kadambari Premaachi jaadu Part 3 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी -प्रेमाची जादू - भाग ३ रा

Featured Books
Categories
Share

कादंबरी -प्रेमाची जादू - भाग ३ रा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग- ३ रा

-------------------------------------------------------

पहाटेचे पाच वाजले ..आणि यशच्या मोबाईल मध्ये मिस कॉलची रिंग वाजली . आवाज ऐकून

यश उठला , रेल्वे स्टेशनवर जायचे आहे ..याची आठवण देण्यासाठी बाबांनी आपल्याला उठवले

आहे “.हे यशच्या लक्षात आले. तसे तर तो ही जागा झालेलाच होता , साडेपाचला निघू या अस

त्यचा हिशेब चालूच होता , पण, त्याचे बाबा वेळेच्या बाबतीत फारच काटेकोर ..सगळ्यापेक्षा

अगोदर त्यांचीच घाई-गडबड सुरु असते ..आता सवयीने सगळेजन त्यांचे घाई घाई करणे ऐकून

घेत चुपचाप आपापली कामे करीत असतात .

यश त्याच्या रूममधून हॉलमध्ये आला. डायनिंग –कम –हॉल अशा नव्या पद्धतीची ही व्यवस्था

सगळ्यांना आवडली होती . यशने पाहिले ..त्याचे आई आणि बाबा दोघे ही पहिल्या चहासाठी

याची वाट पाहत होते .. आणि यश एक खुची ओढून घेत बसल्यावर आईने त्याच्या समोर गरमागरम

चहाचा कप ठेवला .

चहा घेता घेता .बाबा म्हणाले –

तुला साडेपाचला निघायलाच हवे.. मी गेट बाहेर गाडी काढून ठेवली आहे .चकाचक करून ठेवली ,

तुझ्या इतके नसेल जमले हे काम ..

पण, बापूंना ..कार स्वच्छ आणि चकाचक दिसली पाहिजे ..नाही तर ..उगीच ओरडा खावा लागतो .

यश म्हणाला .. काय हो बाबा ..अहो मी वेळेच्या आधीच तयार होतो ..

हे तुम्हाला माहिती आहे, तरी पण तुमची सवय काही जात नाही ..,

पहाटेच्या गारठ्यात कशाला बाहेर पडलात ..काही त्रास झाला म्हणजे ..त्याचा त्रास तुम्हालाच .

आणि आम्ही किती ही म्हटले ,असे नका करत जाऊ , त्रास होईल , दुसर्यांनी सांगितलेले ..

हे तुम्ही थोडेच ऐकणार आहात .?

यशचे हे बोलणे ऐकून ..आई हसत हसत म्हणाली ..

काही उपयोग नाही ..तुम्ही सगळे सारखेच ..एका माळेचे मणी ..आहात ..

स्वतःच्या मनात जे आहे तेच करणार , आणि समोरच्या कडून तसेच करवून घेणार

मला आता याचे काहीच वाटत नाही रे यश ..आई म्हणाली -

बापू आजोबा ,तुझे बाबा , तुझा दादा ..त्यांचेच गुण आणि सवयी तुझ्यात येणारच की .

या सगळ्या बोलण्यात बाबांचे लक्ष भिंतीवरच्या मोठ्या घड्याळाकडे लागलेले ..ते म्हणाले ..

ए यश, आल्यावर निवांत गप्पा करू या तू निघ बर आता ..!

आता जुन्या काळातल्या सारखे रेल्वे उशिरा येत नाही ..त्यामुळे आपण आपलं वेळेच्या आधी

बोगी जिथे येईल ..त्याच्या समोर उभे असलेले बरे..

खरेच किती सोय झालेली आहे, धावपळ ,दमछाक ,नाही राहिली .

ओके ,आई, बाबा ..साडेसहा ..पर्यंत येतो ..आज्जी –आजोबांना घेऊन..

आवडत्या कार मध्ये .सकाळी सकाळी .असे फिरायला निघणे यशची खूप आवडती गोष्ट ,

दिवसभर ट्राफिक जम “मुळे गर्दीचे रस्ते खूप पहाटेच्या वेळी ..गर्दी नसलेली ..सकाळची प्रसन्ना

हवा ..आणि कामावर जाणारी माणसे ..चहाच्या गाडीवर .. गरम चहाचे घटके घेत ..निवांत

उभे ..हे असे दृश्य पुन्हा दिवसभर पाहायला मिळणारे नसते ..

किती वाहने ..किती ट्राफिक ..याच रस्त्याने शाळा कोलेजला जायचो तेव्हा नसायची आजच्या इतकी

गर्दी ..

बापू आजोबा तर म्हणतात ..आम्ही जेव्हा या शहरात आलो ..त्यवेळी हा भाग ..एक लहान गाव

असल्या सारखे होते ..खूप मोकळे ..हवेशीर ..स्वच्छ ..

पण..आज ..सारं बदलून गेलाय ..

रेल्वे स्टेशनवर ..पार्किंगला लगेच रिकामी जागा मिळणे ..म्हणजे नशिबा फारच जोरावर आहे असे

समजावे . तसे नाही झाले तर ..मग मात्र जागा शोधण्यात .वेळच वेळ ..वैतागून जायला होतं

याचा विचार केला तर ..

कधी कधी वाटते ..आपले बाबा वेळेच्या बाबतीत घाई ,गडबड करतात तेच अगदी बरोबर आहे ,

वेळेआधी आले तर ..बहुतेक वेळा अगदी समोर पार्किंग मध्ये गाडी लावता येते ..पण,

तेच अगदी वेळेवर . घाईत आले की ..मात्र ..फक्त गोंधळ ..त्यामुळे ..इरिटेट होऊन माणसे

एकमेकांशी फक्त भांडत राहतात .

यश एक नंबर paltform वर आला , समोरच्या मोठ्या इंडिकेटर बोर्डवर आता येणाऱ्या ट्रेन च्या

वेळा दिसत होत्या ..त्याला बाबांचे शब्द आठवले ..

आणि तो मनाशीच म्हाणाला ..खरेच की ..एक ही ट्रेन लेट झालेली नाहीये ..सगळ्या अगदी

“अपने अपने निर्धारित समयपर “ येत आहेत हे दिसत होते.

आजोबांची शताब्दी ट्रेन येण्यास ..अजून १५-२० मिनिटे होती .. ए सी २ कोच थांबणार त्याच्या

समोरच ..चहाचा आणि खाण्याचा stall ,त्याच्या बाजूला ..पेपर आणि मासिके , यांचा stall,

एका रिकाम्या खुर्चीवर बसत ..यश आजूबाजूला पाहत राहिला ..

सकाळच्या स्लो आणि फास्ट- उपनगरीय लोकल ..मिनिटा –मिनिटाला ..पब्लिकला सामावून

घेत ..निघत होत्या ..ऑफिसला , ड्युटीला , निघालेली स्त्री –पुरुष ,शाळा, कोलेजला जाणारी मुले-मुली

इतक्या सकाळी सकाळी उठून जाणारे सिनियर सिटीझन पाहून तो मनाशी म्हणाला ..

हे लोक का बरे असे बाहेर पडत असतील ? कुणी सोबत नाही ..तरी एकटेच निघालेत .काय काम बंद

असते कुणास ठाऊक यांचे ?

स्वतहा परेशान आणि घरच्यांची परेशानी ..काळजी वाढवतात ..

फार हट्टी, आपलाच हेका चालवणारी , आपलेच खरे करणारी ..अशी माणसे का बरे समजून वागत नसतील ?

त्रास कसा देता येईल ? याचाच विचार करतात की काय ही माणसे ?

अनेक मित्रांच्या घरातअसे सिनियर सिटीझन –म्हणवणारे स्त्री-पुरुष दोघे ही दिसतात ..तेव्हा वाटते

या माणसांच्या मनातील ..प्रेम भावना ..दिवसे दिवस आतून नाहीशी होत जाणारी असते काय ?

“प्रेमाची जादू “ यांच्यासाठी काही करू शकत नाही ..किती कम्माल आहे न ?

त्या मनाने आपण खरेच खूप लकी आहोत ..

समजदार अम्मा-आजी आणि बापू आजोबा ..यांचीच कार्बन कोपी जोडी ..म्हणजे ..

आपले आई-आणि बाबा आहेत ..

आणि सुधीर भैया – अंजली वाहिनी ..हे नव्या जमान्यातली जोडी ..

त्यांना आजी-आजोबांच्या स्वभावाची लेवल येनासाठी अजून काही वर्षे लागणार आहेत ..

आत्ता कुठे ..त्यांच्या लग्नाला ..सात –आठ वर्षे होत आहेत ..

दोघे ही कोर्पोरेत जोब मध्ये ..त्यामुळे ..पारिवारिक आयुष्य त्यांच्या वाट्याला कमीच आहे..

अंजली वाहिनी ..स्वभावाने खूप चांगली आहे ..असे असले तरी .. मोठ्या पगाराची नौकरी ,

हाय-फाय ..माहेर ..माहेरची माणसे .. यातच ती जास्त दंग असते .

आज्जी आणि आईच्या बोलण्यात – अंजली वाहिनीचा विषय निघाला की

आजी म्हणते .. माणसाला स्वतःच्या रूपाचा , हुशारीचा ..अभिमान असणे चुकीचे

नाही , पण ,त्याचा गर्व ,अहंकार असणे वाईट ..!

आपली अंजली स्वभावाने छान म्हणजे ..तशी प्रेमळ आहे , माणसांची आवड आहे तिला ..काळजीने

सर्वासाठी खूप करणे ..आवडते तिला ..

पण..

आणि या पण “मुळे सगळा घोळ होतो ..

स्वताच्या रूपाचा , गुणांचा मोठा अभिमान आहे तिला ,त्यात तिची जीभ चांगलीच फटकळ आहे ..

खूप काही केलेले ..बोलून दाखवण्याच्या सवयीने ..इतर कसे बिनकामाचे , काही न येणारे आहेत ,

आणि मी कशी सगळ्यांपेक्षा ..सगळ्याच कामात हुशार आहे ..हे दाखवण्याचा तिचा आटापिटा ..

समोरच्या माणसांना ..उबगवाणा शो –बिझनेस वाटतो ..

इतरांना चांगले म्हणयचे ..चार गोड शब्द बोलायचे ..या गोष्टी ती लक्षात ठेवून करीत नाही ..

आणि मग ..तिच्या अशा वागण्याने ..बोलण्याने ..माणसे तिच्या जवळची होत नाहीत ..

असे असून ही ..अंजली लोकांच्या नावाने ओरडणार ..

सगळ्यांसाठी मी इतकं करते ..पण..त्याची कदरच नाही कुणाला ..होपलेस पीपल्स ..!

या सगळ्या प्रकारात ..त्याचा सुधीर भैया ..एकदम संत माणूस ..निर्विकार , मितभाषी , आपल्याच

ऑफिसच्या कामाच्या ओझ्याखाली कायम दाबून गेलेला एक सीधा साधा माणूस ..

शनिवार-रविवार या दोन दिवशीच किंवा सुट्टीच्या दिवशी ,सुधीरभैया घरात आहे हे जाणवते ..

सुट्टीच्या दिवशी ..आणि रविवारी ..बहुतेक वेळा ..अंजली वाहिनी तिच्या माहेरी .काही ना काही

निमित्त काढून सकाळी जी जाते ते थेट रातीच्या जेवणाच्या वेळी हजर होणार ..

मग,अशा दिवशी ..सुधीरभैया ..खूप नॉर्मल मूड मध्ये घरभर वावरत असतो ..

अशा वेळी त्याला कुणी छेडीत नाही ..

म्हणत नाही की बाबा रे -.अंजली घरात नसली की तू मोकळा असतोस .

उगीच त्या बिचार्याचा चांगला मूड खराब व्हायला नको.

अंजली वाहिनी आणि यश ..यांची ट्युनिंग ठीक ठीक आहे .असेच आहे.

यश इंजिनियर आहे, मोठ्या जोब मध्ये त्याने जावे असे अंजलीला वाटायचे ..आणि यश तर

स्वताच्या बिझनेस मध्ये मस्त होता . हे तिला फार कमीपणाचे लक्षण आहे “ असे वाटणारे होते .

कामगाराचा ड्रेस घालून गाड्या दुरुस्त करणारा यश “ ,त्याचे फ्रेंड सर्कल , या सगळ्या गोष्टी

तिला आवडत नसत ..आणि संधी मिळाली की सगळ्यांच्या समोर ती यशला नावे ठेवायची ,

टोमणे मारायची .

पण त्याच वेळी ..सुटीच्या दिवशी यशच्या रूमची आवरा आवर करणे ..साफ सफाई , त्याच्या कामच्या

गोष्टींची काळजी घेत त्या व्यवस्थित ठेवणे . जेवणात यशच्या आवडीचे करणे , आग्रह करून

खाण्यासाठी देणे ..हे सगळ ती मनापासून करते ..हे सगळ्यांना दिसत असायचे ..

शॉपिंगला गेले की ..अंजली यशला शोभून दिसणारे कपडे आगदी आठवणीने आणते ..या ड्रेस मध्ये

यश खूप छान दिसतो ..अशा कॉम्प्लीमेंत्स सगळेच देतात .

या सगळ्या प्लस –मायनस मुळे यश त्याच्या अंजलीवाहिनीशी फार मोकळेपणाने पण नाही ,

आणि फार रिझर्वपणे पण राहत नाही .तिचा रागरंग पाहून बोलणे" हेच बरे होते.

आपल्याच विचारात बसलेल्या यशला

आजूबाजूची पब्लिक एकदम अलर्ट झाली आहे असे जाणवले . आणि त्याला दिसले ..

त्याच्या आजी-आजोबांना घेऊन येणारी ट्रेन समोरून येते आहे..

तो जेथे उभा होता ..बरोबर तिथेच कोच थांबला ....ट्रेन पुढे कुठेच जाणारी नव्हती ..म्हणून

उतरणारे प्रवासी ..अगदी आरामशीर उतरत होते ..

रातभर प्रवास करून ..झोप काढून फ्रेश झालेले प्रवासी ..

हुश्श रे बाबा !, झाला प्रवास .आलो एकदाचे आपल्या घरी ..

असा भाव प्रत्येकाच्या चेहेर्यावर दिसत आहे..असे यशला त्यांच्या कडे पाहून वाटत होते ..

आपले बापू आजोबा आणि अम्मा आजी अजिबात घाई न करता सर्वात शेवटी उतरणारे प्रवासी आहेत.

हे आता यशला चांगलेच माहिती झालेले होते. त्यामुळे तो ही निवांत वाट पाहत एसी कोच्या

बाहेर उभा राहिला .

एकदाचे ..बापूआजोबा दरवाज्यात आले ..यशने त्यांना आधाराचा हात देत खाली उतरवून घेतले .

त्यांच्या बैग खाली घेतल्या . मग अम्मा आजी हळू हळू येतांना दिसली ..आणि

तिच्या हाताला धरून सांभाळून आणत असलेली एक मुलगी पाठोपाठ येत आहे असे दिसले ..

अगोदर ती मुलगी ..खाली उतरली ..नंतर तिने अम्माआजीला सावकाश ..खाली उतरवून घेतले .

त्यावेळी बापू आजोबा त्या दोघीकडे पाहत होते ..

ज्या पद्धतीने दोघे ही या मुलीशी खूप जवळीकीने वागत होते ..त्यावरून अंदाज आला की .

हे एकमेकांच्या जवळच्या परिचयाचे आहे. कालच्या प्रवासात झालेली नवी ओळख नक्कीच नाहीये.

दोन मिनिटे ..थांबून ..आखडलेले हात –पाय मोकळे झाल्या सारखे वाटल्यावर ..

बापू आजोबा म्हणाले ,

अरे यश ..ही मधुरा ..! आमच्याच बाजूच्या कॉलनीत राहते .सगळी फमिली खूप वर्षापासून परिचयाची

आहे , त्यामुळे तिच्या आई-बाबांनी काल आमच्या सोबत पाठवली ,म्हणाले आता आम्हाला काळजी नाही.

पहिल्यांदाच आली आहे ती या शहरात .

हिला जाता जाता ..तिच्या दिदिकडे सोडून ..मग आपण पुढे जाऊ या ..!

ठीक आहे बापूआजोबा ..!

अगोदर आपल्याला एक गोष्ट करावी लागेल ..आजोबा ,

सगळ्यात अगोदर ..घरी बाबांना फोन करून सांगू या .

ट्रेन आली आहे , तुम्ही आलेले आहात , आणि येता येता सोबतच्या एका पाहुण्याला त्यांच्या घरी सोडून

मग आम्ही येतो आहोत ..थोडा वेळ लागेल त्यामुळे ..काळजी करू नका .

असे नाही सांगितले तर.. उशीर का लागतो म्हणून ..बाबा वेळेचे गणित सोडवत बसतील ..

आणि का बरे उशीर इतका ?

म्हणून स्वतः बरोबर सगळ्यांना परेशान करतील ..

हे ऐकून आजोबा मोठ्याने हसले आणि म्हणाले ..

यस .हे तर करावेच लागेल .तू तुझ्या बाबांना खूपच चांगले ओळखले आहेस .

हे ऐकून आज्जी म्हणाली ..

यश ..माझ्या लेकाबद्दल असे का बरे बोलतोस .अजिबात ऐकून घेणार नाही मी ..हा ..!

यशने कानाला हात लावीत सोरी आज्जी ..! म्हटले आणि आजी खुश झाल्या .

कार पार्किंग पर्यंत पोन्च्ल्यावर ..यश ने समान ठेवले .. या साठी मधुरा त्याला मदत करू लागली ,

हे पाहून ..आज्जी ..हसत हसत .आजोबांना म्हणाल्या ..

काय हो .. काय वाटतय हे पाहून ..?

आजोबा म्हणाले ..तुझ्या मनात आहे तेच ,माझ्या नजरेला दिसते आहे..

पण, तू अशी घाई करू नको ..आणि बोलून तर अजिबात दाखवू नको ..

एकदम चूप ..!

बरं बाई ..!पण..सगळीकडे लक्ष असू द्या तुमचे !

पुढच्या सीटवर न बसता ..मधुरा ..आजीच्या बाजूला बसली..!

तिने तिच्या दीदीच्या सोसायटीचा पत्ता सांगितला ..तेव्हा ते ऐकून यशच्या ऐवजी

आनंदाने ..आज्जीच म्हणाल्या ..

अय्या , अरे यश ..तुझ्या शॉपच्या अगदी जवळ आहे तीच ना रे ही सोसायटी ?

यश म्हणाला हो आज्जी ..तीच सोसायटी आहे ही ..आपल्या घरापासून फार दूर नाहीये ..

मी रोज याच रस्त्याने ..या सोसायटी समोरून माझ्या शॉपला जातो –येतो ..!

यश ..हे तर खूपच छान झाले की . म्हणजे ..तू मला या मधुराकडे सोडू शकतोस , पुन्हा

घायला येऊ शकतोस . हे बेस्ट झाल .

काय ग मधुरा , येत जाऊ ना मी ? तुला भेटायला ..हा यश असेलच माझ्या सोबत .

काय आज्जी ..माझी दीदी पण तुम्हाला घरच्यासारखीच आहे..आणि तुम्ही आलेल्या मला

चालेल का ? आवडेल का ? असे प्लीज नका न म्हणू.. मला नाही आवडणार असे म्हटलेले .

मधुराने आज्जीला जरा जास्तच खुश करून टाकले आहे..असे यशला वाटले ,

पण तो काही बोलला नाही.

मधुराला सोडून ..यश घरी आला ..

सगळे वाटच पाहत होते ..

थोड्यावेळाने चहाचा राउंड सुरु झाला ..

आजी म्हणाल्या ..कालचा प्रवास बाकी खूप छान झाला .

आपल्या बाजूच्या कॉलनीतल्या पंडितजी यांची मधुरा .आमच्या सोबत आम्हाला घरच्यासारखी होती.

खूप काळजी घेतली आमची या पोरीने .

यशच्या आईला आज्जी म्हणाल्या .. अग..तुला खूप आवडेल ही मधुरा ..खूप गोड ,गुणी मुलगी

आहे .

आजोबांनी त्यांना थांबवीत म्हटले ..आज्जीबाई ..कंट्रोल करा जरा ..

बरं बरं ..अरे यशला विचारू या की

काय रे यश .. तुझ्या काही कमेंट्स ..

नो आज्जी ..नो कमेंट्स ..!

काय करावे या पोराला ?

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाको पुढच्या भागात

भाग – ४ था लवकरच येतो आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.