११. सत्य (दि ट्रुथ फ्रॉम दि ट्रेटर)...
उघड्या असलेल्या दरवाजातून शुक्ला आत आला. तसा उघडा दरवाजा ढकलला गेला. दरवाजा मागे शक्ती उभा होता. त्याच्या हातात पंतप्रधानांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या एका एजंटची 'एफएन हर्स्टल्' होती. शक्तीनेच दार लोटले होते.
"चुपचाप कुर्सी पर बैठो!" तो मागून ओरडला.
शुक्लाने मागे पाहिलं. शक्ती हातात पिस्टल घेऊन उभा दिसला. तो घाबरून खिडकीला अपोजिट उभ्या व त्याच्याकडेच पाहत असलेल्या पीएमकडे वळला. पीएम देखील हतबल होते. असहाय्यता त्याच्या मुखमंडलावर स्पष्ट होती. ते मागे हात बांधून उभे होते. शुक्लाला नजर न देता त्यांनी खाली पाहिलं.
याचा अर्थ शुक्ला समजून चुकला. पीएमनी शुक्लाला शक्तीला सोपवलं होतं हे सहज होतं!
तो गपचूप काही न बोलता मग शक्तीने आधीच रूमच्या मध्यभागी मांडून ठेवलेल्या खुर्चीवर बसला. त्या खूर्ची समोरच आणखी एक रिकामी खूर्ची ठेवली होती. तीवर शक्ती विराजला. हातात पिस्टल तशीच!
"आप किसके लिए काम कर रहे हैं?" शक्तीने थेट प्रश्न केला.
"भारत सरकार के लिए!" कचरत शुक्ला म्हणाला.
"इससे पहले मेरा सब्र टूटे सच बोलला सुरु करें!" शक्तीने धमकावलं.
शुक्ला गप्पच!
"आपको क्या ऑफर मिली अपोजिशन से?" शक्तीने पुढचा प्रश्न केला.
"आप क्या बोल रहे है मैं कुछ नहीं जानता!" शुक्ला आपल्याला सेफ करण्यासाठी खोटं बोलला.
हे करून काही उपयोग नाही हे त्याला माहित होतं; तरी तो बोलला होता!
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणताही साधारण प्राणी शेवटपर्यंत प्रयत्न करतो! एखादं सावज आपण शिकारीच्या हातून वाचणार नाही हे माहीत असून शेवट पावेतो झुज देतच! आत्ताही तीच परिस्थिती होती!
इथं सावज होता शुक्ला; आणि शिकारी होता शक्तीसेन!
शक्तीने मग जास्त वाट पाहिली नाही. त्याच्या कडील एफएन पिस्टलमधून गोळी सुटली.
ती घुसली ती बरोबर शुक्लाच्या उजव्या गुडघ्यात!
'गुन्हेगाराला शिक्षा करणं हे कोर्टाचं काम आहे' यावर शक्तीचा पूर्ण विश्वास; म्हणून शक्ती त्याला मारणार नव्हता! त्याला फक्त उत्तरं हवी होती!
पण हे दृश्य पाहून पीएम नेमके विचलित झाले! त्यांना काय करावं कळेना. ते खोलीतच सैरभैर गडबडी हालचाल करू लागले. कधी ते पुढं शक्तीकडे पाऊलं टाकायचे, तर कधी तसेच मागे वळायचे. त्यांनी कदाचित पहिल्यांदा असं काही इतक्या जवळून पाहिलं असावं... किंवा मग शुक्ला त्यांच्या विश्वासातला असल्यानं ते विव्हल झाले असावेत...
"काय करतोयस! असं करू नको!" पीएम गयावया करत शक्तीवर ओरडले.
वेदना होतच होत्या, पण पीएमच्या या कृतीनं तर शुक्ला जास्तच घाबरला.
आत काहीही झालं, तरी आत यायचं नाही हे संकेत आधीच दिले गेले असल्याने स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे एजंट्स गोळीचा आवाज आला तरी आत प्रवेशले नव्हते!
शुक्ला चौकशी दरम्यान मेलाच तर माननीय पंतप्रधान यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी शुक्लाला मारले हे चित्र उभं करणं शक्य व्हावं या विचाराने म्हणून शक्तीने त्या सुरक्षा रक्षकांपैकी एकाची पिस्टल वापरली होती.
"घाबरू नका सर! हे मरणार नाहीत, हा! पायाने अपंग होतील नक्कीच!" शक्तीने एखाद्या राक्षसासारखं क्रूर स्मित करत शुक्लाकडे पाहत बोलला.
शुक्ला तोंडावाटे आपली वेदना बाहेर पडू नये म्हणून दातांत ओठ जितक्या जोरात दाबता येईल तितक्या जोरात दाबून शक्तीकडे पाहत होता. पण वेदनांनी बाहेर पडण्यासाठी वाट शोधली होती; ते अश्रू बनून डोळ्यांच्या कडांना साचून राहिले होते. पण तेही शुक्ला खाली ओघळू देत नव्हता!
त्याला मराठी समजत नसलं, तरी 'अपंग' हा शब्द हिंदी, मराठीत एकच असल्याने शक्ती काय म्हणाला असेल हे त्याला ध्यानात आले!
"अब बोलोगे?" शक्तीने हसतच विचारलं!
"आप ऐसें किसीं को जबरदस्ती नहीं कर सकते! संविधान इसकइ इजाजत नहीं देता!" शुक्ला रडल्यागत ओरडला.
"अगर संविधान की इतनी चिंता आपको होती, तो आप जनमानस के साथ मिलके ये घिनोना खेल नहीं खेलते! और अगर आप संविधान और कानून की इतनी ही जानकारी रखते हैं, तो आपको ये भी पता होगा, की देश के गद्दारोंकी क्या सजा होती हैं!" शक्ती शांतपणे पण धमकावण्यासाठी बोलला.
त्याचा वार वर्मी लागला होता, तरी त्याने आपल्या 'प्रेमळ' शब्दांत भर टाकली...
"आप जितना देर लगाओगे, उतना खून बहेगा! और जितना खून बहेगा, उतनेही आपके रिकवरी के चांसेस घटेंगे!" शक्तीने धमकावलं.
आता मात्र शुक्लाचा धीर सुटला. त्याला शक्ती जे बोलला ते पटलं होतं. त्याने आत्ता जर सहकार्य केलं नसतं, तर तो इथून पुढं आयुष्यभर एका पायाने अधू झाला असता आणि जर शक्ती एवढ्यावर थांबला नसता तर दोन्ही पायांनी... आणि मग कधीच शुक्ला जीवनभर चालू शकला नसता... पुढची संभावित चित्रं शुक्लाच्या डोक्यांत क्षणार्धात पळाली. आणि त्याने निर्धार केला...!
"जो हो रहा है, अपोजिशन का किया कराया हैं! सब के पीछे डॅनियल है!" तो म्हणाला.
"मालूम है! जो पता नहीं वो बताने की कृपा करें!" शक्ती बोलला.
"लोककल्याण की सरकार गिरे इसके लिए महँगाई बढ़ाने की कोशिश की गई! भ्रष्टाचार के आरोप भी लागए गये! हमारे कुछ पार्टी मेंबर्स एवं मंत्रीयो ने छोटे मोटे गफले किए भी हैं, सो आरोप करके चिंतपल्ली सर, हमारी सरकार और पार्टी के बारे में जनता के मन मे रोष उत्पन्न करने में जनमानस कामयाब हो रही थी, की पीएम ने नई टैक्स पॉलिसी बनाने का प्रस्ताव रखा! इराक और अरब देशों में जारी युद्ध की वजह से महँगाई तो काबू में आ नहीं सकती थी। पर पीएम का मानना था, की हम कर प्रणाली में सुधार करके जनता को राहत तो दे ही सकते हैं! इकसे बारे में इनकी गतिविधियाँ बढ़ी! अपोजिशन को डर सताने लगा, की अगर पीएम सफल हुए तो अगला चुनाव भी हमारी पार्टी ही जीतेगी! सो..."
"इसलिए उन्होंने अपने ही नेता को मरवा डाला!" पीएम पुढं होत शुक्लावर ओरडले!
शुक्ला ने खाली मान घालून अपराधीपणे हो म्हणत तीच मान डोलावली.
उनके सबसे लोकप्रिय नेता इंद्रदत्त वाचस्पती जी को मारकर जनमानस के कुछ नेता जनता, की सहानुभूती गेन करना चाहते थे। और इससे सत्ता पक्ष यानी हमारे लोककल्याण को दोषी रखकर डीएमएफ करने का जनमानस का प्लान था! बेचारे वाचस्पतीजी को उनके मृत्यु के प्लान के बारे में कुछ पता नही था!"
"जो बोओगे, वहीं तो पाओगे!" शक्ती वाचस्पतीला उद्देशून बोलला असला, तरी त्याने शुक्लाला यातून त्याच्या भविष्याचं दर्शन करवण्याचा अट्टहास केला होता.
यावर शुक्ला गप्प मान घालून बसला.
"शुक्ला आपने ही पार्टी से गद्दारी करते तुम्हें शरम नहीं आई?" पीएम पुन्हा ओरडले.
त्यांच्या तळपायाची आग मस्तकसुळ बनत चालली होती!
"पार्टी से क्या इन्होंने तो देश से गद्दारी कर डाली!" शक्ती शुक्लाला चिडवण्यासाठी बोलला...
"ये डॅनियल कोन है?" शक्तीने शुक्लाला पुढं विचारलं.
"डॅनियल तो बडे़से जिग्सॉ का छोटासा तुकडा हैं!" शुक्लानं चुप्पी तोडली.
"तुम्हारी तरह?" शक्तीनं उपहासानानं खुदकत विचारलं.
शक्तीला उत्तराची अपेक्षा नव्हतीच. शुक्लाला लाज आणण्यासाठी तो हे उद्गारला होता. म्हणून...
"इसमें डॅनियल का क्या रोल है?" शक्तीने शुक्ला पुढं विचारलं.
"डॅनियल एक बडा इन्व्हेस्टर है, जो अमेरिका के थ्रू इंडिया में इन्व्हेस्ट करना चाहता था! पर पीएम सर के मना करने से उन्होने अमेरिका संग डॅनियल के भी इरादों को भंग किया!"
"महँगाई कैसे बढ़ा दी गई?" शक्तीने प्रश्न केला.
"आखाती देशांत युद्ध घडवून! हो ना?" पीएमनी शुक्लाकडे घृणीत नजरेने पाहत खुलासा केला,
"अमेरिका सोबत असताना हे करणं अवघड ते काय?" पीएमनी आपलं वाक्य पूर्ण केलं.
शुक्लाने दीर्घ श्वास सोडला. कदाचित त्याला अपराधी वाटत होतं, का मृत्यूचं भय होतं... माहीत नाही, पण तो सत्य सांगू लागला...
इतका वेळ झालं शुक्ला वेदना सहन करत होता... मांडीतून खालपर्यंत रक्त वाहून व्हाईट मार्बल फ्लोअर त्याच्या पाया भोवती लाल रंगाचा झाला होता!
"हा! अमेरिका इराण, इराक से अपनी सेनाएँ हटाने वाला था। ट्रूप्स भी कम किए जा रहे थे! पर यह अमेरिका की रणनीति थी! वह डायरेक्ट युद्ध छेड़ना नही चाहते थे। ताकि सम्बंधित देश, यूएन या कोई भी अन्य देश युद्ध के लिए अमेरिका को जिम्मेदार ना पकड़े। इसिलिए उन्होंने इराक में स्थित अपनी सेना हटाई और वहाँ के एवं अन्य अरब देशों के मिलिटन्ट्स और आतंकियों को इनडायरेक्ट्ली हथियार सप्लाय करने लगे! असंतुष्ट तत्व किस देश में नहीं होते? उन जैसों का तो प्रयोग करके अरब देशों में गृहकलह जैसी परिस्थितियां तैयार की गई। जिससे वहाँ के तेल उत्पाद और निर्यात पे उसका परिणाम हो। इसी तरह से तेल के दाम बढ़ा दिए गए थे! अगर संबधित अमेरिकी तेल कपनियां खुद से प्राइज बढ़ाती, तो शक हो सकता था। इसलिए इतनी बड़ी साजिश गढ़ी गई! डॅनियल भी इसमें अमेरिका के साथ था ही! हथियार पोहोचाना उसीके हाथ मे ही तो था!" शुक्लाने एवढं मोठं कारस्थान उघड केलं...!
"भारत को अपने अधिकार में लाने के लिए इतनी बड़ी साजिश! यकीन नहीं होता!" शक्ती अविश्वासाने बोलून गेला.
"क्यों ना?!" पीएम बोलू लागले,
"अगर तेल का दाम बढ़ गया, तो सिर्फ भारत ही क्यों? पर जो जो देश तेल के लिए इराक एवं सौदी पर डिपेंड हैं, उन सभी पर अधिकार करना अमेरिका को आसान हो जाता! सभी वस्तुओं की कीमतें तेल की कीमतों पर निर्भर होती हैं! इसीका फायदा यह लोग उठाना चाहते थे!"
"इट्स हॉरीबल!" शक्ती उद्गारला.
"येस! जवळजवळ सर्वच देशांची इकनॉमी ही तेलावर चालते. त्यामुळे अमेरिकेचा हा एक मूव्ह त्यांना सर्व देशावर वर्चस्व मिळवून देण्यास पुरेसा आहे!" पीएम बोलायचे थांबले.
तसा शुक्ला बोलला,
"पर आपके नए डायरेक्ट, इनडायरेक्ट टैक्स पॉलिसीज ने अमरिका व जनमानस के इरादे पस्त कर दिए। इसी कारणवश जनमानस ने उनके सबसे लोकप्रिय नेता को मरवाया ताकि उसका आरोप आप पर और अपनी पार्टी पर आए!"
"तो इस तरह से जनमानस इलेक्शन जितना चाहती थी?! पॉलिटिक्स कितनी घिनौनी चीज है यह सिर्फ सुनता आया हुँ! आज स्वयं अनुभव कर लिया!" शक्ती निराश स्मित ओठांवर घेऊन बोलला.
त्याचे डोळे खालच्या कालीन वरील जटिल नक्षीवर लागले होते. डोळ्यांत भाव शून्य...
"तुमने अभी तो कुछ देखा ही नहीं!" शुक्ला शक्तीला बोलला... राजकारण याच्यापेक्षाही घाणेरडं असू शकतं हे तो इंडिकेट करत होता. आणि हे बोलताना त्याने पंतप्रधान यांच्याकडे नजर टाकली होती. ते पाहून मग पंतप्रधानांनी आपली नजर खाली घेतली. ते म्हणाले,
"मैं तुम्हे टोकूँगा नही शक्ती! हमने भी ऐसे कई पाप किए है!"
शुक्लाकडून विदित घटनाक्रम ऐकून पीएम चिंतपल्ली खूपच विचलित झाले होते... त्यांनी नकळतच अव्यक्तपणे आपले गुन्हे कबूल केले, पण ते नेमके कोणते ते उघड न बोलता त्यांनी फक्त स्वतःच्या मनाला त्यांची पुन्हा आठवण करून दिली.
"डॅनियल और उसका सौतेला भाई देश मे कैसे घुसे?" शक्तीने शेवटचा प्रश्न केला!
"रिफ्युजीज् बनके! इससे उन्हे कोई दस्तावेज या कागज नहीं दिखाने पडे़!"
"इतनी बडी साजिश! यकीन करना मुश्किल हैं!" आता पीएम सुद्धा असमंजस झाले...
"यकीन कर लिजीए प्रधानमंत्री जी! यकीन कर लिजीए!" शक्ती म्हणाला.
गुडघ्यांवर हात टेकवत शक्ती उठला. इथलं आपलं काम त्यानं पार पाडलं होतं!
"मी याला तुम्हाला सुपूर्द करतोय! याला दिल्लीला पोहोचवायची आणि याची नीट चौकशी करण्याची व्यवस्था आपण करालच!" बाहेर जात शक्तीने मागे न पाहताच पीएमवर जबाबदारी सोपवली.
शक्तीने ज्या एजंटची पिस्टल घेतली होती त्याला ती परत करून शक्ती लिफ्टकडे गेला. लिफ्टवरच येत होती म्हणून शक्ती वाट बघत थांबला.
लिफ्ट उघडली... आतली व्यक्ती पाहून त्याचे डोळे विस्फारले. तो जेसन होता! त्याने तोंडाला डोक्यासह कव्हर करणारा लाकडी मास्क घातला होता, तरी शक्तीला त्याला ओळखणं नक्कीच कठीण नव्हतं!
जेसन मास्कच्या आत नक्कीच हसत असणार! अखेर शक्तीला मारायला मिळाल्याचा तो आनंद...
त्याने हातात सज्ज ठेवलेली सप्रेसर असलेली त्याची पिस्टल उंचावली, पण तो फायर करणार इतक्यात शक्तीने बाजूला होत त्याच्या हातावर खालून लाथ मारली. जेसनचा हात वर उचलला गेला व सुटलेली गोळी लिफ्टला वर भलं मोठं छिद्र पाडून गेली. पीएम खोली बाहेरील एजंट्स आपल्या गन्स सज्ज घेऊन लिफ्टकडे धावले...
शक्तीने जेसनला लिफ्टमध्ये ढकललं. तोही आत गेला. दोघांची हातापाई चालू झाली. म्हणून एजंट्सना जेसनवर फायर करणं शक्य होत नव्हतं. ते संधीच्या शोधात सतर्क थांबले.
लिफ्टमध्ये जेसन खिशातून गोळी काढून आपली पिस्टल लोड करण्याचा प्रयत्न करत होता, पण शक्तीने त्याचे हात धरलेले होते. शक्तीने त्याच्या तोंडावर उलटं कोपर आदळून त्याला बाजूला करण्याचा यत्न केला. जेसनचं मास्क असलेलं डोकं लिफ्टच्या मेटॅलिक भिंतीवर आढळलं. ती संधी साधून शक्तीने बटन दाबून लिफ्टचं दार बंद केलं.
म्हणून मग लिफ्टकडे धावत आलेल्या एजंट्सना बाहेरच थांबावं लागलं. लिफ्ट वरच्या दिशेने प्रवास करू लागली...
शक्तीची आणि जेसनची फाईट चालू होतीच. जेसन वापरत असलेली पिस्टल अति घातक असली, तरी ती सिंगल शॉट पिस्टल होती. एकावेळी एकच गोळी त्यात भरून ती शूट करावी लागत असल्याने शक्तीला एडवांटेज होतं. त्याने आपली मॅग्नम पिस्टल बाहेर काढली. तो फायर करत होता, पण जेसन पण कच्चा नव्हता! त्याने शक्तीचे शॉट्स चुकवले. मॅग्नममधून सुटणाऱ्या गोळ्या लिफ्टला मोठी मोठी छिद्र पाडत होत्या...
जेसन शक्तीला बराबरची टक्कर देत होता...
पण टक्कर देणं आणि शक्तीच्या विरुद्ध युद्ध जिकणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत!
शक्तीच्या सर्व गोळ्या रिक्त झाल्या होत्या. आता दोघांत मुष्टियुद्ध सुरू झालं. इथेही जेसन चांगलाच झुंझला. अखेर शक्ती प्रमाणाबाहेर चिडला. त्याने जेसनला उचलून खाली पाडलं आणि जेसनच्या गळ्यावर पाय ठेऊन त्याने जेसनला गुदमरवण्याचा प्रयत्न केला. जेसनची धडपड सुरू झाली. तो झटापट करत होता, शक्तीच्या पायावर जोर जोरात मारत होता, पण शक्ती त्याच्या गळ्यावरून पाय काढायला काही तयार नव्हता. शक्तीने स्ट्रगल करतच आपली '500 एस & डब्लू' लोड केली!
पायऱ्यांवरून वरील सर्वांत शेवटच्या फोअर येणाऱ्या एजंटने गन फायर ऐकलं!
बॅम!!!
तो लिफ्ट समोर पोहोचला होता. तो जागीच खिळला. त्याच्या ही नकळत त्याची एमएन हर्स्टल् वरील त्याची पकड घट्ट झाली.
समोर लिफ्ट उघडली, तर शक्ती खाली मरून पडलेल्या जेसनवर आपली मॅग्नम पॉईंट करून उभा त्या एजंट्सला दिसला आणि त्या एजंटने सुटकेचा निःश्वास सोडला.
एजंट शक्तीकडे पाहत होता. काय करावे त्याला सुचत नसावे. शक्ती मात्र जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात एजंटला आत येण्याची त्याने खूण केली. एजंट काही न बोलता लिफ्टमध्ये गेला. शक्तीने बटन दाबून लिफ्ट बंद केली. लिफ्ट पीएमच्या फ्लोअरकडे वापस गेली...
एजंटची नजर पायाखालच्या जेसनवर होती...
"पीएम के पास कोन?" लिफ्टमध्ये सोबत असलेल्या एजंटला शक्तीने विचारलं.
"दुसरा एजंट हैं!" एजंट देखील आतापर्यंत कुल झाला होता. त्याने उत्तर दिलं.
लिफ्ट उघडली. एजंट लिफ्टमधून खाली उतरला...
"प्राईम मिनिस्टर का और अपना ध्यान रखो!" शक्ती म्हणाला आणि बटन दाबून पुन्हा लिफ्ट बंद केली.
हॉटेल लॉबीमध्ये लिफ्ट उघडली गेली. रात्र असल्याने काही स्टाफ सोडला तर कोणी गेस्ट आपल्या रूम बाहेर नव्हते.
दरम्यान लिफ्टमध्येच शक्तीने आपली पिस्टल होलस्टरमध्ये रिप्लेस केली होती.
लिफ्ट समोर असलेली रिसेप्शनिस्ट गोंधळून शक्तीकडे व आत रक्तात पडलेल्या जेसनकडे पाहत होती. तिने 'आ'वासला होता...
शक्तीने लिफ्ट बंद केली.
"जिवंत आहे! पावर तोडून ही लिफ्ट सील करून टाका. हॉस्पिटल आणि पोलिस हेडकॉर्टर्सला फोन करा." शक्तीने बाहेर चालत रिसेप्शनिस्टला इन्स्ट्रक्शन्स दिले होते...
शक्तीने त्याच्या मॅग्नमची 50 कॅलिबरची गन पावडर रिड्यूस करून मिहीरसाठी बनवलेली दुसरी गोळी जेसनवर चालवलेली होती आणि तीही पायावर. त्यामुळे त्याच्या पाय निकामी झाला होता, म्हणून त्याचा जीव वाचला होता. पण जेसन वेदनेने तात्काळ मूर्च्छितावस्थेत गेला होता. पण जरी तो शुद्धीत आला, तरी पाय निकामी झाल्याने त्याला आता इथून उठून जाणं शक्य नव्हतं!
रिसेप्शनिस्ट जाणाऱ्या शक्तीकडे हरवल्यासारखी बघतच होती... तिला भानावर यायला नक्कीच वेळ लागला असेल...