कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन
भाग -१८ वा.
---------------------------------------------------------------------------
अविनाश जळगावकर यांच्या पाठोपाठ अनुषा केबिनमध्ये आली खरी ..पण आतले केबिन इतके भव्य
-डोळे दिपवून टाकणारे असेल याची तर कल्पना केली नव्हती . ते नंतरही पाहता येईलच की ,असा विचार तिच्या मनात येऊन गेला .
खरे म्हणजे आतल्या जागेत फक्त केबिनच नव्हते , तो एक मोठा हॉलच होता , त्याचे दोन तीन भाग करून त्यात
सुरुवातीला अतिशय आकर्षक वाटणारी साहेबांची केबिन , त्याच्या उजव्या बाजूला पुन्हा काचेचे दालन ..
ज्यात बाहेरून आत काय चालले आहे हे पाहता यावे अशी व्यवस्था होती .
एकच वेळी पन्नास ते शंभर माणसे बसू शकतील असा तो मिटिंग हॉल-कम- थियेटर होता . अगदी अल्ट्रा –
अद्यावत आणि आधुनिक सुख सोयी इथे आहेत , हे अनुषा नजरेने टिपत होती.
चालू असलेला कॉल बंद करून फोन समोर ठेवीत ..देशमुख साहेब तिच्याकडे पहात म्हणाले ..
वेलकम ..मिस अनुषा ..माझ्या जुन्या मित्राची आजची एक होतकरू विद्यार्थिनी ...!
देशमुख –ग्रुप ऑफ कंपनीज तर्फे ..मी,सागर देशमुख आपले सागत करीत आहे
आणि ताज्या टवटवीत गुलाब फुलांचा गुच्छ अनुशाच्या हाती देत ते म्हणाले ..
प्लीज टेक युवर सीट—
नंतर आपल्या पी.ए. ला म्हणाले ..
मि .अविनाश तुम्ही एक बेस्ट होस्ट आहात ,
आणि आपली कंपनी आलेल्या प्रत्येकाचे मनापासून छान आदरातिथ्य करीत असते,
हा आपला क्रम ..चुकवू नका .अनुशाला याचा अनुभव घेऊ द्या .
बाकी तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही.
जळगावकर ..त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले .
केबिन मध्ये सागर देशमुख आणि अनुषा हे दोघेच समोरासमोर बसलेले होते.
तिच्याकडे देशमुख साहेब मोठ्या मिस्कीलपाने पाहत आहेत असे अनुशाला जाणवले .
.तसे ती अधिकच अवघडून गेली ..
.तिची ही अवस्था साहेबांनी ओळखू आली नसती तरच नवलाचे होते ..
अनुषा – मी तुला आता अहो अनुषा , तुम्ही आणि तुम्हाला ..असे कार्यालयीन शब्दात अजिबात बोलणार नाहीये ..
मी तुला सरळ आणि सपष्ट शब्दात ..ए अनुषा ,अग अनुषा असे म्हणणार आहे..
फॉर मी ..यु आर माय यंग फ्रेंड ..!
चालेल ना असे ..?
त्यासाठी परवानगी घेतलेली बरी ..नाही का ?
काय हो सर ..! परवानगी आहे का ? असे विचारून का लाजवताय मला ..!
बाय ऑल मीन्स ..तुम्ही मला ..
ए अनुषा , अग अनुषा म्हणा ...तुम्ही सिनियर आहात माझे.
आणि मी पण तुम्हाला ..कधी सर , कधी अंकल असे म्हणून बोलत जाईल ..म्हणजे मला अगदी
फ्री फिलिंग येईल तुमच्या सोबत असतांना .
अनुशाचे हे बोलणे ऐकून –खुश होत देशमुख म्हणाले ..
अनुषा ..तू नव्या पिढीची प्रतिनिधी शोभतेस बरे का .. असे फ्री आणि फ्रेंक नेचर आवडते मला .
संकोचाने दबून रहाणारी ..माणसे मला अजिबात आवडत नाही.
जसे कम्फर्टेबल वाटेल तसे तू माझ्या सोबत वागावे इतकेच म्हणेन मी.
असो ..प्रास्तविक पुरे करू या ..
नाऊ, कम टू द वर्क ..
तर, अगोदर तुझे आभार मानायचे आहेत मला , ते यासाठी की ..
कॉलेजच्या ,तुझ्या शिक्षणाचा भाग म्हणून का होईना ..तू माझ्यावर ,माझ्यातल्या माणसावर
लिहिणार आहेस. “
मी खूप मोठा आहे, असा माझा दावा नाहीये ..पण ,मी एकदमच सामन्य नाहीये ..
ही माझे ठाम मत आहे..
हे का ? कसे ? याचा प्रवास म्हणजे ..तुझे प्रोजेक्ट असावे ? अशी माझी अपेक्षा असेल.
तू या बद्दल आज जरा अधिक सविस्तर सांगितलेस तर ..माझ्या संदर्भातल्या अनेक गोष्टी
मी तुला देण्यासाठी रेडी ठेवू शकेन ..
देशमुख हे सारे सांगत असतांना .. तिच्या मनात येत होते की -
हे व्यक्तिमत्व समोरच्या माणसांच्या मनावर खूप प्रभाव टाकणारे आहे यात शंका नाही...
समोर बसलेल्या सरांच्याकडे पाहत होती ...
सावळा वर्ण ,सरळ आणि टोकदार नाक ,मोठ्या डोळ्यावर सोनेरी चष्मा ,त्यातून रोखलेली भेदक नजर ,
डोक्यावर टक्कल नव्हते , भरपूर असे मागे वाळवलेले थोडे रुपेरी –थोडे काळे असे छान कुरुळे केस ..खूप छान दिसत होते .
यामुळे आधीच रुंद असलेले कपाळ ,अधिकच मोठे दिसत होते .
अंगातला भारी-झकास सूट, दोन्ही हातांच्या बोटात ग्रहांकित रत्नजडीत अंगठ्या संपन्नतेच्या खुणा होत्या .
ठसठशीत आणि बोलका चेहेरा ..त्यावरचा विलक्षण आत्मविश्वास ,
चेहेर्यावर कधी हसरे भाव आणयचे , कधी निर्विकारपाने थंड प्रतिसादी व्हायचे , अनुभवाने साध्य झालेले
हे कसब ..!
सागर देशमुख एकदम फीट आणि फाईन आहेत ..!
ए अनुषा ..लक्ष कुठे आहे तुझे ?
मी काय विचारले ..याकडे लक्षच नाहीये तुझे तर ..!
नो .नो, असे अजिबात चालणार नाही मला . बी अलर्ट अल्वेज ..!
सरांचा वरच्या पट्टीला आवाज आणि शब्द कानावर पडतातच ..अनुषा भानावर आली ..
बाप रे.. सर तर पटकन रागावतात....
ती लगेच म्हणाली ..
सो सॉरी सर, मी आपल्याच कामाबद्दल मनात जुळवाजुळव करीत होते ..त्यामुळे असे झाले..
पुन्हा असे नाही होणार ..आय प्रोमीस यु सर ..!
अनुशाच्या आवाजातली नरमाई आणि अपराधीपणाची भावना जाणवून देशमुख सर म्हणाले ..
ठीक आहे, इट्स ओके ..!
मी पण सॉरी म्हणतो तुला .
हे असे स्वतःला कंट्रोल करणे न जमणे ..ही एक वाईट खोड माझ्यात आहे ..
तुझ्या रजिस्टरमध्ये लिहून ठेव हे ..माझे विश्लेषण करते वेळी कामाला येईल ..
हे ऐकून अनुशाला अगदी मनापसून हसू आले ..
काय हो सर,
माणूस आणि त्याचा स्वभाव ..एकाच नाण्याच्या दोन बाजू .असतात .लगेच समजणे सोपे नसते .
आणि सर, एक व्यक्ती म्हणून तुम्ही तर माझ्यासाठी अभ्यासाचा विषय आहात ..
हर एक गोष्ट .मग ती कोणतीही असो ,मी त्याची नोंद करून ठेवणार आहे. माझ्या मनात ,
इथे मी जे पाहीन , जे ऐकीन , जे जे बोलीन ..यातले सगळेच्या सगळे ..मनात पक्के रेकॉर्ड
होत जाणार आहे ..
त्याची सुरुवात ..मी या केबिन मध्ये पाउल टाकले ..त्या क्षणापासून झालेली आहे.
अनुशाचे शब्द ऐकून ..देशमुख सर आनंदाने म्हणाले ..
आता माझी खात्री पटली ..की ..तुझ्या सरांनी तुझी निवड अगदी विचारपूर्वक आणि खात्रीने केली आहे.
तू तुझे काम अगदी निर्धारपूर्वक करणार आहेस ..या विषयी मला अजिबात शंका
अनुषा – ऐक –
तुला एक -पते की बात “ सांगतो ..
माणसाच्या वागण्यातून , बोलण्यातून त्याच्या मनातील हेतू याबद्दल अंदाज करण्यात ..कदाचित आपण चुकू शकतो ,
पण, वरकरणी एक आणि आतून दुसरेच “असा विचार घेऊन जे वागत असतात ना ..
त्यांचे बिंग ..आज ना उद्या ,कधी तरी फुटते . म्हणून ..माणसाने फाजील आत्मविश्वास बाळगून
फार काळ चालत नसते ...,
पण आजकाल काय आहे ना ..अनुभवाने कच्ची असलेली मडकी “..टिकणारी नसतात .
अशा अर्धवट असलेल्या ..पण ,स्वतःला हुशार समजणार्या ..माणसाना मी माझ्या समोर कधी
उभे करीत नसतो .तर
“त्याला लाथ मारून हाकलून देतो “..
हे वाक्य तुझ्या मनात लिहून ठेवू नकोस ..बरे का . विसरून जा लगेच.
हे तुझ्या साठी अजिबात नाहीये .
तर .असे वागणारे जेव्हा मला भेटतात ..तेव्हा त्यांना
माझ्या कडून अशीच वागणूक मिळाली आहे , यापुढे ही मिळणार .
अनुषा .. माझ्या अशा थेट वागण्याच्या पद्धतीमुळे ..
हे असे लोक माझ्याबद्दल बाहेर जाऊन मनात जे येईल ते पसरवतात ,
पण, स्वतः माझ्याशी कसे वागले ? हे कुणाला नाही सांगणार .
मला या अशा प्रवृतीचा तिटकारा आहे .
त्यांचे ऐकून घेत अनुषा त्याना म्हणाली -
सर, तुमच्या वागण्यात काहीच चुकीचे नाहीये .
मी सहमत आहे तुमच्याशी .
हे असे बोलून गेली ,पण, मनातून मात्र ती खूप अस्वस्थ होऊन गेली होती .
अरे बाप रे ..पहिल्याच दिवशी असा हादरवून टाकले देशमुखसरांनी आपल्याला ..
काही खरे नाही आपले .. कारण ..
सरांनी सांगितलेले हे सगळे त्यांचे विचार ..आणि त्या मागची भावना किती योग्य असली तरी ..
त्यांचे शब्द न शब्द आपल्याला लागू पडणारा आहे ..कारण ..
आपण ज्या हेतूने हे काम आरंभ केले आहे “ त्याला हे पूर्ण लागू पडते .
आपल्या प्रोजेक्ट करण्याच्या हेतू मागे ..आणखी एक दुसरा हेतू पण आहे..लपवून ठेवलेला .
म्हणूनच भीती वाटते आहे ..
चोराच्या मनात चांदणे “ सारखी अवस्था झाली आहे आपली. सरांना आपली ही अवस्था जाणवता कामा नये.
दीड वाजला ..आणि अविनाशसर आत येत म्हणाले ..
सर, लंचरूम मध्ये ..चालावे ..लंच इज रेडी ..
देशमुख सरांनी .घड्याळात पहात त्यांना म्हटले ..
हो हो , चला ,गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजेत .
आणि उशीर वाहयला नको ..
आपल्या पाहुण्या ..म्हनतील ..बोलण्याने मन भरते ..पोट नाही..
आणि तिघे लंच रूम मध्ये गेले ..
सर म्हणाले ..
मि.अविनाश ..तुम्हाला सांगतो
या ..अनुषा सोबत ..तिच्याशी चर्चा करण्यात कसा वेळ गेलाय कळालेच नाही हो.
काही म्हणा ..स्वताच्या कौतुकाबद्दल जे सुरु असते ..त्यात अगदी मनापसून रमायला आवडत माणसाला .
आता हे प्रोजेक्ट माझ्याबद्दलच ..मग, मी तर काय ..हरभऱ्याच्या झाडावरच जाऊन बसलोय कधीचा .
थांक्यू अनुषा ..पुन्हा एकदा.
देशमुख अगदी मनापासून बोलत आहेत ..हे अनुशाला जाणवत होते ..तिने काही न बोलता फक्त
हसून छान प्रतिसाद दिल्याचे दाखवले.
साधेच आणि रुचकर जेवण ..सोबत गप्पा ..लंच टाईम भुर्रकन संपला सुद्धा .
पुन्हा दुपारचे सत्र सुरु झाले ..
त्या अगोदरच .. अविनाश सर म्हणाले ..
आज चार वाजता तुम्हाला ..एक संस्थेत जायचे आहे..तुम्ही मेन ट्रस्टी आहात ..,वार्षिक बैठक
तुमच्या शिवाय होणार नाही . त्यामुळे अनुशाला उद्या अकरा वाजता यावे असे सांगतो .
हे ऐकल्यावर देशमुख सर म्हणाले ..
अरेच्च्या ..असे आहे का ..ठीक आहे ..
जावे तर लागणार . विश्वास आणि जबाबदारी दोन्ही कठीण असते सांभळून ठेवणे .
एक काम कर अनुषा ..
तीन महिन्यात तुला हे प्रोजेक्ट पूर्ण करायचे आहे “ हा नियम आणि महत्वाची अट आहे “
हे तुझ्या प्रिन्सिपल सरांनी मला किमान दहा वेळा सांगितली ..साहजिकच याचे महत्व मला लक्षात
ठेवणे भाग आहे..
तू तुझी फाईल ..एक सेट माझ्यासाठी आणलाच असेल..तो माझ्या टेबलवर ठेवून दे..
वेळ मिळेल तसा मी वाचून बघतो ..म्हणजे स्टेप बाय स्टेप ..त्याझ्या उपयोगी पडणारी अशी
माहिती माझ्याकडे पेपर कटिंग , फोटो जे जी उपलब्ध असेल तर ..आता पासूनच तयार
करून ठेवायला सांगतो.
अनुषा म्हणाली ..
सर, तुमची ही पद्धत मला खूप आवडली .आपणहून आणि मनापासून तुम्ही सहकार्य करीत आहात
छान वाटते आहे मला .
सर..एक विनंती आहे तुम्हाला ..
उद्या पासून ..आपण फक्त बारा ते चार “अशा वेळेतच काम करू, चर्चा करू या .
कारण अकरा वाजेपर्यंत मला कोलेज असते .. आणि पाच नंतर ..पेपरच्या कार्यालयात जाऊन
तिथले काम करायचे , तसेच टीव्हीसाठी " भेटी आणि शुटींग “ करून शो बनवायचे असे काम असते मला .
देशमुख सरांनी शांतपणे तिचे सारे ऐकून घेत म्हटले ..
अनुषा ..तू एक विद्यार्थिनी तर आहेसच ..पण..तुझी ही कार्य करण्याची धडपड मला खूप इम्प्रीस
करणारी आहे.
तुझ्या वेळेप्रमाणे आपण करू या उद्यापासून.
ओके .. तू ये उद्या ..पण , बाराच्या आधी .
बाय सर,
अनुषा त्यांच्या केबिनच्या बाहेर आली,
अविनाश सरांशी बोलून ..त्यांना कल्पना दिली..
ते म्हणाले .. स्वतहा साहेबच रेडी आहेत म्हटल्यावर ..
असे नको म्हणूच शकत नाही मी.
अनुषा म्हणाली - मी तुम्हाला ..आता पासून अविनाश अंकल म्हणू का , छान वाटेल मला ..
तिच्या हातावर टाळी देत अविनाश सर म्हणाले..
यस ..अनुषा ..तू जरूर असे म्हणू शकतेस.
अनुषा देशमुखसरांच्या ऑफिस मधून बाहेर पडली .
आता घरी जायचे , आणि संध्याकाळी ..अभिला आजचा रिपोर्ट द्यायचा ..
अनुषा घराकडे निघाली ..पहिला दिवस छान झाला ..या आनंदात ..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढच्या भागात ..
भाग- १९ वा लवकरच येतो आहे ..
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------