Reshmi Nate - 3 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - ३

Featured Books
  • మనసిచ్చి చూడు - 5

                                    మనసిచ్చి చూడు - 05గౌతమ్ సడన్...

  • నిరుపమ - 5

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • ధర్మ- వీర - 6

    వీర :- "నీకు ఏప్పట్నుంచి తెల్సు?"ధర్మ :- "నాకు మొదటినుంచి తె...

  • అరె ఏమైందీ? - 18

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • మనసిచ్చి చూడు - 4

    మనసిచ్చి చూడు - 04హలో ఎవరు.... ️ అవతల మాట్లాడకపోయే సరికి ఎవర...

Categories
Share

रेशमी नाते - ३

पिहु आवरुन किचन मध्ये येते.

सुमन:- ये बाळा,आज पुजा कर ...मग काहीतरी गोड कर तुला जे बनवता येते ते कर...ये तुला देवघरात कशी पुजा करतात ते सांगते...

पिहु:- हम्म ...पिहु पुजा करायला घेते.ती जप म्हणत सगळे देव धुवुन कोरडे करते .सगळ्या देवांना गंध लावते...छान फुलांनी सजवते छोटीशी वृदांवनची रांगोळी काढते.दिवा धूप अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता..

आजी :- किती छान पुजा करते गं सुमन ‌..

सुमन:- हसत)हो ना आई ..मी काहीच सांगतिले नाही.‌आणि रांगोळी किती छान काढली.पुजा बघुन मन प्रसन्न झाले.

पिहुने घंटी वाजवुन शुक्रवार असल्याने गणपतीची,मग महालक्ष्मीची आरती म्हणून संगळ्यांना आरती दिली.

विराट आवरुन खाली आला .

रोहिणी:- पिहु आरतीच ताट इकडे दे.(पिहुने लगेच ताट दिले)विराट धर आरती..अस म्हणत त्यांनी स्वत:चा तळहात दिव्यावरुन फिरवुन विराटच्या डोक्यावरुन फिरवला.

सूमनची यांची इच्छा होती पिहूने द्यावी .

पिहुने परत आरतीच ताट देवघरात ठेवुन नमस्कार केला.

(सुमन पिहुच्या डोक्यावरुन हात फिरवते.)माझा दोष देवाला देऊ नको...सगळ चांगल होईल.

पिहु गालात हसते) नाही ,ओ आई मी देवाला दोष देत नाही आणि तुम्हाला ही नाही.(पिहूने सुमन यांचे दोन्ही हात हातात घेतले.)
आई दोष देऊन माझ नशीब बदलणार असेल तर मी पहिले हे करेन...नियतीच्या खेळात कोणाला ही दोष देऊ नये.सगळे आपल्या बाजुने नीट असतात.

(खरंच कोणाला दोष देऊन आपले नशीब उलटत असेल तर‌ द्या पण दोष देऊन परत आपण ति‌थेच आहोत त‌र का कोणाला दोष द्यायचा)

मावशींनी पिहुला शिरा बनवण्यासाठी सगळ सामान दिलं .,
पिहुने मस्त शिरा बनवला ,बाहेरून तुळशीची पाने तोडुन आणली.
चांदिच्या वाटीत शिरा काढुन त्यावर तुळशीच पान ठेवुन देवघरात प्रसाद ठेवुन नमस्कार केला.

आजी:-(हसत)सुमन तुला काहीच शिकवावे लागत नाही,सर्वगुणसंपन्न सुन शोधुन आणली

सुमन गालात हसते.

रोहिणी:- पिहु पहीले बाबांना वाढ .नंतर‌ सगळ्यांना..

हम्म, पिहुने बाबांना वाटीत दिलं..

दामोदर:- टेस्ट करत) व्वा काय छान झाला शिरा मन तृप्त झाले...त्यांनी वॉलेट मधुन पैसे तिच्या हातात ठेवले...पिहुने एक नजर सुमन वर टाकली .त्यांनी नजरेने घे म्हणुन इशारा केला.पिहु मोठ्या़च्या पाया पडली.सगळे टेस्ट करत होते.

विराट पेपर बघत कॉफीच पित होता.

वीरा:-वहिनी खुप छान झाला..वेगळीच टेस्ट लागते...काय नविन टाकलं का...

सुमन:- हो गं पिहु...सुमन याचे लक्ष विराट कडे जाते ) अरे विराट थोड टेस्ट कर ना..एक घास ..

विराट:- माझ डायट आहे.गोड‌ चालत‌ नाही.

पिहु:- आई शिरा गुळाचा आहे ...सा‌खर नाही टाकली मी..

विराट एक नजर पिहुवर टाकत पेपर घडी करून टेबलावर ठेवतो.

सुमन खुश होऊन:- विराट आता तरी खा ...गुळाने काही तुझ्या डायट मध्ये फरक पडणार नाही.

आता विराटला काही कारण पण नव्हते..तो कपाळाव‌र आट्या पाडतच चमचा उचलुन एक बाईट ‌खातो.तोंडात टाकल्यावर त्याची चव त्याला वेगळीच जाणवली...तो ही स्वाद‌ घेत शिरा खातो..दोन तीन घास खाऊन तो उठतो...

सुमन:- पिहु गुळ टाकल्याने छान टेस्ट आली... अन्नपूर्णा प्रसन्न आहे तुझ्यावर.... जी गोष्ट मनापासून करतो तो ना त्याच फळ‌ मिळते ...तुमच ही नात तु मनापासुन जोड मग बघ शिरयासारखा गोडवा तुमच्या नात्यात पसरेल...

पिहु मान खाली घालुन लाजत हसते.

विराट:-रुममधुनच जोरत हाक मारतो. मनी ...मनी...

सुमन:- (मनी तर बाहेर गेला आहे....)जा पिहु काय हवं बघ...

पिहु ब्लँकच होते..मी ...मी...

रोहिणी:-. कोण करणार बायको आहेस ना..विराट ला काय हवे काय नको ते तु बघयाचे...जा आता त्या थोड्या ठसक्यातच‌ बोलतात.

पिहु थोडी दचकतेच...ती पटकन रुमकडे वळते...

विराट काहीतरी शोधत मनीला हाक मारत...तो न बघताच ओरडुन बोलतो)मनी ...माझी ग्रे कलरची फाईल काल इथेच होती..हजारदा सांगितले वस्तुंना हात लावत जाऊ नको काही रिसपॉन्स येत नसल्याने तो वळुन बघतो...तो पिहुला बघुन ब्लँक होत. परत हाक मारतो मनी....

पिहु:- हळु पुढे येत) ते ‌...ते...बाहेर गेले आहेत...आईंनी सांगितले...

तो जोरातच हाततल्या फाईल टेबलावर अादळतो..त्या आवाजानेच पिहु दचकते....

मी..मी.....मी..(तो‌ तिला लुक देतो...त्याच्या लुकनेच ती पटकन बोलते..)मी मदत करु का ...

विराट:- काही न बोलता..परत फाईल शोधत‌ो...

पिहु शांत उभी राहते...

विराट ला फाईल मिळते...तो ती बॅगेत टाकुन काढलेल्या फाईल्स रॅक मध्ये‌ लावत असतो...ती पण हळुच पूढे येऊन फाईल घेत मी करते....राहु द्या...

विराट:-तिच्या हातातुन फाईल्स ओढुन घेतो.का...तु का करणार...उगाच नाही ते स्वप्न बघु नकोस...फक्त सहा महिने राहायच आहे...माझी बायको बनण्याचा प्रयत्न तर मुळीच करु नको...तो‌ बोलुन सगळे फाईल्स नीट लावतो..

पिहुच्या मनाला त्याची गोष्ट लागते..तिच्या डोळ्यातुन अश्रु वाहायला चालु होते....

तो एक नजर टाकुन निघायला लागतो...(दारत थांबुन वळुन )ऑफिसमधुन माणुस येईलं तुझ्या डॉक्युमेंट्स दे अॅडमिशनसाठी ऐवढे बोलुन तो ताडकन निघुन जातो.

पिहु,डोळे पुसुन शांत‌ शुन्यात नजर घालवुन चेअरवर बसते..
थोड्यावेळाने तिचा मोबाईल वाजतो.पप्पांचा फोन होता.ती पटकन स्वतःला नॉर्मल करत कॉल रीसीव करते.

हा पप्पा बोलना...ती चेहरयावर हसू आणत बोलते.

इकडच्या तिकडच्या गप्पा होतात...

पप्पा..

हा बोल बाळा..

मी तिकडे येऊ का..

का काय झालं भिमराव काळजीतच बोलतात.

काही ना ओ पप्पा ते सात आठ महिन्यांसाठी कश्याला कॉलेज चेंज करायच..मला किती जड जाईल....मला झेपणार नाही...

पिहु मी बोललो ना..पण तुझ्या सांसुना ते योग्य नाही वाटत ..आता घे बाळ अॅडमिशन..थोडे दिवस त्रास होईल‌ नंतर एकदा काय रुटीन बसले कि ...झालं

तिचा चेहराच उतरतो..हम्म...
.
.
.
.

.

विराट:- अॅडमिशन झालं का...

.
मानव:- ( हसत)हो झालं समज अॅडमिशन, आता ट्रस्टी म्हटल्यावर देणारच ना..पण..दहा बारा दिवस‌ लागतील.

विराटला सकाळच आठवत उगाच चिडलो ती तर फक्त हेल्प क‌रयाला आली होती.. त्याच्या डोळ्यासमोर पिहुच्या भरलेले डोळे समोर येत होता .

मानव:- विराट...विराट..

विराट:-भानावर ) अअ..अ..ह..ते काय...साईटवर कोण गेलं आहे का?? ...

हो ...
.
.
.
.
.
.
लग्नाला आता महिना़ होत आला होता...दोघेही एकमेकांशी बोलतच नव्हते.पिहुला तेव्हापासुन राग होताच परत कसली हेल्प म्हणुन विचारलंच नाही.
विराट तरी एक दोनदा बोलला कामापुरते पिहुने फक्त हो नाही मध्येच उत्तर दिले.

वि‌राट पिहुच्या समोर आला..पिहुने नजर वर केली..ती बाजुला सरकत दुसरीकडुन जाऊ लागली..तो‌ परत तिकडे सरकला..
पिहुला विचीत्रच वाटलं तिने त्याच्याकडे रागाने बघितलं..

विराटने तिच्या समोर‌ एक एनव्होलप धरला.अॅडमिशन झालं आहे .हे धर उद्या पासुन जाऊ शकते कॉलेजला...

पिहुचा चेहराच खुलला तिने तो कागद घेतला. ती उघडून वाचत‌ हसु लागली...

तो तिलाच बघण्यात हरवुन गेला...तिचा हसरा चेहरा ,गालावर‌खळी पडली ती वाचताना तीळ‌ ही चमकत होते..नकळत तो‌‌ही जरासा हसला..

पिहु:- खरच‌ थँक्यू ,खुप त्रास झाला असेल ना..मधेच अॅडमिशन मी म्हणत होते आईंना मी माहेरीच राहते....पण त्या ऐकल्याच नाही...ती पहिल्यांदाच विराटशी ऐवढ बोलत‌ होती...
विराटला तर‌ ती काय बोलते, ते कानापर्यंत पोहचतच नव्हते..फक्त तिच्या ओठांची हलचाल बघण्यात‌ तो‌ गुंतुन गेला होता..तो गालात हसत होता.
.
मॉम वीरा रुममध्ये येतात.त्यांना बघुन पिहु बोलायच थांबत.. आई..पिहु पटकन जाताना तिचा धक्का विराटला लागतो त्याची तंद्री तुटते.तो मागे न बघताच लगेच बाहेर गॅलेरीत जातो.

पिहु:- आई उदया पासुन जायच

सुमन:- हो ..सांगितले मला विराटने...

वीरा:- ‌खुश होऊन) मॉम वहिनी पण माझ्या बरोबर ‌येणार यईईई.
वहिनी आपण खुप मज्जा करु....(ती पिहुचे हात धरुन गोल फिरवते)

पिहु हसत होती तर सुमन यांना तिच्या चेहरयावरच हसु बघुन बर वाटत‌ होत‌ं ...

पिहु:- पण वीरा...मला खुप‌ टेंशन येतेयं किती सिलॉबस पुढे गेला असेल.

वीरा:- टेंशन कश्याला घेते उदया कळेलच ना,नंतर बघु काय करता येते..मी आहे तुझ्याबरोबर..

सुमन:- विराट इकडे ये...

विराट आत येतो..हा मॉम

उद्या पिहुला बाहेर घेऊन जा .लग्न झाल्यापासुन एकदा पण दोघे बाहेर गेले नाही.

विराट मॉमकडे रागाने बघतो..वीरा असल्यामुळे तो काही बोलु पण शकत नव्हता.

वीरा:- वहिनी , दादा मी पण येऊ....

सुमन:- वीरा...

सॉरी जावा तुम्ही ,(वीरा विराटला हग करत)पण मला काय आणणार दादा तु....

विराट:- वीराच्या डोक्यावरुन हात फिरवतो...)पॉकेट मधुन हात घालत‌ वॉलेट मधुन कार्ड देत..हे तुला काही ही घे...

वीरा जोरात ओरडते..(येईईई.)आय लव्ह यु दादा...ती टाईट हग करते..दादा मी दिया ला सांगुन आले उद्याची प्लॅनिंग करतो आम्ही..वीरा‌ खुश होऊन पळतच बाहेर जाते...

सुमन:- विराट मी काय बोलते.


विराट :- मॉम मला वेळ‌ नाहीये.(रागात)..तो आत स्टडी रुममध्ये निघुन जातो...

पिहु:-(पिहुचा फोन वाजतो) ..आई मी ..मी ‌आले ..,
पिहु घरी सांगते सगळे खुश होतात.
मम्मी मी नंतर‌ कॉल करते.

.
.
.
.



सकाळी पिहु लवकर आवरते..

वीरा झोपेतुन उठुन डायनिंग टेबलावर येऊन बसते.

रोहिणी :-(वीराच्या डोक्यावरुन हात फिरवत)..वीरा आज काय कॉलेज नाही..निंवात चाललंय..

वीरा:-आहे ग आई...काल जरा उशीरा झोपले स्टडी करत बसले होते..

रोहिणी:-रात्री जास्त जागत जाऊ नकोस...तबियत बिघडेल..

रोहिणी:- गीता (कामवाली बाई) वीराचा नाश्ता आण...

वीरा:- आई..आज पासुन वहिनी पण येणार आहे मस्त मज्जा येईल...

सुमन,पिहु किचन मधुन बाहेर येतात.

सुमन:- पिहु साडी चेंज करुन ड्रेस घालं..

रोहिणी:- कडक आवाजात )पिहु फक्त कॉलेज पुरते ड्रेस घालायचे सकाळी, घरी आल्यावर मला साडीच हवी..

पिहुचा चेहाराच उतरतो...ती मानेनेच हो म्हणते..ती निघुन जाते.

सुमन:- ताई,काय होतं घरात पण ड्रेस घातल्यावर..

रोहिणी:-आजी कडे नजर वळवुन ) बघताय का आई..आम्हाला साधा डोक्यावरुन पदर पडु देत नव्हता...आता तीच पंरपरा मी चालवते तर‌ सुमन ला त्रास होतोय...

आजी:- अगं रोहिणी तेव्हाचे दिवस वेगळे होते..आता वीरा कशी राहते .रोहिणी आजी ला मध्येच ‌थांबवुन
आई वीरा मुलगी आहे आणि ती सुन आहे ह्या घरची ...घराची इज्जत तिच्या हातात आहे...

आजी शांतच बसतात..


सुमन:- विराटला काही प्रोब्लेम नसेल तर चालेल ना...त्या ही ठसक्यातच बोलतात..

रोहिणी :- तो स्वतःहुन म्हणू दे मग पुढच ते रागानेच निघुन जातात.


पिहु छान रेड बकलरचा ऐ लाईन कट टॉप ब्लॅक कलरची पेन्सील पँन्ट त्यावर नेटचा दुप्पटा ,लांबसडक केस मोकळेच सोडुन एक साईडने घेऊन क्लीप लावली. हलकासा मेकअप
छोटस मंगळसुत्र सिंदूर हातात चुडा अजुन होता सव्वा महिने काढायचा नाही म्हणुन तिने ठेवला होता.पिहु आवरुन खाली आली...


वीरा:- वहिनी मस्त दिसेतय...चल..चल

समुन:- वीरा पिहुला सगळ नविन आहे ...नीट ,मस्ती करत बसू नकोस..

वीरा:- हो‌ गं मॉम ...बाय

दोघी कॉलेजमध्ये येतात... वीरा ने तिला कॉलेजमध्ये सगळ नीट सांगितले कुठे काय काय आहे..तिचा सेक्शन मध्ये तिचा क्लास तिला दाखवुन वीरा निघून गेली..पिहुची धडधडच वाढली .आता पर्यंत वीरा होती म्हणून तिला काही वाटलं नाही...पण आता पुढे..विचार करतच ती क्लास मध्ये एंन्टर झाली.. अजुन लेक्चर‌
चालु झाले नव्हते ..मग काय स्टुडन्टची मस्ती चालु होती...पिहु आत नजर वळवते..काही तिच्यावर नजर पाडुन परत‌ आपल्यात मश्गूल काहींची कुजबुज ..पिहु नंतर इकडेतिकडे न बघता एका मुलीच्या शेजारी जाऊन बसते.डोळे झाकुन दिर्घ श्वास घेत रिलॅक्स होते.लेक्चर चालु होते...कसाबसा आर्धा दिवस जातो...दुपारी दोन तीनच्या सुमारास ब्रेक होतो.

वीरा:-(क्लास मध्ये येत पिहुला हात करते..)पिहु बुक्स घेऊन निघाली.वीराच्या समोर एक मुलागा येऊन थांबला.

हेेेहेह वीरा....तुला माझी ऐवढी आठवण येत होती..मला भेटायला आली.तो मूलगा वी‌राला हग करत म्हणाला ..पिहुच लक्ष गेलं ती ब्लँक होत‌ वीराजवळ येत होती..

वीरा:- काय‌ करू,तुझी ऐवढी आठवण येते कि जेवण पण जात नाही .वीराने त्या मुलाला दंडाला बुक्की मारत ढकललं
दोघेही हाय फाय देत हसु लागले ‌.

पिहु दोघांकडे बघु लागली.

वीरा:- वहिनी ,हा आदित्य डॅडच्या फ्रेंड्स मुलगा आम्ही फ्रेड्स आहोत.आदि वहिनी दादाची वाईफ.

आदित्य पाटील हा कॉलेज चा टॉपर कुल बॉय,सगळ्यां बरोबर हसत खेळत राहणार दिसायला हँडसम‌ चेहरयावर सतत नॉटी पणा.. मुली तर मागेच असायचा पण तो कोणाला भाव देत नव्हता.सगळ्यांना मदत करणारा.. प्रेमळ‌‌‌ हसतमुख..विराटचे वडील आणि आदित्यचे वडली मित्र होते...

आदित्य पिहुकडे नजर वळवत मोठी स्माईल करत :- हाय त्याने हात पुढे केला.

पिहु फक्त हसून हा‌य बोलली.त्याने लगेच इकडेतिकडे बघत‌‌ हात खाली घेतला.

वीराच्या जवळ येत खरच हिटलरला मानायला हवे .चॉईस छान आहे ..

वीरा:- डोळे मोठे करते...तु जास्त बोलू नको हहह दादाला सांगेन मी..

आदित्य:-हहह, हिटलरची बहिन जा सांग मी काय हिटलरला घाबरतो का???

पिहुला हिटलर बोल्याने हसुच आले ती स्वतःच हसु आवरते.

चल वहिनी हा आदि ना कधीच सुधारणार नाही.‌...वीरा पिहुचा हात पकडत निघुन गेली...

आदित्य पण हसत त्यांच्या मागे येत :-अग वीरु...(.तो तिच्या गळ्यात हात घालुन )पक्की दादावर गेली तूझ्या ..किती दिवसानी भेटतोय.जरा हस अँग्री बर्ड..तो तिचे गाल ओढतो...

वीरा:- नाटकी हसत .घरी पुजेला का आला नाही.मॉम तर चिडली आहे .

आदित्य:-अरे बाई, मॉम डॅड‌ आले होते ना माझ काय काम...मस्त पार्टी असली असते तर आलो असतो...हिटलर ऐवढा कंजुस असेल वाटलं नव्हतं एक पार्टी तरी ठेवयाची .हो कि...नाव काय‌ म्हणाली गं वीरा...

वीरा:- वहिनी बोल.

आदित्य वीराच्या डोक्यात टपली मारत ती तुझी वहिनी आहे,मी तर नावानेच हाक मारणार एकाच इयरचे आहोत...हो कि नाही अरे नाव..

वीरा:- पिहु...

आदित्य:- पिहु...हाय‌ पिहु.

पिहु गालात हसली.तिच हसण बघुन आदित्य दोन मिनिट भरावुनच जातो...तिच्या गालवर खळी पडल्याने तो ही हसला.मागुन त्याला मित्राने हाक मारली.लगेच दचकत त्याने इकडेतिकडे बघितले..

वीरा:- आदि चल कँटीनमध्ये .

आदि :- नको तुम्ही जाऊन तिकडे बघ गेलो नाही ना,माझी काही खैर नाही..चल बाय...आदित्य बोलून मित्रांकडे निघुन गेला...
वीरा पिहु पण कँटीनकडे निघाल्या आदित्य ने दोनदा वळुन पिहुकडे बघतिले ती वीराशी हसत गप्पा मारत जात होती.नकळतपणे त्याच्याही चेहरयावर हसु आले.
.
.

.
.
वीरा पिहुला तिच्या फ्रेंड्स ची ओळख. करुन देते.

पिहु:- वी‌रा मला काही कळतच नाहीये सिलॅबस खुप पुढे गेला आहे आणि इकडच थोड जमनींग होत‌यं माझ डोकच काम करत नाही..

वीरा:-अरे वहिनी,होईल गं..टेंशन कश्याला घेते खाऊन घे..वहिनी तु आणि दादा बाहेर जाणार आहे ना आज..

पिहु :- अअ..ते...कॅन्सल झालं

वीरा:-का गं .तु पण हट्टच करत नाही...खरच दादा पण काम‌ काम बाकी काही नाही... आपण जाऊ कॉलेज सुटल्यावर .

पिहु:-नको गं..तु आणि दिया जाणार आहे.ना..

वीरा:-हो गं तु पण चल‌.

पिहु:-नको खरच चांगल नाही वाटत, मोठी आई ओरडेलं

वीरा:--तु टेंशन घेऊ नको मी आईला मॉम‌ला सांगते..वी‌रा उठते चल बाय‌ कॉलेज सुटल्यावर भेटु .

पिहु पण तिच्या क्लास मध्ये जाते..आदित्य उठुन तिच्या पुढच्या डेक्सवर बसत तिच्या कडे वळुन स्माईल करतो...पिहु..

पिहु त्याच्याकडे बघत हलकशी हसते,

तुझ न्यू अॅडमिशन ...ना,काही हेल्प हवी असेल तर नक्की सांग...

हम्म ,पण हा असा फ्रेंडली बोलत होता तिला थोड ऑकवर्डच होत होते.

आदित्य:-पिहु हे माझे फ्रेंड्स तो ओळख करून देतो..राज,मीता,नील, गुंजन पिहु पण हसुन सगळ्यांशी बोलते.. नंतर नंतर ती ही नॉर्मल होते.

सध्याकांळी पिहु ,दिया ,वी‌रा कॉलेज सूटल्या सुटल्या मॉल कडे वळतात.

पिहु:- वीरा आई काय म्हणाल्या.

वी‌रा:-आई खुश होत जा घेऊन म्हणाली तु पण ना वहिनी...चल आता रीलॅक्स हो...ऐन्जॉय‌ कर आता..

तिघी मॉल मध्ये जातात..वीरा ,दियाची धडाधड शॉपिंग चालुच होती.पिहु फक्त बघत फिरत होती..

वीरा:- वहिनी तु पण घे ना..

पिहु:-नको गं तुम्ही घ्या..

दिया:-अस कस वहिनी ,आम्हीच करायच आणि तु फक्त बघत राहयच..घे ना.

पिहु:- अग खरच काही नको.पिहुचा फोन वाजतो...मम्मीचा कॉल असतो.एक मिनीट हा वीरा (पिहु कॉल रिसीव करत बाजुला जते.

वीरा:- दिया दादा कसा आहे ना,थोडा पण रोमँटीक नाही..लग्न झाल्यापासुन एकदा पण बाहेर घेऊन गेला नाही.आणि वहिनी पण कधी काय म्हणतच नाही..किती साधी आहे ना ..

दिया:-हो ,ना पण दादा माहीत आहे...तुला

वीरा:- दादाला बोलावायच‌ का ती दिया डोळा मारत‌ बोलते.

दिया शॉक होत काय.-..दादा इथे कसा येणा‌र..

मी पण वीरा देशमुख आहे,बघ काय करते..

दिया:-हा बघु ,तु काय करणार आहे.

एक मिनीट व‌ी‌राने तिचा मोबाईल काढला आणि विराट ला कॉल‌ लावला.

विराट:- बोल.

वीरा:- दादा ती बारीक आवाज करत ,ते मी..

विराट तिचा आवाज ऐकून थोडा दचकतोच वीरा काय‌ झालं तु कुठे आहे ..

वीरा:- दादा मी मॉल मध्ये आहे शॉपिंगला आले होते..

विराट:-शॉपिंग का!! तो थोडा रीलीफ होत..मग कर ना

वीरा:-दादा कार्ड घरीच राहिले आणि मी खुप काही घेतलं .

विराट:- काय,वीरा इतक केअरलेस असतं का कोणी..तो चिडला

वीरा:-सॉरी दादा मी सगळ रीटर्न करुन घरी जाते.

विराट हे,ऐकताच काय गरज नाहीये शॉपिंग कर लोकेशन सेंड कर मी आलोच.

वीरा खुश होऊन दियाला थम दा‌खवते. दादा मी शॉपिंग करते लवकर ये..बाय लव्ह यु...

विराट गालात हसत फोन ठेवतो.

पिहु परत‌ येते.दोघी थोड्या दचकतात..

पिहु:-काय‌ झालं ???

वीरा:-काय कुठे ,काही नाही चल वहिनी तिकडे जाऊ ..(वीरा पिहुचा हात धरत जाऊ लागली वीराच्या हात लागल्याने पिहुचा मोबाईल जोरातच ‌खाली पडतो..)

पिहु पटकन फोन उचलते स्क्रीन पुर्ण फुटली...

वीरा घाबरत:-सॉरी सॉरी वहिनी चुकुन झालं...

पिहु :- अहह ते पिहु पण नरवस होत मोबाईल चेक करु लागली. पण मोबाईल ऑफरेटच होत नव्हता.

वीरा:-खरच सॉरी वहिनी माझ्यामुळे ..

पिहु :-अग चुकून झालं, ऐवढ काय.(खरतर पिहुला वाईट वाटत होते..).पण आता कोणाला काय‌ बोलुन मोबाईल परत‌ येणार आहे का. पिहु मोबाईल पर्समध्ये ठेवुन टाकते.

(विराट ब्लेझर घालत मानवला इनस्ट्रक्शन देतो).सहाच्या आसपास विराट मॉल मध्ये येतो वीरा ला कॉल करुन कुठे विचारतो.

विराटची नजर वीरावर पडते वी‌रा हात करुन बोलवते.

विराट तिच्या कडे जात असतो त्याला पिहु दिसते ,पिहू ड्रेस बघण्यात बिझी होती.विराटने तिला पहिल्यांदाच ड्रेस मध्ये बघितले होते...दररोज तर‌ ती साडीमध्येच असते...आज सकाळी तो लवकर गेल्‌यामुळे त्याला माहितच नव्हते..तिच शांत रुप ,ड्रेसमध्ये पण तिचा दुप्पटा तिने नीट घेतला होता.साडी घातली तरी खाद्यांवरुन कधी पदर पडत नव्हता.तीची ती सादगी बघुन तो हरवुनच गेला .

वीराने हाक मारली .दादा हे ऐकताच पिहुने नजर वळवली दोघांची नजरानजर झाली...पिहुने बघून लगेच नजर ‌खाली घेतली तो ही भानावर आला.

वीरा जवळ जाऊन हग करत कानाला हात लावत :- सॉरी दादा..

विराट:- (हसत)शॉपिंग झाली का... अजुन करायची .

वीरा:-हो अजुन आहे तु बिल पे कर मी पूढे जाते.चल दिया पिहुला ती एकटीच ठेवुन गेली..पिहु हाक मारत‌ होती तर त्या ऐकून न ऐकल्यासारख्या पुढे गेल्या .

पिहुने विराट कडे बघत ट्राॅली पुढे केली.त्याने बिल पे केलं सगळ्या बॅग्स पिहुने हतात‌ घेतल्या.त्याने ड्रायव्हरला फोन केला ...ड्रायव्हर लगेच आला ...त्याने पिहुच्या हातातल्या बॅग्स घेतल्या.
दोघे शांत चालत होते. पिहु इकडेतिकडे बघत वीराला शोधत‌ होती. दोघेही नजर चोरत एकमेकांना कडे बघतच होते.

(पिहुच्या मनात येते काल वेळ नाही आणि आता हूुहह कुठे तरी तिला ती गोष्ट फिल झाली होती पण मी का,विचार करते .)
(विराटच्या ही मनात येते काल आपण नाही बोललो आणि आलोय काय वाटलं असेल त्यालाही फिल होत होते.)

वीरा ने पिहुला हाक मारली.दोघे ही गेले...

वीरा:- वहिनी ही पर्स छान का ही ..

पिहु:-दोन्ही छान आहे .बघ तुला कुठली छान वाटते...

वीरा:-वहिनी मी तुला घेतेय.आल्यापासुन मी आणि दियाच करते तु फक्त फिरतेय.

पिहु:-मला ..अग नकोय खरचं

वीरा:-दादा तुच सांग,वहिनी काहीच घेत नाही ये तुच सांग कुठली घेऊ ह्यातली ...

विराट:- मी ...मला काही कळत नाही ते तुम्ही बघा...

वीरा:-काय अरे दादा..

पिहु:-वीरा मला हवं असेल तर‌ घेईन.नंतर पण आता नको ना प्लिज.

वीरा:-दादा मला काही सांगु नको हे धर ह्यातली कुठली आवडते बघ वहिनीला आणि घे अस म्हणत वीराने दोन्ही प‌र्स हातात ठेवुन निघुन गेली.

विराट:- वी‌रा ऐक तरी.. विराटला का‌य बोलाव काय कराव कळतच नव्हते.(पिहु पूढे जात होती तर विराट ने आडवलं),बघ तुला कुठली आवडते अस म्हणत त्याने पूढे पर्स धरल्या.

ती एक नजर पर्स कडे एक नजर त्याच्याकडे वळवत नकोय मला ठेवुन द्या .

विराट:-घे वीराला परत ..

पिहु विराटला थांबवत :-हे बघा मला काही ही नकोय.ते वीरा आणि तूम्ही बघुन घ्या.मी माझ्याकडुन क्लिअ‌र केले आहे.मी माझी कुठली जबाबदारी थोपवणार नाही तुमच्यावर बायको म्हुणन तर...तुमच्या सारखी लोक कधी काय बोलतील कळणार नाही त्यापेक्षा काही घेऊ नका तुम्ही.ती रागाने बघत निघुन जाते.

विराट:- मुठ आवळत रागानेच त्या पर्स त्या रॅकमध्ये आदळतो.काय‌ समजते स्वतःला घे नाही तर बस ..तो स्वतःशीच पुटपुटत निघुन जातो.

मॉल मधुन बाहेर पडायला साडे आठ वाजतात.

विराट:- वीरा एकत्र कार मध्ये जाऊ माझ्या कार मध्ये बसा.

वीरा:- हम्म्,

विराट ने ड्रायव्हरला जायला सांगितले.

वीरा दिया मागे बसल्या .पिहु पण मागे बसयाला जात होती,वीराने आडवलं )वाहिनी मागे कुठे पुढे बस .

पिहुला आता नाईलाज होता.ती पुढचा डोर उघडुन बसली.विराट पण आत बसत त्याच लक्ष पिहुकडे गेलं सीटबेल्ट लावत पिहुवर नजर फिरवत बसला.त्याच्या तर पारा अजुन चढलाच होता.

वीरा:- दादा भुक लागली डिनर ला जाऊ ना.

विराट:-वीरा मॉमला नाही सांगितले ,नंतर जाऊ तो मिरर बघुन बोलु लागला.‌

वीरा:-सांग ना,घरी जाईपर्यंत नऊ वाजतील.मला झोप पण आली ..सांग ना..

दिया:- चल दादा किती दिवस झाले गेलो नाही चल ना..मामीला फोन करुन सांग वहिनी बोल ना दादाला...आमच तर काही ऐकतच नाही.

विराट:-दिया मी फोन करुन सांगतो.चला आता विराट कपाळावर आट्या पाडतच बोलतो.

दोघी हसत येसस...चल लवकर

वि‌राट मानावला हॉलेटमध्ये डीनरला येणार आहे म्हुणन फोन करुन सांगतो ..

चल दादा आता...

तो‌ पिहुकडे बघत..बोलतो. सीटब्लेट

पिहुच्या लक्षात येत:-ओ सॉरी ते ती सीटबेल्ट लावण्यासाठी ओढत होती पण,ते खुपच टाईट होते..तिला जमेना विराट तिची केविलावाणी धडपड बघत परत पुढे बघतो...पण खुप वेळ लावत असल्याने तो रागात पटकन तिच्या जवळ जाऊन सीटब्लेट ओढतो .वि‌राट अचानक आल्याने पिहु दचकुन त्याच्याकडेच बघते..वि‌राट तिच्या चेहरयाच्या खुप जवळ आला होता.तिचा तर‌ श्वासच अडकडला होता.विराट सीटब्लेट लावताना तिच्याकडे बघतो..ती लगेच चेहरा फिरवत बाहेर बघते.तो लावुन कार स्टार्ट करतो.

सगळे हॉटेल मध्ये येतात...

पिहु उतरत हॉटेलवर नजर टाकते.

वी‌रा:- वहिनी आपलं आहे हॉटेल चल आत तुला दाखवते.

पिहु हॉटेल बघण्यात गुंग होते..खुपच छान पध्दतीने हॉटेल सजवलं होते...वीराने पुर्ण हॉटेल दाखवलं

मानव चार-पाच स्टाफ सोबत आला .पिहु पहिल्यांदा आली होती तर त्यांनी तिच स्वागत केलं...

पिहु ला थोड घाबरल्यासारखच वाटलं ती वीराकडे ,विराट कडे बघु लागली.विराट ने डोळ्यानेच तिला बुके घ्यायला सांगितला.

मानव ने एका स्टाफला सांगुन त्यांना डिनरसाठी घेऊन जायला सांगितलं.

विराट मानव बोलत चालले होते.

विराट मोबाईल बघत जेवत‌ होता...वीरा दिया पण मोबाईल बघत जेवत त्याच्यात गप्पा मारू लागल्या.

पिहु आपली ऐकटीच जेवत इकडेतिकडे बघत होती.

विराटला कॉल येतो.स्क्रिन वर नंबर‌ होता आता रात्रीच नंबर ओळखीचा नसल्याने त्याने कट केला. परत फोन वाजला दोन तीन वेळा कट करुन त्याने उचलला .

हॅलो.

हॅलो..विराट का!!!

हो तुम्ही

मी भिमराव सरनाईक.

(विराटला कळलंच नाही कोण आहे.).हॅलो.परत त्याच्या लक्षात आले.त्याने पिहुवर नजर‌ फिरवली.

हॅलो ,

हा बोला ना..

माफ करा ऐवढया रात्री फोन केला पण पिहुचा मोबाईल लागत नव्हता..घरी केला तर‌ बाहे‌र गेलात कळलं पिहुच्या मम्मीला बोलायच होतयं थोडं आहे का ती जवळ.

हो एक मिनीट,त्याने मोबाईल पिहूसमोर धरला.

पिहुला कळलच‌ नाही तिने विराटकडे बघत मोबाईल घेतला.
(पिहु नंबर बघुन कानाला लावते)पप्पा तुम्ही ,अस अचानक‌ रात्री पिहु थोडी दचकलीच,वि‌राटने तिच्या कडे बघितलं

भिमराव:-अग काही नाही गं ,तूझा मोबाईल किती वेळचा लावतोय पण लागतच नाहीये कुठे मोबाईल पप्पा चिडुन बोलले.

पिहु:-अहो पप्पा मोबाईल बंद‌ पडलाय चालुच होत नाही संध्याकाळपासुन मी घरी जाऊन करते.

भिमराव:-तुझ्या मम्मी शी बोलं

पिहु:-द्या

रेवती:- पिहु मोबाईल..

पिहु:-मम्मी नंतर सांगते ,बोल आता

रेवती:-काही नाही गं ,उद्या चतुर्थी आहे.माहीत आहे ना..

पिहु डोक्यालाच हात लावते.हे सांगायला फोन करत होती.

रेवती:-हो ..तु धरते ना विसरशील म्हणुन

पिहु:-माहिती आहे (विराटच्या मोबाईल वर फोन येत होता .तिने बघुन महत्तवाचा असेल तर )मम्मी मी ..नंतर

रेवती:-अग ऐक तरी.

पिहु:-काय ???

रेवती:-उपावस आहे तूझा उद्या लग्नाच्या आधीच वेगळ होत आता
वेगळ.

पिहुला‌ - काही कळतच नाही..मम्मी वेगळे म्हणजे.

रेवती:-कोण आहे का समोर..

पिहु:-हो ,ती हळुच बोलते.

रेवती:-तु घरी गेल्यावर कॉल कर ...

पिहु:-हो,करते लॅनलाईन वरुन ..

रेवती:-नको विराट च्या मोबाईल वरुन कर लॅनलाईन कोण पण उचलते उगाच आपलं बोलण कोण तरी ऐकेलं.

आता पिहुला मम्मीचा राग येत होता..मम्मी आताच बोल मी फोन करणार नाही उद्या करते.

रेवती:-अग उद्या नको बाराच्या आत कर मला लग्नानंतरचे उपवास वेगळे असतात पिहु डोक लाव ना मी काय बोलते.

पिहु हळु आवाजात चिडुन :-मम्मी काय लावलं तुझ ठेव फोन पिहु फोन कट करते.
विराट च्या शेजारी मोबाईल ठेवते.

वीरा:-काय‌ झालं वहिनी ...

पिहु:-काही नाही ते असच..(पिहुला मम्मी काय बोलत‌ होती तेच विचार करत होती..वेगळा कसला धरतात🤔.)

पिहुची आई एकटीच बडबडत होती काय मूलगी कस कळत नाही त्या विराट च्या आईला कॉल लावतात.

सुमन आजी गप्पा मारत होत्या. पिहु्च्या आईचा कॉल आता अस म्हणत सुमन ने फोन रीसीव केला.

दोघी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात

रेवती:-सुमन

सुमन:-हा बोल गं .

रेवती:-उद्या चतुर्थी आहे ना पिहुचा उपवास असतो आधीपासुन करते.

सुमन:-हो‌ का छान ..

रेवती:-मला थोड बोलायच होतं गं .

सुमन:-हा बोल ना..

रेवती:-अग आता कस नवीन लग्न झाल ना म्हणून तिला जास्त माहिती नाही मी पण कधी तिला सांगितले नाही

पण काय सुमनला काहीच कळत नाही काय रेवती मला सांगायच.

रेवती:-अग उपवास असताना नवरा बायको जवळ येत नसतात तिला माहीत नसाणार मी तिला फोन केला पण तिला मी काय बोलत होते कळतच नव्हते आता घरी आलं कि सांग थोड समजुन लहान आहे काही काही गोष्टी अजुन माहीत नाहीत गं.

सुमन गालात हसत:-सांगते गं काळजी करु नकोस.

रेवती हसुन फोन ठेवतात.

आजी:- काय‌ सांगयच पिहुला गं

सुमन हसुन:- उपवास आहे तिचा तर सांग म्हणते मनाबरोबर शरीराचा पण उपवास धरायचा असतो.पिहुला माहीत नसेल म्हणतीये.

आजी हसते ..हो बाई सांग एक तर नविन जोड‌प आहे .

सुमन:-काय आई ,तुम्ही पण कस सांगायच हे ..

आजी:-राहु दे,मी सांगते आल्यावर दोघांना

आई तुम्ही सुमन चकित होत.

हो मग कोण सांगणार तुम्ही लाजत‌ बसा कस सांगु कस सांगु.

सुमन:-सांगा तुम्ही मग .(सुमन विचार करत बाहेर येते कधी दोघ संसाराला लागणार काय माहित )


जेवण होते..

वीरा चौघांचा स्लेफी काढते. दादा वहिनी तुमचा दोघांचा काढते.

विराट:-वीरा उशीर होतोय.

काही होत नाही.वीरा पिहुचा हात धरून विराट शेजारी उभ करते...
दोघेही नरवस होत इकडे तिकडे बघतात.

दिया वीरा एकमेकांना कडे बघतात...दिया जवळ येऊन काय दादा अस थांबतात का दिया विराटचा हात घेत पिहुच्या कमरेवर ठेवत पिहुचा हात विराटच्या छातीवर ठेवते
दियाने एका क्षणात केलं कि दोघांच्या अंगाला काटाच आलं पिहुच्या कमरेला विराट हात असल्याने पिहु थरथरतच होती..ते विराटला जाणवत होते...

वीरा:- अरे स्माईल करा...ते वरवर हसतात.आतुन तर‌ दोघांची धडधड वाढली होती काय‌‌ होतयंं कळतच नव्हते.

अरे किती छान आलाय ,वीरा मोबाईल चेक करत‌ म्हणााली .दोघे अजुन तसेच .थांबले होते.

दादा सोड‌ वहिनीला‌ झालं दिया हसत म्हणते दोघ पटकन बाजुला‌ होतात.विराट हात काढताना त्याच्या वॉचला पिहुचा दुप्पटा अडकतो...पिहुला गळ्याला ओढल्याचे जाणवते...ती विराट कडे रागाने बघते.तो ती अशी का बघते म्हणुन तिला तो लुक देतो.
ती बोलणार कि तिच लक्ष त्याच्या घड्याळ्याकडे जाते.ती थोडी जवळ येते...

पिहु:-ते..ते...माझा ..दुपट्टा अडकलाय...ती हळुच बोट करत बोलते.

वि‌राट हाताकडे बघतो..तो लगेच काढायला लागतो..पिहु हात लावत तसा ओढु नका फाटेल..ती बोलल्यावर विराट थांबतो पिहु हळुच हात लावत काढत होती..वारयाने तिचे केस डोळ्यावंर येत होते.तो तिलाच भान हरवुन बघत होता

दियाने वी‌राला इशारा केला.वीराने पटकन दोघांचे दोन तीन फोटो काढले.पिहु बाजुला होत दुपट्टा नीट करत पुढे‌ आली विराट पण डोळे ताट करतच निघाला.(काय‌ होत आहे त्यालाच‌ कळत नव्हतं)

घरी आल्यावर मनी समोर येत:- भैय्या, वहिनी आजीने बोलवलं.

विराट घडळ्याकडे बघत:- आत्ता,

मनी:-हो.

पिहु आजीच्या रुमकडे वळते

पिहु:-आजी अजुन झोपला नाही अकारा वाजलेत...पिहु आजीच्या शेजारी जाऊन बसते.

आजी डोक्यावरुन हात फिरवत :- तुझीच वाट‌ बघत‌ होते.

पिहु घाबरतच:- का आजी काही हवं होतं का ..मी‌ जाणारच नव्हते पण ..

आजी:-अग थांब , पिहु बोलायच थांबते.

आजी:-बाळा उद्या उपवास आहे ना म्हणुन बोलवलं बोला‌यच होतं ..

पिहु:-हा आहे .मी लहान असल्यापासुन धरते...

आजी:-छान पण लग्नानंतर‌ उपवास धरताना नवरयाजवळ जाऊ नको ..उपवास मोडतो.लांब झोपा आज रात्री.

पिहु 🙄 ब्लँक होते.

आजी:-काय बोलते कळलं ना ,

पिहुला तर जीव गेल्यासारखच झालं काय बोलाव नी काय तिला मम्मी च बोलण आता लक्षात येते.ती समोर बघते विराट पण रुममध्येच आला होता त्याला बघुन तर धडकीच भरली.

विराट ने पण ऐकलं त्याने पिहुकडे बघितले ती घाबरून खालीच बघायला लागली.
.

आजी:-विराट उपवास आहे जवळ जाऊ नको आता बारा वाजत आले, आजी ठसक्यातच बोलली.

😐विराटला तर‌ का‌‌य‌ बोलाव कळलच नाही,तो इकडेतिकडे बघत परत निघुन बाहेर आला.

जा पिहु झोप,विराटला ओरडल्याशिवाय‌ काय कळत नाही .म्हणुन ओरडुन सांगितले .तुझ ऐकला नसता काही.आजी हसत बोलते.

ती काही न बोलता शॉक लाग्ल्यासारखी रुमच्या बाहेर आली..आता ‌रुममध्ये जायच तिला अवघड झालं होते.ती हळुच रुममध्ये आली.इकडेतिकडे बघत चालली होती. विराट चेंज करुन येत होता नेमकी पिहुसमोर आली.दोघांची धडक होणार दोघेही सावरले दोघांना आजीचे शब्द आठवुण लाजल्यासारख होत होते पिहु पळतच त्याच्या‌ बाजुने निघुन आत जाते.विराट ही पटकन स्टडी रुममध्ये जाऊन स्लाईडींग ओढतो.

आता नाही,म्हटलं तरी डोक्यात दोघांच्या तेच चाललं होत😂😂😂 पिहु चेंज करुन पटकन ब्लँकेट तोंडावर ओढुन झोपते.

विराट झोपयला लागला तर त्याच्या लक्षात आलं आपण पिलो आणलाच नाही,बाहेर बेडवरच राहीला.तो उठुन बाहेर आला.पिहुला ही जाणवलं तिने घाबरून ब्लँकेटच तोंडावरून काढलीच नाही.

पिहु झोपली म्हणून तो हळुच बेडजवळ जाऊन तिच्या बाजुची उशी घेऊ लागला.

पिहु घाबरते, इथे का आलेत हे ती मनात‌ बडबडत‌असते.

तो उशी घ्यायला आणि तिने पटकन ब्लँकेट तोंडावरुन काढली ब्लँकेट लागलयाने तो बेसावध असल्याने विराट चा तोल जाऊन तिच्या अंगावर‌ पडतो..पिहु जोरातच किंचाळते..

तो ही दचकतो.तो पटकन उठुन बसतो...ते मी..

पिहु पटकन बेडवर उठुन उभी राहते...अहो लाज वाटते का??...काय चाललय तुमच रागात तोंडाचा पट्टा चालुच होतो.
खरच मला वाटलं सभ्य अससाल पण इतका नीच पणा..

विराट ही रागात उठुन उभा राहतो...तोंडाला आवर घालं काय‌ बोलतेस नीच कोणा‌ला म्हणतेस.

तुम्हालाच म्हणते,पिहु चिडुन बोलते.

विराट आवाज वाढवत शांत हो काही ही म्हणु नकोस मी फक्त उशी घ्यायला आलो होतो‌ जाताना विसरलो .

ते ऐकुन पिहु शांतच होते.ती बेडवर बघते खरच उशी राहिली होती...

तो रागाने तिच्या कडे बघत होता..

ती जीभ चावत पिलो उचलुन समोर धरते..

विराट रागाने तिच्या हातातुन पिलो ओढतो..तो पडणार कि पिहुच लक्ष जाताच अहो पडतालं अस म्हणत तिने विराटच्या हाताला पकडत‌ ओढले. .

विराटचा एक हात भितींवर एक हात पिहुच्या हातात होता.दोघेही एकमेंकाच्या डोळ्यात‌ आरपार बघत होते..

थोड्यावेळाने दोघेही भानावर येत बाजुला होतात.विराट बेडवरुन खाली उतरुन जोरातच स्लाईडींगचा डोर आदळतो.

ती घाबरुन डोळे झाकते...तिलाच फिल होतं विचार न करताच बोलुन गेले..ती परत बेडवर बसत विचार क‌रत झोपी जाते‌.


(काही चुकलं असेल तर‌ क्षमस्व कसा वाटला भाग नक्की कळवा.)

क्रमश