्तिक: - वा म्या इत रावून का करु? म्या बी येतो. बस उगी गेलो अन बगी आलो.
दोघेपण घराकडे निघाले कार्तिक ने वाटेत मामाच्या घरून दोन मवाच्या बाटल्या भरून घेतल्या चौकीदारसाठी. घरुन आवश्यक वस्तू बॅगेत भरल्या आणि निघाला मुक्याला घेऊन गडाच्या दिशेने सोबत न्याहारी पण बांधून घेतली थोडा दूर आल्यावर वाटेतच गावचा सरपंच त्यांना आडवा झाला. त्यांना पाहुन तो टिंगल उडवीत म्हणाला,"
सरपंच:- काय मुकेसराव कोठची तयारी? आन ह्यो बगा(सोबत असलेल्या आपल्या सहकारी ला म्हणतो) सोबत कोण हाय माननीय लेखक साहेब. गावात याच्या लीखानाले कोणी कुत्र हुंगत नाय मनून गाव सोडुन चालला वाटते.(आणी हसायला लागला. कार्तिक आणि सरपंच यांची आपसात कधी बनलीच नाही दोघंही एकमेकांच्या विरोधात होते. पण कार्तिकच्या सडेतोड भाष्य आणि स्वभावामुळे त्याची कधी चालत नसे.)
कार्तिक:- नाय नाय म्या मस्नात जात हाओ तुये सारण रचाले. तूये दिस भरले हायेत न मनून.(सरपंच रागाने लाल होवुन )
सरपंच: - ये मुक्या आपल्या ह्या दोन कवडीच्या दोस्त ले समजावून ठीव मायासी अदबीन वागाच मनून नाय त लई भारी पडन याले.
कार्तिक: - आर ये लमच्या धमकी कोणाले देतो रे माई किंमत कवडीची हाय त तूयी का हाय रे चोरा? आमच्या गोर गरिबांच्या कष्टावर त तुयी जिंदगी हाय. सरकारचे पैसे खावून लई माज आला र तुल याद राख यक ईषारा केला ना गावात त पुढच्या खेपेला कुत्रा बी तुले वट नाई करणार चाल निग इथुन.
(कार्तिकच्या शब्दाने सरपंच खूप खवळला आणि अंगावर चालून आला तोच मुक्याने कुऱ्हाड काढून गर्जना केली)
मुक्या:- खबरदार सरपंच जर यक पाय बी सामोर वाडवला तर मुक्याशी गाठ हाय. मुकाट्यानं इतुन चालता हो गावाचा सरपंच हाय मनून आता परत मान दिला पण दोस्ता वर हात उगारला त इतच जिता गाडीन. चाल र तु म्होरं (कार्तिक ला समोर ढकलत मुक्या म्हणाला. सरपंच मुक्या ला ओळखुन होता त्याला त्याच्या सामर्थ्य विषयी चांगले ठावूक होते म्हणून माघार घेणे त्याला योग्य वाटले. )
चालत चालत ते दोघं गेटजवळ आले त्या दोघांना पाहून चौकीदार स्वतः बाहेर आला व म्हणाला,
चौकीदार:- आर काय कार्तिक राव कुठ निगाले ?
कार्तिक:- तुमच्या कडेच आलो साहेब. हा माया मित्र मुक्या आमी दोघं मिळून माया मित्राले सोदाले जात हाओ तुमची मदत पायजे.
चौकीदार: - आर साहेब फसवाल का?मायी नोकरी जाईल तुमच्या नादी यक त तुमचा साथीदार अजुन आला नाय वरुन तुमि दोग पण जाता मनता. नाय नाय हे नाय जमलं मले माफ करा.
कार्तिक:- आव कसं नाय जमणार म्या तुमची व्यवस्था केली हाय ह्या घ्या तुमच्या दोन बाटल्या. अन कोनाले भनक बी नाय लागण माया सबद हाय तूमाले.
चौकीदार:- आर पर कस्या पायी संकट आंगावर घेता राव थो गेला जाऊ द्या त्याच्या पायी आपला जीव कायले धोक्यात घालता.
कार्तिक:- कसं हाय साहेब दोस्ती मंदी जान भी हाजिर हाय तुमि नाय समजणार. चला रस्ता द्या.
चौकीदार:- तुमची जसी मर्जी म्या जीप न सोडुन देतो अर्द्या परत मंग तुमि जावा सामोर पर लवकर येजा.
कार्तिक :- व्हय व्हय (हसत हसत समोर जाऊन जीप मध्ये बसला माग मुक्या आणि मग चौकीदाराने त्यांना अर्ध्यापर्यंत नेऊन सोडले)
तर मित्रांनो समोर काय झाले ते वाचायला विसरू नका भाग 7 व आपल्या प्रतिक्रिया पण द्याला विसरु नका.
धन्यवाद.