aadishakti stree in Marathi Women Focused by Archana Rahul Mate Patil books and stories PDF | आदिशक्ती स्री

Featured Books
Categories
Share

आदिशक्ती स्री

आदिशक्ती स्री..

यत्र यत्र नार्यास्तू पुज्यंते.. रमंते तत्र देवता...
या उक्तीप्रमाणे ज्या घरात नारीची पूजा केली जाते किव्वा तिला चांगली वागणूक दिली जाते देव तेथेच रमतात..

संत श्रेष्ठ ज्ञानदेवांना ही दोन शब्द सांगणाऱ्या मुक्ताबाई असो की संतनामदेव यांच्या समवेत भक्ती त रंगणाऱ्या संत जनाबाई असो...

जनकराजाचे वैभव वाढणारे, दरबारात हे जिला मान असणारे साध्वी गार्गी.. अहिल्याबाई होळकर,असो,की राजमाता जिजाबाई...
झाशीची राणी लक्ष्मीबाई, सीता आणि राधा, द्रौपदी, कुंती, दमयंती.. ई. आर्य महिला..
संत मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई,सखुबाई ई.,संत जन..
इंदिरा गांधी पासून प्रतिभा ताई पाटील राजकारण गाजेपर्यंत...

कल्पना चावला, किरण बेदी, पी. टी.उषा, म दर तेरेसा, सुनीता विल्यम्स, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, यांनी आपल्या भारत भूमीचे नाव संपूर्ण विश्वात ख्याती आहे.
अश्या अनेक महिला आहेत की त्याच्या वारसाहक्काने आपण समृद्ध आहोत.

.. 💞 स्री.💞
गंभीर नाही तर खंबीर आहे ...
वार नाही तलवार आहे ...
बोठलेली नाही तर धार आहे. ..
श्री म्हणजे भिजलेली राख नाही
तर पेटता अंगार आहे ..
जिव्हाळ्याने पाहिली तर
बहिणीची माया देते ..
लहानग्या बाळाला आईची छाया येते ...
शांत रहाणे हा स्री ता भाग आहे
वरून जरी पाणी असले तरी
आतून ती आग आहे
वागणी तिचे एकदम कडक आणि सक्त आहे
कारण तिचा मध्ये जिजाऊचे रक्त आहे..
इतिहास सांगतो आमचा श्री ने च शत्रू उडवला ..
झाशीची राणी लक्ष्मीबाई ने किल्ला लढवला ..
जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडविला ..
ताराबाईने महाराष्ट्रात औरंगजेब रडवीला...

तारेवरची कसरत करताना बाईची किती ओढातान होते... पण ही कसरत करत असताना ती तिचा तोल मात्र कधीही जाऊ देत नाही.. जातो तो तर तिच्या स्वास्थ्याचा स्वाभिमानाचा. ..
बाई आता फक्त बाई राहिली नसून आता एक सुपर वूमन झाली झाली आहे ..सुपर वुमन होण्यासाठी तिला प्रत्येक कार्यात स्वतःला सिद्ध करावं लागतं ..
सकाळी आपल्या बाळाच्या काळजी पासूनचे दिवसभर काम नवऱ्याची, सासू-सासर्‍यांची सेवा करणे आल्यागेल्याची काम, आदरातिथ्य करणे आणि प्रत्येक कार्यात मन झोकून काम करणे.. हीच तर सुपरवूमन आहे ..नाही का एवढे करूनही तिला मात्र स्वतःसाठी कधी वेळच नसतो तो तीला काढावा लागतो ...सगळ्यांना असे नाही... तिनेही कधीतरी स्वतःसाठी वेळ काढून स्वतःच्या समाधानासाठी स्वास्थ्यासाठी जागरूक असायला हवी... यावर तुमचे काय मत आहे.
प्रत्येक महिलांना आपल्या आरोग्य पेक्षा आपले कुटुंब महत्वाचे वाटते त्यांनाच अग्रस्थानी...
खरतरं ..माया, ममता ,त्याग,जिव्हाळा या शब्दाखाली तिने स्वतःला जखडून ठेवलेले आहे ..एक प्रकारचं बंदिस्त जीवन जगते आहे ...

कुटुंबाप्रती आपले आद्य कर्तव्य आहे ..असेच म्हणून सर्वांना आपलंसं करते.. . तिने तिची आवडती गोष्ट शेवटच्या वेळी केव्हा केली असेल हेही तिची तिला ठाऊक नसणार हे नक्कीच आहे

तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गागणही ठेंगणे असावे..
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे..

जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी
ह्या अशा विश्व शक्तीचे नाव आहे नारी..

जन्मा येण्यास कारण तू..
नात्यांमधील गुंफण तू..
दुःखाला लिंपन तू..
मायेचे शिंपण तू..
झिजतना ही दर्वळणारे देव्हाऱ्यातल चंदन तू..
सर्वार्थाने या जगताला मिळालेले वरदान तू..
ती आई आहे ..
ती ताई आहे ..
ती मैत्रीण आहे ...
एक पत्नी आहे ..

ती मुलगी आहे
ती जन्म आहे..
आदी आहे..
अंत आहे..

ती सुरुवात आहे
सुरुवात नसेल तर
बाकी सारे व्यर्थ आहे
जन्म घेऊन टिकनारे
ती नाते जोडते आहे..

.......✍️✍️✍️💞 Archu💞

संत म्हणतात....

तुम सुनियो भारत नारी..
क्या हो गयी दशा तुम्हरि..
रामचंद्र अरू लक्ष्मण जैसे..
तुम्ने गोद खीलये थे..
भीष्म, अर्जुन भीमसेन से
तुमने योध्या लाये थे..
पिर पिसाच पुजके अब तुम पैदा किये मदारी .

की हो गयी दशा तूम्हारि

राजा रतन सिंह की रानी
पद्मावती सायानी थी..
अपने पती को लिहा चुडाके..
वीर बडी मर्दानी थी..
जलकर गयी पती के सांग मे..कैसा पतिव्रता धारी..

.. क्या हो गयी दशा तूम्हरि...

सीता,द्रौपदी दमयंती ने
कैसा पतीव्रत धारा था..
सहे हजारो कष्ट ही लेकीन..
धर्म से पग नाही हारा था..
पतीसेवा के बदले मे अब देत हो तुम गारी..

क्या हो गयी दशा तुम्हारी..

इंद्र कहे भारत की नैया..
तुम ही उबरोगी बेहना..
विद्या पढो, पतिव्रत धरो..
यही है उत्तम गेहना
बिन विद्या के हाय तुम कों अब कहते नार गवारी..

क्या हो गयी दशा तुम्हारी..

संत म्हणतात. ....राम ,लक्ष्मण यांच्यासारखे विर पुरुषांच्या तुम्ही जन्मदात्री आहात.. भीष्म,अर्जुन,भीमसेन यांसारखे पराक्रमी योधे तुमच्यापासून आहेत.. ज्याप्रमाणे राजा रतन सिंग ची पत्नी पद्मावती राणीने पतिव्रत धारण करून, आपल्या मृत्यू तिने जवळ केला..पण पतिव्रत धर्म सोडला नाही.. सीता द्राउपदी,आणि दमयंती या थोर आर्य महिलांनी आपल्या पटीव्रत धर्माचे पालन कले..त्यांना अनेक कष्ट सहान करावे लागले..म्हणून संत म्हणतात..की फक्त आर्य महीला मध्येच ती अधभुत शक्ती आहे.जी समग्र विश्वाला तारु शकते..आपण महिलांनी ही आपल्या धर्माचे पालन करून स्वावलांमी झाले पाहिजे.. विद्या प्राप्त करून आपण कुठलेही क्षेत्रात यश मिळवले पाहिजे....

✍️✍️💞Archu💞