प्रेम म्हणजे प्रेम असत- ४
रितू ला स्वतःवरच हसू येत होते. तिच्या कडे समोरून प्रेम चालत येत होते पण तरी ते ती मान्य करू शकत नव्हती. तिची नकार घंटा चालूच होती. पण तिचे बोलणे ऐकून जय खरच वैतागला होता. आता अजून काय कराव लागेल रितू ला पटवायला ह्याचा त्याला अंदाज येत नव्हता... तो जरा वैतागूनच बोलला,
"काय म्हणत होतीस रितू? जरा प्लीज परत सांगतेस का?"
"मी काय बोलले ते ऐकल नाहीस का?"
"ऐकल ग... पण परत ऐकायचं आहे..सांग सांग!! मग मी बोलेन.. तिखट शब्दात बोलायचं आहे मला.. फार घेतली तुझी मनमानी चालवून.. पण तुल नक्की काय प्रोबेल्म आहे ते मला बाहेर काढायचं आहे.."
"ओह.. मला तिखट शब्दात बोलणार तू... हाऊ रूड जय!!"
"गम्मत करतोय ग.. पण तू मनातल सगळ बाहेर काढावस असं मला वाटत.. म्हणजे आपण जेव्हा आपल्या नात्याची नवीन सुरवर करू तेव्हा सारखा तुझा भूतकाळ मध्ये मध्ये लुडबुड करणार नाही.." इतक बोलून जय शांत झाला आणि नंतर मात्र त्याला हसू आवरता आलं नाही...
"हसू नकोस रे जय! आणि ओके... सांगते सगळ.. जे जे वाटतंय ते सगळंच.."
"बोल बोल पटापट..."
"हो रे... मी अपघातातून वाचले.. पण मनात भीती तर राहतेच ना रे..मी मान्य करते मी डीप डिप्रेशन मध्ये गेले होते.. अर्थात ना.. कोणालाही बसेल ना रे.. मरण इतक जवळून पाहन अवघड असत रे.. खूप अवघड!! मला जेव्हा जबरदस्त धक्का बसला आणि मला मानसोपचार तज्ञा कडे जाव लागल.. मी नव्हते इतकी खंबीर.. आणि आपल्याकडे काही लपून राहत नाही ना.. सो आमच्या नातेवाईकांना पण कळल की मी मानसोपचार तज्ञाकडे जाते. जेव्हा हे नातेवाईकांना कळल तेव्हा ते कसे वागले मी पाहिलंय! आपल्याकडे अजूनही लोकांचे विचार बुरसटलेलेच आहेत.." रितू खूप मनापासून बोलत होती.. आणि बोलताना तिच्या मानाराचा ताण सुधा हलका होत होता. जे ती ह्या आधी कुणाशीच बोलली नव्हती ते ती जय बरोबर शेअर करत होती.. पण रितू चे शेवटचे वाक्य ऐकून जय ने तोंड वाकडे केले. रितू ने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला प्रश्न केला,
"का करतोयस तोंड वाकड? तू म्हणलास म्हणून सगळ सांगतीये ना तुला..जा तू जय!! आय अॅम हर्ट!" रितू जरा उदास झाली..
"ए रितू.. मी तोंड वाकडं केल कारण तू पण फार काही फॉरवर्ड विचार करत नाहीस.. तुझेही विचार तसेच बुरसटलेले आहेत.. नाहीतर होकार द्यायला इतका वेळ का लावला असतास? स्वतःला फार काही वेगळी समजू नकोस!! खरे फॉरवर्ड विचार आहते ते फक्त माझे..." जय बोलला आणि हसला..
"पुरे.. जय पुरे!! आय नो तू फार भारी डॉक्टर आहेस.. आणि ठीके.. मान्य करते चुकीच बोलले.. पण स्वतःच्या बाबतीत मी आहेच फोरवर्ड विचारांची.. पण जेव्हा तुझा विचार येतो तव्हा अर्थात मी माझे विचार जरा बदलते. आपल्याबरोबर अजून कोणाचे आयुष्य पणाला का लावायच?"
"बर.. ता पुढचे विचार सांग मग एकदम मांडेन मी माझे महत्वपूर्ण विचार!!"
"ह? ओके.. सांगते..मानसोपचार तज्ञाकडे जायला लागले आणि मी वेडी आहे असा सगळ्यांनी समज करून घेतला. ते माझ्याकडे वेडी म्हणून पाहायला लागले...नातेवाईक सुद्धा बदललेले पहिले आहेत मी.. खरच जेव्हा मला माझ्या जवळच्या नातेवाईकांची गरज होती तेव्हा ते कधी फिरकलेही नाहीत.... मला गरज होती आणि ते एकदम बिझी झाले....कशी असतात ना लोकं... काहीतरी घोर अपराध केलाय आपण असं भासवत राहतात. मग डिप्रेशन अजूनच वाढत..खरच इतका संकुचित विचार कस असतो लोकांना.. पण ठीके.. ते सुद्धा मान्य केलं. नंतर मीही ठरवलं,माझ आयुष्य मी एकटीनी जगू शकते..कश्याला कोणाच्या मदतीची आणि उपकाराची वाट पहायची? मी स्वतःला खंबीर बनवायला लागले होते. आणि तेव्हाच तू आलास माझ्या आयुष्यात! तू सगळ्यांपेक्षा वेगळ आहेस हे मला प्रत्येकवेळी जाणवत होतं. मित्र म्हणून आलेलास आणि नंतर तू म्हणलास प्रेम करतो! पण मी ते मान्य करायला तयार नव्हते! सगळच अनपेक्षित होत माझ्यासाठी म्हणून ते मी मान्य करायला तयार होत नाहीये! प्रेम स्वतः चालत माझ्याकडे आल तरी मी ते मान्य करत नाहीये...गम्मत आहे ना सगळी...पण काही निर्णय अवघड असतात.. खूप अवघड!!"
“आय लव्ह यु रितू!! आणि खूप मनापासून प्रेम करतो मी.. तुझ्याबरोबर कोणीही नसेल तरी मी नेहमीच तुझ्या आजू बाजूला असेन ह्याची खात्री ठेव.. आणि व्हेरी गुड! ज्या गोष्टींचा त्रास झाला ते सगळ बोललीस.. आता मोकळी होशील.. आणि महत्वाचे, सोडून दे त्या लोकांना! ज्यांनी तुझी मदत केली नाही जे तुझ्याशी चांगले वागले नाहीत त्याचा विचार करून तू उदास होऊ नकोस!! उलट त्याच्यामुळेच आज तू खूप खंबीर झालीस... आणि त्याचा अभिमान ठेव.. जे आले नाहीत त्यांचा विचार करू नकोस! आता मी आहे ना? आणि मी तुला सांगितलं असत,तू आता ठणठणीत बरी आहेस... तुला मानसोपचार तज्ञाची सुद्धा गरज नाहीये..फक्त तुला माझ्यासारख्या पॉझीटीव लोकांबरोबर रहायची गरज आहे... जे तुला वेळो वेळी लेक्चर देऊ शकतील.. आणि ते सुद्धा हक्काचे लेक्चर!! हाहा! आणि मी तुला सिम्पथी देतोय अस समजू नकोस... मी तुला सिम्पथी द्यायला लग्न करणार नाहीये... माझ तुझ्यावर मनापासून प्रेम आहे म्हणून लग्न करणारे! मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस.. मी प्रेम करतो...काही अटींशिवाय..मला तुझी साथ हवीये.. आयुष्य जगण्यासाठी... मला माझा आयुष्य तुझ्याबरोबर घालवायच आहे.. ”
“येस.. आय अग्री! ज्या लोकांना माझी पर्वा नव्हती त्यांचा विचार कशाला करू मी? आणि तुझ्यासारख्या पॉझीटीव लोकांबरोबर राहू? हाहा... ए पण तरीही....”
“तू वेडी आहेस का ग रितू! इतक सगळ बोललो मी... तरीही परत पण... माझ्यावर विश्वास ठेव.. तुझ आयुष्य मी सुंदर करेन!! आणि मी तुझ आयुष्य सुंदर करण्यापेक्षा तू माझ आयुष्य अधिक सुंदर करशील..आणि माझ्याबरोबर तुझ्या आयुष्यात पूर्वी काय झाल त्याची तुला आठवणही राहणार नाही.. तू पण फक्त आज चा विचार करत जगायला लागशील बघ माझ्यासारखी!!!”
“आय ट्रस्ट यु जय.. पण मला सारख वाटत,माझ मरण जवळ आल आहे..कळत नाही..माझ्याकडे किती वर्ष आहेत अजून!” हताशपणे रितू बोलली..
“डोंट वरी...अजून बरीच वर्ष आपण एकत्र राहू..माझा विश्वास आहे! आणि कोणाकडे किती वर्ष आहेत हे सांगता येत नाही ग अस.. मरण सोडून जगण्याचा विचार करून जगायला लाग.. बघ काय मस्त होईल तुझ आयुष्य!!! ए एक मिनिट..”
“म्हणजे कोणीही सांगू शकत नाही मी किती वर्ष जगेन..” रितू नी सुस्कारा टाकला.. पण सावरत ती पुढे बोलली, “काय झाल? एक मिनिट का म्हणालास?”
“मी डोळे बंद केले होते तेव्हा मला आत्ता काहीतरी दिसत आपल्या दोघाबद्दल!!! काय दिसलं असेल सांग पाहू...”
“काय पाहिलस तू.. मला नाही सांगता येत..”
“मला बऱ्याच वेळा आयुष्यात पुढे काय होणारे दिसत.. हसू नकोस!! मी एकदम सिरिअस आहे.... आत्ता डोळे बंद केले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आल.. आपण दोघ बरेच वर्ष एकत्र आहोत आणि तुझे आणि माझे केस पांढरे झाले आहेत..आपण झोपाळ्यावर बसून गप्पा मारतोय अस आल.. एक अक्षरही खोट नाही.. आणि कोण जाणे, माझ्यापेक्षाही जास्ती जगशील तू!!! आता मी दमलो ग.... आता तुझा होकार समजतो! फायनली तू लग्नाला तयार झालीस!! ग्रेट ग्रेट!!! आणि मी सगळ्यात जास्ती महत्व माणसाला देतो..आय व्हॅल्यू पिपल! कळल असेल ना आज? किती जगतो त्यापेक्षा कस जगतो हे माझ्यासाठी जास्त महत्वाच आहे!!! आता माझ आयुष्य तुझ्याबरोबर खूप सुंदर असेल...मला खात्री आहे!!” खुश होऊन जय बोलला...
“हाहा.. तुला भविष्यकाळ दिसतो.. खर का मला चांगल वाटावं म्हणून सांगतो आहेस? आणि यु आर राइट...आयुष्य कस जगतो हे महत्वाच!!! पण... ”
क्रमशः