तुझाच मी अन माझीच तू...भाग ९
आभा घरी जातांना सुद्धा तिच्या मनात मध्ये मध्ये राजस चा विचार येतंच होता.. आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा येत होते.. आभा तिच्या विचारात मग्न झाली होती. आणि ती यांत्रिकपणे तिची स्कुटी चालवत होती.. पण विचारात बुडली असल्यामुळे तिने चुकून सिग्नल सुद्धा मोडला आणि ही गोष्ट तिच्या लक्षात सुद्धा नाही आली पण तिथेच सिग्नल वर पोलीस मामा उभे होते.. आपण इथे असतांना ही मुलगी सिग्नल मोडते ही गोष्ट त्यांना सहन नाही झाली.. त्यांनी जोरात शिट्टी वाजवली...
"थांबा थांबा ताई.. सिग्नल मोडून कुठे चाललाय?" ट्राफिक पोलीस मामाने ने जोरात शिट्टी वाजवली आणि ते ओरडले. ट्राफिक पोलीस च्या शिट्टी मुळे आभा भानावर आली..
"ओह.. मी सिग्नल मोडला का.. सॉरी पोलीस मामा...चुकून मोडला सिग्नल.."
"मामा...लाडी गोडी!! म्हणलीस तरी सिग्नल मोडला त्याचा दंड तर घेणार.."
"प्लीज हो मामा.. मी नेहमी सिग्नल नीट पाळते.. पण आज लक्षातच नाही आलं.." पोलीस मामांची थोडी विनवणी करत आभा बोलाली...
"ह्यावेळी दंड भर मग पुढच्यावेळी विसरणार नाहीस बघ.. जास्ती नाही, १०० रुपये काढ!!" पोलीस मामा हसत बोलले.. आभा ला ही गोष्ट आवडली नाही. १०० रुपये म्हणजे पावती नाही.. पण पावती घ्यायची म्हणजे १००० रुपये जाणार खिशातून...आता काय करावे हे आभा ला कळत नव्हत पण ती म्हणाली,
"मामा, पावती द्या..."
"कशाला पोरी... १०० रुपयात होत असतांना १००० रुपये का देतेस?"
"मामा, मी चूक केली.. शिक्षा ही मिळाली पाहिजेच..." आभा हसली आणि तिने पर्स उघडली. त्यातून १००० रुपये काढले..आणि ते पैसे तिने पोलीस मामांना दिले.. आता पोलीस मामांकडे पावती देण्यावाचून काही पर्याय नव्हता.. सो त्यांनी पावती दिली आणि ते निघून गेले... आभा ला आपण बरोबर वागलो ह्याचा अभिमान वाटला. पण नसता भुर्दंड तिला बसला होता.. तिने कपाळावर हात मारून घेतला.. नेहमी अतिशय चोख वागणारी आभा...पण आज राजस मुळे तिला १००० रुपयांचा भुर्दंड बसला होता... पण तिला ह्याची जाणीव होती की चूक तिचीच होती. उगाच राजस ला ब्लेम करण्यात काहीही अर्थ नव्हता.. पण झाल्या प्रकार नंतर ती जरा अलर्ट झाली.. आणि मग मात्र तिने जाणीवपूर्वक राजस चा विचार बंद केला..तिला जाणीव झाली राजस च भूत तिचा पिच्छा इतक्यात सोडणार नाही..ती हसली.. पण काय होतंय त्यावर तिचे नियंत्रण अजिबातच नव्हते. तिने ही गोष्ट मान्य केली आणि काय होतंय ते पाहत राहायचा निर्णय घेतला... पण काही काळापुरते तरी आणि जाणीवपूर्वक मनातून सगळेच विचार काढून टाकले.. आणि ती परत स्कुटी वर बसून घरी जायला निघाली.. आता तिने लक्ष समोर द्यायचे ठरवले. ती जरा वेळातच घरी पोचली... आणि घरी पोचल्या पोचल्या ती आईला जाऊन बिलगली..
"मम्मे.. आय लव्ह यु ग!!"
"आय लव्ह यु टू आभा.. पण आज हे काय नवीन?"
"आज ऑफिस चा पहिला दिवस होता ना.."
"येस..." आईने अभिमानेने आभा कडे पहिले..
"प्लीज आई.. पटकन चहा देतेस का?"
"अरे वा.. खुश दिसतेस, आभा.. येस करते चहा! तू कधी येणार हे माहिती नव्हते सो आधी करून नाही ठेवला तुझा चहा.."
"नो वरीज आई.. मी येते ५ मिनिटात फ्रेश होऊन मग मस्त गप्पा मारत बसू.. आज इंटरेस्टिंग होता दिवस.. आज मजा झाली मस्त.."
"वॉव.. मला ऐकायचं आहे सगळ.. तू ये फ्रेश होऊन तोपर्यंत मी चहा आणते.. आणि काही खाणार का ग?" आई ने आभा ला प्रश्न केला.. आईच्या प्रश्नाला आभा ने मानेने होकार दिला..
"काहीतरी मस्त कर चमचमीत...आज मस्त मूड आहे.. आणि तुझ्याशी गप्पा पण मारायच्या आहेत.. बाबा कुठे आहेत ग?"
"बाबा बाहेर गेलेत.. मोस्टली येतील जरा वेळात.. नाहीतर मी आहे ना.. मला सांग तुझ्या गमती.."
"ओके आई... मी येते फ्रेश होऊन.. मग बसून मस्त गप्पा मारू!!" इतक बोलून आभा तिच्या रूम मध्ये गेली.. ती फ्रेश झाली.. तोंडावर पाणी मारलं. मग तिने स्वतःला आरश्यात निरखून पाहिलं.. आणि हसली. "किप गुड एम्स आभा बाई.. खूप प्रगती करायची आहे... आई बाबांना प्राऊड वाटल पाहिजे असं काहीतरी खूप मस्त करायचं.." यावेळी थोडा वेळ का होईना पण राजस तिच्या विचारातून नाहीसा झाला होता.. पण तो पुन्हा पुन्हा आभा च्या मनात, आभा च्या विचारात येत राहणार ह्याची आभा ला काहीच कल्पना नव्हती.. काही दिवसातच राजस तिच्या आयुष्याचा भाग होणार होता.. आणि तो ही खूप महत्वाचा भाग..
आभा फ्रेश झाली आणि हॉल मध्ये सोफ्यावर येऊन बसली.. आई अजूनही स्वयपाक घरातच होती.. आणि आई बाहेर आली नाहीये हे पाहून तिने आईला हाक मारली..
"आई.. ए आई! कुठे आहेस? ये की ग.. आणि काय करत असतेस स्वयपाक घरात इतका वेळ?" आभा ने तिची कुरकुर चालू केली.
"आले आले आभा.." आई आतूनच बोलली.. "आभा म्हणजे ना.. २ मिनिट दम नाही.. आणि अजिबात पेशंस नाही... पण गोड आहे पोर.. पाहता पाहता इतकी मोठी कधी झाली कळल सुद्धा नाही.." आई चं मनात विचार आला आणि तिच्या डोळ्यात एकदम पाणीच आले.. पण तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि केलेले पोहे बाऊल मध्ये काढले.. बाऊल आणि चहा घेऊन ती बाहेर आली..
"काय ग आभा.. तुला जराही दम कसा नसतो ग.." आईने चहा आणि पोहे टीपॉय वर ठेवले आणि ती समोरच्या सोफ्यावर बसली.."आता सांगा तुमच्या गमती जमती आभा बाई.." आई ने टीपॉय वरचा चहा उचलला.. आणि ती बोलली..
"ओह आई.. पोहे करत होतीस.. थँक्यू थँक्यू मम्मी.. मला किती दिवस तुझ्या हातचे पोहे खायचे होते.." खुश होऊन आभा बोलली..आणि पटापट पोह्याचे २ घास तोंडात कोंबले..
"हळू हळू आभा... आणि तुझा आज ऑफिस चा पहिला दिवस.. आमची आभा कशी नेहमी खुश पाहिजे आम्हाला.. आमच एकुलत एक अन बिघडलेलं लाडक पिल्लू आहेस ना.." आई हसत बोलली
"काय ग आई.. मी बिघडलेली आहे का?"
"मग.. आमच्या पिल्लाला फक्त ऑफिस च काम येत.. पण घर कामात कधीच लक्ष सुद्धा देत नाही.."
"काय ग आई.. एखाद्याला नाही येत स्वयपाक घरातल काम... पण बाकी तर हुशारे ना..?"
"हो हो... बाकी काय म्हणताय आभा बाई? आज एकदम खुश ना? ऑफिस आवडलं असं दिसतंय आमच्या पिल्लाला.."
"आई, फायनली ग..आता खऱ्या अर्थाने माझं आयुष्य बदलणार..आणि ऑफिस ना? जाम भारी आहे... "आभा उत्साहाने बोलली.. आई ने तिचं बोलण ऐकून तिच्या डोक्यावरून हात फिरवला..
"वा.. काम करतो ती जागा आणि काम करणारे चांगले असतील तर अजूनच मजा येते कामात..पिल्लू खुश आहे ना आमचं? पिल्लू खुश तर पिल्लाचे आई बाबा सुद्धा खुश!!"
"येस येस.. आई.. इतके कष्ट केल्याच चीज झालंय.. आणि तसही कॉलेज लाइफ सुद्धा मस्त एन्जॉय केलं होत आता जॉब लाइफ एन्जॉय करेन.. फार लोकांशी ओळखी झाल्या नाहीत पण काही लोकांशी झाल्या ओळखी आणि मस्त आहेत.. त्यात नेहा आणि राजस बरोबर जास्ती वेळ होते.. छान आहे त्यांची कंपनी.. "
"नेहा आणि राजस बरोबर वेळ घालवला.. छान! नेहा च मी समजू शकते पण राजस शी सुद्धा? वा वा... ही तर प्रगती आहे आमच्या आभा ची.. आणि पहिल्या दिवशी जे भेटतात आणि बोलतात त्यांच्याशी खास मैत्री होते बघ.. कर कर मस्त एन्जॉय.. आणि कोणी आवडलं तर फक्त आमच्या कानावर घाल ह आभा.." आई हसून बोलली..
"आई... तुझ ना काहीतरीच असत!! मी ओळखी झाल्या हे सांगितलं आणि तू कुठच्या कुठे पोचलीस.. प्रगती कसली... मी जनरल सगळ्यांशी बोलतेच पण मैत्री निवडक लोकांशी फक्त!! आणि तसही, आज माझा वाद झालाय राजस बरोबर!" आभा थोडी वैतागून बोलली... आई ने कपावर हात मारला
"ओह हो आभा.. पहिल्याच दिवशी भांडण केलं? काय झाल ग इतक? जरा मिळून मिसळून राहत जा आभा..का केलास वाद? काय बिनसलं?" आई बोलली..
क्रमशः