भाग २१
हळुच दार उघडलं आणि सायली आत आली. विशाखा झोपली होती. तीने लाईट लावली आणि विशाखाच्या जवळ येऊन बसली. झोपेत ते कापसाचे बोळे तीच्या डोक्याखाली गेले होते. सायली ने हळुच ते उचलुन कच-याच्या डब्यात टाकले. आणि तीच्या डोक्यावरून हात फिरवला.
हात लागला तशी विशाखाची झोप चाळवली आणि तीने डोळे उघडुन बघितलं तर समोर सायली. विशाखा जोरात दचकली आणि ओरडली,
" आ..... "
" ए..... गप ना. ओरडायला काय झालंय. 🤨 " तीच्या तोंडावर हात ठेवत सायली म्हणाली.
" तु इथे काय करतीयेस ?? " उठुन बसत तीने विचारलं.
" मी नेहमीच येते. त्यात नवीन काय 🙄 "
" हो पण पहाटेचे चार वाजलेत. कळतंय का ?? एकतर एवढ्या पहाटे आलीस आणि ते ही एकटी. मुर्ख आहेस का गं तु 😡 "
" मी तुझ्यासाठी आलीये ते नको बघु, लेक्चर देत मला 😒 "
" चुप. कळत नाही का ?? लहान आहेस का आता "
" हो , तुझ्यापेक्षा तरी लहानच आहे 😁 "
" हे असले लेम जोक्स नको मारू. तु आत्ता का आलीस ते सांग "
" रात्री तुझ डोकं दुखत होत ना मग म्हणून बघायला आले. "
" डोकं दुखतंय त्यासाठी बघायला यायची काय गरज आहे 😡. आणि आत्ता यायची काय गरज आहे, सकाळी आली असती तर चाललं नसतं का ?? 😡 "
" मला आणि काकाला किंमतच नाहीये 😑. लेकरू एवढ्या पहाटे आपल्यासाठी आलंय, आपल्याला बघायला आलंय हे नाही बघत तर का आलंय ह्यासाठी ओरडतीये 😒 "
" काकाचा डायलॉग इकडे चिटकवू नको काय . आणि मी ओरडत नाहीये रे तुला , I just care for you म्हणून म्हणलं की आत्ता का आली. सकाळी आली असती तरी चाललं असतं ना. "
" जाऊदे आले ना आता. मग कसं वाटतंय आता, डोकं थांबलं का ?? "
" माझं डोकं थांबलं तर पेशंटस् कोण बघणार ?? ते थांबत नाही, नेहमी चालुच असत 😁 "
" आता फालतु जोक कोण मारतय 😒 "
" सॉरी सॉरी 😁😁. "
" मग बरं वाटतंय आता ?? "
" हो. एकदम मस्त. इतकं मस्त की चहा प्यावासा वाटतोय आता 🥰. "
" आत्ता चहा 🙄. साडेचार वाजलेत येडी. "
" हो मग असु दे ना. चल आपण फिरायला जाऊ. "
" कुठे 😲 "
" अरे बाहेर..... यह खुला असमान होगा, थंडी हवा और तुम्हारा साथ 😉.... " सायली कडे बघुन डोळा
मारत विशाखा म्हणाली.
" 🤦🤦 "
" अरे चल , असं डोक्यावर मारून काहिही होणार नाही. चल .चल. चल. चल. " विशाखा तीचा हात धरून तीला ओढतच रूमच्या बाहेर घेऊन आली. बाहेर येऊन बघितलं तर काका गाढ झोपला होता मग पावलांचा आवाज न करता सावकाश गाडीची चावी घेऊन घराबाहेर पडल्या. सायली गाडीवर बसून गाडी स्टार्ट करणार की विशाखाने तीला थांबवलं, आणि गाडीला ढकलत ढकलत जरा पुढे घेऊन आली आणि मग गाडी स्टार्ट केली.
" चला भुर्रर्रर्रर्रर्रर्रर्र भुर भुर भुर भुर्रर्रर्रर्रर्र " विशाखा गाडी चालवत तोंडाने मोठ्यने आवाज काढत होती.
" तुला असं बघुन कोणी म्हणेल की तु एक डॉक्टर आहेस 😒 "
" लोकांनी म्हणावं तसं जगायचं का मग मी 😑. "
" तसं नाही पण कसं रस्त्यावर ओरडण म्हणजे... "
" बाळा आख्खा रस्ता मोकळा आहे, कोण बघणार तुला इथं. इथे झोपली तरी कोण बघणार नाही तुला ,😂😂 "
" गप्प बस. आणि त्या दिवशी घरी येऊन धिंगाणा घालायची काय गरज होती ?? पप्पा किती चिडले परत माझ्यावर "
" हिटलरला चिडण्याशिवाय दुसरं काय येत 🤪"
" एएएएएए पप्पा आहेत माझे. "
" हो मग असु दे ना. आहे तर हिटलरच ना. आणि मी धिंगाणा नाही घातला, तुझ्या बापाने घातला होता. "
" मग एवढ्या रात्री यायला कुणी सांगितलं होतं 🤨"
" मग , मला इग्नोर करायला कुणी सांगितलं होतं 😉 "
" मी इग्नोर नाही केलं फक्त जरा कमी वेळ दिला. "
" हां त्यालाच सोप्या भाषेत इग्नोर म्हणतात. तुझ्या मैत्रीणी आहेत , त्यांना वेळ दे ना पण त्यांना वेळ देताना आपलं हातचं पण राखुन ठेवाव लागत. "
" बरं बाई सॉरी. "
" गुड गर्ल. चल चहा पिऊ. "
" आत्ता 🙄. पाच वाजलेत मॅडम. "
" हो माहितीये रे मला , पण हवा बघ ना कसली भारी सुटलीये, मस्त वाटेल. "
" मिळतो का पण एवढ्या सकाळी 🙄 "
" बघा स्वतःला पुणेकर म्हणवणारे, साधं एवढ पण नाही माहित की ज्या पुण्यात पहाटे पाच वाजता
पोहे - सांबर मिळु शकत तिथे चहा काय चीज आहे"
" बरं. ऐक ना पण नंतर पियुया का ?? "
" का आता काय झालं ?? आत्ता तर हो म्हणणार होतीस ना लगेच पलटी. "
" अरे मी परत थोड्या वेळानी येते घरी पण आत्ता मला लवकर घरी सोड परत पप्पा उठले आणि मी नाही दिसले तर प्रॉब्लेम होईल. "
" काय यार ... हा हिटलर शनी आहे माझ्या कुंडलीतला 😖 . इतका मस्त मुड स्पॉईल केला. छी !!! "
" सॉरी सॉरी. परत येऊ आपण हवं तर पण आत्ता घरी सोड . "
" हवं तर.... म्हणजे नाहीच. चल बाई आता काय. सोडते घरी. "
विशाखा तीला घरी सोडुन परत घरी जातच होती पण चहाची हुक्की काही कमी झाली नाही. जिथे चहा मिळतो तिकडे गेली.
चहा मागवुन पीतच बसली होती की मागुन आवाज आला,
" हाय रडकी "
" मि. आकाश नेहमीच तुम्ही कसे काय भेटता हो मला. म्हणजे coincidence एकदा समजु शकतो ना आपण पण ही चौथी भेट आहे अशी. " तीने मागे न वळताच त्याला उत्तर दिलं.
" अरे व्वा !!!! प्रगती आहे म्हणायची. मागे न बघता सांगितलं कोण आहे. आणि काय झालं माहिती का ?? " आकाश मागुन येऊन तीच्या शेजारी बसला.
" हो सांग ना. काय झालं ?? "
" मला पण एक चहा द्या काका. हां तर मी काय सांगत होतो .... "
" काहितरी झालं ... " विशाखाने त्याला आठवण करून दिली.
" हां, तर झालं असं की कालचा दिवस एवढा भारी गेला ना तुझ्यासोबत. मग झोपेनी तर माझ्याशी कट्टीच घेतली. मला म्हणाली की जा तुला माझ्यापासून ज्या परीने लांब केलय तीला भेटुन ये मग मी तुझ्या जवळ येते. आणि मग माझ्यावर रूसल्यामुळे झोप माझ्या जवळ आलीच नाही. "
" व्वा !!!!! आणि मी परी का 🤨 " त्याच्या खांद्यावर हात ठेवत तीने विचारलं.
" तुला आणि परी " असं म्हणून जोरजोरात हसायला लागला.
" 🤨🤨😡 "
तीचा लुक बघुन कसा बसा शांत झाला.
" हां but jokes apart खरंच परी सारखी दिसत होती काल तु. " तीच्या डोळ्यात थेट बघत आकाश म्हणाला.
" ओह किती फ्लर्टींग ना 😁 " विशाखा हसत म्हणाली.
" फ्लर्ट नाही, खरंच सांगतोय.
तुझे ते वा-यावर उडणारे भुरूभुरू केस,
तुला सतत छळणा-या तुझ्या त्या केसांच्या बटा,
थंड हवेला स्वतःवर झेलणारे तुझे ते हात,
पावसाचे थेंब स्वतःवर घेणारे तुझे ते मिटलेले डोळे,
सगळंच कसं एकदम भारी वाटत होतं. आणि त्यामुळेच रात्रभर डोळ्याला डोळा नाही लागला. " आकाश सगळं तिच्या डोळ्यात एकटक म्हणाला.
त्याच्या असं एकटक बघण्याने विशाखा गडबडली, नजर चोरत पुढे बघतच होती की तो परत म्हणाला,
" बघ मग उडणारे केस बघुन मी लहान घाबरणारच ना 🤪 "
" म्हणजे 🤨 " तीला तर आधी कळालच नाही.
पण तो तिच्याकडे हसत असं बघत होता की तीला कळाल बरोबर.
" नालायक, भुतं वाटते काय मी तुला 😡 " त्याला हातावर मारत ती म्हणाली.
" अरे, मी असं कुठ म्हणलं . ते तर तु स्वतःच म्हणतीयेस 😂😂 "
" चुप. मग तुझ्या बोलण्याचा अर्थ काय होता, तोच होता ना. " तो पुढे काही बोलणार तेवढ्यात तीचा फोन वाजला.
काकाचा फोन होता, ती फक्त ह्ममम, हो आणि येते म्हणाली. फोन ठेवुन आकाशाकडे बघितलं,
" चल जाते मी, नाहीतर काका ओरडेल बाय. "
ती उठली पण मागुन आकाशने तीचा हात धरला, तीने मागे वळुन त्याला बघितलं 🤨. खाली घातलेली मान वर करून तीच्याकडे बघितलं, हळूच ऊठुन तीच्याजवळ आला, आणि डोळ्यात बघत तीला म्हणाला,
" जाताना नेहमी येतो म्हणावं. "
" हं , येते मी. " त्याच्या हातातुन हात सोडवुन घेत पटकन गाडीवर बसली आणि निघुन घरी आली.
घरी आली तेव्हा सव्वा सहा वाजले होते. आल्या आल्या काकाने तीला फैलावर घेतलं,
" एवढ्या सकाळी कुठे गेली होतीस ?? आणि ते पण न सांगता. कधी गेलीस ते ही माहित नाही. ऊठुन सगळं घर बघितलं तर तु गायब. जाताना मला उठवायचा तरी ना. आता बरं वाटतंय का ?? डोकं दुखायच थांबलं का ?? नसेल थांबलं तर राहुदे, आजचा एक दिवस नको जाऊ हॉस्पिटलला. पंडितला फोन करून सांगतो मी , तु येत नाहीस ते."
त्याच्या हातातला फोन हिसकावून घेत विशाखा म्हणाली,
" काही नको सांगु. आता बरं वाटतंय. आणि सायु आली होती तर तीला सोडायला गेले होते. तु झोपला होतास म्हणून तुला उठवल नाही. "
" एवढ्या सकाळी ती का आली होती ?? दोघी बावळट आहेत तुम्ही. एक रात्री जाती आणि एक सकाळी येती. पण नक्की बरं वाटतंय ना. "
" हो. अजिबात दुखत नाहीये. आणि मला भुक लागलीये. मी काल पासून काहीच खाल्ल नाहीये. " एवढुसा चेहरा करत ती म्हणाली.
" जा आवर मग. मी लगेच पोहे करतो. "
" हो, बटाटा घालुन कर पण. " आत जाता जाता विशाखा ने त्याला ओरडुन सांगितलं.
विशाखा तीच सगळ आवरून बाहेर येऊन बसली. पोहे खाता खाता सकाळी जे घडलं त्याबद्दल विचार करत होती.
कसा बघत होता ना तो, एकटक माझ्या डोळ्यात. त्याच्याकडे बघितलं तर असं नाही वाटत की मस्करी करतोय. खरंच मनापासून बोलतोय असं वाटतं होतं. खरंच तसं बोलत होता का तो ?? की फक्त माझी मस्करी करत होता. पण त्याचे डोळे तर वेगळंच सांगत होते. आणि नंतर पण त्याने हात धरला तेव्हा कसले काटे आले अंगावर. काय घडत होतं काहिच कळलं नाही पण भारी वाटलं तेव्हा.
" कसला विचार करतीये एवढा. "
" त्या आकाशचा ...... " विशाखा नकळत बोलून गेली पण परत चमकुन शेजारी बघितलं तर सायली.
" हां, तर जीजुंच नाव आकाश आहे 😉😝. कळलं मला. "
" हे असं काही नाहीये. "
" असं कसं नाहीये 😉. तोंडात त्याचच नाव येतं जो आपल्या मनात असतो. "
" हे अजिबात असं काही नाहीये. "
" ह्मममम आकाश जीजु हां...... लाडाने काय म्हणतेस तु माझ्या जीजुंना. "
" गप एएएएएए . असं काही नाहीये. "
" आता मला काय लाजायच. सांगुन टाक. " सायलीला आता ह्या विषयावरून डायव्हर्ट करायचा एकच उपाय होता आणि तो विशाखा ने बरोबर वापरला.
" किती मेकअप फासलाय 😕😕. कसले लाल पोपटासारखे ओठ केलेत. ते डोळ्याच्या वर काय काळ काळ लावलय. इइइइइइइइइ "
" एक मेकअपला काही नाही बोलायचं हां. भारीच लावलय मी. आणि ते काळ काळ नाहीये, त्याला आय लायनर म्हणतात. "
" हट. आत्ताच पीठाच्या गिरणीतुन बाहेर आल्यासारखे वाटतंय. "
" तु..... मला पीठाची गिरणी म्हणली 😡😡. काका....... काका...... काका..... काका...... " सायली जोरजोरात ओरडायला लागली तसं विशाखा ने कानात बोट घातली.
" ए काय झालं घसा फाडायला 🤨 . कान फाटले ना माझे "
" हीला सांग ना मला पीठाची गिरणी म्हणतीये 🥺"
" आता एवढ थोबाडाला फासुन आल्यावर ती तेच म्हणणार. जरा कमी लावायच ना गं. कॉलनीतले पोर तुला बघुन घाबरले नाही ना. "
काकांचं बोलणं ऐकुन विशाखा जोरजोरात हसायला लागली 😂😂😂😂😂.
सायली रागाने तीच्याकडे बघत होती तरी ती थांबायच नावच घेत नव्हती. सोफ्यावर लोळुन लोळुन हसत होती.
" मी बोलणारच नाही तुला जा 😡😡 "
" असंही हे बारक्या लेकराच भांडण असल्यासारखं आहे तुमच. काय करायचय ते करा. " म्हणत काका आत निघून गेला.
इकडे आकाश घरी आला तेव्हा आई - पप्पा अजुन झोपलेले होते. तो आपल्या रूममध्ये निघून आला, आणि आत्ता जे झालं त्याचा विचार करायला लागला.
शीट यार. असं कसं काय निघाल माझ्या तोंडातुन. आता काय वाटलं असेल तीला. तरी बरं मस्करी करून परत झाकुन गेलं पण तरीही तीच्या मनात शंका तर आलीच असणार. शीट.... सगळं अवघड करून ठेवलं मी. अजून चांगली मैत्री पण नाही झाली आमची. आधी मैत्री करून तीला जरा माझ्यासोबत comfortable करायचं होतं मग सगळं बोलायचं होतं पण माती खाल्ली मी 🤦🏻♂️.
पण जेव्हा तीचा हात पकडला तेव्हा असं वेगळंच जाणवलं तीच्या डोळ्यात. जसं की असं विचार करतीये ती ह्या सगळ्याचा. काहितरी होत ना. म्हणजे ती..... उफफफफफफ काय होतय काहीच कळत नाहीये.
आणि विचार करता करता आकाश परत झोपी गेला.