Tujhach me an majhich tu..8 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | तुझाच मी अन माझीच तू...भाग ८

Featured Books
Categories
Share

तुझाच मी अन माझीच तू...भाग ८

तुझाच मी अन माझीच तू...भाग ८

आभा ऑफिस मधून निघून गेली.. आभा जेव्हा राजस च्या डेस्क जवळून गेली तेव्हा आभा जातांना त्याला आभा च्या जाण्याची जाणीव झाली होती पण तो तिच्याशी बोलला नाही...कारण सारखं सारखं तिच्याशी बोलून आपण किती डेस्परेट आहे हे दाखवायची आणि बोलायची त्याला गरज वाटली नव्हती. अजून दोघांची नीट ओळख सुद्धा झाली नव्हती. पण राजस ला आभा बद्दल जे वाटत होत ते लव्ह अॅट फर्स्ट साईट आहे ह्याची हळुवार जाणीव व्हायला लागली होती. आभा ला पाहून त्याच्या मनात गुदगुल्या होत होत्या. पण आभा हे प्रकरण सोप्प नाही ह्याचा त्याला अंदाज आला होता. पण सगळ्यात आधी त्याला आभा ची फ्रेन्डशिप हवी होती... फ्रेंडशिप झाली की पुढचा प्रवास सोप्पा असेल अशी त्याला खात्री होती.

सो आता त्याच्या मनात आभा आणि आभाचाच विचार घोळत होता. अचानक आभा त्याच्या आयुष्यात आली आणि नकळत तिने राजस च्या मनाचा कब्जा घ्यायला सुरवात केली होती. आभा च वागण थोड रूड होत पण राजस ला हाच तिच स्वभाव जाम आवडला होता. आभा कोणालाही लगेच भूलायची नाही.. आणि तिला सुद्धा आपल्या ह्या स्वभावाचा अभिमान होता. पण आभा ला वेगळ्या पद्धतीने इम्प्रेस करायला लागणार ह्याचा तिला अंदाज होता. आता काय केल की आभा इम्प्रेस होईल ह्या बद्दल त्याचा विचार चालू झाला होता. खर तर त्याचे हात लॅपटॉप वर चालत होते पण त्याच्या मनातून आभा चा विचार काही केल्या जात नव्हता. आता त्याच्या डोळ्यासमोर एकाच एम होते ते आभा ला पटवायचे..लगेच प्रेम नाही पण किमान मैत्री.. तिच्या मैत्री बद्दल च्या विचारांनी राजस आधी थोडा वैतागला होता पण नंतर त्याला हे जाणवले की तिला तिची मते असणे ह्यात काही चूक नाही. त्यानी २-३ गोष्टींचा विचार केला पण त्याचा फार काही उपयोग होईल असं वाटत नव्हत.. आता काय करायच्या ह्या विचारात तो पडला होता. त्याने डोकं खाजवलं.. त्याच्या मनात एक वेगळाच प्लान शिजायला लागला होता.. पण तो प्लान कश्या पद्धतीने पूर्ण करायचा ह्या बद्दल त्याचा गोंधळ होत होता. तो स्वतःशीच हसला आणि परत कामाला लागला.. पण काम करता करता त्याच्या डोक्यात १ प्लान रेडी होत होता.. राजस परत स्वतःशी हसला... ६ दिन लाडकी इन... कोणत्यातरी मुव्ही मध्ये पाहिलेलं ह्या मुलगी पटवायच्या आयडीया ची आठवण झाली.. राजस ला आठवल आणि त्याचा चेहरा चमकायला लागला.. तो त्याप्रमाणे काय करायचं ठरवत होता. काय पद्धतीनी वागायचं ह्याचा विचार तो करायला लागला. आणि समोरच असलेल्या लॅपटॉप वर मुद्दे लिहायला लागला,

१. आधी एकदम स्मार्ट बनून तिच्या समोर जायचं..

२. स्मार्ट राजस ला बघून आभा नक्की बोलायला येणार पण तिला इग्नोर करायचं..

३. वेगळ्याच कोणीतरी स्मार्ट मुलीची फ्लर्ट करायचं..शक्यतो अनोळखी..(नेहा नाही कारण शी नोज मी व्हेरी वेल..आणि ती सगळी बिंग फोडण्यात हुशार आहे.)

४. मला दुसऱ्या कोणाशी फ्लर्ट करतांना पाहून आभा ची थोडी चिडचिड होईल.. पण दुर्लक्ष करायचं.. आपण आभा कडे लक्ष देत नाही असा तिला वाटलं पाहिजे. तिची मला भेटण्याची हुरहूर अजून वाढली पाहिजे.

५. मग तिच्यासमोर जायचं. आणि डायरेक्ट डेट साठी विचारायचं..

६. प्रपोज...

त्याने सगळे मुद्दे एकदा परत वाचले. आणि तो खुश झाला.. "पण असं काहीच झालं नाही तर?" - राजस च्या मनात शंकेची पाल चुकचुकली.. आणि त्याने नकळत हातची बोटं क्रॉस केली.. आणि मनात प्रार्थना केली...आभा बद्दल राजस ला काहीच माहिती नव्हते तरी तो तिला पटवायचे मुद्दे त्याच्या लॅपटॉप मध्ये तो लिहित होता. हे सगळ आपण फार विचित्र वागतोय ह्याची जाणीव त्याला होत होती. राजस ला पण आपण अस का वागतोय ह्याचा अंदाजच लागत नव्हता. फक्त त्याच्या मनात विचारांची गर्दी मात्र कमी होत नव्हती,

"हे असं वागण कितपत योग्य आहे राजस साहेब? हे असले फंडे मुव्ही मध्ये ठीक आहेत पण खऱ्या आयुष्यात शक्यच नाही.....आणि हा प्लान फासण्याचे चान्सेस जास्त वाटतायत मला.. " राजस मनात आलेला विचार सोडून देणार होता तितक्यात अजून एक विचार त्याच्या मनात चमकून गेला. त्याने स्वतःला टप्पल मारली..

"घाबरता काय राजस साहेब? पाण्यात उडी मारायची ठरवलीच आहे ना.. मग आता वाहत्या पाण्याला घाबरून काय उपयोग? आता हो जाए आर या पार.. आभा मला इतकी आवडलीये.. आज वर इतक्या मुलींना भेटलो पण आभा बद्दल काहीतरी वेगळंच फिलिंग येतंय... पण ती भाव सुद्धा देत नाही.. नीड टू गो क्लोज टू हर.. ती आली नव्हती तेव्हा काहीच टेन्शन नव्हत ना राव... ती आयुष्यात आली आणि सारखी रुखरुख असते मनात.. तिच्या बद्दल ची ओढ...कमी होईल असं वाटत नाही...पण अर्थात कोणतीही घाई नको.. हे करू पण थोडे दिवस जाऊ दे.. आभा ला अजून नीट समजून घेऊ....तिला सुद्धा मला समजून घेऊ दे.. थोडा वेळ जाईल पण हा प्लान ऑन आहे.. नाऊ नो बॅकिंग आउट.." राजस च्या मनात बरेच गोंधळ चालू होते.. काय कराव काय करू नये, कसं वागाव, काय कराव काहीच सुचत नव्हत. राजस च्या मनात बराच गोंधळ चालू होता.. काय कराव, काय करू नये हे राजस ला कळत नव्हत..आपण विचारांमधून पॉज घेण गरजेच आहे हे राजस ला जाणवत होतं पण त्याला आभा च्या विचारातून बाहेर देखील पडता येत नव्हता.

शेवटी राजस ने ती फाईल लॅपटॉप मध्ये सेव्ह केली. आणि हसला.. काही काळ आभा ला मनाच्या कोपऱ्यात बंद करून ठेवलं.. आता जरा वेळ आभा चा विचार तो बाजूला ठेवणार होता.. मग मात्र तो परत काम करायला लागला. त्याने पूर्ण लक्ष कामाकडे वळवल... आणि काम करतांना आभा जरा वेळ त्याच्या विचारातून बाहेर गेली होती. राजस ने काम आवरले... पण त्याला थोडा दमल्यासारख वाटायला लागाल होत सो त्याने कँटीन मध्ये जाऊन कॉफी पिली.. कॉफी पिऊन तो जरा फ्रेश झाला.. रोज कितीही कामे केली तरी राजस दमायचा नाही पण त्या दिवशी आभा बद्दल विचार करून करून राजस दमून गेला होता. आणि आता काम आवरून त्याला घरी जायचे वेध लागले होते. त्याने परत डेस्क वर येऊन पटापट काम आवरले.. आणि तो घरी जायला निघाला...तितक्यात समोरून त्याचा मित्र आला... तो बोलायला लागला पण त्याला बाय करून त्याने कटवलं.. आणि ऑफिस बाहेर पडणार तितक्यात त्याच्या मनात काय आले कोण जाणे.. तो परत मागे फिरला...आणि आपल्याकडे कोणाचे लक्ष नाहीये हे एकदा हेरलं. जास्ती करून लोकं घरी गेले होते आणि काही होते ते त्याच्या कामात मग्न होते.. ह्याची खात्री केली आणि हळूच तिच्या डेस्क पाशी आला. तो डेस्क रिकामा होता पण तरी राजस तिथे पाहून हसला.. त्याला समोरच कागद पडलेले दिसले.. त्याने पटकन एका कागदावर काहीतरी लिहिले. त्यावर आभा ने आणलेली गणपतीची मूर्ती ठेवली आणि मनात बोलला. "धिस इस फॉर यु आभा. उद्या आलीस की वाच.." आणि हळूच एक फ्लाईंग किस दिली.. पटकन तिथून निघाला.. पण आपण काहीतरी चुकीच वागलो ह्याची जाणीव होऊन त्याने जीभ चावली.. मग तो एक मिनिटही तिथे थांबला नाही.. पण कागदावर लिहिलेला मजकूर आठवून त्याला हसू येत होते. आता राजस उद्याची वाट पाहायला लागला होता.. राजस ला जाणवत होत की तो फार वेड्या सारखा वागतोय.. पण त्याचा स्वतःच्या भावनांवर कंट्रोल होत नव्हता.. पण त्याने दीर्घ श्वास घेतला आणि ऑफिस मधून बाहेर पडला..

क्रमशः..