काही दिवसा नंतर अनिल पुन्हा एकदा डॉक्टरांला भेटायला गेला.
"कसे आहात आत्ता, काही फरक जाणवतोय का?
डॉक्टरने स्मित हास्य देत विचारले
"ठीक आहे डॉक्टर पण पूर्ण पणे नाही, काही आजारा बद्दल ऐकलं, किंवा कुणी मेल की त्या आजारांची किंवा मरणाची भीती परत जागी होते, हो पहिल्या पेक्षा खूप कमी आहे, पण आहे"
"हे बघा तुमचा आजार काही साधा सर्दी खोकला नाही की लगेच ठीक होईल, याच्या साठी थोडा वेळ, संयम आणि परिश्रम द्यावा लागेल".
"तरी किती दिवस लागतील डॉक्टर?
अनिलने बारीक स्वरात विचारल
"माणसाला शर्ट घट्ट झालं म्हणून दुकानात जाऊन शर्ट नाही बदलायचंय, इथे पूर्ण माणूसच बदलायचा आहे, वेळ तर लागेलच ना, सहा महिने ते वर्ष ही लागू शकते, पण एक गोष्ट लक्ष्यात ठेवा तुम्ही नीट होण्याची मनापासून तयारी दाखवली आणि थोडा माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही नक्की ठीक होणार"
डॉक्टर हसत हसत बोलल्या.
"हो डॉक्टर विश्वास तर आहे पण राग मानू नका लोक किंवा तो मेडिकल वाला त्या दिवशी बोलत होता की ह्या एवढ्या गोळ्या जास्त दिवस खाऊ नका, चांगल्या नसतात त्या"
अनिलच्या ह्या उद्गारावर डॉक्टर खूप शांत पणे बोलल्या.
"नाही नाही राग मानण्याचं यात काहीच नाही, आम्हाला सवय असते हे सगळं ऐकण्याची, मी माझ्या पेशंटना एकच गोष्ट सांगते कि तुम्हाला कोणाचे ऐकायचे ते तुम्हीच ठरवा डॉक्टरचे कि मेडिकल वर काम करणाऱ्या मुलाचे"
डॉक्टरने पाण्याचा एक घोट घेतला आणि बोलणे पुढे सुरु ठेवले
"मनोरोग हा खूप खोल आणि मोठा विषय आहे, आम्ही त्यावर वर्षांनुवर्षे अभ्यास करतो, खूप मेहनतीने डिग्री मिळवतो, नेहमी नवनवीन येणाऱ्या औषधां बद्दल आणि मनोविज्ञानात होणाऱ्या चढ उतारा बद्दल कटाक्षाने जिज्ञासा ठेवतो, पण जेव्हा असे कुणी बोलते तेव्हा मला राग नाही तर हसू येते. तुम्हाला माहित आहे का किती प्रकारचे मनोरोग असतात.
मेंटल डिसऑर्डर म्हणजे मानसिक विकृती ज्यात माणसाचे विचार, भावना, स्वभाव, मनस्थिती एक वेगळ्या प्रकारची बनते आणि ती स्वतःसाठी किंवा इतरांसाठी घातक असू शकते.
पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे व्यक्तित्व विकार, या मध्ये माणसानं मध्ये किती तरी प्रकारचे आगळे वेगळे स्वभाव असू शकतात, जसे गर्दीला किंवा माणसांमध्ये मिसळण्याची भीती, संशयित स्वभाव.
आणखी किती तरी प्रकार आहेत पर्सनॅलिटी डिसऑर्डरचे.
मानसिक तणाव, स्किझोफ्रेनिया म्हणजे स्मृती भंग, ओब्सेससिव्ह कॉम्पल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे प्रेरक-बाध्यकारी विकार, कॉन्व्हरसिओन डिसऑर्डर म्हणजे रुपांतरण डिसऑर्डर, फोबिया म्हणजे कुठल्या ही प्रकारची भीती, ओव्हर किंवा लोवर सेक्शुअल डिसऑर्डर म्हणजे अति किंवा कमी लैंगिक रस किंवा विकार.
असे खूप सारे मनोरोग आहेत जे खरंच खूप घातक असतात आणि ज्या साठी उपचाराची गरज असते, पण लोकांना मध्ये एक खूप मोठा गैरसमज आहे कि आम्ही फक्त वेड्या लोकांचे डॉक्टर आहोत, आणि त्या मुळे किती तरी लोक आपल्या मानसिक स्थितीला त्यांचा स्वभाव समजून बसतात आणि पैसे आणि वेळ वाया घालवतात आणि महत्वाचे म्हणजे किती तरी नाते जसे नवरा बायको, आई वडील आणि मुलं, भावंडं, इत्यादी मोडकळीस येतात.
असो मी तुमचा निर्णय तुमच्या वर सोडते, जर तुम्हाला ठीक होण्याची इच्छा असेल आणि माझ्या वर विश्वास असेल तर ट्रीटमेंट बंद करू नका, नाही तर पुढे तुमची मर्जी"
"नाही नाही डॉक्टर मला पूर्ण विश्वास आहे तुमच्या वर आणि मी उपचार पूर्ण करणारच, पण कधी कधी मन भटकळत, मनाला कस ताब्यात ठेवू किंवा रमवू ते सांगा ना"
अनिलने खुर्ची पुढे सरकवत विचारले.
"तुम्हाला काही छंद वैगेरे नाही आहे का, म्हणजे कुठल्या गोष्टीची आवड?
"मला चित्र काढायला आणि कविता लिहायला आवडतात, चित्रकला चांगली आहे माझी"
अनिल आपले बोलणे संपवत नाही तेवढ्यात डॉक्टर उत्साहाने बोलल्या
"अरे वा खूप छान, बघा देव देखील तुम्हाला मदत करतोय"
"म्हणजे?
अनिलने आश्चर्याने विचारले.
"म्हणजे डॉक्टर्स डे च्या निमित्ताने मेडिकल असोसिएशनने डॉक्टर आणि पेशंट साठी पेंटिंग कॉम्पिटिशन ठेवलं आहे, तुम्ही पुन्हा एकदा चित्र काढण्यास सुरवात करा, काढून फेका ते भीतीचे काळे रंग डोक्यातून आणि रंगवून टाका त्या काळपटलेल्या मेंदूला, आज पासूनच सुरवात करा, तुमच्या कडे फक्त २०-२५ दिवस आहेत, १ जुलैला आहे कॉम्पिटिशन, हे २०-२५ दिवस सगळे विचार बाजूला ठेवा, औषधे वेळेवर घ्या आणि मिळेल त्या मोकळ्या वेळेत फक्त आणि फक्त कोऱ्या कागदावर रंग भरा"