Sparsh - 16 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | स्पर्श - भाग 16

Featured Books
Categories
Share

स्पर्श - भाग 16

मानसी ..काय होती ती ??..स्नेहसंमेलनाला डोळ्यात डोळे घालून डान्स करणारी मानसी होती की लग्नाचं एकूणही शांत बसणारी मानसी होती ..दिवसेंदिवस ती माझ्यासाठी कोड बनत जात होती ..कॉलेजला होतो तेव्हा दुरून बघण्यात ती वेगळीच भासत होती ..म्हणजे निरागस ..घरच्यांचं बंधन असलं तरीही नदीच्या पाण्यासारखी शांत , संथ वाहणारी तर आता मोकळीक मिळाली असूनही बंधनाच ओझं घेणारी खरच काय होती मानसी ?? ...काहीही म्हणा पण तिला जाणून घेण्यातही वेगळीच मज्जा होती ..प्रत्येक मुलीचा स्वभाव वेगळा असतो ..एखादी मुलगी भेटताच आपली होते तर एखादी मुलीला खुलायला वेळ लागतो ..तिनेही मला खुलायला वेळ मागितला असल्याने मला तो देणे भाग होते ..मला ती ड्रॉप करायला आली नव्हती याच वाईट वाटलं पण चौकशी केली तेव्हा माहिती पडलं की तिची तब्येत खराब झाली होती बहुतेक तिला सगाईच्या कामाच ओझं पेललं नसावं ..तरीही मी खुश होतो कारण माझी तिच्याकडून कुठलीच अपेक्षा नव्हती ..फक्त तिने मनाने सोबत राहावं हीच इच्छा मनोमन बाळगून होतो ..
मी तर कॅनडाला पोहोचलो होतो ..पण तिची आठवण सदैव साथ असे ..घरच्यांचं बंधन असल्याने सहसा ती घरी असली की फोन कमीच करत असे पण कधी - कधी लपून फोन करत असे तेव्हा मला तीच आश्चर्य वाटायचं ..दिवसातून एकदा तरी तिला कॉल व्हायचाच .हळूहळू तीच मन जपू लागलो होतो ..तिला काय आवडत काय नाही या सर्वांची माहिती काढून घेतली होती ..त्यामुळे ती नाराज असली की त्या सर्व गोष्टी पुरपूर वापरून तिला मनवु लागलो ..तिने म्हटलं तस तिला सावरायला खरच वेळ लागला पण अलीकडे सर्व काही बदललं ..ती स्वतःहून मला कॉल करू लागली ..माझ्याशी बोलत असताना तिच्या ओठांवर हसू राहू लागल ..तिलाही माझ्या प्रत्येक गोष्टी आवडू लागल्या आणि मानसी नावाचं कोड हळूहळू का होईना सोडवल्या जात होतं ..पण मधातच तिचा एखादा रुद्रावतार पाहायला मिळायचा आणि मी गोंधळून जायचो ..तिच्याशी बोलताना वेळ कसा निघून जाई तेसुद्धा कळत नव्हतं ..आणि तिची चूक असतानाही ती रागावली तरीही मला तिचा राग येत नव्हता ..कारण ती आयुष्यात नसण्यापेक्षा आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं होत ...मग ती कशीही असली तरी माझीच होती ..

मी तिकडे कॅनडाला होतो ..तर घरचे लग्नाची तयारी करू लागले होते ..जवळपास 3 महिन्यांनी त्यांनी लग्नाचा मुहूर्त काढला होता ..मी जरी नसलो तरी आई शाश्वतला सोबत घेऊन सर्व काम सांभाळून घेत होती ..तिने सगाई होताच लग्नाची सर्व तयारी सुरू केली ..ती प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखी करत होती ..तिच्या वागण्यावरून जाणवत होतं की तिच्यासाठी माझं लग्न किती खास होत ..घरच एकमेव लग्न म्हणून तिने घरच्या लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वाना कपडे घ्यायचे ठरवले होते ..मानसीला दागिने करणे असो वा तिला लागणाऱ्या सर्व गोष्टी ती बारकाईने पाहत होती ..लग्नाला जरी वेळ असला तरी तिचा उत्साह मात्र कुठेच कमी होत नव्हता ..मी सगाईच ऑफिसला सांगितलं असल्याने सर्वच खूप खुश होते ..शिवाय बोलविल नाही म्हणून नाराज पण होते ..मी त्यांना समजावलं आणि ते समजले देखील ...ऑफिसचा प्रत्येक व्यक्ती लग्नाला देखील येणार होता ..त्यामुळे मला फारच आनंद होत होता ..

कॅनडाला जाऊन जवळपास एक महिना लोटला होता ..तस तर मी सहसा घरी येत नव्हतो पण मानसीला भेटण्याची ओढ इतकी होती की स्वताला सावरन शक्य नव्हतं ..सतत तीचाच विचार मनात घर करून असे ..तिला भेटण्यासाठी मी आतुर झालो होतो ..त्यामुळे दोन - तीन दिवसांच्या सुट्ट्या काढून मी पुन्हा एकदा भारतात आलो .. यावेळी मात्र कुणालाच खबर केली नव्हती ..घरी पोहोचलो तेव्हा आई माझ्याकडे शंकेच्या नजरेने पाहत होती ..शनिवारला दुपारी घरी पोहोचलो ..मला हा संपूर्ण रविवार मानसिसोबत घालवायचा होता ..तिचे बाबा जागे असताना ती फोन उचलणार नाही माहिती असल्याने रात्र होण्याची वाट पाहू लागलो ..रात्रीचे 11 वाजले असतील आणि तिला फोन केला ..समोरून फोन उचलल्या गेला .." हाय अभि कसा आहेस .." , मानसी म्हणाली ..आणि मी गमतीत म्हणालो , " तुझ्याविना कसा असेल ..जगतोय कसातरी ..तू झोपली होती का ? "

" नाही रे तुझ्याच फोनची वाट पाहत होते ..तू रोज करतोस ना आता सवय झाली त्यामुळे तुझा आवाज एकल्याशिवाय झोपच लागत नाही " , मानसी माझी खेचत म्हणाली आणि मीही रोमँटिक होत म्हणालो , " अरे बापरे !! एवढं प्रेम ..देवा मला सांभाळून घे नाही तर मी पागल होऊन जाईल मॅडमचा प्रेमात " . समोरून ती हसू लागली ..खर सांगू तर तिच ते हसन मला वेड लावून जायच म्हणून मीही तिच्याशी जास्तच फ्लर्टी वागायचो ..ती हसन सावरत म्हणाली , " तू न काकुसारखा अगदी नौटंकी आहेस ...काहीही बोलत असतोस .." मी पुन्हा रागावत तिला म्हणाली , " कोण काकू हा ..? " आणि हसत म्हणाली , " सॉरी ..सॉरी आई " ..

खरच तिचे ते निरागस भाव मला समाधान देऊन जायचे ..जिने मला प्रेम करायला शिकविल होते तीच जेव्हा म्हणायची की मी तुझ्याकडून प्रेम या शब्दाचा अर्थ शिकते आहे तेव्हा ते खूप मोठं अचिवमेंट असायचं ..मी पुन्हा म्हणालो , " एक ना मानसी उद्या कामात नसशील तर मूवी पाहायला जाऊ " , आणि ती माझ्यावर हसत म्हणाली , " तू न लग्नाचं एकूण खरच वेडा झाला आहेस ..तू तिकडे कॅनडाला असताना आणि मी इकडे भारतात मग मूवी काय विडिओ कॉलवर पाहू .." आताही ती हसत होती ..आणि मी तिला उत्तर देत म्हणालो , " कल्पना भारी आहे पण ते नंतर कधी आता तर सोबत पाहूया आणि ते पण भारतात उद्याच .."

" सिरीयसली आता अस नको सांगू की तू घरी आला आहेस " , ती माझ्यावर चिडत म्हणाली ..आणि मी हलकेच स्मित करत म्हणालो , " काय करू तुझी आठवण येत होती म्हणून आलो घरी ..मग उद्याच पक्क ना .." ती विचार करत होती आणि मी तिच्या उत्तराची वाट पाहू लागलो , " वेडा आहेस तू !! उद्या रविवार आहे त्यामुळे बाबा परवानगी देणार नाहीत पण मी कुठला तरी बहाणा मारून येते पण मला लवकर सोडावं लागेल हा ..नाही तर काही खर नाही .." , मानसी म्हणाली आणि तिला उत्तर देत म्हणालो , " हो ग माझी झाशीची राणी सोडतो लवकर ..पण त्यासाठी ये तर आधी .."

तिने होकार कळविला आणि मला फार बर वाटल ..तिचा स्वभाव पाहता ती येईल अस वाटलं नव्हतं ..सुरुवातीला फक्त 15 मिनिटं बोलण्यासाठी कंटाळा करणारी मानसी आता रोज तास - दोन तास बोलत होती आणि त्या संपूर्ण वेळात ती फारच खुश असायची ..मला जसा तिचा सहवास आवडायचा तसाच तिलाही माझा सहवास आवडत होता ..ती बोलत असली की मी फक्त तीचच बोलणं एकत असायचो ..ती बोलून थकली की तिच्या लक्षात यायचं की आपणच बोलत आहोत आणि हसून स्वतःलाच स्टुपिड म्हणवून घ्यायची ..बोलता - बोलता रात्रीचे 12 वाजले होते ..तिला झोप येत असल्याने मी फोन ठेवला आणि मीही झोपायला गेलो ...

दुपारी बाराचा शो पाहण्याच ठरलं होतं ..त्यामुळे लवकर तयारी करून निघायचं होत ..पुन्हा रात्रीच्या फ्लाइटने परत जायचं असल्याने सकाळीच बॅग भरून ठेवली होती ..आज मानसी पहिल्यांदा माझ्या गाडीवर बसणार असल्याने गाडीला छान धुवून - पुसून काढल ..आजचा क्षण मला खास बनवायचा होता त्यामुळे त्याची तयारी मी केली होती ..ती तिच्या घराजवळच्या बसस्टॉपवर माझी वाट पाहणार होती त्यामुळे तिला पीक करण्यासाठी निघालो ..जाताना तिला खुश करता याव म्हणून बागेतल गुलाबाचं फुल तोडून घेतलं आणि स्वारी निघाली होणाऱ्या हमसफरकडे ..बसस्टॉपवर पोहोचलो तरीही ती आली नव्हती म्हणून तिला बोलविण्यासाठी लगेच फोन लावला आणि ती खांद्यावर हात ठेवत गाडीवर येऊन बसली ..मागून येऊन बसल्याने तीच रुपदेखील पाहता येईना तर स्कार्फ बांधल्याने तिचा चेहराही पाहता येईना .तिला लगेच फुल दिलं आणि त्या सुगंधात हरवली ...मी गाडीचा आरसा तिच्या चेहऱ्याकडे सेट केला आणि तिचे नशिल्या डोळ्यांच दर्शन झालं ..मी तिच्याकडे पाहत होतो आणि ती म्हणाली , " अभि आता पाहून झालं असेल तर निघुया का .." तिच्या अशा बोलण्याने मी थोडा लाजलो आणि पुन्हा स्वताला सावरत म्हणालो , " इकडे खड्डे खूप आहेत सो पकडून बस नाहीतर ओरडशील माझ्यावर .." ती हसली आणि मी गाडी चालवू लागलो ..ती मागे बसून होती आणि मी जाणून- बुजून गाडीला ब्रेक मारत होतो ..ती थोडीशी रागवायची , हसायची तरीही मला काहीच म्हणत नव्हती फक्त तिचे ते डोळे मला तिच्या मनातला भाव सांगत होते ..मी ब्रेक मारला की तिचा हात आपोआप खांद्यावर यायचा ..मी फार जास्त वेळ तस करू लागलो की मागे पाठीवर एखादी द्यायला ती विसरत नव्हती ..किती मस्त होत ना हे सर्व ..शेवटी थेटरला पोहोचलो ..फारशी गर्दी नव्हती त्यामुळे लगेचच तिकीट मिळाली ..त्यावेळी थेटरमध्ये आशिकी 2 मूवी लागून होती ..ती मूवी पाहण्यात व्यस्त होती तर मी तिला पाहण्यात ..ती मूवी पहा म्हणून मला रागवायची आणि मी तिलाच बघत होतो ..शेवटी मलाही मूवी पाहन भाग पडलं ..हम तेरे बिन रेह नही सकते हे गाणं सुरू झालं ..त्यात पावसात चिंब भिजताना किसिंग सिन सुरू झाला ..आणि माझा नकळत हात तिच्या हातावर पडला ..माझं त्याकडे लक्ष नव्हतं पण तिला काय झालं माहिती नाही तिने लगेच माझा हात झटकून दिला ..मीही त्यावेळी काहीच रिऍक्ट केलं नाही पण ती गोष्ट माझ्या मनाला लागली ..मी तिच्याकडे न बघताच मूवी पाहण्यात व्यस्त झालो ..तर तीच संपूर्ण लक्ष माझ्याकडे होत ..मी मुद्दामहून तिच्याकडे दुर्लक्ष करीत होतो ..तिलाही हे आता जाणवायला लागलं ..इंटरवल झाला आणि मी खायला आणायला गेलो ..तिचा चेहरा फार उदास जाणवत होता ..तिला माझ्याशी खूप काही बोलायच होत पण तिची हिम्मत होत नव्हती ..तिने बोलायला हिम्मत गोळा केली तेव्हा पुन्हा एकदा मूवी सुरू झाली आणि मी माझं संपूर्ण लक्ष मूवीकडे केंद्रित केल..मूवी समोर - समोर जाऊ लागली आणि सुरुवातीला चेहऱ्यावर असलेल हसू दुखात परावर्तित झालं ..तिच्या डोळ्यात असलेलं ते अश्रू तिच्या वागण्याचे होते की मूवीचा शेवट पाहून आले होते यातलं काहीच कळत नव्हतं ..मूवी संपली आणि तिने आपला चेहरा रुमालाने पुसला ..आम्ही थेटर बाहेर पडलो ..
मूवीनंतर जेवणाचा प्लॅन होता शिवाय सकाळपासून दोघांनी नाश्तासुद्धा केला नव्हता ..त्यामुळे इच्छा नसली तरी जेवायला जाण भाग होत ..या संपूर्ण वेळात आम्ही दोघे शांतच होतो ..तिनेही जेवणासाठी स्वतःचा ऑर्डर दिला आणि मी आपला ..तिची स्थिती आणि माझी स्थिती काहीशी वेगळी नव्हती ..तरीही तिला छान फील व्हावं म्हणून मधातच तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होतो ..ती माझ्याकडे पाहून केवळ हमम करत होती आणि मी पुन्हा शांत होऊन जेवणाकडे लक्ष देऊ लागलो ..त्याही अवस्थेत आमचं जेवण करून झालं आणि आम्ही दुसरीकडे फिरायला कुठेच न जाता घरी जाण्याचा निर्णय घेतला ..सकाळी गाडीवरून जाताना वेगळं वातावरण होत तर आताच सर्व वातावरण बदललं ...तिला त्रास होऊ नये म्हणून गाडी आरामशीर चालवत होतो ..तिच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते ..आणि ती वारंवार त्यानं वाट करून देत होती ..मी हे सर्व साइड मिररमध्ये पाहत होतो ..शेवटी तिला घराकडे सोडलं ..तिला राग येऊ नये म्हणून एकदाच बाय केल आणि तिच्या उत्तराची वाट न पाहता सरळ घराकडे निघालो ..काहीच वेळात घरी पोहोचलो ..

घरी पोहोचल्यावर आई मला काय काय केलं ते विचारत होती मी तिच्याशी खोट बोलून सर्व काही सांभाळून घेतलं ..शिवाय थोडा त्रासलो सांगून बेडवर पडलो ..मानसीच्या अशा वागण्याच मला खूपच दुःख झालं होतं ..साधा स्पर्श तर झाला होता ..तोही जाणूनबुजून केला नव्हता मग तिला अस रिऍक्ट करायला नेमकं काय झालं ?? ..असे कितीतरी प्रश्न माझ्या डोक्यात थैमान घालत होते ..मी बेडवर पडून सकाळी घडलेल सर्व पुन्हा आठवू लागलो ..

चाहता हु बहोत तुझको
फिर भी कुछ अधुरा सा है
कमी मेरे प्यार मे है
या तेरा अपना कोई फसाना है ..

कितीतरी वेळ तसाच बेडवर पडून होतो ..2 तासाने फ्लाइट होती ..त्यामुळे स्वताला सावरत बेडवरून उठलो ..चेहऱ्यावरून पाणी घेत बेडरूमला येऊन पोहोचलो .आईने कडक चहा हातात आणून दिला ..मी चहा घेतला आणि टीव्ही पाहू लागलो ..मी त्यावेळी कुणाशीच काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो त्यामुळे अर्धा तास फक्त शांत बसलो ..फ्लाइटला काहीच वेळ उरला असल्याने मला लवकर निघन भाग होत ..बॅग सकाळीच भरून ठेवली होती ..त्यामुळे फक्त कपडे चेंज केले आणि तसाच निघालो ..बाबा सोडायला येण्याची जिद्द करत होते पण मी त्यांना येण्यासाठी नकार दिला ..आईबाबांचे आशीर्वाद घेऊन मी पुन्हा एअरपोर्ट ला निघालो ..बाबा मला रिक्षापर्यंत सोडायला आले होते ..काहीच वेळात मला रिक्षाही सापडली आणि बाबांना बाय करून मी आपला रस्ता धरला ..अर्ध्यात पोहोचलोच होतो की मानसीचा फोन आला..मी फोन उचलला आणि ती बोलू लागली , " अभि आता कुठे आहेस तू .." , मी हळूच उत्तर दिलं , " थोड्या वेळात फ्लाइट आहे न म्हणून निघालो आहे ..अर्ध्यात पोहोचलो आहे ..जाईल लवकरच .." ती काही क्षण शांत झाली आणि म्हणाली , " एक मी येतेय आता ..मला भेटल्याशिवाय जाऊ नको ..माझी वाट बघ ..मी पोहोचते लकरच " ..अस म्हणत तिने फोन कट केला ...थंडीचे दिवस असल्याने लवकरच अंधार पडला होता ..ती रात्री येणार असल्याने मला तिची काळजी वाटत होती ..फोन हातात होता ..तिला कॉल करावंसं वाटत होतं पण गाडीवर असेल म्हणून फोन कारायचीदेखील हिम्मत नव्हती ..रिक्षा चालत होती आणि मी माझ्या विचारात बुडालो होतो .." दादा तुमचा स्टॉप आला " अस रिक्षावाला म्हणाला आणि मी भानावर आलो ..बॅग बाहेर काढली आणि पैसे देऊन रिक्षाच्या बाहेर आलो ..तिने वाट पाहायला सांगितलं असल्यामुळे मी तिथे बाहेरच तिची वाट पाहू लागलो ..समोरून ती फारच वेगात गाडी चालवत येत होती ..मी कुठेतरी कोपर्याला उभा राहून तिची वाट पाहत होतो ..तिने घाईतच गाडी पार्क केली ...नंतर मला शोधू लागली ..मी तिच्यापासून दूरवर उभा होतो ..तीच लक्ष माझ्याकडे गेलं आणि ती धावत - धावतच येऊ लागली ..तिला कुणाचंच भान नव्हतं फक्त समोर मीच दिसत होतो..पाहता - पाहता तिने। येऊन मला मिठी मारली ..तिने मिठी मारताच माझ्या हातातील बॅग खाली पडली ..तिने मला घट्ट मिठीत धरलं होत आणि तिच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते ...ती मला तशीच बिलगून रडत होती आणि म्हणाली , " सॉरी अभि मी सकाळी अशी का वागले खरच काहीच कळाल नाही ..याआधी कधीही पुरुषाचा मला स्पर्श झाला नाही त्यामुळे मी तस वागून गेले ..तुला थेटरमध्येच सॉरी म्हणायचं होत पण जमलं नाही ..खूप वाईट वागले रे मी तुझ्याशी ..पण खरंच मी जाणूनबुजून नाही केलं ..घरी गेले तेव्हापासून स्वतःवरच खूप राग येत होता ..सतत तुझा विचार येत होता ..तुलाही फार वाईट वाटलं असेल हे लक्षातच आलं नाही ..खूप गिलटी फील करतेय रे प्लिज एकदा माफ कर ना ..प्लिज ..नाही तर आयुष्यभर स्वताला माफ करु शकणार नाही .." ..ती आताही माझ्या मिठीतच होती आणि मी तिच्या डोळ्यावरून हात घेतला ..जिला फक्त स्पर्श झाला म्हणून हात झटकून देणारी मानसी आता कुणाचीच पर्वा न करता माझ्या मिठीत होती ..काय मस्त होता ना तो क्षण .." अग बाई सर्व बघत आहेत सोड आधी मला " , मी म्हणालो आणि ती लगेच म्हणाली , " मला माफ केलंस मग " , मी हो म्हणालो आणि तेव्हा कुठे ती बाजूला झाली .." बाय द वे मी पण सॉरी " , मी मानसीकडे पाहत म्हणालो .." तू कशाला " , ती म्हणाली ..

" खरच आपण प्रत्येक व्यक्तीच सेल्फीश असतो ..आपल्या दुखासमोर आपल्याला कुणाचंच दुःख दिसत नाही ..खर तर मी तुला प्रॉमिस केलं होतं की तुला दुखवणार नाही ..तुला समजून घेईल पण नात्याच्या सुरवातीलाच मी ते वचन पूर्ण करू शकलो नाही म्हणून सॉरी ..आणि हो आजच्या जगात जिथे आपले लोकच आपल्या लोकांवर अत्याचार करतात तिथे आपण कुणावर विश्वास ठेवणार नाही त्यामुळे तुझं वागन कदाचित बरोबर होत ..ही गोष्ट मला आता जाणवते आहे .तुझेही काही मत अस शकतात हे विसरलो म्हणून सॉरी .." , मी म्हणालो आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकू लागलं ..बराच उशीर झाल्याने मी तिला जायला सांगितलं ..ती समोर जात होती आणि मागून आवाज देत म्हणालो , " आता तरी डोळे पूस नाही तर एखाद्याला उडवून द्यायचीस ..मग तुला सोडवायला पुन्हा जास्त दिवस लागायचे आणि मला पुन्हा वाट पहावी लागायची लग्नाची .." ती हसत - हसत निघाली ..गाडी स्टार्ट केली आणि पुन्हा वाऱ्यासारखो अलगद उडाली ..मीही माझ्या फ्लाइटने कॅनडासाठी निघालो ..( पुढच्या भागात अभि आणि मानसिच लग्न आहे तेव्हा नक्की या हा ) ...


क्रमशः ..