ek hote bandar in Marathi Horror Stories by Sushil Padave books and stories PDF | एक होतं बंदर..

Featured Books
Categories
Share

एक होतं बंदर..

जहाजाची सुटायची वेळ झाली होती...जसा जसा सूर्य अस्ताला जात होता तसा तसा काळोख पडत होता...
नीलिमा च्या बाबांनी सगळं सामान नौकेत चढवलं होत...

बऱ्याच काळा पूर्वी समुद्रातून वस्तूंची ने आण त्याच बरोबर प्रवाश्यांची सुद्धा ने आन होत असे...त्यासाठी मोठ्या नौका किंवा..विदेशी बांधणीतली जहाजांचा वापर होत असे..
त्यामुळे सकाळच्या आणि संध्याकाळ च्या वेळी एका बंदरावरून दुसऱ्या गावी जाण्यासाठी माणसे गर्दी करत असत..

त्यावेळी नुकताच पावसाळा सरून हिवाळा सुरू झाला होता..दिवाळी संपली होती पण दिवाळीच्या सुट्ट्या मात्र बाकी होत्या..म्हणूनच निलिमाच्या हट्टा पायी नीलिमा चे बाबा आणि आई...नौका प्रवास करून अलिबाग ला आपल्या गावी जात होते..

मी नीलिमा मी इयत्ता पाचवीत शिकत होते..आणि सुट्ट्यामध्ये नौकेतून गावी जायचा हट्ट करून मी पहिल्यांदाच समुद्र प्रवास करणार होते..

संध्याकाळीची ६.३०- ७:०० ती वेळ...मुंबईत तेव्हा माणसाची गर्दीच म्हणा पण...पण आज बंदरावर जास्त प्रवासी दिसत नव्हते..

निलिमाची आई खोडूनच बोल्ली.."तरी मी सांगत होते..नको जाऊया असल्या बोटी बिटीतन फारशी लोकही नसतात त्यात...आणि त्यातून आज अमावस्या तुम्ही पुरवा आजुन आपल्या लाडक्या लेकीं चे लाड.."

"अग अजुन लहान आहे ती लहानपणी च तर लाड पुरवणार ना.." बाबानीही आई ला समजावलं..

नौकेत सर्व समान चढवुन झालं होतं...
समुद्रही अगदी शांत होता...आणि वातावरणातही अगदी तशीच शांतता होती...नौकेत जेमतेम आठ दहा लोक होती..

बाबांनी नाखव्याला मुद्दामच विचारलं..काय रे बाबा आज एवढी कमी मानस..

"काय सांगू दादा मागल्या आठवड्यात दोन बोटी बुडल्यानं समुद्रान अचानक वादळ वारं येऊन..तवापासन लोक भीती न येतच नायत" नाखवादादा सांगत होते..

ऐकून जरा भीतीच वाटली..
पण मग भोंगा वाजला..हो भोंगाच जहाज सुटायच्या आधी अशी भोंगा वाजवायची पद्धत असायची..जहाज सुटण्याचा इशारा त्याने दिला जायचा..

जेमतेम मोजकेच प्रवासी आपापली जागा धरून बसेल होते..
आम्ही सुध्दा एका कडेच्या बाजूला जाऊन बसलो..

बोट सुरू झालेली सुरू झाल्या झाल्याचं एक जोर दार धक्का बसला..लाटांचा धक्का होता तो..
आणि संन्नन्ननन कन एक थंड वाऱ्याची झुळूक येऊन गेली..

माझ्या अंगावर एक शहारी च आली...एका मिनिटात शरीर थंड पडलं..
आणि दुसऱ्या मिनिटाला तोंडातून गरम वाफ..
आई ने गळ्याला हात लावला..तर मी तापाने फनफणले होते..
आई ने रुमाल पाण्याने भिजवला आणि माझ्या डोक्यावर ठेवला..आणि शांत पडायला सांगितलं..

अचानक वातावरणात बदल जाणवायला लागले..
जोरदार वारं सुटलं..लाटा अतितीव्र वेगाने बोटी ला आदळू लागल्या....काळोख अगदी दाट झाला होता त्यात अमावस्या म्हणजे चंद्राचा उजेडही सोबतीला नव्हता..चांदण फिक पडु लागलं होत..
तेवढ्यात एक लक्क्ख वीज चमूकन गेली...आणि ढगांची महाकाय गर्जना झाली..आणि भयंकर आणि जोरदार पाऊस सुरू झाला..
जहाजवरच्या दोन गॅस बत्त्या फक्त तेवत होत्या..थोड्या वेळाने त्यातली एक विझाली देखील...भयानक काळोख
वाऱ्याचा सोसोटा आणि त्या वाऱ्या सोबत तो किर्रर्रर्रर्रर्रर्र करणारा आवाज..कान बधिर करणारा होता..
बोट इकडून तिकडे गटांगळ्या खात होती..

नाखव्याला धोका स्पष्ट जाणवत होता..कायतरी विपरीत घडणार याची कुणकुण त्याला आत्ता पर्यंत आली होती..

जहाजाची दिशा बदलली..पुन्हा उलट्या दिशेने जहाज वळलं होत..
नाख्यव्यांन सगळ्या प्रवाशाना इशारा दिला..वातावरण गंभीर दिसत आहे पुन्हा बंदराच्या दिशेने जात आहोत..
घट्ट धरून बसा लाटांचा आणि पावसाचा वेग जास्त आहे वेग जास्त आहे..आपण लवकरच पुन्हा बंदरावर पोहचू..

आम्ही जेमतेम एक अर्ध्या पाऊण तासाचच अंतर कापलं होत..म्हणून पुन्हा मागे जाणे सहजच शक्य होते...
वाऱ्याच्या वेगाबरोबर बोट पुन्हा परतीच्या दिशेच अंतर कापत होती..

पाहता पाहता किनारा आला..दुरवर एका खांबावर लाईट दिसत होती...जहाज पुन्हा बंदरावर आलं होतं..वादळवार अचानक थांबलं होतं...खवळणार समुद्र अचानक शांत झाला होता...आकाशाकडे पाहिलं तर पाऊस जणू आलाच नव्हता अस भासत होतं..क्षणार्धात चित्र पालटलं होत..

पण हुश्शहहहहह आम्ही सगळे सुखरूप आमच्या मूळ जागी आलो होतो...पण नक्की मूळ जागीच आलो होतो ना...
कारण निघताना ज्या बंदरातून निघालो होतो आणि आत्ता ज्या बंदराला बोट लागली होती ती जागा आणि ते बंदर जरा वेगळच भासत होतं..
कारण तिथे एक वेगळीच भयाण शांतता होती..

बोट किनाऱ्याला लागली एक एक करून सगळे उतरले
आई ने मला मफलर गुंडाळल होतं...बाबांच्या हातात उजेडासाठी छोटी गॅसबत्ती होती...

बाबांनी ती उजेड दाखवण्यासाठी वर धरली..
त्या उजेडात मला एक म्हातारं बाबा आमचं जहाज रस्सी ने एका मोठ्या खांबाला बांधताना दिसला...अंगाभोवती जाड घोंगडी...चेहरा विचित्र वाढलेल्या दाढीमुळे तोही नीटसा दिसत नव्हता..

जसा बाबांनी त्याचा चेहरा पाहायला गॅसबत्ती वर धरली तशी ती हातातून सटकली..आणि खाली पडून फुटली..
पुन्हा डोळ्यासमोर अंधार झाला..

पण त्या अंधारात सुद्धा त्या म्हातारबाबाचे पांढरे चमकणारे डोळे...मनात धस्स करून गेले...

आणि सगळे उतरून वरती बंदरावर पोहचलो होतो..
रात्रीचे किमान 9- 9.30 वाजले असतील..

नाखव्यानी दुरूनच म्हातारबाबला विचारले
"नीट बांधतोयस नव्ह..नायतर जायची निघून"

म्हातारबाबाच उर्मट आवाजातच उत्तर आलं..
" व्हय जी"

एकूणच भयान अशी ती जागा होती..एव्हाना सगळ्यांनाच कळून चुकलेल की आपण ज्या बंदरावरून प्रवास सुरू केलेला...पुन्हा त्याच जागी आलेलो नव्हतो..
हे कुठलं वेगळच बंदर होतं..
दूरदूर वर माणुसवस्ती दिसत नव्हती...आणि माणस सुद्धा दिसत नव्हती..

होऊंजावून होता तो एक म्हातारंबाबा आणि उजेडाला म्हणावं तर तो एक उंच लाईटी चा खांब..
आणि अधून मधून येणारी वाऱ्याची झुळूक अंगाला गारवा देत होती...

तो म्हातारबाबा सुद्धा बोट खांबाला बांधुन एव्हाना जायला निघाला होतं..

तेव्हड्यात नाखव्यानी आवाज देऊन त्याला विचारलंच..
" ऐई बाबा..कुठं निघालास...आणि कोनच बंदर म्हणायचं हे..कोनच गावं.."

म्हातारंबाबा एकदा वळला...आणि हसायला लागला..थोड्या वेळाने तो अजून जोरात हसायला लागला..
त्याच हसणं एवढं विद्रुप आणि कर्कश्य होतं...
की कानठळ्या बसत होत्या...काहीही न बोलता पाठ करून तसाच तो त्या अंधाराच्या दिशेने चालायला लागला..

ह्या अश्या भनायक दिसणाऱ्या परिस्थिती मुळे सगळ्यांनाच घाम फुटत होता...
काही क्षणातच तो म्हातारबाबा त्या गर्द काळोखात अदृश्य झाला...

आणि सोसाट्याचा वारा पुन्हा वाहू लागला...आणि त्या वाऱ्यासोबत घडलं ते अनर्थच होतं...वाऱ्याच्या वेगामुळे तो खांब ज्याला जहाज बांधलं होत...तो खांबच क्षणात मोडून पडला होता..दोर सुटला होता...

नाखाव्यांनी जहाजाच्या दिशेने धाव घेतली होती...
पण सगळंच व्यर्थ होतं..
कारण दोरासोबत जहाजही सुटलं होत....

नाखाव्यांन सहित सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली होती...

कारण त्या भयानक अश्या बंदरावर एवढ्या रात्री फक्त काही दोन नाखावी काही प्रवाशी आणि गर्द अंधार एवढंच उरलं होत...

वार थांबलं...तसा तो हसण्याचा आवाज पुन्हा आला आणि त्याच दूरवरच्या गडद अंधारात म्हातारबाबाची आकृती पुन्हा दिसली...आणि गायब झाली...

हा सगळा प्रकार पाहून सगळेच घाबरले होते..

दोन्ही नाकव्यानी आम्हा आठ दहा प्रवाशांना धीर दिला..तिथे बाजूला एक मोडक पत्र्याचं शेड होतं..तिथे आम्हाला थांबायला सांगितलं..

आम्ही त्या म्हातारबाबा चा शोध घेऊन येतो आणि आजूबाजूला कुठे वस्ती दिसते का ते बघून येतो..
असं सांगून ते दोन्ही नाकवी त्या अंधाराच्या दिशेने गेले..
काही क्षणातच ते देखील त्या अंधारात दिसेनासे झाले...

इकडे आमचा सगळ्यांचाच भीतीने थरकाप उडाला होता..
आई बाबा मला घट्ट धरून बसले होते..
त्या गर्द काळोखाची ,भयाण शांततेची आणि त्या ओसाड भयावह बंदराची सगळ्यांनाच भीती वाटू लागली होती....

अचानक एक मोठी किंचाळी ऐकू आली...त्याच गर्द काळोखातून..आणि एखाद हिंस्र श्वापद मासा चे लचके तोडत तसा आवाज येऊ लागला...तो आवाज अगदी थरकाप उडवणारा होता...
कारण ज्या दिशेने नाखवे गेले होते त्याच दिशेने तो आवाज येत होता..

अचानक दुसऱ्या बाजूला काहीशी हालचाल जाणवली...
तोच म्हातारंबाबा पाठमोरा होऊन दगडांच्या मागे काहीतरी ओढून घेऊन जाताना आम्हा सर्वांनाच दिसला...

कारण त्या उंच पुऱ्या लाईटी च्या खांबाचा उजेड त्या दिशेला होता...

ते काहीतरी भयानक च होतं...

तरीही आमच्यातल्या चार पाच जणांनी धीर करून तिकडे जाऊन त्याची शहानिशा करायची ठरवली...आणि त्या बाजूला उजेड होता त्यामुळे तितकीशी भीती जाणवत नव्हती...आणि जर एकत्र गेलो तर काहीही असेल त्याचा सामना करू शकू ह्या हेतू ने ते निघाले...

हळूहळू त्या लाईटी च्या खांबाच्या दिशेने ते चालू लागले..

आम्ही चौघ जण त्या पत्राच्या शेड मधून लांबूनच त्याना पाहत होतो..
जसे ते त्या खांबा जवळ पोहचले...एक मोठह्ह आवाज झाला...
तो खांब त्यांच्या अंगावर कोसळला होता...
हो..तो पूर्ण खांबच मोडून त्यांच्यावर कोसळला...
पुन्हा सगळं क्षणातच घडलं होत...

आणि आत्ता तर संपूर्ण काळोख...

तो ओसाड भयाण बंदरावर...आम्ही त्या पत्राच्या शेड मध्ये भीतीने कापत चौघच राहिलो होतो...
एक मी आई बाबा आणि एक आज्जी..
हो आमच्याबरोबर एक म्हातारी आज्जी त्या जहाजात प्रवास करत होती...

भीतीने तिची पाय देखील लटपटत होते...सगळ्यांच्याच अंगाला कापरी भरली होती...

तोच दुरवरून दोन माणूससदृश व्यक्ती येताना दिसले...
आत्ता त्या गर्द अश्या अंधारात कोणतीही व्यक्ती दिसली तरी ते धस्स करणारच होत...

पण जसे जसे ते जवळ आले तसे ते आमचे नाखवी असल्याचे भासले...
अंधारात चेहरा नीटसा दिसत नव्हता...पण आवाजा वरून नाखवीच वाटले...

"चला तिकडं थोडी लोकवस्ती हाय...तिकडं जाऊया आजच्या रातीला...उद्याच बघू मग.."

असं ते म्हणाले तेव्हा जरास हायसं वाटलं...

"चल म्हातारे आधी तुला घेऊन जातो मग ह्यांसनी घ्यायला परत येतो.." नाखवी घाईतच बोलत होते

"नको नको सगळेच जाऊया ना इथे खूप भीती वाटते हो.."
बाबा बोलले..

"न्हग न्हग वाट लय बिकट हाय थोडया थोड्यानीच जायला हवं.."

अस म्हनून त्या आज्जी चा हात धरून ते घेऊन जायला लागले..

थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांनी मागे वळून पाहिलं
आणि आमच्या हृदयाचा थरकाप उडाला...
कारण पुन्हा तसेच त्या म्हातारंबाबा सारखे पांढरे डोळे आम्हाला त्या नाखाव्यांचे त्या अंधारात चमकताना दिसले...
ते पाहून डोक्यावरचा घाम एव्हाना पाया पर्यंत आला होता..

आज्जी ला फरफटत ते त्या अंधारात घेऊन चालले होते...
आणि पुढ्ल्या काही क्षणातच...ते देखील अदृश्य झाले...

आत्तापर्यंत ज्या घटना घडल्या होत्या त्या मनाला हलवून टाकणाऱ्या होत्या...भीतीने आम्हा तिघांच्या शरीराची चाळण झाली होती...घामाने अंग भिजल होतं..

तोच समोर आज्जी आली...तीच त्या काळोखात अदृश्य झाली होती...
समोरून रेंगाळत रेंगाळत आमच्या दिशेने ती येताना दिसली..

रेंगाळत येऊन तिने घप्प कन आई आणि बाबांचे पाय पकडले..आणि खेचू लागली...
तिने मान वर केली तर पाहणार काय..
तिला चेहराच नव्हता..होते ते फक्त डोळे..पांढरे चमकणारे...ती तशीच फरफटत माझ्या आई बाबा ना त्या अंधाराकडे घेऊन जात होती..

ते बघून माझी एक मोठी किंचाळी च निघाली...
"सोड माझ्या आई बाबा ना सोड...सोड.."

आणि तितक्यात आई ने माझ्या तोंडावर पाणी मारून मला उठवलं...
आणि गळ्याला हात लावून अंग अजूनही गरम आहे का बघितलं...

आणि बाबा ही बोलले चल निलु आपलं गावं आलं..आत्ता थोड्याच वेळात जहाज बंदराला लागेल...
मीही खडबडून झोपेतून जागे झाले...मी पाहिलं ते एक स्वप्न होत...

आमचं जहाज आमच्या गावच्या बंदराला लागत होतं..
रात्री सुमारे ११ - ११:३० ची वेळ होती...
बाबानीही सर्व सामान घेतलं आणि सर्वजण उतरले...मी मात्र त्या भयानक स्वप्नांत आणि त्या स्वप्नातल्या भयानक बंदरातच अजून अडकले होते...

"चल नीलिमा जायचंय..आलं आपलं बंदर.." बाबांनी खाली उतरून हाक मारली..

मी सुद्धा उतरले..
बाबांनी गॅसबत्ती पेटवली..
आणि उजेडा साठी वर धरली....
वर पकडताच ती बाबांच्या हातातून सटकून खाली पडली आणि फुटली...

माझ्या हृदयात एकदम धस्स झालं...

मी वर बंदराकडे पाहिलं...तर तसाच म्हातारंबाबा आमचं जहाज बांधत होता..
दुसऱ्या बाजूला तोच उंचापुरा लाईटी चा खांब दिसत होता...तेच पत्र्याच शेड...

आणि बंदर देखील तेच...अगदी तसंच.......!!!!!






वरील गोष्टीचा कोणत्याही वास्तविक घटनेशी, स्थळाशी पात्राशी काहीही संबंध नाही कथा पूर्णतःह काल्पनिक असून
कथेद्वारे कोणत्याही अंधश्रद्धे च समर्थन केल गेलेलं नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी...आणि कृपया आपल्या मौल्यवान प्रतिक्रिया आणि सुचना कळवाव्यात...


लेखक- सुशिल सूर्यकांत पाडावे
8286018514