Antahpur - 13 - last part in Marathi Detective stories by Suraj Gatade books and stories PDF | अंतःपुर - 13 (अंतिम)

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

अंतःपुर - 13 (अंतिम)

१३. पुनरुत्थान (रिजरक्शन)...

शक्ती माननीय पंतप्रधान यांच्या सोबत त्यांच्या रूमच्या बाल्कनीत उभा होता...
त्यांच्या डोक्यावरून बिपीन शुक्लाला घेऊन आलेलं प्रायव्हेट जेट सगळ्या चांडाळ चौकडीला घेऊन दिल्लीच्या दिशेने झोकावलं होतं...
"इथून पुढचा तपास आपली टीम सांभाळेल!" शक्ती वर त्या वायूवेग असल्याने गायब होणाऱ्या जेटकडे पाहत बोलला.
"शुक्ला नंतर काही बोलले?" शक्तीने विचारलं.
"हो. शुक्लावरील काही केसेस जनमानसने सत्तेवर आल्यावर बंद करण्याचं आश्वासन देऊन वर आरबीआय गव्हर्नर पदाचं लालूच दाखवून त्याला त्यांच्याकडं वळवून घेतलं होतं!" वर पाहत पीएमनी राहिलेल्या प्रश्नाचा पण खुलासा केला.
काही वेळ दोघेही बोलायचे थांबले. मग...
"तर इंद्रदत्त वाचस्पती यांच्या निर्णयानेच त्यांनाच सर्वनाश केला. आणि त्यांच्या उदात्त हेतूने जागा घेतली, ती निहित स्वार्थाने!" पीएमनी आकाशाकडून नजर हटवून शक्तीकडे पाहत उच्चारले!
"हो! खरं आहे; हं! निर्बुद्धासी विचार तो कैसा!" शक्तीने पुष्टी केली.
"शक्तीसेन, खरं सांगू; वाचस्पती खूप विद्वान होते. त्यांचं देशावर प्रेम होतं. समाजाविषयी करुणा होती. त्यांना खरंच जनतेचं भलं करायचं होतं. म्हणूनच अपोजिशन असून मी त्यांची खूप रिस्पेक्ट करायचो. वाटलं नव्हतं, की सत्तेचा लोभ त्यांना इतका लाचार आणि अविवेकी बनवेल..." दुःखी अंतःकरणाने पीएम बोलून गेले,
"एनिवेज्, आपली खूप मदत झाली शक्तीसेन!" पीएम लगेच मूड बदलून कृतज्ञतेने म्हणाले.
"हे माझं कर्तव्य होतं!" शक्ती हसला.
आणि आपल्या खिशातील सिक्रेट आयडेंटिटी कार्ड काढून त्याने ते पंतप्रधान यांच्या समोर धरलं. पण ते न घेता...
"आपण फोर्स का नाही जॉईन करत?" पीएमनी शक्तीला ऑफर दिली.
"मी तयार आहे! पण मी उद्या तुमच्याही विरोधात गेलो, तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल!" शक्ती मस्करीच्या सुरात हसून म्हणाला.
"एका नागरिकांचं हेच तर काम आहे! सरकारच्या चुकीच्या निर्णयांना विरोध करणं आणि निर्णय योग्य असेल तरी त्यातील त्रुटी दाखवणं हे जनतेचं कर्तव्य आहे! मला वाईट नाही वाटणार!" पीएम हसून म्हणाले!
"नाही नको!" शक्ती हसला. म्हणाला,
"आपल्याला विरोध करायला मी एक नागरिक म्हणूनच अधिकार ठेवून आहे. मी आहे तसा ठीक आहे!" त्याने हात अजूनच उंचावून पीएमना ते आयडी कार्ड घेण्यास बाध्य केलं.
शक्तीच्या हजरजबाबीपणाचं आणि धाडसाचं कौतुक करणारं स्मित पंतप्रधान यांच्या मुखावर उमटलं,
"यु आर डेफिनेट्ली द रिबेल!" ते स्मित करून उद्गारले आणि त्यांनी शक्तीच्या हातून कार्ड घेत शक्तीला विचारलं,
"आपले मित्र शौर्यजीत कसे आहेत?"
"अजून पाहिलं नाही! पण नक्कीच चांगला असेल." शक्ती हसून खात्रीशीर म्हणाला व...
"एक विचारू सर?" थोडं संकोचतच शक्तीने प्रश्न केला...
"हं!" पीएमनी परवानगी दिली.
"सो, देन व्हॉट इज युअर आयडिया टू मेक इंडिया ग्रेट, अ सुपरपावर?" शक्तीने पीएम चिंतपल्ली यांना विचारलं.
शक्तीच्या प्रश्नावर चिंतपल्ली हसले. शक्ती त्यांच्या आयडिओलॉजीला पडताळतोय हे ते समजले होते. ते बोलले! 'खरं' बोलले...
"दि प्रॉपर एज्युकेशन! फर्स्ट ऑफ ऑल, वी हॅव टू क्रिएट सिंपल येट इफेक्टिव्ह एज्युकेशन सिस्टीम. १२. पुनरुत्थान (रिजरक्शन)...
शक्ती माननीय पंतप्रधान यांच्या सोबत त्यांच्या रूमच्या बाल्कनीत उभा होता...
त्यांच्या डोक्यावरून बिपीन शुक्लाला घेऊन आलेलं प्रायव्हेट जेट सगळ्या चांडाळ चौकडीला घेऊन दिल्लीच्या दिशेने झोकावलं होतं...
"इथून पुढचा तपास आपली टीम सांभाळेल!" शक्ती वर त्या वायूवेग असल्याने गायब होणाऱ्या जेटकडे पाहत बोलला.
"शुक्ला नंतर काही बोलले?" शक्तीने विचारलं.
"हो. शुक्लावरील काही केसेस जनमानसने सत्तेवर आल्यावर बंद करण्याचं आश्वासन देऊन वर आरबीआय गव्हर्नर पदाचं लालूच दाखवून त्याला त्यांच्याकडं वळवून घेतलं होतं!" वर पाहत पीएमनी राहिलेल्या प्रश्नाचा पण खुलासा केला.
काही वेळ दोघेही बोलायचे थांबले. मग...
"तर इंद्रदत्त वाचस्पती यांच्या निर्णयानेच त्यांनाच सर्वनाश केला. आणि त्यांच्या उदात्त हेतूने जागा घेतली, ती निहित स्वार्थाने!" पीएमनी आकाशाकडून नजर हटवून शक्तीकडे पाहत उच्चारले!
"हो! खरं आहे; हं! निर्बुद्धासी विचार तो कैसा!" शक्तीने पुष्टी केली.
"शक्तीसेन, खरं सांगू; वाचस्पती खूप विद्वान होते. त्यांचं देशावर प्रेम होतं. समाजाविषयी करुणा होती. त्यांना खरंच जनतेचं भलं करायचं होतं. म्हणूनच अपोजिशन असून मी त्यांची खूप रिस्पेक्ट करायचो. वाटलं नव्हतं, की सत्तेचा लोभ त्यांना इतका लाचार आणि अविवेकी बनवेल..." दुःखी अंतःकरणाने पीएम बोलून गेले,
"एनिवेज्, आपली खूप मदत झाली शक्तीसेन!" पीएम लगेच मूड बदलून कृतज्ञतेने म्हणाले.
"हे माझं कर्तव्य होतं!" शक्ती हसला.
"आपण फोर्स का नाही जॉईन करत?" पीएमनी ऑफर दिली.
"मी तयार आहे! पण मी उद्या तुमच्याही विरोधात गेलो, तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल!" शक्ती मस्करीच्या सुरात हसून म्हणाला.
"एका नागरिकांचं हेच तर काम आहे! सरकारच्या चुकीच्या निर्णयांना विरोध करणं आणि निर्णय योग्य असेल तरी त्यातील त्रुटी दाखवणं हे जनतेचं कर्तव्य आहे! मला वाईट नाही वाटणार!" पीएम हसून म्हणाले!
"नाही नको!" शक्ती हसला. म्हणाला,
"आपल्याला विरोध करायला मी एक नागरिक म्हणूनच अधिकार ठेवून आहे. मी आहे तसा ठीक आहे!"
शक्तीच्या हजरजबाबीपणाचं आणि धाडसाचं कौतुक करणारं स्मित पंतप्रधान यांच्या मुखावर उमटलं,
"यु आर डेफिनेट्ली द रिबेल!" ते स्मित करून उद्गारले आणि त्यांनी शक्तीला विचारलं,
"आपले मित्र शौर्यजीत कसे आहेत?"
"अजून पाहिलं नाही! पण नक्कीच चांगला असेल." शक्ती हसून खात्रीशीर म्हणाला व...
"एक विचारू सर?" थोडं संकोचतच शक्तीने प्रश्न केला...
"हं!" पीएमनी परवानगी दिली.
"सो, देन व्हॉट इज युअर आयडिया टू मेक इंडिया ग्रेट, अ सुपरपोव्हर?" शक्तीने पीएम चिंतपल्ली यांना विचारलं.
शक्तीच्या प्रश्नावर चिंतपल्ली हसले. शक्ती त्यांच्या आयडिओलॉजीला पडताळतोय हे ते समजले होते. ते बोलले! 'खरं' बोलले...
"दि प्रॉपर एज्युकेशन! फर्स्ट ऑफ ऑल, वी हॅव टू क्रिएट सिंपल येट इफेक्टिव्ह एज्युकेशन सिस्टीम. इट इज नो युज टू टेल पीपल टू युज ऑनलाईन बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड्स अनलेस गिविंग देम द अवेअरनेस अँड टिचिंग देम हाऊ टू युज दिज थिंग्स. इट इज नो पॉईंट टू टेल पीपल टू बाय इलेक्ट्रिक विहेकल्स अनलेस यू क्रिएट चार्जिंग पॉईंट्स लाईक पेट्रोल पंप्स.
"इट्स पॉईंटलेस! सो वी हॅव टू क्रिएट एन आयडियल इन्फ्रास्ट्रक्चर अबाऊ ऑल! अँड देन सिमिलर्ली वी हॅव टू इन्व्हेस्ट इन बिझनसेस. विदाऊट गुड इन्फ्रास्ट्रक्चर, यु कान्ट बिल्ड अ बिझनेस! मला सांगा ज्या हॉटेलचा रस्ता खराब आहे, त्या हॉटेलला तुम्ही जेवायला जाल? नक्कीच नाही!
"आणि याच्यासाठी आपणास सर्वांत आधी आपल्या युवकांमध्ये किंबहुना सर्व जनतेमध्ये इन्वेस्ट करावे लागेल. सर्वांना फायनाशियल एज्युकेशन दिले गेले पाहिजे. शिवाय जनतेत योग्य चारित्र्य निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे एका रात्रीत किंवा कोणत्याही सरकारच्या एक-दोन टेंयोर मध्ये हे होणार नाही. शिवाय त्यांची ती प्राथमिकता सुद्धा हवी. तशी ती असली, तरी याला अनेक वर्षे जातील त्यामुळे काही वर्षांत तुम्हाला भारत सुपरपावर होईल अशी जर कोणी तुम्हाला स्वप्न दाखवत असेल, तर तो तुमच्याशी खोटं बोलतोय; तो तुम्हाला फसवतोय हे समजून घ्या!
"बिसाईड्स आवर युथ, दे आर डिस्ट्रॅक्टेड् अँड दे डोन्ट नो व्हॉट टू डू विथ देअर लाईव्ह्स!" पंतप्रधान बोलत होते.
"‌आय नो आएम वन ऑफ दोज्..." शक्ती नाराजीने मध्येच बोलला.
त्याकडे पंतप्रधान यांनी दुर्लक्ष केलं. कारण शक्ती त्याच्या आयुष्यासोबत किती मोठं कार्य करू शकतो याची प्रचिती त्यांनी घेतली होती. आणि हीच क्षमता ते भारतातील सर्व तरुणांमध्ये पाहत होते... पण तरी... अजून त्या दृष्टीनं बरंच काम करणं बाकी होतं... म्हणून माननीय पंतप्रधान पुढं म्हणाले,
"‌दे आर नॉट वर्दी इनफ फॉर बिग! सो आवर जॉब इज टू मेक देम वर्दी फस्ट!!" त्यांनी संभाषण संपवलं.
पंतप्रधान पुनीत यांनी त्यांची 'आयडिया फॉर नेशन' शक्तीसमोर स्पष्ट खुली केली होती!
"सर, काय सत्ता खरंच इतकी महत्वाची आहे का? की ज्याच्यासाठी लोक एकमेकांच्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत! किंबहुना एकमेकांचा जीव घ्यायलाही कमी करत नाहीत?" शक्ती आता विचलित झाला.
कारण राजकारणाचं ध्येय जर इतकं उदात्त असलं पाहिजे असं आहे, तर ते कोणत्याच सरकारचं किंवा पक्षांचं मुख्य आचरण का नसतं असा त्याला आता प्रश्न पडला होता...
"एक गोष्ट समजून घ्या, वाईट कोणताच देश नसतो. वाईट असतो तो स्वार्थ! तो देश चालवणारे लोक या स्वार्थापायी वाईट असू शकतात; पण घाबरायचं कारण नाही! कारण ते लोक सुद्धा काही सर्वकाळ तिथं असणार नाहीत! जसे मागचे लोक गेले, तसे हेही लोक बदलतील... कधीतरी असे लोक समाजसेवेसाठी समोर येतीलच ज्यांना स्वार्थापेक्षा समाज महत्वाचा असेल! यासाठीच समाजाचे उत्तम चारित्र्य घडवणे आणि विद्यार्थ्यांना सकस व उपयुक्त शिक्षण देणे ही प्राथमिकता असायला हवी!
"यातूनच असे लोक उद्या घडतील जे एकत्र राहून देशाचा आणि पर्यायाने जगाचा उत्कर्ष घडवतील!" माननीय पंतप्रधान यांनी शक्तीचे शंका निरसन करण्याचा सोप्या शब्दांत प्रयत्न केला...
"महागाईचा बोजा जनतेवर येऊ नये म्हणून आपण कर प्रणाली बदलणार आहात असं मी ऐकलं होतं. मी काही सजेशन देऊ शकतो?" शक्तीने विचारलं.
"जरूर!"
"अर्थशास्त्र सांगतं, की राजाने जनतेकडून कर असा घ्यावा जसा मधमाशी फुलांतून मधु गोळा करते! मधमाशीचे काम पण होते आणि फुलालाही इजा होत नाही!"
"माझाही विचार तोच आहे! पण आजपर्यंत लोकांना जो त्रास झाला, तो मलाही टाळायचा आहे. वास्तविक कर भरणं याला सक्ती असू नये. पण जर असंच ठेवलं, तर लोक करच भरणार नाहीत! म्हणून सक्ती करावी लागते! लोकांना हे समजलं पाहिजे, की ते ज्या समाजात राहतात त्या समाजाप्रती ते काही देणं लागतात! लोकांना हे समजायला हवं, की ते रहात असलेल्या समाजाचा उत्कर्ष हाच त्यांचा उत्कर्ष! म्हणून कर तर टाळता येणार नाही. हा! त्यात शिथिलता नक्कीच आणू!"
"थँक्यू सर! हे ठीक आहे! पण कर गोळा करणारे प्रशासन; त्यांनीही हे लक्षात घेतलं पाहिजे की हा गोळा केलेला कर हा समाजाच्या उन्नतीसाठी आहे! स्वतःच्या उत्कर्षासाठी नाही!"
"मला तुमचा रोख, तुमचा रोष कळतोय! तुम्ही होणाऱ्या घोटाळ्यांबद्दल बोलताय! मला हेही मान्य की माझे काही लोक नीट काम करत नाहीत! पण ते मी सुधारणार आहे. जशी कर प्रणाली सुलभ करण्याचे प्रयत्न चालू आहेत! त्याप्रमाणे त्यावरही लवकरच निर्णय आणि कठोर असे निर्णय घेतले जातील!"
"कर्जं घेऊन पळालेल्या लोकांचा पण बंदोबस्त करण्याचे पण प्लॅन्स चालू आहेत. त्यांचा पैसा परत चलनात आला, तरी जनतेला महागाईत बरीच राहत मिळेल. अर्थव्यवस्थेवरचा बराचसा भार हलका होईल!"
"हा, पण त्याची कर्जं राईट ऑफ करू नका म्हणजे झालं!" शक्तीने कोपरखळी मारली.
दोघे खूपच मैत्रीपूर्ण वातावरणात संवाद साधत होते म्हणून शक्तीने हे धाडस केलं होतं.
यावर पीएम मोठ्याने हसले! कारण त्यांनाही माहीत होतं हे राईट ऑफ वगैरे दिखावा असतो प्रत्यक्षात तशा कर्जाची वसुली तशी केली जातच नाही, ना आशा कर्जदारांना कधी शिक्षा होते...
"तुम्ही खूपच काळजी करता!" ते शक्तीच्या पाठीवर थाप मारत म्हणाले.
"जे अनुभवत आहे ते काळजीचंच तर आहे..." शक्तीने चेष्टेचेष्टेत सत्य विदित केलं...
हे ध्यानात येऊन पीएम थोडे गंभीर झाले,
"नाही तसं नाही होणार!" ते मागे हात बांधत म्हणाले.
"शक्तीसेन, मी जाणून आहे, की मी या चार महिन्यांत कितीही प्रयत्न केला, तरी पुढचं इलेक्शन मी हरणार आहे. पण माझ्या प्रयत्नांनी जनतेला थोडा तरी आराम मिळाला, तरी मला ते पुरेसं आहे. पुढं हरलो, तरी पण माझं समाजसेवेचं काम चालूच राहील!" पीएमनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शक्तीला मात्र बरं वाटत होतं, की या स्वार्थी राजकारणात एकतरी व्यक्ती होता जो समाजाची काळजी वाहत होता... पण म्हणून तो त्यांच्यावर पूर्ण विसंबून कधीच राहणार नव्हता! हेच तर एका 'सुजाण नागरिका'चं 'कर्तव्य' आहे!
"जर आपली परवानगी असेल, तर एक विनंती करू?" शक्तीने संकोचत विचारलं.
"नक्कीच!" पीएमनी परवानगी दिली.
"सर, चीन व उत्तर कोरियावर लक्ष ठेवावं, कारण ते अमेरिकेच्या गतीविधींवर लक्ष ठेवून असणार. त्यांना जर समजलं, की भारतातील काही लोक देखील त्याच्या विरुद्धच्या कारस्थानात सामील होते, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.
"त्याच प्रमाणं अरब देशांना सुद्धा आता सांभाळावं लागणार आहे. आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ आहोत हे त्यांना दर्शवण्याचा ही वेळ आहे. त्यांना त्यांच्या आंतरिक कलहातून बाहेर काढण्यास शक्य ती मदत करावी. याने आपल्या देशाचा देखील फायदा आहेच." शक्तीने सतर्कतेचा इशारा केला व मुख्य विनंती त्याने पुढे बोलून दाखवली. तो म्हणाला,
"आणि सर, कृपया सर्व देशांशी मैत्री पूर्ण व्यवहार ठेवावेत. कारण जे प्रेम आणि सहकार्यांने साध्य होतं, ते युद्धानं नाही होत." शक्ती कळकळीने म्हणाला.
पीएमनी शक्तीची चिंता समजून घेत गंभीरपणे मान डोलावली.
"आणखीन एक शेवटची विनंती!" शक्ती म्हणाला.
"बोला ना!"
"मिहीरची बातमी अजून दिली नसेल!"
"ब्रॉडकास्ट झाली! का? काही प्रॉब्लेम आहे..."
"बातमी चेंज करायची होती... करू शकतो?"
"नक्कीच! बोला!"
"मिहीर वाचलाय आणि तो, एसपी व कोल्हापूर पोलिस यांच्या प्रयत्नांनीच ही सगळी कॉन्स्पिरिसी उलगडली गेली असं जाहीर करायचं आहे."
"पण हे क्रेडिट तुमचं आहे!" पीएमनी आग्रह केला.
"एकट्याचं नाही! सर्वांचे कष्ट आहेत! प्लिज सर..." शक्तीने विनंती केली.
"ओके. तुमच्या इच्छेनुसार होईल!" म्हणत पीएम बाहेर वळले. बाल्कनीच्या रेलिंगवर हात विसावून ते कोल्हापूर शहराच्या नजारा पाहण्यात गुंतले...

शक्तीने मात्र सगळ्यांतून स्वतःला वेगळं करण्याचा प्रयत्न चालू केला...

************************************************************************************************************

तो आधी त्याच्या हॉटेल रूमवर गेला. तेथे वॉर्डरोबमध्ये ठेवलेली रायफल केस त्याने पाठीला अडकवली. तो लॉबीत आला. राहिलेलं बिल त्यानं भागवलं आणि त्यानं ते हॉटेल सोडलं.

************************************************************************************************************

डॅनियलने दिलेली बीएमडब्ल्यू पोलीस हेडकॉर्टर्सला लागली. शक्ती त्यातून उतरला.
एसपी बाहेरच होता. क्लबमधून जप्त केलेली असॅसिनची शक्ती वापरत असलेली कावासाकी हेडकॉर्टर्सला आणून ठेवली होती.
शक्तीने ती रायफल व डॅनियलने दिलेला मोबाईल एसपीच्या सुपूर्द केला. आणि गाडी देखील तिथंच सोडून तो चालू पडला... रस्त्यापलीकडील रिक्षा स्टॉपला लागलेल्या पुढच्या रिक्षात बसून तो मार्गस्थ झाला...

************************************************************************************************************

आरटीओ ऑफिसला येऊन शक्तीने त्याची सुझुकी हायाबुसा ताब्यात घेतली. तो आपल्या घराकडे लागला...

************************************************************************************************************

घराबाहेर कम्पाऊंडमध्ये सुझुकी लावून शक्ती फोर व्हीलर घेऊन निघाला. गेट लॉक करायला तो विसरला नाही.

************************************************************************************************************

नम्या असलेल्या हॉस्पिटलला येऊन तिला सोबत घेऊन बिल पे करून शक्ती निघाला...

************************************************************************************************************

शक्ती मिहीरला सीपीआरमध्ये जाऊन भेटला. सोबत नम्या होतीच. जतीन देखील त्यांना सामील झाला होता...
"तुला भेटायला लोक आलेत." शक्ती मिहीरला म्हणाला.
शक्तीचा आवाज ऐकून मिहीरचं मुखमंडल प्रसन्न झालं. तो शिस्तीत मागे सरकून सावरून बसला.
"हे कोण?" नम्याला व जतीनला पाहत शक्तीने विचारलं.
"हे? या नम्या. वाचस्पती यांच्या केसमधील महत्वपूर्ण साक्षीदार आहेत. आणि हे जतीन. माझे खास मित्र. यांनीच तुला वाचवलं." शक्तीने दोघांकडे पाहत त्यांची ओळख करून दिली.
"थँक्स!" मिहीरने जतीनचे आभार मानले.
"जरा बातम्या बघू." म्हणत शक्तीने टीव्ही ऑन केला. काही हेडलाईन्स नंतर...
टीव्हीवर शक्तीला हवी ती बातमी चालू झाली...
"अखेर इंद्रदत्त वाचस्पती यांच्या नाट्यपूर्ण खूनाचा खुलासा झाला. या कारस्थानामागे त्याचाच पक्ष जनमानस असल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. आणि याच सोबत सत्ताधारी पक्ष असलेल्या लोककल्याण पार्टी वरील इंद्रदत्त वाचस्पती यांच्या खूनाचा आरोप पुसला गेला आहे. पुढील माहिती व सत्यता ही केस कोर्टमध्ये उभी राहिल्यावरच समोर येईल. आणि म्हणून हे प्रकरण लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात घेतले जावे याबद्दल प्रयत्न चालू आहेत! कोल्हापूर सुप्रीडेनडेंट सारंग गोखले यांची महत्वाची भूमिका या प्रकरणाचा छडा लावण्यामागे होती. शिवाय यात जीवाची बाजी लावून मोलाची कामगिरी निभावली, ती कोल्हापूर पोलीसचे डिवायएसपी असलेले मिहीर देशमुख यांनी! त्यांच्या प्रयत्नानेच एवढे मोठे सत्य बाहेर पडण्यास मदत झाली!" लेडी रिपोर्टरने बातमी दिली.
"सर..." आश्चर्याने मिहीरने शक्तीकडे पाहिलं.
"यु डिसर्व्ह थिस बॉय!" शक्ती त्याच्या खांद्यावर थोपटत आनंदाने म्हणाला,
"चल, आम्ही आता निघतो. काळजी घे!" शक्ती म्हणाला.
व शक्तीने मिहीरच्या हातात हात घेत त्याला धन्यवाद दिले. मात्र पुढं काही बोलला नाही...

शक्ती, जतीन, नम्या हॉस्पिटलसमोर उभे होते.
"मी आता निघतो मुंबईला!" शक्ती जतीनच्या हातात हात देत म्हणाला.
"का?" जतीननं विचारलं.
"शौर्यजीत, माझा मित्र. त्याला त्याच्या घरी पोहोचवायचं आहे!" जतीनला इतर देऊन शक्ती नम्याकडे वळला.
"चलायचं?" शक्तीने नम्याला विचारलं.
"तू हो पुढं मी मुंबईतच तुला जॉईन होते! नवीन आयुष्य सुरू करण्याआधी अनाथाश्रमच्या सुपरवायझर आणि अक्काला भेटायचं म्हणते..." नम्या उदासीनता आणत बोलली.
"ओके!" शक्ती गंभीर होत म्हणाला.
त्याने काही पैसे खिशातून काढून तिला दिले.
"आणि माझे पैसे?" हे कशाबद्दल बोलतायत माहीत नसून हे काही तरी गंभीर आहे हे समजून वातावरण हलकं करण्यासाठी जतीनने मस्करी केली.
"आजपर्यंत कवा दिल्यात तवा आता दिन!" शक्ती चेष्टा करत म्हणाला.
"निघा!" जतीन ओरडला.
"तू पैशाला एवढा हावरा का आहेस?" शक्तीने पुन्हा चेष्टेत विचारलं.
"जगात जन्म घेणं एवढंच सोपं आहे. सर्व्हाइव्ह इज टफेस्ट! अँड इट टेक्स मनी!" जतीन म्हणाला.
"तरी तुला मी पैसे देणार नाही! कारण कठीण जीवनाचा अर्थ असा नाही की पैसे कमवायला तुम्ही काहीही कराल! अयोग्य मार्गाने पैसे कमावणे कोणत्याच परिस्थिती योग्य नाही!" शक्ती हसत म्हणाला.
"मी तुला निघ म्हटलंय!" चिडून जतीन बोलला.
शक्ती हसला. तो नम्यासह गेट बाहेर पडला. फुटपाथला लागून पार्क केलेल्या शक्तीच्या कारमध्ये बसून दोघे निघून गेले.
जतीन जाणाऱ्या शक्तीकडे हसत पाहत होता. शक्तीची गाडी गेली, तसा तोही त्याच्या स्कुटरवर राईड झाला.

************************************************************************************************************

शक्तीची गाडी त्याच्या मूळ गावी चालली होती...
"सुलभा, शौर्यनं तुला मुंबईच्या घरी यायला सांगितलंय!" शक्ती ब्लुटूथमध्ये बोलत होता...

शक्ती त्याच्या गावाकडील नाईक वाड्यात आला. त्याने शौर्यजीतला आधार देऊन बाहेर घेतलं. शौर्यच्या रक्षणासाठी असलेल्या एका गार्डने गाडीचा दरवाजा उघडला. शक्तीने शौर्यला गाडीत बसवलं. शक्तीची गाडी प्रवासाला लागली...
त्यांच्या मागून गार्ड्स् आपल्या चार चाकीत बसून त्याच्या हेडकॉर्टर्सला निघाले... त्यांचे कार्य समाप्त झाले होते...

************************************************************************************************************

दरम्यान पोलीस हेडकॉर्टर्समध्ये सारंग गोखलेने किरकोळ एव्हीडेन्स एका बॉक्समध्ये पॅक केले. त्यावर 'पीएमओ, डेल्ही" असं इंग्रजीत लिहिलं. प्राईम मिनिस्टर ऑफिसचा पत्ता असल्याने तो बॉक्स कोणी उघडून तपासू नये व एव्हीडेन्सशी कोणी छेडछाड करू नये म्हणून ही तरतूद.
तो बॉक्स व रायफल केस घेऊन त्याने आपल्या एका ऑफिसरकडे सोपवले. ऑफिसर बॉक्स व रायफल केस सोबत हेडकॉर्ट्स बाहेर पडला.
बॉक्स व रायफल केस सोबतच ऑफिसर बाहेरच उभ्या एका हेवी ट्रेलर ट्रकच्या केबिनमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला बसला.
ट्रकमध्ये डॅनियलने असॅसिनेशन्ससाठी वापरलेली बाईक व कार आधीच लोड करून ठेवल्या होत्या.
तो ट्रक दिल्लीकडे रवाना झाला...

************************************************************************************************************

संध्याकाळी शक्तीची गाडी शौर्यजीतच्या मुंबईतील घराला लागली होती. शक्तीने त्याला गाडीतून उतरवून मेनडोअरकडे नेलं. बेल वाजवली.
शौर्यजीतच्या बायकोने दार उघडलं. काहीच अपेक्षा नसताना शौर्यला तसं पाहून तिला रडू कोसळलं.
शक्तीने शौर्यला तिच्याकडे सोपवलं. दोघांना एकांतात सोडून काहीच न बोलता शक्ती आपली गाडी घेऊन तेथून निघाला...

************************************************************************************************************

काही अंतर कापल्यावर पुढं कॉर्नरला नम्या शक्तीची वाट पाहत उभी होती. शक्तीने आपली गाडी थांबवली. नम्या त्याच्या शेजारी येऊन बसली....

पुढे शक्तीची गाडी थांबली ती त्याच्या गार्गीच्या आईच्या घराबाहेर...
तो गाडीतून उतरला. नम्याला सोबत यायला सांगण्याचं भान त्याला उरलं नव्हतं. पण नम्याच उतरली. त्याच्या मागून चालू लागली...

शक्तीची मुलगी 'पारिजात' बाहेर लॉनमध्येच खेळत होती. तिची आजी झोपाळ्यावर नातीचा खेळ पाहत तिच्यावर लक्ष ठेवून बसली होती.
शक्तीची चाहूल लागताच पारिजातने त्या दिशेने पाहिलं. आपल्या वडिलांना अवघ्या दोन वर्षाने पाहत असलेल्या त्या पाच वर्षांच्या मुलीला आनंद आवरला नाही... ती पळत येऊन शक्तीच्या अंगावर झेपावली... शक्तीने तिला हवेतच झेललं आणि तिला भाव विभोर होऊन प्रेमाने भावविवश होऊन स्वतःभोवती गोल फिरवू लागला...
शक्ती आणि पारिजात दोघेही आसपासचं जग विसरून गेले होते...
त्यांचा हा ब्रह्मानंद सोहळा नम्या व गार्गीची आई लांबूनच आनंदी चेहऱ्याने हे पाहत होते... त्या दोघीही या हर्षभरीत वातावरणाचा आनंद घेत होत्या...!!!

************************************************************************************************************

समाप्त!!!