Aajarnch Fashion - 20 in Marathi Moral Stories by Prashant Kedare books and stories PDF | आजारांचं फॅशन - 20

Featured Books
Categories
Share

आजारांचं फॅशन - 20

व्हाईट कोट सिन्ड्रोम एक नवीन नाव, एक नवीन आजार अनिलला माहित पडला, हायपोकॉन्ड्रियाक माणसाचं आणखीन एक वैशिष्ट्य असत त्यांना कुठल्याही आजाराच्या तळा गळाशी जाऊन त्याची माहिती घेण्याची सवयी असते आणि आज कालच्या इंटरनेट युगात हि माहिती इंटरनेटवर खूप सहज आणि मोफत उपलब्ध असते, आणि अश्या माहिती शोधण्याच्या सवयीचा त्यांना फायद्या पेक्षा तोटाच जास्त असतो, कारण इंटरनेट वर जी माहिती असते ती बहुतांशी वेळा खूप वाढवून चढवून आणि आजाराला खूप मोठं करून लिहलेली असते आणि त्या मुळे डोक्यामध्ये माहिती पेक्षा भीतीच खूप भरली जाते, म्हणून अश्या पेशन्टने इंटरनेट वरील माहिती वाचणं टाळणं आणि काहीही प्रश्न असतील तर त्यांची उत्तर आपल्या डॉक्टरला विचारून आपल्या मेंदूची तहान भागवणं केव्हा ही चांगलं.

आज अनिलच्या डोक्यात भीतीने पुन्हा सरड्याची जीभ बाहेर काढली होती, बी पी वाढलेलं होत, आणि बी पी मुळे ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो हि नवीन माहिती आणि हार्ट अटॅक चा ही धोका असतो हे तर त्याला पहिल्या पासून माहित होतं.

त्या दिवशी तो थोडसं जेवण, हो फक्त जेवण पार्सल घेऊन घरी गेला, पण जेवणात रस नव्हता, मेंदू आणि चित्तात फक्त भीती आणि भीती भरलेली होती, काय करावं कळत नव्हतं, त्याने बी पी ची आणि डॉक्टर माधवने दिलेल्या गोळ्या खाल्ल्या आणि शांत बेड वर विचार करत पडला. पण मन लागेना, उठून बसला, स्वतःच्या ह्या परिस्थितीची त्याला दया आणि राग देखील येत होता, रडायला येत होत, डोकं दोन्ही गुढघ्यांच्या मध्ये लपवून आज अनिल खरंच रडला, एखाद्या लहान मुलासारखा ढसा ढसा रडला, त्याचं डोकं छातीजवळ घेऊन, त्याला घट्ट धरून सावरायला किंवा समजवायला कुणीच जवळ नव्हतं.

थोड्या वेळाने स्वतःच स्वतःला सावरले आणि शांत झाला आणि अचानक डॉक्टरने सांगितलेली ग्रॉउंडिंग टेक्निक त्याला आठवली, ज्या मध्ये पाचही इंद्रियांचा उपयोग करायचा असतो, आणि त्याने डॉक्टरने सांगितल्या प्रमाणे, रंग शोधणे, आवाज ऐकणे, इत्यादी करण्यास सुरवात केली, १०-१२ मिनिटे ते करण्यात निघून गेले आणि त्याला थोडं बर वाटलं, थोडा विश्वास देखील आला कि खरंच जर मना पासून प्रयत्न केला तर परिस्तिथी बदलू शकते.

स्वतःला सावरत, समजावत त्याने आणलेले जेवण खाल्ले आणि झोपी जाण्याच्या प्रयत्नात बेड वर पडला, विचार थोड्या फार प्रमाणात कमी झाले होते, आणि कदाचित औषधांमुळे झोपही त्याला पटकन लागली.

सकाळी तो खूप फ्रेश उठला, चांगली झोप झाली होती, दारू न पिण्या मुळे डोकं वैगेरे दुखण्याचा त्रास होत नव्हता, त्याला थोडस का होईना वेगळं वेगळं जाणवत होतं.

अनिलने त्या दिवशी देखील पूर्ण वेळ कामात घालवला आणि रात्री न पिताच बाहेरून जेवून आला, भीती काय पूर्ण गेली नव्हती पण तो लढत होता, उदास नक्की होता पण सावरण्याचा प्रयत्न करत होता.

हायपोकॉन्ड्रिया किंवा आजाराचा भ्रम ह्या आजाराचं एक वैशिष्टय असत, तो एकटा कधीच येत नाही, त्याच्या सोबत, इंगजायटी म्हणजे चिंता, डिप्रेशन, निराशा, एकटे पणा, इत्यादी घेऊनच येतो.

अनिलने कसे बसे दिवस ढकलणे सुरु ठेवले, दिवस आड दिवस जात गेले आणि औषधांचा प्रभाव दिसू लागला, अनिलचे बाकीच्या कारणांसाठी डॉक्टर कडे जाणे खूप प्रमाणात कमी व्हायला लागलं आणि डॉक्टर माधवने सांगितल्या प्रमाणे अनिल वेळो वेळी त्यांना भेटत राहिला आणि डॉक्टर देखील त्याला वेळो वेळी योग्य सल्ला देत होत्या आणि गरजे प्रमाणे औषधांचें डोस कमी जास्त करत होते.

सविताला अनिलची काळजी नव्हती असं नव्हतं, ती देखील अनिलच्या नकळत तो नसताना घरी जाऊन आजूबाजूवाल्यांकडून, गॅरेज वरच्या छोटू कडून आणि त्याच्या जवळच्या मित्रां कडून त्याची वेळो वेळी हाल हवा विचारात होती, अनिलच्या वागण्यातला बदला मुळे तिला खरंच खूप आनंद आणि अभिमान होत होता, तिचा घरी परत येण्याचा खूप तीव्र मानस होता पण तिचा मेंदू मनावर भारी पडून तिला रोखत होता. तिला एक प्रकारची भीती होती कि जर ती परत गेली आणि अनिलने पुन्हा पिणे आणि परत तसेच वागणं सुरु केलं तर, म्हणून ती लांबूनच त्याच्या ह्या लढाईत त्याचा विजय व्हावा त्या साठी त्याला एक प्रकारची अदृश्य साथ देत होती आणि देवाकडे रोज न चुकता प्रार्थना करत होती.