ई कडे साखरपुड्याची जोरदार तयारी जाहली .अंजलीच्या हातावर मेहंदी लागली होती . अंजली साखरपुडा ची तयारी करण्यात गोळ्या खाण्याची विसरून जयील .म्हणून सोहम तिच्या कडे जेवणानंतर खाण्याच्या गोळ्या घेऊन गेला . अंजली मैत्रिणी सोबत गप्पा मारत बसली होती . सोहम तिच्या जवळ गेला, तिच्या हातावर मेहंदी लागल्या मुळे ती गोळी खाऊ शकत नव्हती .सोहम ने तिला गोळी भरवली .तिला ग्लास ने पाणी पाजले .आणि तो तिथून निघून गेला . तो तिथून जाताच, अंजलीच्या मैत्रिणी तिला सोहम वरून चिढ्वु लागल्या . त्याच्या चिढ्व्नया मुळे अंजलीही लाजली. सोहम तिची सतत घेत असलेल्या काळजी तिला ही आवडू लागली होती. आता पर्यंत सोहम फक्त तिला एक चांगला मित्र वाटत होता .पण, तिच्याशी लग्न करायला घेत असलेल्या निर्णयामुळे तिला सोहम खूप आवडू लागला होता .आणि सोहम आपला आयुष्याचा जोडीदार होणार ह्याचा तिला सार्थ अभिमान वा टत होता .
ई कडे सोहम ची आई सोहम च्या आणि अंजलीच्या लग्नाला आली खरी पण सोहम आणि अंजलीच लग्न होऊ नए म्हणून तिचे सगळे प्रयत्न चालू होते .तिने सोहमला खूप विचारण्याचा प्रयत्न केला, की निशा वर प्रेम असताना तो अंजलीशी असा का वागला ? त्याच्या ह्या प्रश्नावर त्यानी उडवा उडवीची उत्तरे दिली . ह्यावरून सोहम च्या आई ला खात्री पटली की, अंजलीच्या पोटा तील मुलं हे सोहम च नाही आहे . पण, तिला लगेच प्रश्न पडला मग सोहम हे सगळं का सहन करतोय . तो का अंजलीशी लग्न करतोय? सोहम च्या आईला अनेक प्रश्न पडत होते .पण आता प्रश्नाची उत्तरे शोधा याची वेळ नाही . तर काहीही करून हा साखरपुडा आणि लग्न मोडयाची वेळ होती .
त्या लगेच अंजली नाही हे पाहून, अंजलीच्या रूम मधे शिरल्या. त्यानी बरीच उलथापालथ केली .पण त्याना तिथे काहीच मिळाले नाही . एक आशा होती तिची पण निराशा जाहाली . त्याना असं पण वाटत होत, की हे सगळं नीशाला सांगावं .आणि तिला एथे बोलवून घ्यावं .पण तस केलं तर मग अंजली गेली की निशा त्याची सून बनेल .त्याना ते ही मान्य नव्हतं. त्याना त्यांच्या आवडीची मुलगी सून म्हणून घरात आणायची होती ., .... काहीही न करता ....ब्यांद जयील .म्हणून त्यानी नीशाला सोहम च्या लग्ना विषयी काही न सांगण्याचा निर्णय घेतला . पण हा साखरपुडा कसा मोडावा? हा तर फार मोठा प्रश्न उभा होता .त्याना काहीच सुचत नव्हते.
सोहम ने फोन चे पटापट नंबर दाबले. फोन कानाला लावला . रिंग वाजत होती . पण कोणी फोन उचलत नव्हते . थोडावेळ गेला, आणि समोर गोड आवाज आला .,हेलो, ....... कोण बोलतय? ....थोडा वेळ शांतता पसरली . समोरून आवाज आला ...कोण? सोहम..... ...
ई कडून लगेच आवाज आला, तू कसं ओळखलंस? हा ..तर मझा नंबर नाही ..... सोहम नि विचारलेल्या प्रश्नांवर निशा बोलू लागली . , अरे, आपल्या जवळच्या माणसाना ओळखायला कशाचीही गरज नसते . ती तर आपल्याच जवळ असतात . त्यामुळे ती कोठे ही असली तरी, त्याना ओळखणे फार अवघड नसते . जसं... तुला ओळखणे ....मला फारस अवघड नाही ...... निशाच त्याच्यावर असणार प्रेम आणि विश्वास ह्याचा त्याला नेहमीच कौतुक वाटे .पण आता ....त्याला त्याचाच त्रास होत होता .कारण त्यामुळेच त्याला तिच्या पासून दूर होणे अवघड जात होते . पण, आज नीशाला सगळं सांगूंन टाकायचं.ह्या हेतूने त्याने बोलायला सुरवात केली . ,,, निशा ...अगं, आज मला तुला काहीतरी सांगायचंय ....एवढ्यात त्याचं बोलणं ..मधेच थांबवत निशा त्याला नेहमीप्रमाणेच बोलायचं, असं म्हणून ...बोलू लागली ....मला माहीत आहे, काय ...सांगायचंय ते ...तुझं मझ्यावर खूप प्रेम आहे . तुला नेहमी हेच सांगायचं असतं ,एवढं बोलून निशा गोड हसली . तीच ते खळखळ नार हसू ऐकून सोहमला खूप आनंद झाला. पण सगळा आनंद बाजूला ठेवून तिला हे सगळं सांगितलं पाहिजे . म्हणून सोहमने सांगायला सुरवात केली .,निशा .....ते तर मी नेहमीच बोलतो , पण आता मला काहीतरी वेगळं सांगायचंय.तू प्लीज़ मला समजून घे .मी तुला कोणत्या ही प्रकारचा धोका नाही दिला .पर्स्तीथी तशी आली म्हणून मी तसा निर्णय घेतला . नीशाला सोहम काय बोलतोय काहीच कळेना .तिला त्याला त्याच्या बदल विचारू लागली . सोहम, तिला सांगू लागला .निशा, मी एथे आलो, ते निशा बाबा साठी त्यांची अपेक्षा होती .मी एथे येऊन पुढचं शिक्षण घ्यावे . आणि तुला ही तसच वाटत होत. म्हणून, मी एथे आलो . पुढचं शिक्षण घेऊ लागलो .एथे मी रह्तौय हे बाबांच्या मित्रा च घर आहे . त्याना एक मुलगी सुध्दा आहे . अंजली तीच नाव . मी एथे आलो, तेव्हा तिच्याशी ओळख जाहाली .खूप चांगली मुलगी आहे ती ......मझ्या च कॉलेज मधे आहे ती ...मी एथे अल्य्यावर तिने मला खूप मदत केली .आमची चांगलीच गट्टी जमली . एके दिवशी आह्मी एकत्र अभ्यास करत होतो .त्यावेळी तिला अचानक चक्कर आली .आणि ती बेशुद्ध पडली . घरी कोण्ही नसल्या कारणाने मीच तिला हॉस्पिटल मधे घेऊन गेलो .तेव्हा कळाले, की ती प्रेग्नंट आहे . आणि तिला त्याबद्दल विचारले, तेव्हा समजले ,की तिला एका मुलाने फसवले .तिची ईछा नसताना तिला गुंगिचे औषध देऊन तिच्यावर बळजबरी केली . ती खूप डिप्रेशन मधे गेली .मग, तिने ते बाळ ह्या जगात न आणयाचा निर्णय घेतला . सगळं कसं विचित्र घडत होत .ह्या सगळ्यात फक्त माझं मन मला सांगत होत की, ह्या बाळा चा काय दोष आहे .कोणीतरी आपली हवस भागवण्यासाठी काहीतरी केलं, आणि ह्या बाळानी जन्म घेतला .ह्या सगळ्यात त्याची काय चुकी आहे .त्यानी का जन्म घेऊ नये. हे सुंदर जग बघण्या चा त्याला पण तिठ्काच अधिकार आहे, जितका की ईत राना .त्या बाळाला ह्या जगात आणण्यासाठी मी एक निर्णय घेतला. तू प्लीज़ रागावू नको. मला समजून घे .त्याच सगळं बोलणं निशा कानात तेल घालून ऐकत होती . पण ....शेवटी तिला न राहवून तिने त्याला विचारले .बोल, सोहम कोणता निर्णय घेतला ?.निषाच्या मनात संशयाची पाल चुक्चुक्ली. सोहम ने मोठा श्वास घेतला. आणि तो सांगू लागला . मी अंजली शी लग्न करायचा निर्णय घेतलाय, म्हणजे मला तसा तो निर्णय घ्यावा लागला . मला तिचा तो त्रास बघावाला नाही . आणि ते बाळ ......हेलो ....हेलो ...हेलो ....समोरून फोन कट झल्याच सोहम च्या लक्षात आले. ह्या सगळ्या प्रकरणात निशा आपल्याला समजून घेयील .असं, सोहम ला वाटले होते . पण तसे तर काही घडले, नाही पण तिने त्याचं बोलणं ही ऐकून घेतले नाही .
सोहमला निशा च्या वागण्याचे वाईट वाटले .पण, निशा ला हे सगळे कळ्या वर ती थोडाफार असं वागेल ह्याचा ही त्याला अंदाज होता .एवढ्यात अंजलीच्या डॉक्टराचा फोन आला .अंजलीच दुसऱ्या दिवशी रेग्युलर चेकअप होत. ते सांगण्यासाठी डॉक्टराचा फोन आला होता . दुसऱ्या दिवशी सोहम आणि अंजलीचा साखरपुडा होता .साखरपुडा झल्यावर सोहम तिला घेऊन हॉस्पिटल मधे रेग्युलर चेक अपला जाणार होता .