The Author Maroti Donge Follow Current Read माझी ओळख सापडत नाही मला.....! By Maroti Donge Marathi Biography Share Facebook Twitter Whatsapp Featured Books નિતુ - પ્રકરણ 45 નિતુ : ૪૫ (ટાઈમ્સનું પુનરાવર્તન) નિતુ અને નવીન બંને ઓફિસે પહ... કૉલેજ કેમ્પસ (એક દિલચસ્પ પ્રેમકથા) - 119 બ્લૂ કલરનું ડેનિમ અને બ્લેક ટી શર્ટ પહેરીને અને એક હાથમાં જે... પ્રેમની એ રાત - ભાગ 8 મૂંઝવણ"શું વાત છે કેમ આમ ચુપચાપ બેઠો છે. કંઈ બોલતો નથી?? કંઈ... પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 10 જાદુ" શું ભાઈ ટિફિનની વ્યવસ્થા કરી કે નહિ? " કૌશલ મોબાઈલ ચાર... ભાગવત રહસ્ય - 96 ભાગવત રહસ્ય-૯૬ મનુ મહારાજ-રાણી શતરૂપા અને દેવહુતિ સાથે-કર્... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Share माझी ओळख सापडत नाही मला.....! (1) 2.9k 11.5k हा मंथळा पाहून तुम्ही आश्चर्यचकीत झाले असेल. परंतु ही खरीच गोष्ट आहे. आपण जन्माला आल्यानंतर बाहेरचे जग पहायला मिळतात. पण त्या बाळाला स्वतःची ओळख मी कोण आहे. माझा जन्म कसा झाला. माझी जन्म तारीख काय? माझा जन्म वार कोणता? माझे आईवडील कोणत्या गावचे आहे. त्या लहान बाळाला माहित नसते. त्याला फक्त नामकरणाच्या माध्यमातून एक नाव ठेवले जाते. पण त्याला खरी ओळख प्राप्त काही होत नाही. बाळ जेव्हा आईच्या कुशीत स्तनपान करीत असते. तेव्हा त्याला जाणवते. हीच आई जन्मदात्री, हीच आहे मायेची सावली, हीच आहे खरी मायेची उब. हे तर बाळाला कळत सुद्धा नाही. माझी ओळख कशी निर्माण होत आहे. तरी पण बाळाच्या हृदयात एका मातृत्वाचे दर्शन झालेले असते. एक नाळी आई आणि बाळाला दूर करण्याचे कार्य करते. पण एक बाळ म्हणून त्याला सर्व काही नवीन असते. बाळाला हळूहळू बाहेरच्या जगाचे दर्शन होतात. तरी पण त्याला मी कोण आहे. माझा जन्म कशासाठी झाला, या जगात येण्यामागचे कार्य कोणते?, माझाच जन्म का झाला, मला दुसरे जीवजंतू, प्राणी, पक्षी म्हणून मला का नाकारण्यात आले. हे समजायला त्याला संपूर्ण आयुष्य वेचावे लागत असते. पण त्याला खरी ओळख मात्र मिळत नाही. तशाच प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात हा प्रश्न मनात येतो. पण त्याला शोधण्याचा प्रयत्न कुणीच करत नाही. ज्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला ते स्वामी विवेकानंद , ए. पी. जे. अब्दुल कलाम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, असे थोर व्यक्ती झाले. आजही आपल्याला त्याचे विचार ऐकण्यापुरते आपण अंगीकारतो. पण आचरणात आणत नाही. कारण की, आपल्या अंगी स्वार्थीपणा दडला आहे. तो बाहेर काढण्याचा प्रयत्न कुणीच करत नाही. कारण तो बाहेर काढला तर आपण सुखी जीवन जगूच शकत नाही, अशी धारणा सर्व मानव जातीला झाली आहे. मानव हा आज एका राक्षसी रुपात पहायला मिळत आहे. त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याआधीच कलंकित केली आहे. ती मग भ्रष्टाचार करून असो की, आई- बहिणीसारख्या दिसणाऱ्या निरागस मुलीवर बलात्कार करून त्याने दाखवून दिले की, माझी एक विशिष्ट ओळख आहे ती मला वेगळ्या उद्देशाने मिळाली आहे. पण जन्माचे सार्थक कशामध्ये आहे, स्वतःच गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणे का? हेच आज कुणालाही उलमत नाही. कारण काय असेल आणि त्याला जबाबदार कोण? आपणच का? आणखी कुणी? असे अनेक प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे, पण ते येताना दिसत नाही. ओळख ही बनवायला खूप कष्ट करावे लागतात. पण गमवायला एक मिनीट सुध्दा लागत नाही. खरच आपली मानव जातीत असा प्रश्न भेडसावत असेल काय? मग तो कशाप्रकारे सामना करतो. तोच खरी ओळख निर्माण करू शकतो. आज आपल्याला अनेकांना तोंड देता देता मरणाला जवळ करत असतो. आत्महत्या हा उपाय आहे का? आपल्या ओळखीचा आपल्याला का होत नाही. आपण चुकीचा मार्ग का अवलंबवितो. हा प्रश्न जेव्हा सर्व मानव जातीला पडेल आणि आपले जीवन सार्थक करता येईल म्हणून डोक्यात विचार येईल. तेव्हाच आपण आपल्या मानव जातीच्या कल्याणाच्या बाजूने विचार करू. तेव्हाच माझी ओळख संपूर्ण जगासमोर येईल. माझी ओळख सापडत नाही म्हणून हात बांधून राहण्यापेक्षा माझं काही देणं आहे समाजाप्रती यांची जाणीव स्वतःला होईल, तेव्हाच माझ्या आयुष्याचे सार्थक माझ्या ओळखीत दिसेल आज आपण आई वडिलाच्या नावाने माझी ओळख समाजाला दिसत आहे, पण माझ्या नावाने आई वडिलाची ओळख निर्माण करणे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून समाजाला आणि देशाला एका प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या वाटेने वाटचाल करायला पाहिजे. मार्ग वेगवेगळे, पण ध्येय एक ठेवणे हेच आपल्या ओळखीला पूर्ण रूप देण्याचे कार्य करीत असते. ही ओळख निर्माण करायला वयाची मर्यादा नसतात, पण आपली एक चूक ही आपल्याला रसातळाला घेऊन जाऊ शकते. इतकी ताकद या "ओळख" या शब्दात आहे. Download Our App