hot asan kadhitari in Marathi Short Stories by Akshata Kurde books and stories PDF | होत असं कधीतरी

Featured Books
Categories
Share

होत असं कधीतरी

होत असं कधीतरी

आज सुट्टीचा दिवस मी पूर्ण एन्जॉय करणार 😉 आणि जेवण सुद्धा ऑर्डर करेन, 😤 मस्त आज आराम करणार ठरवून मी उशिराच उठले. 😵 सगळ आवरे पर्यंत दीड वाजून गेला. जेवणाच पार्सल 🍜 घेवून मी टीव्ही वर मूव्ही 😍लावून जेवणाचा आस्वाद घेत होते. 😋 सगळ झाल्यानंतर मी माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजे गच्ची वर जाऊन गोष्टी वाचत 📖 बसेन ठरवून वरती गेले. 🧐 गोष्टी वाचता वाचता अचानक डोळा लागला 😵 आणि तिथेच झोपून गेले. 😴 नंतर मग डास चावल्याने मला जाग आली. 🥴

संध्याकाळ झाली होती. 🥰 मग मी माझा सगळा पसारा आवरला.😩 गच्चीवरून खाली येऊन फ्रेश झाले 😄 मग दिवा लावून शांत देवासमोर हाथ जोडून 🙏 उभी राहिली. 😇 इतक्यात घरातली लाईट निघुन गेली. 🙁 अचानक लाईट कशी काय गेली 🤔 हे बघायला मी वळणार इतक्यात माझ्या पायात पाय अडखळला 😦 आणि मी पडले तिथे हाथ लागून दिवा सुद्धा विजला. 😞 डोळ्यांपुढे मिट्ट काळोख पसरला होता. 😱 कशी बशी मी हाथ चाचपडत काडीपेटी शोधण्याचा प्रयत्न करायला लागले. 😟 काडीपेटी हाताला लागताच मी डोळ्यांना थोडा तान देऊन अंधारात पाहण्याचा प्रयत्न करत होती. 😐 काडी पेटवताच बाजूने एक सावली धावत जाताना मला दिसली. 😳 मी इतकी घाबरून गेले की माझ्या श्वासाने पेटवलेली काडी सुद्धा विझून गेली. 🌬️ इतक्या वेळात मी एकटी होती पण सोबत मनात विचारांचं काहूर माजलं होतं 🤯 त्याने भिती वाटत नव्हती 😕 पण आता मात्र मी आणि माझं मन सगळं शांत झालं होतं. 😣 घडळ्याच्या पळणाऱ्या काट्यांचा आवाज सुद्धा माझ्या मनाला भीतीदायक वाटतं होता. 😨 पुन्हा मी काडी हातात घेऊन ती पेटवण्याच्या विचारात होते पण तो काडी पेटवताना होणारा आवाज आता मला नको होता. 😟 पण धीर एकवटून मी पुन्हा काडी पेटवण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळी ती काडी तुटून गेली. 😰 पुन्हा तीन प्रयत्नांत मी काडी पेटवून कसातरी दिवा लावला.🕯️ मिणमिणत्या उजेडात मी माझा मोबाईल 📱 शोधू लागले 🧐 पण तो सुद्धा दिसेना. 🤔 मग आठवलं की मी मोबाईल गच्चीवर ठेवून आलीय. 😣 आता मात्र मी काय करू काय नको अस झालं होतं. 🥺 मी माझ्या विचारात होते आणि तितक्यात किचन मधुन ताट खाली पडल्याचा जोरात आवाज आला. 😲 मी इतकी घाबरून गेली होती की आता जीव जातोय की काय असच वाटतं होतं. 😖 इतक्यात लाईट आली तशी मी दचकून गेली. 😳 पुन्हा किचन मध्ये भांड्यांचा खुडखुड आवाज आला. 😧 आता मी माझा सगळा धीर एकवटून किचन मध्ये जाऊ की नको अस करत करत मी एक एक पाऊल पुढे टाकत होती. 😥

किचन जवळ पोहचले 🙎 तशी मी हळूच मी माझं डोकं आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला 😥 तर समोर च दुष्य पाहून डोक्यावर हात मारून घेतला. 😦 माझा नवरा मला चायनीज आवडत म्हणून घेऊन आला होता. 🙄त्यासाठी तो भांडे शोधत होता.🤦‍♀️ मला असं उभी पाहून त्याचा हिरमोड झाला. 😞 त्याला सरप्राइज द्यायचं होत म्हणे. 🤷 ह्या सगळ्या प्रकारा मुळे मला चांगलच सरप्राइज मिळालं होत. 😩 माझी अवस्था हसू की रडू अशी झाली होती. 🥺 मग त्याला झालेला सगळा प्रसंग सांगितला 😅 तसा तो खूप हसला. 😝 मग आम्ही गच्चीवर जाऊन गप्पा गोष्टी करत माझं आवडतं चायनीज फस्त केलं. 😋 आयुष्यभर लक्षात राहील असं जीवघेणं सरप्राइज मला मिळालं... 🤭😂 😆 😅

( एक काल्पनिक अनुभव )

- अक्षता कुरडे.