garmagaram cha milen ka ? in Marathi Love Stories by राहुल पिसाळ (रांच) books and stories PDF | गरमागरम चहा मिळेल का?

Featured Books
  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

  • Nafrat e Ishq - Part 7

    तीन दिन बीत चुके थे, लेकिन मनोज और आदित्य की चोटों की कसक अब...

Categories
Share

गरमागरम चहा मिळेल का?

*गरमागरम चहा मिळेल का?*

विनोदला सकाळी कामावर जाण्यासाठी घाई झाली होती.लवकर आटोपून कामावर जायचे होते.पण काय करणार! त्याला एकट्याला स्वयंपाक करावा लागत होता.असताना तो खेड्यागावात वाढलेला आणि शिक्षण ही तिथेच पुर्ण झाले होते.आणि नोकरी लागली ती पण अशी शहारात!!!जिथे ना कोण ओळखीचं ना कोणी पाळखीच.
दररोज प्रमाणे तो आज पण चाललं होता.एका पायातील सॉक्स सापडत नव्हता.त्यामुळे तो स्वतःशीच पुटपुटत होता.रात्री जर आपण आळस केला नसता तर अशी वेळ आली नसती!आता गप्प गुणाने बसा शोधत!!!
तोपर्यंत घरातील मोबाइलची घंटी वाजली पण जसं काय ह्याला एखाद टास्क दिल्यासारखा तो सॉक्स शोधत होता.बराच वेळ झाल तो मोबाईल ही रिंग वाजवून गप्प बसला असावा!आता विनोदला कितीतरी मेहनत करुन हा सॉक्स मिळाला.तसाच तो आपल्या एक काके मध्यें बॅग घेऊन निघाला.तसाच नेहमीच्या रस्त्यावर तो चालू लागला.
पण त्याला आताशीच आठवण झाली असावी की,अरे आपण तर मोबाईल पाहिलाच नाही!

जाताना तो बसमधून गेला.स्टॉपला उतरला.आणि थोडयाशी जवळच म्हणजे समुद्रकिनारा होता.तो सवयीप्रमाणे या थंडगार हवेत.मनाला प्रफुल्लित करण्यासाठी आनंद लुटण्यासाठी तो तेथील चहाच्या टपरीवर चहा पिऊन जायचा.हा त्याचा दररोजचा नित्यनेम झाला असावा.त्या काकूही आता त्याच्या चांगल्या ओळखीच्या झाल्या होत्या.पण आता मोठमोठी चहाची दुकाने झाली अन् टपरीकडे येणाऱ्या लोकांचा ओघ कमी झाला.पण हा विनोद कधीच तो इथे येताना चुकत नसे.काहीवेळा तर दुकानाला दिवसातून एक ग्राहक मिळायचा! अर्थात तो विनोद असायचा.पण बोलायला एकदम मनमोकळा होता.विनोद नावाप्रमाणेच विनोदी बुद्धी त्यामुळे त्याच्या शेजारील माणसे नेहमीच आनंदीत असायची!

कामावर सुद्धा प्रत्येकाला कधीच रागाने बोललाय असं सहसा झालं नाही.त्याचा स्वभाव शांत होता आणि तो आपल्या कामाशी प्रामाणिक असायचा.

त्या चहावाल्या काकू बरोबर चांगली ओळख झाली.काय करतो?एकटा राहतो का?अशी विचारणा त्यांनी केली.तसेच एकटाच राहतो .मग जेवायचं काय केलं?असे अनेक चर्चात्मक संवादातून चांगलं नातं तयार झालं होतं.दोन दिवसांपासून काकू काही टपरीवर दिसल्या नाहीत आणि कुठे जाणार होत्या हे पण तेथील शेजारील दुकान मालकांना सांगितले नाही.दोन दिवसांनी विनोद तेथूनच जात होता . त्याला काकूंची टपरी चालू दिसली.तो त्या दिशेने गेला.काकू आता थोड्या शांत वाटत होत्या.त्यांनी काहीच सांगितले नाही.पण त्यांच्या टपरीवरती आज कोणीतरी नवीन व्यक्ती होती.आणि ती काकूंना मदत करु लागत होती.त्याने काकूंकडून चहा घेतला आणि तो आॅफीसला गेला.

त्याला आज काकूंमध्ये काहीतरी बदल झाला आहे.त्या पूर्वीसारख्या बोलत नाहीत.फक्त विचारेल तेवढच बोलतात आणि अगदी मोजकेच !!! नक्कीच काहीतरी झाले आहे.आणि काकूंनी एकदा सांगितले होते की त्यांना एक मुलगा आहे पण तो त्यांना सांभाळत नाही.तो गावाला असतो.आणि त्या इथेच शहरात पोट पाणि चालण्यासाठी टपरी चालवतात.असेल काहीतरी कारण पण चला आज जाताना त्यांना विचारूनच जाऊया.

तो आज टपरीकडे चालला.टपरीजवळ आला होता.पण आज जास्त गर्दी नव्हतीच.त्याने काकूंना पाहिले पण त्या तिथे दिसल्या नाहीत.मग त्याला कोणितरी विचारले,"एक कप चहा घेणार का?"
तो मधुर आवाज कानी पडताच तो तसा भानावर आला,तर पाहतो तर काय!ती सकाळची व्यक्ती म्हणजेच स्त्री असावी.

विनोद ,"हो म्हटला!"
त्याने विचारले,"काकू दिसत नाहीत!"

ती म्हणाली,"आई घरी गेली आहे, तिला बरं वाटतं नाही!"

"काय झालंय तिला!"

ती म्हटली,"ताप आला आहे!"

*बरं!मग डॉक्टरांकडे गेला होता का?"

ती म्हटली,"नाही गेलो.कारण ती नको म्हटली !"

"असं कसं , तुम्ही तिला नाही घेऊन गेला!"

"ती ऐकत नाही!"

तो म्हटला,"तुम्ही कधी इथे दिसला नाही?"

"हो! मी तिकडे दादाकडे होते.पण वहीनीच्या त्रासाला कंटाळून आले.माझ्यामुळे आईला बोलणे खावे लागायचे.त्यामुळे निघून आले.आणि दादाने तर परत आमच्या दोघींचे तोंडचं पाहणार नाही असं सांगितलं आहे!"

विनोद थोडा वेळ शांत तसाच उभा होता.
परत तो म्हटला,"अगं,हा चहा गार झाला आता!"

तशी हसत म्हणाली,"मग काय! गप्पा मारण्याची शिक्षा नको का!"

तसा विनोद ही हसला.

तशी ती म्हणाली,"हा देते लगेच गरम करून!"

असाच दोघांचं दररोज संवाद घडायला लागला.आणि काकूला पण बरं वाटायच आपली मुलगी काम करतेय!"

असाच संवाद साधताना,काकू म्हटली,"अरे विनोद आता मयुरीच शिक्षण बंद आहे! पुढे आता चांगला मुलगा पाहुन लग्न लावून देते हिच!"

तशी मयुरी म्हणाली,"काय गं!तुझं माग लावलं आहे लग्न!मग तुला कोण सांभाळणार?"

तशा काकू शांत बसल्या.विनोद म्हणाला,"काकू ती पण म्हणतेय ते पण योग्यच आहे,कारण मग तुमचा सांभाळ कोण करणार?"

तशी मयुरी म्हटली,"आई, तुझा सांभाळ कोण करेल त्यांच्याशी मी लग्न करेल! नाहीतर लग्नच करणार नाही!"

काकू अजूनच विचारात पडल्या.

दररोज प्रमाणे विनोद आणि मयुरीची बोलण होत होते.आणि आता दोघे एकमेकांना चांगले ओळखू लागले होते.आता काकूंची तब्येत बिघडू लागली होती.मग मयुरीच असायची टपरीवर.मग विनोद ही तिला थोडीफार मदत करायचा.

एकेदिवशी असंच झालं ,टपरीवरती बऱ्याच मुली चहा पिण्यासाठी आल्या होत्या.आणि विनोदाने त्यांना चहा दिला पण काही मुली त्याला मुद्दाम चहा गरम करायला सांगायच्या.अस दोन-तीन वेळा झाले.आणि त्यांनी विनोदला काही तरी म्हटल्या.आणि पैशावरून वाद घालू लागल्या.मग तिथे मयुरी आली आणि तिने सर्व मुलींचा समाचार घेतला.पण विनोदने सर्व मुलींची माफी मागितली आणि परत असं होणार नाही असं सांगितलं.मयुरी खुप रागवली होती त्याच्यावर.

"काय कारण होतं, त्यांची माफी मागायची?"

तो म्हटला,"अरे, त्या फक्त आज आल्या आहेत दुकानावर . त्यांना काय माहित आहे.चहा! बाकीचं ग्राहक पण पितात की,चहा!"

"मग काय?"

"अरे,जर आपल्याला ग्राहक टिकवायचं असेल तर, नम्रता आपल्यात हवीच!"

"बरं,मग माझे चुकले!पण तुला बोलल्याबद्दल राग आला!"

"अरे बापरे!, मला बोलल्याबद्दल आणि तुला राग!"

तो मिश्कीलपणे हसला.तशी अजूनच रागावली.बर तुला नाही ना विश्वास!मग जा आणि त्या टवळींशी जावून गुलूगुलू बोल.मी नाही बोलणार जा!

आता विनोदला काही कळेना,तो म्हटला,थांब त्यांचा नंबर घेतला आहे, त्यांना फोन करतो!"

तशी ती पळत आली आणि तो मोबाईल हिसकावून घेतला आणि बोलली.लय मोठा शहाणा लागून गेला.चाललाय फोन करायला.

काकूंनी येताना त्यांचा हा प्रसंग पाहिला होता.पण त्या काही बोलल्या नाहीत.कारण त्यांना माहित होत की,मयुरी अजून लहान आहे तिला बोलून काही उपयोग नाही.ती रागीट तर आहेच पण लगेच टोकाची भूमिका घेते.त्यामुळे त्या विनोदला एका बाजूला घेऊन बोलल्या.
"बघ,विनोद माझी मयुरी एकटीच आहे.आणि मी किती दिवस टिकेल याचा विश्वास नाही.त्यामुळे माझ्यानंतर तू माझ्या मयूरीला सांभाळशील ना!"

"अहो,काकू असे का म्हणताय, माझ्यावरती तुमचे खुप उपकार आहेत.मला या शहरात कोणी नव्हता.तेव्हापासून तुम्ही माझ्या जेवाणाची तयारी केली.मला माणुसकी वागवल हेच खुप आहे.अजून नका मला शरमिंदा करू नका!"

"बघ विचार करून सांगा!"

दोन दिवस झाले विनोद टपरीकडे आला नाही.म्हणुन मयुरी काकूंना विचारलं,"अगं तो विनोद दोन दिवस आला नाही गं!"

काकू काही नाही बोलल्या.त्या शांत होत्या.

"अगं,बोल ना!त्या दिवशी तुम्ही काहीतरी दोघं बोलला . तेव्हापासून तो आला नाही?"

"काकू काय सांगणार या मुलीला!"

तो पर्यंत तिकडून विनोद आला होता.त्याने मयुरीकडे पाहिले तर ती रागावली होती‌.पण काकूंना पेढा देत म्हणाला

"काकू हा घ्या पेढा!"

"कशाचा रे!"

"अहो माझा पगार वाढला आहे.आणि नौकरी पण कायमची झाली आहे!"

"मग इकडे न येता मोठ्या दुकानात का नाही गेला?"
थोड्या रागात मयुरी म्हटली

तशी काकू म्हटली अगं शांत बस्स!

तो म्हटला काकू, "चला उद्या तयार रहा.आपण एक मोठं गुपीत उद्या साजरा करुया!"

"बघ,कसा काहीतरी बोलला का माझ्याशी!"मयुरी म्हणाली

काकू तिची समजूत काढत . अगं नाही गं तुला विसरणार कधी तो.
मयुरीला काहीच समजलं नाही.

सकासकळी विनोद टपरीवर आला.अन् मयुरीला म्हणाला, "मला तुझा होणारा नवरा सापडलाय!"

"काय म्हणाला!सकासकाळी कशाला गार डोक्याला गरम करतोय!"

"चल,मग एक गरम चहा मिळेल का?"

"करुन पी!"

"अरे,बापरे खुपचं रागवलेला दिसताय!"

"हो!"

"बरं, मला असाच गरम चहा पेयाला मिळेल ना!"

तशी अजून रागावली.

तशा काकू आल्या आणि म्हणल्या,"चल लवकर तुझं लग्न ठरवलंय !"

"काय?"

"हो चल लवकर मुलगा आला असेल कोर्टमध्ये !चल लवकर!"

"अगं,एकदा तरी मला विचारायचं ना!"

"मला सांभाळून घेणारा आहे मग काय पाहीजेल!"

"बघ,आई तशी मी पण तुला सांभाळू शकते.पण माझी आवड नाही महत्वाची!"तशी ती हळूच विनोदकडे पाहून म्हणाली

तसा विनोद म्हटला,"काय काकू तुम्ही बोलण्यात वेळ घालवताय! चला लवकर ! तुम्ही पुढे व्हा.मी हार बाकीचं साहित्य घेऊन येतो."

मयुरीला खुप राग आला होता.माझ्याशी याला थोडावेळ पण बोलू वाटत नाही का! माझ्या लग्नाची तयारी करतोय हा!!!

मयुरीचे डोळे भरून आले होते.तिला वाटत होत.आईला घट्ट मिठी मारुन रडाव.

ते तसेच कोर्टात पोहोचले.मयुरी काकूंना विचारात होती."अगं विनोद अजून नाही आला."

काकू म्हटल्या,"अगं तो कामाला गेला असेल ,काल तर पगार वाढलाय म्हणे!"

कोर्टात पोहचताच नवरा मुलगा आला होता.त्याने तोंड लपवलं होत.त्यामुळे त्याला ओळखत अवघड होत.पण तरी मयुरी आपल्या जोडीदाराच्या चेहरा पाहण्याची प्रयत्न करत होती.

रजिस्टरला सही करताना मात्र तिने तोंड पाहण्यासाठी हट्ट केला.नाहीतर नाही होणार लग्न!!!

नाईलाजाने त्याला तोंडावरील काढायला लागले.आणि पाहते तर काय तो दुसरा कोणी नसून विनोद होता!!!!
आणि तो हळूच म्हणाला, "आता तरी गरमा गरम चहा मिळेल ना मला;"

तसा सर्वजण हसत राहिले.आणि असा चहासारखा जीवनाला नवीन आशेदायी , उत्साही जोडीदार मिळाला!

मग पिताय ना? चहा!!! गरमागरम बरं का!
लेखक:-©राहुल पिसाळ रांच)