प्रेम म्हणजे प्रेम असत- ३
जय ने रितू चे बोलणे शांतपणे ऐकून घेतेले.. पण रितू चे बोलणे ऐकून झाल्यावर मात्र जर जोर जोरात हसायला लागला,
"काय रितू तू...अशी कशी ग?" त्याचं बोलण ऐकून रितू जरा वैतागली.. तिने जय कडे जर चिडूनच पाहिलं.. आणि मग ती बोलायला लागली,
"तुझ्याशी बोलले स्पष्ट.. स्पष्ट बोलण सुद्धा बंद करू का जय? सांग तू.. आणि आता जे वाटत ते बोलायला पण बंदी घालणार का रे? माझं मन कुठे करू हलकं?" रितू थोडी उदास होऊन बोलली..ही गोष्ट जय च्या लक्षात आली.. आणि तो थोडा ओशाळला..
“सॉरी ग.. आय अॅम सॉरी!! पण मला नव्हत माहिती..." डोकं खाजवत जय बोलला,
"काय नव्हत माहित?"
"हेच की तू..आणि तूच घाबरट आहेस इतकी! आणि खूप निगेटिव!"
"बोल बोल काहीही बोल... आता मी आहे तशीच तुझ्यासमोर आहे..मी कोणताही मुखवटा घालून नाही येत तुझ्यासमोर!!"
"ओह.. कोणताही मुखवटा नाही!! उत्तम!! पण इतकी का नकारात्मक विचार करतेस ग? पास्ट मध्ये तू एका मोठ्या अपघातातून बचावली आहेस आणि त्यामुळेच तू भीतीनी तुझा आज जगायला नकार देतीयेस? तु मरण डोळ्यांदेखत पाहिलं म्हणून तुला कदाचित भीती वाटते... पण मी तर म्हणतो तू एकदा वाचलीस म्हणजे तुला खूप आयुष्य आहे... तुला हे आयुष्य बोनस मिळाल आहे... आणि तेच सुंदर आयुष्य जगायला तुझा नकार का?" जय खूप मनापासून बोलत होता..
"आय नो रे.. पण परिस्थती मुळे झालेत माझ्यात बदल.. एकदम कशी बदलू..? कशी होऊ एकदम सकारात्मक??"
"माझ्यावर तरी विश्वास आहे ना?"
"येस.."
"गुड.. आणि तू किती पुढचा विचार करतेस...उद्या कोणी पाहिलाय? कोणालाही माहित नसत,कोण कधी मरणार.. मरण कधी येऊ शकत... मी आज मधे जगतो...उद्याचा विचार करून मी माझा आज खराब नाही करू शकत! मला माझा आज तुझ्याबरोबर घालवायचाय! मी स्वतः डॉक्टर आहे! मरणाची आणि मरण पाहण्याच्या भीती कधीच गेलीये माझी...मी रोज मृत्यू पाहतो... आधी मी सुद्धा घाबरायचो मरणाला.. पण नंतर हळू हळू काही गोष्टी समजत गेल्या. कधी काही अपेक्षा नसतांना लोक जातात आणि कधी लगेच मरतील अस वाटत असतांना किती तरी वर्ष आनंदात जगलेल पाहिलंय मी... मला आधी प्रश्न पडायचा... मी कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेऊ? हे माझ्यासाठी आय ओपनर होता.. मग हळू हळू मला कळत गेलं,आपल्या हातात काहीच नसतं...आपण ठरवून थोडी जन्म घेतो? तसच मरण तर नाहीच आपल्या हातात...मग ज्या गोष्टीबद्दल मला काही खात्री नाही त्याचा विचार करून मी आहे ते आयुष्य तडफडत जगू का? नो नो... ते मला जमणार नाही. आय लव्ह यु.. मी तुला पहिल्यांदी पहिले तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो.. तू माझ्याशी तेव्हा बोलली देखील नव्हतीस.. पण मी तुल जेव्हा जेव्हा पाहायचो, तेव्हा तेव्हा तुझे डोळे माझाशी संवाद करायचे.. तुझ्याकडे पाहूनच मला आपलेपणाची जाणीव व्हायची..आणि मी मला जे वाटत ते बोललो आता तुझ्याशी.. माझ्यासाठी आत्ताचा क्षण हा सगळ्यात महत्वाचा.. हा क्षण जगला नाही तर मी काय जगलो.. सो आहे तो क्षण मी जगतो! पूर्ण पणे जगतो...अगदी असा जगतो की हाच माझा शेवटचा क्षण आहे..आणि थोडा फार माझाही वैद्यकीय उपचारांवरचा अभ्यास आहे म्हणून माझा त्यावरही विश्वास आहे... ”
“काय बडबड करतोयस?"
"जे खर आहे ते.." जय हसून बोलला..
"हसू नकोस रे... आणि तू जे बोलतोयस ते पुस्तकात वाचायला खूप सुंदर आहे! पण खऱ्या आयुष्यात ते इतक सोप्प नसत ना? मे बी मी निगेटिव झालीये! पण मी खूप प्रक्टीकल आहे रे... माझ्यामुळे कोणाला त्रास होणार असेल तर मी ते करूच कशाला? आणि माझ्या हातावर आयुष्याची रेष लहानच आहे... म्हणजे मी फार वर्ष जगेन अस मला वाटत नाही..”
“हाहा.. अगदी बरोबर! पुस्तकात वाचायला छान वाटत पण तस कधी जगून पाहिलं आहेस का?... खर सांगू,मी फक्त बोलत नाही..तर मी माझ आयुष्य अगदी तसच जगतो! आणि मी तुझ्यापेक्षा जास्ती प्रक्टिकल आहे! हातावरच्या आयुष्याच्या रेषेबद्दल बोलायचं झाल तर,माझ्या हातावरची आयुष्याची रेष सुद्धा लहानच आहे.. आता बोल! मी लवकर मरेन म्हणून मी आज जगण सोडून देऊ? माझ्या समोर असलेले सुंदर क्षण जाऊ देऊ? आणि खर सांगायचं तर माझा हातावरच्या रेषांवर विश्वास नाही.... मला मान्य आहे,तेही एक शास्त्र आहेच आणि ते बरोबर असेलही.... पण बरोबर असेल अशी कोण खात्री देऊ शकत का? खात्री दिली तरी त्यावर काही उपाय असतो का? होणार आहे ते होणार तर आहेच..त्यात आपण किती ढवळाढवळ करायची? आणि माझा वैद्यकीय शास्त्रावर जास्त विश्वास आहे! तू म्हणजे ना... वेडी आहेस..खरच! हात बघून तू तुझ आयुष्य कधी संपणार हे ठरवलस? असं होत नसतं.. अगदीच बिकट परिस्थिती आली तर मी आहे कि.. प्रचलित डॉक्टर आणि माझ्याबरोबर बरेच हुशार डॉक्टर!! अमर तर कोणीच नाहीये! तुही नाही आणि मी ही नाही.... मी उद्या मरेन का परवा मरेन असा विचार करत आज संपवून टाकू का? मला माझ्या आयुष्यातले क्षण तुझ्याबरोबर घालवायचे आहेत! आणि त्रासाच म्हणशील तर,तू माझ्या आयुष्यात आली नाहीस तर मला त्रास होईल.....कळलं का? आणि कोण जाणे,तुझ्या आधी मला मरण आल तर? कोण सांगू शकत?” रितू ने जय चे शेवटचे वाक्य ऐकले. आणि नकळत त्याच्या तोंडावर हात ठेवला..
“काय बोलतो आहेस? तू कसा मरशील लवकर? तुला तर खूप लोकांचे आशीर्वाद मिळाले आहेत...तू खूप वर्ष जगणार!! आणि माझ पण तुझ्यावर प्रेम आहे.... म्हणूनच तुझ्याशी इतक्या मोकळेपणानी बोलतीये! मला इतकच वाटतंय माझ्यामुळे तुला त्रास ह्यायला नको!”
“मला नाही होणार त्रास.... तुझ्यामुळे तर अजिबातच त्रास होणार नाही!! आणि मी तुलाही काही त्रास होऊन देणार नाही! तुला माहितीये का? मी तुला पहिल्यांदी पाहिलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो... दिवसेंदिवस मी तुझ्यावर अजूनच प्रेम करायला लागलो! इतक प्रेम का कस ला माझ्याकडे उत्तर नाही.... तुला पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो... प्रेम काही बघून होत नसत... हे तू मान्य करतेस ना? आधी तर मला तुझ्याबद्दल काहीच माहित न्हवत आणि मग मी हळू हळू तुला समजुन घेतलं! मला जे वाटल ते मी तुला सांगितलं...आणि मी ठरवलं,तुझ्याबरोबर राहून माझ आणि तुझ आयुष्य अजून खूप सुंदर करायच!! विश्वास ठेव,मी तुझ आयुष्य रंगांनी भरून टाकेन मी...तुझी सगळी स्वप्न,सगळ्या आकांशा मी पूर्ण करेन.. मरणाला घाबरून तू तुझा आज खराब करू नकोस हे नेहमी लक्षात ठेव.. मी तुझ्यावर प्रेम केलय...आणि प्रेमात काही अटी नसतात.. प्रेम म्हणजे प्रेम असत.. मोकळ्या मनानी केले कि ते प्रेम असत... ओह माय गॉड!!! वा वा..मी कविता करायला लागलो! हाहा..”
“तू इतका पॉझीटीव कसा आहेस रे?... मला जेव्हा जबरदस्त धक्का बसला आणि मला मानसोपचार तज्ञा कडे जावं लागल आणि जेव्हा हे नातेवाईकांना कळल तेव्हा ते कसे वागले मी पाहिलंय! लोक माझ्याकडे वेडी म्हणून पाहायला लागले...नातेवाईक सुद्धा बदललेले पहिले आहेत मी.. खरच जेव्हा मला माझ्या जवळच्या नातेवाईकांची गरज होती तेव्हा ते कधी फिरकलेही नाहीत.... मला गरज होती आणि ते एकदम बिझी झाले.... नंतर मीही ठरवलं,माझ आयुष्य मी एकटीनी जगू शकते..कश्याला कोणाच्या उपकाराची वाट पहायची? आणि तेव्हाच तू आलास माझ्या आयुष्यात! मित्र म्हणून आलेलास आणि नंतर तू म्हणलास प्रेम करतो! पण मी ते मान्य करायला तयार नव्हते! सगळच अनपेक्षित होत माझ्यासाठी म्हणून ते मी मान्य करायला तयार होत नाहीये! प्रेम स्वतः चालत माझ्याकडे आल तरी मी ते मान्य करत नाहीये...गम्मत आहे ना सगळी...” स्वत:वर हसतच रितू बोलली...
क्रमशः