kadambari Premavin vyarth he jeevan Part 21 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २१ वा

Featured Books
Categories
Share

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २१ वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग – २१ वा

-----------------------------------------------------------------

सकाळपासून अनुशाच्या मनात एकच विचार चालू होता ..की –

ज्या गोष्टी सागर देशमुख यांच्याकडून जाणून घायच्या आहेत ..त्याची कशी

तयारी करायची ? याचा विचार करीत .बसली होती .

.आणि असे प्रश्न विचारले तर .देशमुखसरांची

प्रतिक्रिया एकदम विरुध्द असली तर..आपण हाती घेतलेले कार्य ..पूर्ण होण्याची शक्यता

अजिबात नव्हती . या भीतीने तिचे मन अगदी व्यापून टाकलेले होते ..

गेल्या आठवड्यातल्या भेटीत ..स्वतःबद्दल सांगण्यासाठी ,

स्वतः देशमुख अतिशय उत्सुक दिसले

दुसर्यांच्या मनात आपल्याबद्दल आता काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी ...

सरांच्या या सकारात्मक प्रतिसादाने .आपल्याला खूप आशादायक वाटते आहे हे नक्की .

पण म्हणून लगेच काही सगळे फमिली मेम्बर लगेच प्रत्यक्ष जवळ येतील याची खात्री नाहीये

..पण ..आता आपल्याला काही वेगळ्या पद्धतीने .असे काही करावे लागेल ..की

एकमेकांच्या बद्दल सध्या हे कसे आणि काय व्यक्त होतात .

..हे जाणून घेतले तर पुढचे सारे काम बरेचसे सोपे होईल.

तिने लगेच देशमुखसरांना कॉल लावला ..

रिंग वाजली आणि लगेच सरांचा आवाज आला ..

हेल्लो ..बोल अनुषा ..

स्क्रीनवर तुझा नंबर आणि नाव वाचून मला आश्चर्य वाटले ..त्या पेक्षा आनंदच जास्त झालाय.

तू पहिल्यांदा आपणहून मला फोन केलास .thanks.

बोल ..काय विशेष आहे ? कारण विनाकारण फोन केलेला नाहीस तू ...!

गुड मोर्निंग सर, तुमचे बरोबर आहे सर ,

मी तुम्हाला विनंती करण्यासाठी ,आणि तुमची परवानगी हवी आहे मला .

म्हणून सकाळी फोन केलाय

देशमुखसर म्हणाले –

काही हरकत नाही ..तू कधीही फोन करू शकतेस..

आता सांग मला -.कशाची परवानगी हवी आहे तुला माझ्याकडून ?

अनुषा सांगू लागली ..

सर, आमच्या कॉलेजमध्ये उद्या दुपारी ..एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे ..

त्याचे संचलन मला करायचे आहे असे आमच्या सरांनी सांगितले आहे. आमच्या फायनल इयरच्या क्लासचा उपक्रम असला तरी ,

हा कार्यक्रम पूर्ण कोलेज attend करणार आहे..म्हणून जास्त लक्षपूर्वक हे सगळे कार्य मलाच पूर्ण करण्यास सांगितले ,

त्याचसाठी आज दुपारी मिटींग आहे ..त्यासाठी मला जावे लागणार आहे. मगच मला कार्यक्रम कसा पार पाडायचा हे कळणार आहे.

माझ्यासाठी आणखी एक मोठी गोष्ट करायची आहे ती म्हणजे उद्याच्या कार्यक्रमात जे प्रमुख पाहुणे येत आहेत

त्यांची उत्स्फूर्त मुलाखत –स्वरूप गप्पा –गोष्टी .हा कार्यक्रम मला घायचा आहे ,

ही आणखी एक मोठीच जबाबदारीचे काम माझ्यावर सरांनी सोपवले आहे.

यासाठी पूर्व-तयारी ..न करता ऐनवेळी बोलायचे आहे.

आणि उद्या संध्याकाळी पाच वाजता ..मी ज्या टीव्ही चानेल साठी काम करते .त्यावर ही मुलखात

दाखवली जाणार आहे ...असे सरांनी ठरवून टाकले आहे आणि मला त्याप्रमाणे करण्यास सांगितले आहे.

गम्मत म्हणजे ..मला अजून काही कल्पना नाहीये .की .उद्या येणारे पाहुणे कोण आहेत ?

हे सगळं मिटींगला गेल्यवर कळणार आहे ..

पण..हा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम झाला पाहिजे ..

म्हणून प्रिन्सिपल सरांनी ..माझ्यावर या कार्यक्रमाची जबाबदारी सोपवली आहे ..

यासाठी म्हणून मला ..आज आणि उद्या ..असे दोन दिवस ..आपल्या १२ ते ४ या वेळेत येणे जमणार नाही.

प्लीज मला ..परवानगी द्यावी .

अनुशाचे बोलणे ऐकून घेत ..सर म्हणाले ..

अरेच्च्या ..असे आहे का ..हा तर तुझ्या कोलेजचा कार्यक्रम आहे ..त्यात तुझा सहभाग तर असायलाच

हवा ..आणि..

तुझ्या प्रिन्सिपल सरांना तू एक विश्वासू विद्यार्थिनी वाटते आहे, म्हणून नव्या कार्यक्रमाची

पूर्ण जबाबदारी त्यांनी तुझ्यावर सोपवली आहे ..याचा मला अतिशय आनंद वाटतो.

तुला परवानगी आहे माझी

पण..माझी एक अट असेल आणि ती तुला पूर्ण करावी लागेल..

बोल आहे का काबुल ?

अनुषा क्षणभर विचारात पडली ..मग म्हणाली ..

हो कबूल आहे , सांगावी तुमची अट-

अनुषा - तुझा हा उद्याचा पूर्ण कार्यक्रम तू –रेकॉर्डेकरून .. परवा ऑफिसात आल्यावर

मला दाखवशील असे कबुल केले तरच ..

मी परवानगी देईन ..समजले का ?

त्यांची अट ऐकून अनुषा म्हणाली ..

यस सर, तुम्हाला याबद्दल उत्सुकता आहे, हे ऐकून मला खूप बरे वाटले ..!

परवाच्या दिवशी ..मी नेहमीप्रमाणे ..ऑफिसात येईन ..त्यावेळी हा कार्यक्रम दाखवीन तुम्हाला ,

अगदी पक्का प्रोमीस ..!

ओके..अनुषा ..छान करावा कार्यक्रम ..बेस्ट लक .!

मनावरचे एक मोठ्ठे ओझे कमी झाले असेच अनुशाला वाटत होते. तिने लगेच कॉलेजमध्ये प्रिन्सिपल

सरांना ..फोन लावीत ..तिने ठरवलेले सांगत म्हटले –

सर –तुमच्या परवानगीने हा कार्यक्रम मी ठरवते आहे ..आणि माझ्या प्रोजेक्टच्या दृष्टीने याचे खूपमोठे

महत्व आहे.. उद्या कार्यक्रम पूर्ण झाल्यावर तुम्ही नक्कीच माझ्याशी सहमत व्हाल.

अनुशाला .बेस्ट लक देत म्हणाले ..तू कार्यक्रमाचे स्वरूप आणि शीर्षकच असे ठेवले आहेस की ..

याला नाकारण्याचा प्रश्नच येत नाही . तुझा प्लान मी आपल्या दोघात ठेवतो .उद्या सगळ्यांना

हे खूपच छान वाटणारे surprise असणार आहे... उद्या दुपारी एक वाजता माझ्या ऑफिसमध्ये

पाहुण्यांना घेऊ यावे.

सरांनी परवानगी दिल्यावर ..अनुशाने अभिला फोन लावला ..

हं- बोल अनुषा –आज सकाळी सकाळी कसा काय कॉल केलास ?

त्याचा आवाज ऐकून अनुषा म्हणाली ..

आत्ता लगेच गाडी घेऊन ये माझ्याकडे ..आपल्याला तुझ्या ताईकडे जायचे आहे..खूप महत्वाचे

काम आहे ..दहा मिनिटात ये, मी गेट बाहेर येऊन उभी राहते ..

मग.ताईकडे जातांना तुला सांगेल

ओके..अनुषा ..मी रेडी होऊन लगेच येतो ..

अनुषाने लगेच अभिच्या ताईंना ..फोन लावला ..

ताईंनी कॉल घेत हेल्लो म्हंटले ..

अनुषा म्हणाली -

ताई ..अजय जिजाजी आहेत ना अजून घरी ? की गेले ..स्कूलला ?

ताई म्हणाल्या ..आहेत अजून घरी .आज जरा उशिरा जाणार आहेत ..का ग ,काय काम आहे.?

अनुषा म्हणाली ..

ताई ..मी आणि अभि आता थोड्यावेळात येत आहोत तुमच्याकडे..तो पर्यंत तुम्ही माझ्यासाठी

एक काम करा ..उद्या दुपारचा १२ ते ३ हा वेळ तुम्ही दोघांनी माझ्यासाठी राखून ठेवावा ..

मी आले की सविस्तर सांगते.

ताई म्हणाल्या ..काळजी करू नको ..जिजाजी ..हा आठवडा पूर्णवेळ घरी आहेत ...जुनी

पेंडिंग काम करायची आहेत त्यांना घरी राहून .

अनुषा मनातून खुश झाली. ओके ताई .आम्ही येतच आहोत.

अनुशाने मनोमन देवाचे आभार मानीत म्हटले ..

आपण जेजे ठरवतो आहोत ..ते अनपेक्षितपणे जुळून येते आहे ..म्हणजे आपण जे काम हाती

घेतले आहे ते नक्कीच ..एक “नेक –काम “आहे .

अनुशाचे लक्ष खिडकीतून दिसणाऱ्या गेटकडेच होते ..

अभि येईपर्यंत त्याच्या आवडीच्या छान ड्रेस मध्ये तयार होण्यात वेळ जाईल ..

..ऑरेंज आणि ग्रीन अशा कलरचा ड्रेस घालून ..अनुशाने आरशात स्वतःला पाहिले ..तिच्या

चेहेर्यावर हलके स्मित उमटले ..

तिला असे पाहून ..तिचा अभि दिल से खुश ..होणार ,हे तिला माहिती होते .

आणि अभिची कार गेट बाहेर रस्त्यवर थोडे पुढे जाऊन थांबली ..घरात उगीच कळायला नको..

म्हणून ..अजून थोडे दिवस अभि-अनुषा लव्ह स्टोरी ..सिक्रेट ठेवायची असे ठरले होते.

आई- बाबा , मी निघाले हो कोलेजला , येते पाच वाजेपर्यंत.

बाहेर पडल्यावर गेट व्यवस्थित लावून घेते की नाही अनुषा

..हे पाहण्यासाठी ..आपले बाबा खिडकीतून पहात असतील

त्यांची ही सवय अनुशाला माहितीची होती .त्यामुळे तिने गेट लावून घेतल्यावर ..

परत एकदा खिडकीकडे पाहिले ..तिचे बाबा तिच्याकडेच पाहत उभे आहेत असे दिसले .

..अनुशाने त्यांना ओके..गेट नीट लावलाय असा थम्स अप केला, .,बाय

असे म्हणून ती अभिच्या कार जवळ जाऊन थांबली .

दरवाजा उघडून समोरच्या सीटवर अनुषा बसली ..

कार सुरु करण्या अगोदर ..तो म्हणाला ..डियर अनुषा -

एकदा डोळे भरून , मन भरून ..तुला पाहून घेतो ..

आज फारच सुरेख दिसते आहेस तू,

आणि परफ्यूम तर बेस्ट ..! काय विचार आहे बाईसाहेब ..मार डालोगी दिवाने को ..!

त्याच्याकडे मिस्कीलपाने पहात ती म्हणाली -

हो का ..घे बघून मन भरून ..

अभि म्हणाला -

हो ना -तुझ्याजवळच आहे पण ..जास्त जवळ येता येत नाही तुला

मी काय करू ..!

अनुषा म्हणाली – आज नो चान्स ..!

काही नको करू .आता .चल आधी ताई कडे जाऊ , ते काम करू ..मग देईन तुला स्वीट ..!

असे कबुल केले की अभि खुश होणार हे तिला माहिती होते .

ताईच्या घरासमोर गाडी थांबली ..ताई आणि जीजू या दोघांची वाटच पहात होते..

आत येऊन बसले ..थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या ..

ताई म्हणाली ..आता बोल अनुषा .

.तुझे काय काम आहे ते सांग ..म्हणजे .आम्हाला तयारी करता येईल..

अभि म्हणाला –

ताई आणि जीजू ..अनुशाने काय ठरवले आहे..हे मला सुद्धा आता तुमच्याशी बोलतांना कळणार आहे..

या अनुशाला हे असे अनपेक्षित काही करून दाखवण्याची फार हौस आहे.

जिजाजी म्हणाले –

अनुशाच्या एका भेटीवरून सुद्धा मी खात्रीने सांगू शकतो ..की ही मुलगी जे जे काही करील ,

त्यामागचा हेतू आणि उद्देश चांगला असणार .

आणि तिने मागच्याच भेटीत आमच्या कडून कबुल करवून घेतले आहे ..की

तिच्या मदतीस आम्ही तयार असावे. हे आम्ही दोघे ही विसरलेलो नाहीत.

अनुषा बोल – आम्ही तुझ्यासाठी काय करायचे आहे ..

ऐका –ताई आणि जिजाजी –

सागर देशमुख ..याच्यावरील प्रोजेक्टमधला पहिला भाग –त्यांचे सार्वजनिक जीवन
हा जवळपास पूर्ण झाला आहे..आणि तो मी त्यांच्या समोर अभिप्रायार्थ सुद्धा ठेवला आहे.

आता भाग –दुसरा ..सागर देशमुख यांच्या वैयक्तिक –खासगी जीवनाविषयी मला लिहायचे आहे .

म्हणून..जिजाजी ..तुम्ही उद्या आमच्या कोलेज मध्ये ..एक वक्ते म्हणून यायचे आहे ..

निसर्ग आणि मनुष्य “ यावर तुम्ही आमच्याशी बोलायचे आहे.

त्या संबंधीचे निसर्ग चित्र ,फोटो ..हे सगळं प्रदर्शनात ठेवायचे आहे.

या नंतर ..तुमच्याशी आणि तुमच्या पत्नीशी ..मी उत्स्फुर्तपणे बोलणार आहे .

आणि तुम्ही माझ्या प्रश्नांना तितकीच समर्पक उत्तरे देणार आहात .

या कार्यक्रमात व्यासपीठावर आपण तिघे असणार आहोत .

पण सगळ्यांसाठी आपण पूर्णपणे अपरिचित ,अनोळखी आहोत असे दाखवत बोलायचे आहे,

आणि पूर्ण कार्यक्रमात वागायचे आहे.

विचारलेल्या अनपेक्षित प्रश्नाना तुम्ही -आणि मी सागर देशमुख आणि परिवार असा उल्लेख

एकदाही करणार नाहीत पण..

सागर देशमुख यांचा उल्लेख न करता ..त्यांचे विषयी तुम्हाला वाटणारे तुमच्या मनातील

आपलेपणा ,प्रेम ,नात्याचे महत्व सांगायचे आहे. तुमच्या विवाहास विरोध केलाय त्यांनी

तरी तुमच्या मनात अजिबात कटुता नाहीये ,

ताई तुम्ही असे सांगायचे आहे –की

माझ्या बाबांचे माझ्यावर खूप प्रेम आहे ,माया आहे “हे मला माहिती आहे .

एक दिवस त्यांचा विरोध आणि राग जाईल ..हे माहिती आहे माला ..आणि मी

त्याच दिवसाची वाट पाहते आहे ..

अनुशाचे हे शब्द ऐकूनच ..अभिच्या ताईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या होत्या ..

हे पाहून जिजाजी म्हणाले ..

बघ अभी ,मी म्हणालो होतो ना ..अनुशाच्या कार्या मागे हेतू आणि उद्देश खूप मोठा आहे.

अनुषा त्या तिघांच्याकडे पाहत म्हणाली ..

उद्या संध्यकाळी ..मी ज्या वाहिनीवर माझे शो करते ..त्या वाहिनी वरून तुमची ही मुलाखत

सगळीकडे प्रसारित होणार आहे. पण माझ्या दृष्टीने ..पर्वाचा दिवस जास्त महत्वाचा आहे .

ताईने विचारले ..तो कसा काय ..?

अभि, ताई आणि जिजाजी ..

परवाच्या दिवशी नेहमीप्रमाणे मी देशमुखसरांच्या ऑफिस मध्ये जाणार आहे ..त्या दिवशी दुपारी

ही मुलाखत मी देशमुख सरांना दाखवणार आहे. कारण ..कार्यक्रमाची शुटींग करून ..ती पूर्ण

दाखवीन ..हे त्यांनी माझ्याकडून काबुल करवून घेतले आहे आणि नंतरच

आज –उद्या १२ ते ४ वेळेत कोलेजच्या

कार्यक्रमासाठी परवानगी दिली आहे .

आपल्या भावना त्यांच्या मनापर्यंत पोचल्या पाहिजेत ..या हेतूने मी उद्याचा तुमचा कार्यक्रम

ठेवला आहे.

आणि मला खात्री आहे ..याचा खूप प्रभाव पडेल देशमुख सरांच्या मनावर ..जो मला अपेक्षित

आहे.

त्याबद्दल मी पुन्हा सांगेन .

आता तुम्ही उद्या कोलेजला कसे येताय हे सांगा ? की अभिजित सोडणार तुम्हाला ?

जिजाजी म्हणाले ..नको नको ..आम्ही दोघे ..आमच्या गाडीने येतो .अभिला अजिबात नको

आणू या पिक्चर मध्ये .

ताई म्हणाल्या ..अनुषा आम्ही जे करू शकलो नाहीत ,,तू तर त्याची सुरुवात केली आहेस .

भारी डेअरिंग आहे बाई तुझे.

अनुषा म्हणाली ..उद्याचा कार्यक्रम दुसर्या भागाचा आरंभ आहे ..तो सक्सेसफुल झाला पाहिजे .

अभिजित आणि जिजाजी म्हणाले ..

अनुशा तू ज्या पद्धतीने ..सगळा मामला सांभाळून करते आहेस ..त्यावरून मला खात्री आहे ..

ऑल विल व्हेरी वेल..!

जिजाजी - ताई

तुम्ही धीर देतात ,सांभाळून घेत आहात ..खूप भारी वाटतंय मला .

उद्या साडेबारा वाजेपर्यंत यावे जिजाजी तुम्ही आणि ताई ..

कॉलेजमध्ये मी तुमच्यासाठी पूर्णपणे अनोळखी असणार आहे ..एक सामन्य विदाय्र्थी ,

आणि कार्यक्रमाची सूत्र –संचालक या भूमिकेत .

ठीक आहे अनुषा ..तू सुद्धा बघशील ..आम्ही पण आमचा रोल उद्या कसा मस्त करतो ते ..

ताई आणि जिजाजींचा निरोप घेऊन अभी आणि अनुषा निघाले ..

उद्या आपण ठरवल्या प्रमाणे होईल ..पण पर्वा जेव्हा देशमुख सर हा कार्यक्रम पाहतील तेव्हा ?

आणि त्या नंतर काय होईल ..!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढच्या भागात

भाग -२२ वा लवकरच येतो आहे

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------