कादंबरी –जिवलगा
भाग- ३१
------------------------------------------------------------------------------
अनिता ,सोनिया आणि नेहा रोजच्या प्रमाणे ऑफिससाठी म्हणून बाहेर पडल्या ,आणि
मावशीच्या घरी मधुरीमाने तिच्या ज्या दोन कार्यकर्त्यांना घराची काळजी घेण्यासाठी
म्हणून ठेवले होते ..ते दोघेजण नेहाला भेटण्यासाठी आले ,त्यांचे बोलणे होण्यात
या दोघींना उशीर झाला असता म्हणून.
.त्या दोघी म्हणाल्या ..नेहा ..तू यांच्याशी बोलून मगच ऑफिसला ये ,
तुला आज उशीर होईल हे ऑफिसमध्ये सांगतो आम्ही .
सोनिया आणि अनिता ऑफिसमध्ये पोचल्या
आणि थोड्याच वेळात त्यांच्या समोर खुद्द
हेमू पांडे येऊन बसलाय याचे त्या दोघींना आश्चर्य वाटले ..
तुम्ही - मिस्टर हेमकांत पांडे द सिस्टीम बॉस..?
अरे बापरे ..! कसे काय ?आज इकडे वाट केलीत ?
आम्ही दोघी तर तुमच्या लिस्ट मधल्या ..आय मीन .. सेक्शनमध्ये नसलेल्या आहोत
मग आमच्याशी तर नक्कीच तुमचे काही काम नाहीये ..
क्यू ? बोला बोला हेमू पांडे जी ..!
आज आमची आठवण कशी काय झाली बाबा ..?
खुर्चीवर बसत हेमू पांडे म्हणाला ..
पुरे करा न अनितादीदी ,ओ सोनियादी.. उगीच फिरकी घेऊ नका ..
आज नेहा , तुमची मैत्रीण अजून आलेली नाही ऑफिसला ..
तुम्हाला विचारावे म्हणून आलोय आणि सुट्टी वगेरे बद्दलचा अर्ज वगरे आहे का तुमच्या सोबत दिलेला ?
हो हो ..आम्हाला इतकी सफाई देऊ नको हेमू पांडे ..
तुझी कलीग आहे हे सगळ्यांना माहिती आहे..
पण,नेहा आता तुझ्या मनातली मैत्रीण आहे “ , हे मात्र फक्त आम्हा दोघींना माहिती आहे.
तेव्हा ,जास्त टाईमपास नको करू
तुझे खरे काम काय आहे ? ते बोल , सांगून टाक पटकन ..!
यस., या बद्दल आताच तुमच्याशी बोलणे आवश्यक आहे म्हणून ..आलोय
आणि लकीली अजून नेहा पण आलेली नाहीये आज..
दीदी –तुम्ही आणि मधुरिमादीदीने खूप विचार करून आणि ठरवून ..
नेहाला माझ्या सेक्शनला पाठवले आहे .त्यातला तुमचा हेतू , उद्देश मला माहिती आहे , आणि
याबद्दल मी तुम्हाला काही वावगे बोलावे असे काहीच नाही .
उलट याबद्दल thanks म्हणेन तुम्हाला .
दीदी – दुम्ही दोघी आणखी एक काम करा ,हेच सांगायला आलो आहे मी ,असे समजा .
आता तुम्हीच प्रेमाची चाबी द्या आमच्या गाडीला तरच मामला पुढे जाऊ शकेल ,
नाही तर ..आहे तिथेच ..राहून जाईल आमची प्रेमाची सुरूच न झालेली गाडी .
हेमू पांडेची इच्छा आणि त्यातल्या तक्रारीचा सूर ऐकून ..
सोनिया आणि अनिता दोघी हसू लागल्या –
अरेरे हेमू.. किती रे वाईट हे .. . आम्हाला अगदी कबुल आहे की –
या बाबतीत आमची मुलगी जरा आहेच थोडी कमी डोक्याची ..!
तिला असे नाही समजणार ..काही तरी आयडिया कराव्या लागणार हेच खरे ..!
हो ना दीदी ..कुछ तो सोचो ..कुछ तो करो ..
आता हेच बघा ना –महिना होऊन गेलायआम्ही सोबत काम करतो आहोत .पण,
ही नेहा आल्यापासून माझी कलीग म्हणूनच असते, कायम तसेच बोलते आणि सतत वागते सुद्धा ,
आमच्यात मैत्री होईल, आणि पुढे काही होईल ..असे सध्यातरी मला अजिबात वाटत नाही.
कारण अनेक वेळा मी लीड घेऊन सूचकपणे सांगण्याचा प्रयत्न करून पाहतो,
पण, ही मुलगी
माझ्याकडे तिचा “बॉस “या भावनेतूनच बघते , बोलते .
सांगा तुम्ही काय करावे ? आणि इतक्यावर बोलून बसलोच तर ..
तिच्याकडून प्रतिसाद मिळेल की नाही ?,..ती कशी react “ होईल ?
उगीच प्रोब्लेम होऊन बसू नये ..मी स्वतःला कंट्रोल करून गप्प बसून आहे .
म्हणून आता तुम्हीच काही करावे असे सांगयला मी आलो आहे.
सोनिया म्हणाली ..अनिता ..नेहाला आज उशिर होणार आहे, हे एक दृष्टीने चांगलेच झाले म्हणयचे .
निदान या हेमू पांडेने त्याची “मन की बात “ तर आपल्याजवळ बोलून दाखवली ..यातून एकच
अर्थ निघतो ..हेमू पांडे ..घायल –प्रेमी ..आहे ..तेव्हा आपणच त्याला मदत केली पाहिजे.
सोनिया म्हणाली .. हेमू..आपण काढू मार्ग यातून नक्कीच ..
आता आम्हाला आमचे काम करू दे
तुझे बरे विचारले ,
तू काय बॉस माणूस आहेस , कुणी काही विचारलेच तर ,तुझे उत्तर तयार ..
काही नाही ..सिस्टम चालू आहे की नाही ..? चेकिंग सुरु केली आहे..त्यात बिझी आहे.
पण आम्हाला तर म्हणतील ..गप्पा पुरे ..कामाला लागा..!
त्यांचे बोलणे ऐकून हेमू पांडेला हसू आले ..
ओके ,येतो मी आता . प्लीज ,सुरु करा तुमचे काम !
हेमू पांडे तिथून निघाला – जातांना विचार चालूच होते ..
तो मनात म्हणाला ..सोनिया आणि अनिता आपल्याला मदत करणार्या आहेत , एरव्ही ..
या नेहाला समजून घेणे अवघड आहे रे बाबा .
हेमू पांडे ..आणखी काही सेक्शन फिरून स्वतःच्या फ्लोरवर आला . नेहाची खुर्ची सोडून
बाकी सगळ्या खुर्च्या भरलेल्या दिसत होत्या .
हेमू पांडे ..त्या रिकाम्या खुर्चीकडे पहात होता .., त्याच्या मनात विचार येत होते ..
पहिली नोकरी मिळाली ..ती याच ऑफिस मध्ये ..गोल्ड मेडल मिळवणारा स्कॉलर आपल्या
आपल्या ऑफिस मध्ये असायलाच हवा ..असे मधुरीमाने बिग -बॉस .विश्वजित सरांना सुचवले ,
आणि हेमू पांडेला ..हा व्हीआयपी जॉब मिळाला . एकदम नवखा तरुण..बॉस म्हणून आपल्या
समोर मिरवणे ..ही गोष्ट सिनियर लोकांना सहन होणे अवघड होते .पण..हेमू पांडेने सगळ्यांशी
इतके छान जुळवून घेतले की ..सुरुवातीला अनेकांचा “नावडता झालेला हेमू पांडे “ आता त्यांचा
लाडका “पांडे जी “ झाला होता.
ऑफिस मधले लहान असो मोठे असो ..हेमू पांडे आणि त्याची नागपुरी ..हिंदी –मराठी बोलण्याची स्टाईल,
आपलेपणाचे वागणे ..हसतमुख आणि प्रसन्न चेह्रेयाने सगळ्यांना प्रभावित करीत गेले .
विश्वजित सर ..मधुरीमाला नेहमी म्हणयचे ..मधुसिस्टर ..तुम्ही खरेच एक गुणवान हिरा दिलाय
आमच्या ऑफिसला ..”
इतक्या लहान वयात इतकी समजदारी ..फार कमी लोकात पहायला मिळाली आहे मला .
त्यांना मधुरिमा म्हणाली ..
विस्वजीत सर – एका सामन्य आणि साधारण अशा परिवारातून पुढे आलेला हा बुद्धिमान ,
कर्तबगार मुलगा आहे. याचे आई-वडील दोघे ही शिक्षक ..लहान खेड्यात राहून ज्ञान –दान
करणरे साधी माणसं , हे धनवान नाहीत , पण यांच्या जवळ असलेलेल बहुमोल असे संस्कार –धन “
याचे भांडार अपरंपार आहे. या परिवारात .
मी या परिवाराला ओळखण्याचे कारण ..आमच्या हा परिवार आमच्या संस्थेच्या उपक्रमात
म्हणजे तुमचे दोस्त ..रणधीरच्या सामाजिक उपक्रमात हेमू पांडेच्या परिवाराचा सक्रीय सहभाग आहे.
आमच्या तिकडे जाण्याने ..हा हेमकांत पांडे “ माझ्या दृष्टीस पडला ..आणि मदती अभावी याची
करिअर वाया जाऊ नये म्हणून ..मी आणि रणधीरने अगदी ठरवून त्याला इथ पर्यंत आणले ..
आणि आता त्याला तुमच्या हवाली केले आहे..
तेव्हापासून हेमू पांडे ..ऑफिससाठी एक सर्वप्रिय माणूस झाला होता .
ऑफिसमध्ये ..नव्या जमान्यातील तरुण ,सुंदर ,स्मार्ट मुलींची काही कमतरता नव्हती .
जिथे हेमू पांडे असतील ..तिथे या पोरींचा घोळका .भवती जमा व्हायचा .किती जणी त्याच्यावर
जी जान से मरत असतील “ काही हिशेब नव्हता .
त्याच्या भवताली कायम गोपिका भिरभिरत असत . त्यामुळे हेमू पांडे म्हणजे ..अगदी गोकुळीचा कान्हा “
आपल्या बद्दल असे कौतुकाने म्हटले जाते , याची कल्पना हेमू पांडेला होती.
हेमू पांडे ने घड्याळ्यात पाहिले जवळपास दोन तास उशीर झालेला होता . असा आणि इतका
उशीर होण्याची नेहाची ही पहिली वेळ आहे “ हे त्याच्या लक्षात आले.
..एकदा अचानक मधुरिमादिदींनी त्याला ऑफिस संपल्यावर फोन करून
भेटायला ये असा निरोप देतांना ..एक हॉटेल मध्ये बोलावून घेतले होते. त्या प्रमाणे ..हेमू पांडे
तिथे पोंचला .
मधुरिमादीदी त्याची वाटच पहात होती ..
हेमू मी तुला आज अगदी पर्सनल विषयावर बोलायचे आहे म्हणून बोलावले आहे.
हो दीदी , महत्वाचे बोलायचे असेल ,म्हणूनच तुम्ही बोलावलंय कल्पना आहे मला .
हे बघ ..हेमू ..तुझ्या आई-बाबांना चार मुली .नंतर झालेला तू एकुलता एक मुलगा आहेस.
तुझ्या सगळ्या बहिणीची लग्न झालीत .साहजिकच ..तुझे लग्न व्हावे ..तुझा संसार सुरु झालेला
तुझ्या आई-बाबांना पहायचे आहे. म्हणून ..तुझ्या साठी योग्य अशी मुलगी आम्ही शोधू का ?
हे विचारण्यासाठी तुला इथे बोलावले ..
आम्ही एखादी मुलगी शोधून ठेवली ..तर तू म्हण्य्चास –
दीदी ..मी तर माझ्यासाठी मुलगी पक्की करून ठेवलीय ..आमचे प्रेम आहे ,वगरे असे सांगितलेस
तर ..त्याचा विचार करावाच लागेल न रे आम्हाला .
बस का दीदी ..अशी शंका तुमच्या मनात आलीच कशी ?
असे काही असेल तर , सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन मी .
अजून पर्यंत असे काही नाहीये . तुम्ही माझ्यासाठी मुलगी सुचवावी जरूर ,कारण तुम्हाला
पक्के माहिती आहे ..आमच्या परिवारात कोणती मुलगी सहजतेने सामील होऊ शकेल.
मग मी काय सांगते ते नीट ऐक ..आणि तसे कर..
मी ज्यांचाकडे राहते ..त्या मावशींची भाची आहे..नेहा तिचे ..नाव.. नोकरीसाठी म्हणून इथेआलेली आहे
तसे तर तिला नोकरी करण्याची अजिबात गरज नाहीये , तिचा परिवार सुद्धा लहानशा गावात राहणारा
आहे, खूप मोठा आणि नावलौकिक असलेला तिचा परिवार विचाराने आणि कृतीनी अगदी साधा ,
नव्या विचारांचे स्वागत करणारा आहे.
ही नेहा ..तिच्या सोबत सध्या मीच असते ..इथली तिची पालक असल्यासारखी .
हेमू ..तिला आपल्याच ऑफिसात जोब मिळवून दिला आहे ,सध्या ..ती ग्राउंड फ्लोअरच्या कॅश सेक्शनला आहे.
आहे इंजिनियर , पण, मी विश्वजीतसरंना सांगून तिला हे काम द्यायला लावले ..ऑफिस वर्कचा
अनुभव यायला हवा . तिथे सोनिया आणि अनिता दोघी आहेत तिच्या मदतीला .
आता महत्वाचे ऐक ..
मी देखील सहा महिन्यासाठी रणधीरकडे चालले आहे , मावशी आणि काका ..ते तर आधीच गेले आहेत
युएस ला .
नेहाला अधिक जाणून घे तू ,
त्यासाठी तिची ट्रान्स्फर तुझ्या सेक्शनला सिस्टीम ऑफिसर म्हणून केली आहे.
सोनिया आणि अनिता तुला मदत करतील .
नेहा तुझ्यासाठी आणि तू नेहासाठी अगदी योग्य आणि अनुरूप आहात .
थोडक्यात ..तू नेहा ..तुझी झाली पाहिजे यासाठी तुझी हुशारी वापर .
कारण..नेहा ..दिसते तशी नाहीये ..वाटते भोळी ..पण तशी अजिबात नाहीये ..
तेव्हा ..कोरा कागज “ आहे तिचे मन .
म्हणून ही प्रेमाची गाडी ..स्टेशनवर तुलाच आणायची आहे.
हेमू पांडेला हे सगळे आठवले ..तो विचारातून भानावर आला ..
केबिनच्या काचेतून त्याला दिसत होते ..
त्याच्यासाठीची ,पण अजून त्याची न झालेली ..
त्याची .स्वप्न-सुंदरी ..नेहा येते आहे..
हेमू पांडेने ठरवले ..आता काय बी होवो ..
या नेहाला आपल्या मनातले सांगूनच टाकायचे ..
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढच्या भागात ..
भाग -३२ वा लवकरच येतो आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी ..जिवलगा
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.
९८५०१७७३४२
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------