भाग २२
विशाखा पटपट आवरून बाहेर आली आणि सोफ्यावर उडी मारली,
" काका....... काका....... "
काका हातात प्लेट घेऊन बाहेर आला,
" घसा फाडण्यात येऊ नये. नाष्टा आणलेला आहे. "
" ओह थँक्यु काका ☺️ . आय लव्ह यु काका 🥰 "
" 🤨🤨😕 "
" काय झालं असं बघायला ☹️ "
" तेच मी तुला विचारायला पाहिजे की काय झालंय तुला "
" मला 🙄 . मला कुठे काय .. काहीच तर नाही. "
" मग एवढं गोड गोड का बोलतीये 😕 "
" गोड गोड म्हणजे 🙄 "
" सवय नाहीये गं बाई असं गोड गोड ऐकण्याची. ४ शिव्या दे पण असं नको बोलत जाऊ. धडकी भरते मला. "
" 😅😅 "
" गप्पा खा ते. आणि निघ लवकर. "
इकडे सकाळी आकाश शिरा खात बसला होता. तेवढ्यात आई बाहेरून पळत पळत आली.
" कुठं गेली होती तु ?? माहिती आहे ना मल जायचय कामाला मग चहा द्यायच सोडुन तु गायब " आकाश खाता खाता म्हणाला.
" अरे ते शेजारचे पाटील आहेत ना. "
" कोण पाटील ?? " आकाशने विचारलं.
" अरे, ते नाही का, आपल्या कॉलनीच्या सुरवातीला ते दुकानाच्या शेजारी घर आहे तिथे राहणारे. "
" मग ते शेजारी कुठं झाले ?? त्यांच्या आणि आपल्या घराच्या मध्ये आख्खी कॉलनी येते 😂 " आकाश हसत हसत म्हणाला.
" गप रे गधड्या. "
" बरं त्या पाटलांच काय ?? "
" अरे त्यांना म्हणे, सकाळपासून उठताच येत नाहीये. "
" उठता येत नाहीये म्हणजे 🙄. उठलेच नसतील ना मग कसं उठता येईल 😂😂 " आकाश परत फालतु जोक करत हसला.
" गप बस . नाहीतर धपाटाच घालीन एक. " आई
" असं कस उठता येत नाहीये पण ?? " तो
" काय माहिती. त्यांना उठताच येत नाहीये. आता दवाखान्यात नेतायत म्हणे त्यांना. "
" बरं बरं. चहा देशील का ?? मला जायचंय गं आई" आकाशने घड्याळ बघत सांगितलं.
" हो देते लगेच. " आई आतमध्ये चहा करायला गेली की तेवढ्यात आकाशचे पप्पा आले.
" पटकन नाष्टा दे, आज लवकर निघायचय मला. "
" अहो तुम्हाला माहिती का, ते आपल्या शेजारी राहतात ना पाटील त्यांना म्हणे सकाळपासुन उठताच येत नाहीये. " आई त्यांना नाष्टा देत सांगत होती.
" का ?? काय झालं त्यांना ?? "
" मला काय माहिती ?? आता नेतायत हॉस्पिटलमध्ये. मग कळेल बघु..... "
" बरं चला सरकार. चहा द्या आम्हाला आणि निघुद्या पटकन. "
" हो देते " असं म्हणून आत गेली तेवढ्यात तीचा फोन वाजायला लागला.
" आई फोन वाजतोय तुझा...... "
" घे की मग. आता काय भुतासारख हात लांब करून उचलु का ?? "
" मावशीचा फोन आहे. तुच घे. "
मावशीचा फोन असं ऐकल्या बरोबर आई पळत पळत बाहेर आली आणि आकाशच्या हातातुन फोन काढुन घेतला. ते बघुन पप्पा आणि आकाश दोघेही हसायला लागले.
" अगं तुला माहिती का, आमच्या इथे ते पाटील राहतात ना. त्यांना म्हणे सकाळपासून उठताच येत नाहीये. " आई मावशीला फोनवर सांगत होती.
" आई तीला सांगायची काय गरज आहे 😕 ?? तीला काय माहिती पाटील कोण ?? "
" तु गप रे गधड्या. अगं तुला नाही ह्या आकाशला म्हणत होते. "
" आता सगळीकडे सांगितल्याशिवाय हीला चैन पडणार नाही. चला आता हा फोन काही एक तास तरी संपत नाही. आपण बाहेर चहा पिऊ. " म्हणत त्याचे पप्पा उठले. आकाश पाच मिनिटं वाट बघत बसला पण फोन ठेवायची काही लक्षण दिसेना म्हणून तो ही कंटाळुन ऊठुन गेला. आणि अॉफीसला निघून गेला.
इकडे विशाखा हॉस्पिटलमध्ये पेशंटस् चेक करत होती की बाहेर आरडा ओरडा ऐकु येत होता. आधी तर तीने दुर्लक्ष केलं पण परत आवाज वाढला तसं पटकन बाहेर आली. बाहेर येऊन बघितलं तर सायली नेहमीसारखचं पंडित बरोबर भांडत होती.
" अच्छा, आता मी आत जाऊ नको का ?? "
" का जाणार तु आत ?? " पंडित तीच्या समोर कमरेवर हात ठेवून तीला बघत रागात म्हणाला.
" कारण आता माझी मैत्रीण आहे म्हणून... "
" इथे कोणी मैत्रीण बित्रीण नाही. इथे फक्त त्या डॉक्टर आहेत. "
" हो माझीच मैत्रीण डॉक्टर आहे ना मग 😕 "
" मैत्रीण घरी. आत्ता इथे त्या फक्त एक डॉक्टर आहेत. सो तुला त्यांना भेटायचं असेल तर अपॉईंटमेंट घ्यावी लागेल. "
" काय फालतुगिरी आहे 🤨.... आता मला माझ्याच मैत्रीणीला भेटायला अपॉईंटमेंट घ्यावी लागेल "
" हो मग. नाहीतर उद्या कुणीही येईल तुझ्यासारख आणि आत घुसेल. "
" सगळे तुझ्यासारखे वेडे असतात का 😏 "
" वेडी असशील तु. "
" तुच वेडा, तुझी ती gf पण वेडी "
" एएए तीला का मध्ये घेतीये ?? तीला काही नाही बोलायचं हां "
" मग मला पण वेड नाही म्हणायचं. "
" Guys, just stop it. Everyone is staring at you. " प्रीती मध्ये येऊन त्यांना गप्प करायचा प्रयत्न करत होती पण ते दोघ गप्प राहतील तर खरं.
" मग ह्याला सांग ना. मला जाऊच देत नाहीये. मध्येच रस्ता अडवलाय काळ्या मांजरी सारखा. "
" बघ तुच. ही चेटकीण मला काळी मांजर म्हणतीये"
" हो. बरोबर. आता काळ्या मांजरीने रस्ता अडवल्यावर मी चेटकीणच होणार ना. "
" अलरेडी असल्यावर अजुन व्हायला कशाला पाहिजे 😏 "
" ए काळ्या मांजरा "
" ए चेटकीणे "
त्यांचा तो प्रेमळ संवाद ऐकुन विशाखा पटकन पुढे आली आणि सायलीचा हात धरत, ओढत ओढत तीला केबीनमध्ये घेऊन गेली.
तरी जाताना पण सायली पंडित वर ओरडतच होती. आत आल्यावर परत विशाखा वरच ओरडली,
" आत का घेऊन आली ?? आज बघितलच असतं मी त्याला 😤 "
" काय मुर्खपणा लावला होता बाहेर ?? सगळे जण हसत होते तुम्हाला बघुन...... हे असं लहान मुलांसारख भांडत होती त्याच्यासोबत ?? "
" मी 😲😲 . मी भांडत होते ?? मी नाही , तुझा तो लाडका पंडित भांडत होता. मला आतमध्ये येऊच देत नव्हता. "
" अरे मग मला कॉल करायचा ना. मी आले असते बाहेर. "
" जरा मोबाईल बघ 🤨 " सायली हाताची घडी घालुन तीच्याकडे बघत थांबली.
" अरे हे काय, इथे टेबलवर आहे....... ओह शीट..... अमममममम ७ मिस कॉल. अं.... ते.... पेशंटच्या नादात कळलं नसेल "
" कळलं .... मग मी डायरेक्ट का आले ते "
" हो. पण का आलीस ते सांग ना. " सायली सांगत होती की पंडित बेधडक केबीनमध्ये घुसला.
" या साहेब, आता कसं येण केलंत ?? " सायली ने तिरकसपणे त्याला विचारल.
" बघायला आलो होतो की चेटकिणीचा काही प्रादुर्भाव पडलाय का केबीन वर ?? "
" काय पडलाय का ??? "
" ओह्हो, बघा स्वतःला पुणेकर म्हणवणारे 😏 "
" एएएएएए तु गप हां... "
" यार तुम्ही दोघं परत सुरू झाले " विशाखा दोघांना गप्प करत म्हणाली.
" मी कुठे मॅम ... हीच मला म्हणाली . " पंडित बारीक तोंड करत म्हणाला.
" बरं तु कशाला आला होतास ?? "
" ते पुढच्या अपॉईंटमेंटस् च काय करायचं ?? म्हणजे ...... "
पंडितच्या असं बोलण्यावर विशाखा ने सायली कडे बघितलं.
" बाहेर जाऊया ना फिरायला प्लीज. " सायली एकदम लहान चेहरा करत म्हणाली.
तीच्या तसं करण्यावर विशाखा हसुन हो म्हणाली पण पंडितने चेहरा वाकडा तिकडा केला. त्याला तसं बघुन सायली ने पण वाकड केलं तोंड.
" काही नाही होऊ शकत तुमच " विशाखा डोक्यावर हात मारत म्हणाली.
दोनच अपॉईंटमेंट होत्या त्या पंडितला बघायला सांगुन विशाखा आणि सायली फिरायला बाहेर पडल्या.
गाडी सायली ने घेतली आणि निघाली.
" कुठे चाललोय आपण ?? "
" तु गप्प रहा ना. तुम बस आम खाओ, गुठलिया मत गिनो. "
" वाव !!!!! सप्टेंबरमध्ये आम हिटलरने ठेवले होते का ग ?? 🤭🤭 "
" 😒😒 यार . "
" तु इकडे हिंजवडी पुलावर का आणली आहे गाडी ?? Let me guess, तुला नोकरी मिळाली आणि तु तुझी कंपनी दाखवायला आणली आहेस. बरोबर ना 🤩 "
" तुझ्या डोक्याला आता पान लागलीयेत branches 🤪 "
" दुधावरची साय 😂😂 "
" Poisonous branches "
" सांग ना कुठे जातोय ?? "
" आलो . समोर बघ. "
" वाव 🤩 !!! कल्याण भेळ. "
" हो. खुप दिवसांपासुन जायचं होत मला. आज मुहुर्त मिळाला. "
" चला चला चला. " असं म्हणत विशाखा तीच्या हाताला धरून आत घेऊन गेली.
दोघींनी ऑर्डर देऊन, ती भेळ घेऊन बाहेर येऊन बसल्या.
" वाव 🥰. किती भारी ना. "
" कोण मी का ?? " मागुन आवाज आला म्हणून चमकुन विशाखा ने मागे वळुन बघितल तर हाताची घडी घालून आकाश तीच्याकडे बघत हसत होता.
" यार तु इथे पण आला. खरं खरं सांग, u r following me na ..... " विशाखा त्यांच्याकडे बघत बारीक डोळे करत म्हणाली.
" मी का फॉलो करू ?? "
" ते मला कस माहिती असणार ना... "
" हे तर मी म्हणायला हवं ना कि तु मला फॉलो करतीये 🤭 " आकाश गालातल्या गालात हसत म्हणाला.
" मी का तुला फॉलो करू पण "
" आता हँडसम् मुलं दिसल्यावर करतात मुली फॉलो 😉 " आपल्या डोक्यावरून हात फिरवत आकाश म्हणाला.
आकाश आणि विशाखा भांडत होते आणि सायली पुर्ण कन्फ्युज झाली होती. एकदा आकाश कडे तर एकदा विशाखा कडे आळीपाळीने बघत होती.
" मी काही तुला फॉलो करत नाहीये. ओके. तु इकडे कसा काय ?? "
" हे तर ती विचारायला पाहिजे की
मिस. गायनॅकोलॉजिस्ट तुम्ही इथे काय करताय ?? 🤨 "
" मी आधी विचारलय. "
" माझी कंपनी आहे इथे. मी रोजचंच येतो इकडे. "
" मी मैत्रीणी सोबत आले होते. " असं म्हणल्यावर विशाखाला लक्षात आलं की सायली पण सोबत आली आहे तीच्या. तीने पटकन सायली कडे बघितल तर सायली तीच्याकडे बारीक डोळे करत बघत होती.
" आलं का लक्षात. मला वाटलं मी सोबत आहे ते विसरली. "
" सॉरी. तर ही माझी मैत्रीण सायली. " आकाशाकडे बघत विशाखा ने सायली ची ओळख करून दिली.
" आणि हा आकाश " एवढ म्हणून विशाखा गप्प बसली. सायली ने तीच्याकडे बघुन इशारा केला,
" हाच का माझा जीजु 😉 "
ते बघुन विशाखा ने खोटं खोटं हसत तीच्या पायावर पाय देऊन गप्प बसवायचा प्रयत्न केला पण पायावर पाय पडल्यामुळे सायली गप्प बसायचं सोडून जोरात ओरडली, " आई..... गं...... "